माझी सख्खी बायको

माझी सख्खी बायको

ती बया मला मुद्दामच ती घासून गेली असा जणू मनी भास झाला
तो तिचा इशाराच तर नसेल असा माझ्या मनाने मला कौल दिला

तिचा मुखचंद्र दिसावा म्हणून मीु खुप दुरवर पाठलाग केला
काय तिची चाल! समोर दिसतेय अस वाटतयं तोच तिन गुंगारा दिला

क्षणात ती दिसे अन क्षणात गायब, लपाछपीचा खेळच जणू सुरु झाला
मी पुरताच पागल त्या मृगजळानी अगदी दिवसाही माझा पार मामा केला

मी ही तिचा पार दिवाणा तिच्या सोबत तिची सावली बनून फिरलो
बांधल्या ओढणीत निट चेहरा दिसलाच नाही म्हणून तिच्या मागोमाग शिरलो

वेडीवाकडी वळण घेत घेत ती चक्क माझ्या घरच्या रस्त्याला लागली
कुणी पाहिलं तर काय म्हणतील? या शंकेनच माझी पावले अडखळली

ती माझ्याच घरात जातांना दिसली तेव्हा वाटेवर मी बेशुद्ध पडलो
कोणीतरी पाणी मारून मला शुध्दीवर आणताच मी पुरता गडबडलो

त्यांनी आधार देत मला घराच्या पायरी जवळ आणताच मी थिजल़ो
संध्याकाळ असूनही आता “भोगच भोग” मनी म्हणत घामानेच चिंब भिजलो

तिच्याकडे पहाण्याची माझी हिंमतच नव्हती, तिचा स्पर्श होताच गोठलो
नजरेस नजर मिळताच तिचा मिश्कील चेहरा पाहून मनी खुललो

माझी पत्नी माझ्या शेजारी बसली मला पदराने घालत होती वारा
डोक्यावर हात ठेऊन विचारत होती काय रे! हा कोणासाठी गजरा?

मी तिच्याकडे केविलवाण पाहिलं तेव्हा तिचा चेहरा पाहून पडलो गपगार
कोरीव भुवया, उजळ चेहरा, केसांचा बॉब हा तर दुसरा वार

हातावर मेहेंदी, दंडावर ट्यँटू, मनगटात कडे, लाल टी शर्ट जिन्सची पँट ढोपरावर फाटकी
नखशिखांत नटली होती एकुलती एक माझी बायको भारी लाडकी

तिच्या त्या सौंदर्याने मला भेटली तिच्यातील दिपिका, प्रियांका, कतरीना
मी पारच गार झालो, बाप्पा चूकच माझी झाली, दे परत माझी साधीभोळी मैना

कोणीतरी चिमटा काढून उठवल तेव्हा कळल मला पडलं होत सपान
माझ्या बाजूलाच उभ होतं आमच गावरान सौभाग्य, अन चितपरिचीत ध्यान

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

4 thoughts on “माझी सख्खी बायको

 1. Suresh sonawane
  Suresh sonawane says:

  अप्रतिम सर?

  1. Mangesh kocharekar
   Mangesh kocharekar says:

   धन्यवाद सोनावणे

   1. प्रविण वोरा
    प्रविण वोरा says:

    Nice अप्रतिम

  2. Jeetendra Rao
   Jeetendra Rao says:

   Very nice sir ?

Comments are closed.