मळभ भाग 2

मळभ भाग 2

भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

दोन दिवसांनी प्रतिमाचा वंदनाला फोन आला, तिचा फोन म्हणता वंदनाने तो घाईघाईने कानाला लावला, “वंदना, मी तुझ्यावर खूप रागावले आहे?” “का गं,माझं काही चुकलं का?” “अग वंदे,एवढं महागडं गिफ्ट कशासाठी?” “अगं,महागडे कसले? आणि तू काय परकी आहेस का? आपल्या माणसासाठी करायचं नाही तर कोणासाठी करायचं? बरं कार्यक्रम निटनेटका झाला ना?तुझ्या मिस्टरांना आवडला ना? ” “अगं अगदी उत्तम, कुठे ही नाव ठेवायला जागा नाही, माझा नवरा तुझी स्तुती करत होता. तुझं प्रधान साहेबांजवळ चांगल वजन आहे म्हणाला.”

“छे गं,कसल वजनं आणि कसलं काय? मी त्यांना रिक्वेस्ट केली,त्यांनी ऐकली, बास, मोठी माणसं व्यवहारी असतात, ती कोणाचीही नसतात.” अग तुझ्या विनंतीला त्यांनी मान दिला,एवढा वेळ थांबले हे काय कमी आहे का?” “बरं बरं, मग आता तुला भरपूर रिकामा वेळ आहे,मस्त एंजॉय कर. जा दोघं,एखादी मोठी टूर करा.” “वंदना अग मुलाच्या बिझनेसमध्ये आधी ते मदत करत होते आणि आल्हाद आता मला म्हणतोय की मी सुध्दा त्याला मदत करावी. त्याने आपल्या कंपनीत टेंडर भरलयं तू पाहिलं असशील ना?” “प्रतिमा, कंपनीतल्या कोणत्याही गोष्टी, मी घरी येतांना डोक्यात ठेवत नाही. पण टेंडर भरले असेल तर मानेकडे डिटेल असतील.”

“अग सतीशच मला भेटून गेला तेव्हा सांगत होता,त्याने तुझ्याकडे फाईल नेली होती पण तू त्यावर काही रिमार्क मारला नाहीस म्हणत होता.” “अग तो काहीतरीच म्हणतोय,मी त्या दिवशी तुझ्या सेंडऑफच्या कामात होते तेव्हा बहुदा त्यांनी ती फाईल मला दाखवली असावी मी म्हणाले तु तुझे मत नोंदव आणि माझ्याकडे पाठव. त्यानंतर मी पूर्णपणे तुझ्या सोबतच तर होती.” “बऱ बरं, मग आता ती फाईल पहा, Nothing is objectionable,
We also don’t want to lose our reputation. Alhad already talked with Pradhan, just remind him, I hope you can do it. Your recommendation is more precious than your gift.” “बर मी पाहते, फक्त एक काम आवर्जून कर,आल्हाद ला यापूर्वी ज्या सप्लायरना त्यांनी माल सप्लाय केला असेल त्यांचे सेल नंबर पाठवून द्यायला सांग. Let me take their review. Sorry Pratima, please listen,we are good friends,We worked together, please don’t pressurize me for the sake of our friendship. I am very serious about my job. Even pradhan sir can’t force me.”

प्रतिमा यावर काहीच बोलाली नाही. वंदनाने दोन मिनिटे वाट पाहिली पण समोरून काही रिस्पॉन्स नव्हता. तरीही वंदना दोन मिनिटे कानाला मोबाईल लाऊन होती. वंदनाच्या लक्षात आलं आपली मैत्रीण तिच्या मुलाचे कोटेशन स्विकारलं नाही म्हणून नाराज आहे.

वंदनाने फोन ठेऊन दिला. दोन चार दिवसांनी प्रधान साहेबांनी वंदनाला केबिनमध्ये बोलावून घेतले., “मॅडम, तुमच्या टेबलवर काही purchase tender होते त्यात आल्हाद साने यांचं टेंडर होतं,त्याच काय झालं?” प्रश्न अचानक ऐकून, वंदना मॅडमना धक्का बसला, प्रधान साहेबांकडे प्रतिमाने शब्द तर टाकला नसेल ना, तरी सावरून त्या म्हणाल्या, “सर सतीश माने यांनी शॉर्ट लिस्ट केलेली नाही. माने यांना मी सांगितलं होतं की जर आल्हाद साने यांचं टेंडर कंपनीच्या अटीत बसत असेल तर त्यांचं नाव घालून आज मला ती शॉर्ट लिस्ट दाखवा.”

