लाल परी सर्वांना प्यारी

लाल परी सर्वांना प्यारी

२८ ऑक्टोबर २१ पासून एसटीचे राज्य सरकारमध्ये विलानीकरण व्हावे या साठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे, आज पर्यंत त्यावर तोडगा काढण्यात सरकारला यश आलेल नाही. ग्रामीण भागातील व्यवहार ठप्प झाला आहे. या कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार का उगारले? संपूर्ण राज्यात विखुरलेले हे एसटी कर्मचारी आझाद मैदानात आपल्या कुटुंबासह संपात का उतरले? हे माहिती करून घेणे गरजेचे आहे. एसटी कर्मचाऱ्यांना गेले वर्षभर कधीही वेळेवर वेतन मिळाले नाही. अगदी सणावार असतांना त्यांचे वेतन होत नव्हते. कधी कधी दोन दोन महिने वेतनासाठी वाट पहावी लागत होती. करोना काळात प्रवासावर बंदी घातल्याने उत्पन्न घटले ही सत्य परिस्थिती असली तरी राज्यातील इतर महामंडळाना तेव्हा वेतन मिळत होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात गेले बरेच महिने वाढ होत नव्हती. इतर शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांचा महागाई भत्ता २८% झाला तरीही एसटी कर्मचाऱ्यांना आजही हा महागाई भत्ता कसाबसा १७% आहे. त्यांना शासकीय वेतनश्रेणी नाही, सातवा वेतन आयोग नाही परिणामी पंधरा वर्षे एसटी मंडळात काम करूनही वीस हजार रूपये इतके वेतन नाही. ते निवृत्त झाले तर अधिकात अधिक ४५०० पेंशन अधिकारी पदावरील व्यक्तींना मिळते. सतत होणारा अन्याय सहन करून हे कर्मचारी कंटाळले होते.

मंडळ अधिकारी, सचिव, अध्यक्षांच्या दबावाखाली ड्रायव्हर व कंडक्टर तसेच इतर एसटी कर्मचारी यांच्यावर खोटी नाटी चार्जशीट दाखल करुन त्यांना लाखो रूपये दंड करत होते. या अन्यया विरुद्ध उद्रेक होणे स्वाभाविक होते. वेतन नियमित न मिळालेल्या काही कर्मचाऱ्यांनी घरातील चणचण सुधारता येत नाही यामुळे टोकाची भुमीका घेत आत्महत्या केली. या आत्महत्येची कोणीच दखल न घेतल्याने त्याचा परिणाम म्हणून कर्मचारी राज्यसरकारच्या विरोधात संपावर गेले.

सरकारचे म्हणणे, एसटी सतत तोट्यात जात असताना वेतनवाढ शक्य नव्हती, पण वास्तव वेगळेच आहे. एसटी मंडळ राज्य सरकारला १७% प्रवासी कर देते, २७% डिझेल वर कर देते. यामुळे एसटीला खाजगी प्रवास कंपनीच्या स्पर्धेत टिकून रहाणे कठीण होते. या शिवाय, शाळेचे विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, स्वातंत्र्य सैनिक, लोक प्रतिनिधी, पारितोषिक प्राप्त कलाकार, दिव्यांग यांना सरकारने प्रवास भाड्यात सवलत दिल्याने मंडळाचा तोटा वाढतो . वास्तवात या सर्व सवलतीपोटी सरकारने एसटी महामंडळाला नियमित अनुदान देणे गरजेचे आहे. ते अनुदान तर मिळत नाहीच याउलट मंडळाचे अधीकारी प्रवास वाहतुकीसाठी खाजगी गाड्या अवाजवी भाड्याने घेतात, गाड्यांच्या सुट्या भागाच्या खरेदीत मोठा भ्रष्टाचार होतो. एसटी डेपोची दुरूस्ती, डेपोमधील कॅन्टीन चे कंत्राट यात ही अनियमितता केली जाते. कर्मचारी भरतीतही गडबड होते. यामुळे एसटी महामंडळाच्या तिजोरीत पैसे जमा न होता अधिकाऱ्यांच्या खिशात जमा होतो. तूट मात्र एसटी महामंडळाची वाढते. पून्हा एकदा तिच्या खाजगी करणा विषयी वाढते.

