भ्रम
काय खरं? काय खोटं? सामान्य माणसाला कधी नाहीच कळत
इतिहास आणि वर्तमान, दोन्ही त्याला सारखेच असतात छळत
यशासाठी देव, अंगारा, वशिला कोणतंच सुत्र कधी कायम नसतं
मेहनत, समयसूचकता यांच गणित जुळलं, तर यश नक्की हसतं
कोणाचे म्हणणे खरे, कळत नाही कोणावर टाकावा विश्वास?
ज्याचा त्याचा नवीन सल्ला, कोणता मार्ग देईल यश हमखास?
कितीही शिकलं तरी यशाची हमखास खात्री कुणीच देत नाही
बाजारात शिक्षणाची बरीच दुकान, निवडता आपली मती सुन्न होई
आपल्या वेळेस कोणी उभे राहिलं याची उगाच पाहू नये कोणी वाट
तुमची मानसिक तयारी अशीच ठेवा, अडथळ्याचा कोणी घालो घाट
ज्याच्या मनी जिद्द, मेहनतीची तयारी यशाच्या पायरीवर त्याचेच नाव
संकल्प सिध्दीचा केलात तर कोणीही सहकारी मदतीस घेईल धाव
उंच सखल, उन पाऊस, यशापयश हा साराच आहे निसर्गक्रम
वादळ वाऱ्यातही नाव किनारी नेतो ज्याच्या बाहुत असतो दम
जग काय म्हणेल? याचा विचार करून वेळ नकाच फुकट दौडू
कौशल्य असेल तर तुम्ही कोणत्याही संकटाला शकाल भिडू
कष्टाशिवाय तुमची नाव पलीकडे जाईल हा आहे तुमच्या मनाचा भ्रम
स्वतःच्या बुध्दी आणि क्षमतेवरच ठेवा विश्वास घ्या थोडे जास्त श्रम