“मॅडम,तुम्ही सतीश जवळून ती शॉर्ट लिस्ट आजच मागवून घ्या आणि त्यात काही त्रुटी असेल तर तस साने यांना कळवा, pratima rang and told me we let not give opportunity for her son to progress when she served in company for 35 years devotedly.”

“Sir, she is putting pressure on us. Do you think she is right? If Sane qualifies our terms and conditions then we may think to put our order with their firm. But she should not take undue advantage.” ते ऐकून प्रधान सर त्यांच्या खुर्चीतून उठले, त्यानी वंदना मॅडम यांच्या समोर हात पुढे नेत शेक हॅन्ड केले.” Madm salute to you for your courage and sincerity . You are the Diamond of my unit.”

“सर, माझं काही चुकलं तर नाही ना? दोन दिवसापूर्वी प्रतिमा मॅडमचा मला फोन आला होता, बहुदा सतीश माने यांनी आमच्यात झालेला संवाद त्याला सांगितला असावा. पण कोणाला प्रमोट करणं किंवा फेवर करणं मला जमणार नाही मी तिला सांगितले, कदाचित आमच्या मैत्रीचा फायदा त्यांना व्हावा असा त्यांचा आग्रह असावा.” “Vandana madam, I am proud that I have an honest staff like you. I have never ever imagined that you are so confident about your decision. Keep it up, you have full support .

त्या नंतर काही काळ प्रतिमा आणि वंदना यांची मैत्री दुखावली, दुरावली होती. वंदनाने दोन तीन वेळा आपल्या मैत्रिणीच्या खुशालीसाठी फोन केला पण तिने तो उचलला नव्हता. वंदनाला खूप वाईट वाटले. इतके वर्ष हिच्याशी बहिणीप्रमाणे वागले, तिचं मन जपण्याचा प्रयत्न केला, आज तिच्या मुलांचं टेंडर मी पास केलं नाही म्हणून एवढ्या वर्षांची मैत्री क्षणात तोडून टाकली, तिने विचारायचे होते की तू आल्हदच टेंडर का नाकारले?

जुने सप्लायर जे पंधरा वर्षे किंवा त्याहून अधिक वर्ष मटेरील कंपनीला क्रेडीटवर देतात त्यांना मी अचानक डावलले असते तर त्यांनी त्याचा काय अर्थ काढला असता? मुख्य म्हणजे मोठ्या सप्लायरना माल क्रेडिटवर देणे परवडते तसे साने एंटरप्राइज यांना परवडेल असते का? आणि लोकांनी मैत्रिणीच्या फेवरमध्ये काम केलं आरोप केला तर काय शोभा झाली असती?

प्रतिमा चांगली मैत्रीण आहे यावर वंदनाचा विश्वास होता पण मुलाच्या स्वार्थासाठी तिने एवढ्या वर्षांची मैत्री लाथाडली हे पाहून ती दुखावली. तिने ही गोष्ट आपल्या मिस्टरांना कधीचच सांगितली होती. ते म्हणाले “जग हे असचं आहे, तू बाहेरच का सांगतेस मुलांच तरी वेगळं आहे का? जोपर्यंत त्यांच तू ऐकशील ते तुझा आदर करतील, मान राखतील पण त्यांना तू विरोध केलास, त्यांच्या मागण्या नाकरल्या तर ते ही बंड करणारच मग प्रतिमाचं काय?” तरुण वंदनाचा प्रतिमा बद्दल आग्रह होता की ती एक ना एक दिवस प्रतिमा स्वतः तिला फोन करेल.

