राहून गेले

राहून गेले

कधीकधी कुणाला सांगायचं राहून जाते
आठवण होते तेव्हा झालेला असतो उशीर
ज्याचासाठी व्यक्त व्हायचंय तो होतो अधीर
तो काही गुन्हा नव्हे, ज्याची करावी फिकीर
फार उशिर होण्याआधी, मनापासून द्यावा धीर

तुमचे शब्द हे कदाचित, त्यांना असते अमृत
केवळ धिराचे चार शब्द, पळवते मनातील भूत
काही मित्र मात्र भुलतात पाहूनच वरवरचे रूप
न पारखताच करतात विचारांची उगा काथ्याकुट
चांगली व्यक्ती कुणालाच म्हणत नाही बैठकीतून उठ

मनात असेल ते खुल्या मनाने, शुद्ध बुध्दीने सांगावे
गैरसमज होण्याआधी, विचारांचे प्रेमळ बंध बांधावे
समोरच्याची ऐपत, दानत बघुन योग्य तेच मागावे
उपकार केलेत अस वाटणार नसेल, तरच दान द्यावे
या हाताचे त्या हाताला, न या कानाचे त्या कानाला कळावे

युध्दात आणि प्रेमात, सगळं माफ असं उगाचच म्हणतात
जेव्हा ओतून कराव प्रेम, तेव्हा शब्दांशीच अडखळतात
अन मग वेळ सुटून जाते, स्वतःशीच एकटेपणी झुरतात
मग फक्त एकांत, विचारांच्या कोषात स्वतःला छळतात
‘अरे रे! सांगता न आले प्रेम तुझपाशी’ म्हणत तळमळतात

हातून काही सुटण्यापूर्वी काळ, काम, वेग यांचे नाते ओळखा
कोण तुमचा सहृद, कोण आपमतलबी हे नजरेन पारखा
जमलच तर समजवा प्रेमान जोडा मन कुणीच नसतो परका
पश्चतापाचा पाश भयंकर अवघड,चुकूनही चुकू नका
सावध घ्या निर्णय, नियती पुन्हा पुन्हा देत नसते मौका

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

5 thoughts on “राहून गेले

  1. Dr.Sachin Shinde
    Dr.Sachin Shinde says:

    अप्रतिम

  2. Mangesh Kocharekar
    Mangesh Kocharekar says:

    धन्यवाद शिंदे सर.

  3. Raju

    खूप छान मित्रा , हृदयाला भिडणारी ही कविता अनुभूतीची बंद कवाडं नकळत उघडून गेली.

  4. Raju

    खूप छान मित्रा ,हृदयाला भिडणारी ही कविता अनुभूतीची बंद कवाडं नकळत उघडून गेली.अशाच सुंदर सुंदर कविता आपल्या सिद्धहस्त लेखणीतून उतराव्यात हीच मनीषा!

    1. Mangesh Kocharekar
      Mangesh Kocharekar says:

      धन्यवाद, तुमचा अभिप्राय हेण तर लेखकाच आणि कविच टॉनिक।

      आमचे चाहते यांच्यवर आम्ही फिदा तेच आमचे या वाटेवरील आशिक।

Comments are closed.