बिनधास्त
जे करायचं ते करायला कोणाच्या बापाला आपण भित नाही
बाप म्हणतो, माझ्या बोलण्यावागण्याला मुळी रित नाही
बाप आपला लय शाणा, आपल्याला दारावर कधी घेत नाही
मेरा नाम मत लेना उगाच बोलतो, त्याच्या नावावर मी मुतत नाही
भन्नाट जगण्याचा मोह मला मुळीच आवरता आला नाही
बचपन से बिनधास्त,क्या सही क्या गलत, हिसाब केला नाही
उत्सव की उन्माद यात मी कधीच कुठे अडकत नाही
सेलिब्रेशन करतांना, सर्वस्व फुंकून टाकायला मी विसरत नाही
साब बोला, उसको आडवा केला, फिल्मी स्टाईल कधी जमलानाही
“आत, बाहेर” कितनी बार, आपुन ने साला कधीच मोजला नाही
साहेबच जामीनावर सोडवतो, आपून फिकीर कधी केला नाही
घोडा अपने बाये हात का खेल, निशाणा कधी फेल गेला नाही
शिक्षण, संस्कृती, समाज, नीती यांची बांधीलकी साला, सब झुट
पक्ष टिकवायला, वाढवायला, सणांचा काढावा लागतो नवा बुट
ढीनचॅक कार्यक्रम राबवला तरच गल्लीतली जमतात पोरं चिकार
बिल्डिंग मध्ये वाजवतात दार, रोख वर्गणी जमा, आपली पोरं हुशार
ढोल, ताशे,झांजा, चरस, गांजा याशिवाय येणार कशी झींग
डीजे वरच्या उडत्या चाली हेच तर आधुनिक रणशिंग
कधी दहिहंडी, कधी गणपती तर कधी सत्यनारायण घालतो
चिरीमिरी पोर आणतात, मोठा मासा फोनवर स्वतःच येतो
आगे गणपती पिछे तिन पत्ती, जागरण करायला रमीचा आधार
एखादा पेग लेनाच पडता, सोडा आईस सगळं तिथेच तय्यार
खाना चखना, रखनाईच पडता, बच्चे को बाटना पडता है ना यार
जीतनेके बाद अपनेकोच ठेंगा, जेब खाली फिकीर नही अपने को यार
आपल्या मागे जेव्हा असतो जमाव तेव्हाच वाढतो भाईचा भाव
आठवड्याला एक बॅनर, वाढदिवस, जयंती, मोर्चा, रस्तारोको, उठाव
अपना जिना, अपना मरना, किसी डायरी मे कोणी लिवला नाही
जब तक है जान, मान,सन्मान, जीने की स्टाईल, अपनेसे पंगा लेना नही
एक दिन तो सबको जानाईच है, अमृत पिऊन कृष्ण पण आला नाही
वक्त आयेगा तो भेजा फोड लेगा, पुलीस के गोलीसे अपनेको साला मरना नही