पहाता पहाता पाच सहा महिने निघूनही गेले. दरम्यान वंदनाने चार पाच वेळा प्रतिमाला फोन करून तिची खुशाली घेण्याचा प्रयत्न केला. त्या काळात आलेल्या प्रत्येक सणाला तिला शुभेच्छा पाठवल्या. त्याला मात्र ती शुभेच्छा देऊन, थँक्स पाठवत होती. प्रतिमाकडून उत्तर मिळत नसल्याने, तिच्या मुलाला वंदनाने मदत केली नाही म्हणून कंपनीने संधी दिली नाही, म्हणून ती रागावली आहे हे सत्य समजले.

दर वर्षी ०१ मे कामगार दिनी कंपनी आपल्या निवडक कर्मचाऱ्यांचा उचित सत्कार करत असे. या वर्षी देखील ०१ मे ला कार्यक्रम होणार होता.पब्लिक रिलेशनशन अँड वेल्फेअर मार्फत याचे निमंत्रण कर्मचाऱ्यांना एक आठवडा आधी जात असे. कर्मचाऱ्याला आपल्या कुटुंबासह या कार्यक्रमास हजर राहता यावे हा उद्देश होता. या कार्यक्रमास, सत्कार समारंभ आटोपला की करमणूक म्हणून संगीत मेजवानी आणि बुफे देण्यात येत असे.

विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या निमंत्रणाचा मेल वंदनाला ३० एप्रिल रोजी संध्याकाळी मिळाला तेव्हा तिला आश्चर्य वाटले. तिला कळेना कामगारांचा सत्कार ठिक आहे पण मग आपल्याला कशाबद्दल आमंत्रित केल आहे? आपण तसेही हजर राहणार आहोतच. दर वर्षी ती आपल्या मिस्टरांना या कार्यक्रमासाठी त्यांनी यावे म्हणून तगादा लावत असे पण ते Advocate असल्याने सुट्टीच्या दिवशी त्यांच्याकडे जास्त क्लायंट असत. या वर्षाचं निमंत्रण खास असावं वाटलं म्हणून तिने मिस्टरांना जास्तीच आग्रह धरल्याने त्यांनी आपल्या काही अँपॉईंटमेंट रद्द करून येण्याचे ठरवले. मुलांना आईच्या सत्कारात विशेष रस नव्हता.त्यामुळे दोघेच निघाले.

वंदना आणि सुहास क्षीरसागर कंपनीच्या आवारात उभारलेल्या पंडाल मध्ये पोचले तेव्हा त्यांना वेल्फेअरच्या देशपांडे साहेबांनी स्वागत करून पुढील कोचावर बसवले. तिच्या शेजारच्या कोचावर प्रतिमा साने आणि तिचे मिस्टर बसले होते. त्यांना पाहताच वंदनाने तिला हात हलवून स्मित केले. प्रतिमानेही हात हलवून स्मित केले. कार्यक्रमाला सुरवात झाली.प्रधान यांनी आपले असिस्टंट मेहेंदळे आणि सिन्हा यांच्यासह प्रवेश केला. निवेदन करणाऱ्या कामगार युनियनच्या परेरा यांनी प्रकाश साने याना आजच्या कार्यक्रमचे चीफ गेस्ट म्हणून डायसवर निमंत्रित केले. त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून आणि शिवरायांच्या फोटोला तसेच जेआरडी यांच्या प्रेतिमेला हार घालून कार्यक्रमाची सुरुवात केली.

सिन्हा साहेब यांनी कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर प्रधान साहेब यांच्या हस्ते आजच्या कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे साने यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. मग कंपनीच्या उपक्रमाबाबत मेहेंदळे यांनी प्रास्ताविक केले. सर्व सहकाऱ्यांना कामगार दिनाच्या शुभेच्छा देत ते म्हणाले ” मित्र हो! कंपनी दर वर्षी आपल्या कंपनीतील विविध स्थरातील कर्मचाऱ्यांचे कामगार दिनी त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल पदक,वेतन वाढ, स्वीट बॉक्स, रोख रक्कम देऊन स्वागत आणि सन्मान करते. त्याप्रमाणे आज हा सन्मान सोहळा आपल्या प्रतिमा मॅडम यांचे मिस्टर प्रकाश साने निवृत्त मॅनेजर बँक ऑफ बरोडा यांच्या हस्ते करत आहोत.

