मिरग
अक्षय त्रितीयेक सुक्या पेरला, जोताक लाडको बाळगो फिरलो
बाळग्या वांगडाक घरचो चंद्रो, त्याका पयल्या सूट उजू केलो
पाठीवर याक शिरटी बसता, पळ पळून सोसवाक लागलो
धा किलो ‘चिंटूक’ हाडाला होता, तरी येवचो तो तोटो इलो
उभी आडवी नांगरट केली, फळी फिरवून कोपरो जीतो झालो
अंगची ओल मायेची उब, धा दिसात शात हिरव्या मखमलीन सजला
रोजच सकाळी बेबल्या बघूक जाय, हर्षान घरात नाचत हसत रिगला
आये, रूजान इलो तरवो म्हणत तिचे दोनी हात धरून गरगर फिरला
वाट बघण्याची खोटी सांजेक इलो वळीव, म्हणता सगळा अंगण भिजला
तासाभरात पाणीच पाणी, कोपऱ्यात कोंब कुजतले, काळजात चर् झाला
मेर फोडून पाणी काढला, डोंगरातून पुना इला, अशी वळीवाची दुश्मनी
चार झिलगे मदतीक इले, घातलो थोरलो बांध, पाट उकरुन काडला पानी
असूननसून घेतली जाग, पावसाच्या थंडाईन थंडगार, बांडुक गाऊ लागले गाणी
आऊस जागी मनात संशय, काय करीत नेम कोणाक? घशाक कोरण पीयं पाणी
रातभर डःराव डःराव झोपेचा खोबरा, पूर्व उजळली आणि आनंद झालो मनी
कोपऱ्यात बेबल्या गेला तिका दिसली मोठी कुर्ली, आरडतच इली घरी
बापूस गेलो आक्या घेऊन त्याने कुर्ली धरली पकडून हैराण, त्याका इली घेरी
पाच पन्नास कुर्ल्यांचा निस्ताक वाटे घरोघरी, आमच्या आवशीची इमानदारी
चार दिसान तापाक लागला ,कळेना असा कसा झाला? व्हयती बरी न्हय मस्करी
आऊस गेली म्हापुरूषाक शरण, घाशीत रवली नाक, देवाक गाराणा करी
मिरग इलो, वाटा, सुको जातलो, तरवो मराक लागलो, जीवाची कायली झाली
आजो डोळ्यार हात ठेऊन तिनदा बघून गेलो, त्याच्या मनाची दैना झाली
घडाक नाय ता घडूक लागला, कर्माची फळा, भोग सगळो, लय बडबड केली
आजे समजावता फिरतला डोक्या, तेल घालून घासून दितय, झोप शांत येतली
गाळी घालता आजो, कळणा नाय तुका, माझ्या पोरांची मेहनत वाया जातली
दुपार सारी रखरखीत उन, जमीन भाजान गेली, नशीबापुढे काय करतली?
सांजेक इला आभाळ भरून, विज चमकली, सोसो वारो, पावसाची सर इली
पोराटोरा खळ्यात इली, ओरड घालून केलो कालो, पावसात भिजान गेली
रातीच्या जेवणाक कापलो कोंबो, बापाशीक नव्हतो थारो, जीवाची मुंबई केली
पाऊस रातभर कोसळत रवलो, वाणशीत आमी पोरा, गोधडीच्या उबेखाली