इतर सहकाऱ्यानी प्रेरणा घेऊन पुढील वर्षी या सन्मान यादीत माझेही नाव असेल यासाठी आपले कौशल्य दाखवून ,काही तरी innovative कामगिरी करून, कामाच्या पद्धतीत सुधारणा करून, वीज बचत, स्वच्छता व नीटनेटकेपणा दाखवत या पदकाचे मानकरी झाल्याचे पाहायला सर्वांनाच आवडेल.आपण प्रत्यक्ष सोहळ्यास प्रारंभ करू.त्यांनी विविध विभागातील एक एक कर्मचाऱ्यांचे नाव पुकारले आणि साने यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. प्रत्येक वेळी टाळ्यांचा कडकडाट होत होता. वंदना मॅडम यांना कळेना की आपल्याला नक्की कशास बोलावलं आहे? कामगार पुरस्कार देऊन झाले तसं मेहंदळे यांनी माईक प्रधान साहेब यांच्या हाती देत सांगितले. या वर्षाच्या विशेष पुरस्काराची घोषणा आपले एमडी प्रधान साहेब करतील.

प्रधान साहेब यांनी,माईक हाती घेत सर्व सहकाऱ्यांना पुन्हा शुभेच्छा दिल्या आणि म्हणाले,”मी ज्यांचे नाव या विशेष पुरस्कारासाठी घोषित करणार आहे त्यांना तुम्ही सगळे ओळखता पण ती व्यक्ती कोण ते अंदाज लावू शकता का?” सभेत एकदम शांतता पसरली.जो तो दुसऱ्याला विचारत होता, कोण असावे?

कोणीच गेस करू शकले नाही मग साहेब म्हणाले, “कोणताही प्रसंग आला तरी कंपनीच्या कामात तडजोडी करणार नाही, असा धाडसी निर्णय मनावर ताबा ठेऊन घेणाऱ्या वंदना क्षिरसागर यांना कंपनीने “Diamond of the Year” हा सन्मान देऊन गौरविण्याचे ठरवले आहे. त्यांच्या या निर्णय प्रक्रियेचा मी स्वतः साक्षीदार आहे. तेव्हा मी वंदना मॅडम याना विनंती करतो की त्यांनी हा सत्कार स्वीकारावा.”

टाळ्यांचा कडकडाट झाला. प्रतिमा साने यांनी उठून वंदनाचे अभिनंदन केले. वंदना प्रतिमाच्या पाया पडली. दोघीनी एक मेकींना मिठी मारली. वंदना सावकाश पावले टाकत डायसवर गेली.तिने डायसवरील सर्वांना नमस्कार केला. समोर पहात सहकाऱ्यांना नमस्कार केला. प्रकाश साने यांनी वंदनाच्या गळ्यात कंपनीचे Dimond पदक घातले. तिचे शेक हँड करत अभिनंदन केलं. जमलेल्या सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला. सर्वांनी वंदना मॅडम यांना उभे राहून मानवंदना दिली.

प्रधान साहेब यांनी,साने यांना चार शब्द बोलण्याची विनंती केली. तेव्हा साने म्हणाले. “तुमच्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रधान साहेब यांच करावं तेवढ कौतुक थोडं, कामगार आणि कंपनी यांच सौहार्दाचे नाते कसे टिकवावे? वाढवावे याच उत्तम उदाहरण म्हणजे आजचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामुळे इतर सहकाऱ्यांना प्रेरणा मिळते, positivity मनात तयार होते. आपण उत्तम काम केले तर त्याची वाह वा होते याची समज येते त्यामुळे असे कार्यक्रम ते ही कामगार दिनी आयोजित केले जातात याबद्दल कंपनी आणि आयोजक यांचे अभिनंदन.”

“संस्कृत मध्ये म्हण आहे, ‘योजक तत्र दुर्लभः’, केवळ Machinery आणि Manpower असून चालत नाही तर त्याला दिशा देण्याच काम हे डायरेक्टर करत असतात. दुसरे म्हणजे आज Diamond पदकांने ज्यांचा सन्मान झाला त्या वंदना मॅडम या अतिशय धाडसी आणि प्रामाणिक अधिकारी आहेत. आपल्या निर्णयामुळे आपले सहकारी दुखावले जातील याची कल्पना असूनही कंपनीसाठी जे योग्य तेच मी करेन असा ठाम विश्वास आणि निर्णय घेण्याची त्यांची हातोटी एकदम स्तुत्य आणि योग्य. अशा अधिकारी व्यक्तीच कंपनीसाठी मौल्यवान असतात. त्यामुळे कंपनीने केलेला त्यांचा सत्कार ही त्यांच्या कामाची पावती आहे. त्यांचे आणि आज ज्यांना ज्यांना सन्मानित करण्यात आले त्या सर्वांचे अभिनंदन.”

कामगार आणि इतर सहकाऱ्यांनी त्यांना उभे राहून वंदना मॅडम यांना मानवंदना दिली. कार्यक्रम सोहळा राष्ट्रगीताने संपन्न झाला. सर्व निमंत्रितासाठी चहापान कार्यक्रम होता. त्यामुळे राष्ट्रगीत होताच लोक विखुरले. युनियन सेक्रेटरी मनोहर नरवणे येऊन अभिनंदन करून गेले.इतर काही सहकाऱ्यांनी येऊन अभिनंदन केल. थोड्या वेळाने प्रतिमा आणि प्रकाश साने यांनी येऊन तिच अभिनंदन केलं.

आज वंदनाचा एवढा मोठा जाहीर सत्कार झाल्या नंतर, प्रतिमाच्या मनात मैत्रीणीविषयी नक्कीच असुया असावी पण ती तोंडदेखल्या म्हणाली, “वंदू मी तुला जे काही बोलले ते विसरून जा. आल्हादला ती ऑर्डर मिळाली असती तर त्याच्या प्रोफाइलमध्ये एक प्रतिष्ठित नाव ऍड झालं असत. त्याच्या करिअरचा विचार करता मला तस वाटलं, पण तुझी चुक नव्हती. जुन्या सप्लायरनी त्यांच कोटेशन का रिजेक्ट केलं विचारलं असत तर तू काय उत्तर देणार होतीस?”

“Thank God, प्रतिमा, मला प्रधान साहेबांनी या कोटेशनच्या चर्चेसाठी बोलावले तेव्हा हेच मी प्रधान साहेबांना विचारलं. मी कोणाचं कोटेशन पास करावे या पेक्षा त्याचे निकष परिपूर्ण करणं जास्त महत्वाचे होते की नव्हते? मी आपल्या जुन्या साप्लायर पैकी कुणाला नाकारण्याच सबळ कारण तर हवं ना? तुझ्या मनातली शंका मिटली याच समाधान आहे. गेले पाच महिने मीच माझ्या मनाला विचारत होते माझं काय चुकलं? का माझी प्रिय मैत्रीण माझ्यापासून दुरावली?” “Very Sorry, मी काही काळ आल्हादचा विचार करता अविचारी झाले होते, स्वार्थी झाले होते.यापूर्वी मी अस वागल्याचं तुला आठवतयं का? मी खरचं चुकले मला माफ करं.”

वंदनाने तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले, ती म्हणाली, “तूला या कार्यक्रमाला आलेली पाहिली तेव्हा मी संभ्रमात होते पण प्रकाश यांच्या हातून सत्कार स्विकारतांना मी तुझ्याकडे पाहिले, तुझ्या डोळ्यातील आर्त मी पाहिलं तेव्हाच ठरवले हा विषय इथेच संपवायचा. मात्र आशा करते की या पूढे तू माझा फोन इग्नोर करणार नाहीस.” दोघींनी एकमेकींना मिठी मारली. दोघांचे मिस्टर दूर राहून संभाषण ऐकत होते.

त्यांनी ऐकमेकींशी हस्तांदोलन केलं. प्रकाश साने क्षिरसागर यांना म्हणाले, “बायकांच्या भांडणात आपण न पडलेलं बरं, त्यांचे गैरसमज कधी होतील ते सांगण अवघड. या गैरसमजातून नवरा सुटत नाही तर इतर कसे सुटतील.” दोघही दिलखुलास हसले. दोघींच्या मैत्रीवर आलेलं संशयाचं मळभ स्वच्छ झालं.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

One thought on “मळभ भाग 2

  1. Instagram bio for musicians

    “This is exactly what I was looking for, thank you!”

Comments are closed.