त्यामुळे या लाल परीला वाचवायचे असेल आणि १२ कोटी जनतेची आवडती प्रवास व्यवस्था नियमित ठेवायची असेल तर जनतेने कर्मचाऱ्यांची बाजू सरकारकडे उचलून धरली पाहिजे अन्यथा कोकणातील माफक तिकीटात बोट प्रवास जसा कायमचा बंद झाला तिच पाळी एसटी प्रवासावर आल्यानंतर शोक करण्यात अर्थ नाही. नाहीतरी, बेस्ट आणि एसटी यांचे खाजगीकरण करणे हा विषय यांच्या अजेंड्यावर आहेच.

या प्रदीर्घ संपामुळे आजतरी लाल परी ठप्प झाली आहे . ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था पार कोलमडली आहे सर्वांना रिक्षा किंवा अन्य खाजगी वाहन परवणारे नाही. या वर्षी कोविड संकट कमी असूनही ना कोणी कार्तिक एकादशीला पंढरपूरला गेले ना कोणी आपल्या बहीणीला भेटायला, तिच्या भाऊबीजेला गेले. ग्रामीण भागातील व्यवहारच ठप्प झाला कारण छोटे शेतकरी, छोटे व्यापारी यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी एसटी शिवाय अन्य साधन परवडणारच नाही. एसटी हेच सामान्य माणसाच्या वाहतुकीचे साधन आहे.

एक लाख अठरा हजार इतका कर्मचारी आणि त्यांचे साधारण चार लाख किंवा थोडे जास्त कुटुंबीय या संपामुळे संकटात आहेत. या वर्षी त्यांच्या घरात ना खरेदी झाली ना दिवाळी झाली. आधीच अतिशय तुटपुंजा पगार आणि तोंडावर आलेला सण यामुळे अगदी सन्नाटा होता. आता तर काम बंद वेतन बंद अशी स्पष्ट धमकी मंत्रीमहोदय यांनी दिली आहे. त्यामुळे पूढे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काय करायचे?, मुलांच्या शिक्षणाची सोय कशी लावणार या विवंचनेत कर्मचारी आहेत.

ग्रामीण भागासाठी एसटी सारखा परवडणारा वाहतुकीचा पर्यायच नाही त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांबाबत सरकारने सहानुभूतीने तातडीने निर्णय घेणे अपेक्षित आहे. या संपाचे नेतृत्व आमदार पडळकर यांनी केल्याने तसेच देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, प्रवीण दरेकरविरोधी पक्ष नेत्यांनी वेळोवेळी संपकरी कर्मचाऱ्यांना भेट दिल्याने त्याला राजकीय रंग चढला. कर्मचाऱ्यांच्या संपाच्या विरोधात सरकार कोर्टात गेले त्यामुळे आता सर्व बाहेरून तडजोड करण्याचा मार्ग खुंटला.

आज संपूर्ण महाराष्ट्रात रेल्वे धावत आहे मात्र पंचवीस वर्षांपूर्वी महाराष्ट्रच्या काही दुर्गम भागात एसटी हा एकच पर्याय़़ होता. आजही कोकण, गडचिरोली, चंद्रपूर, मेळघाट या जिल्ह्यातील काही भागात एसटी हाच पर्याय आहे. काही भागात तर पाई जाण्या व्यतिरिक्त अन्य मार्ग उपलब्ध नाही. पण “गाव तिथे एसटी” या संकल्पनेमुळे काही प्रमाणात वाहतूक सुविधा उपलब्ध झाली आहे हे नाकारता येत नाही. सह्याद्री आणि विंध्य पर्वतांच्या रांगांमध्ये वसलेल्या गावंना एकमेकांशी संपर्क साधण्याचा एसटी हाच एकमात्र दूवा आहे.

कोकण रेल्वे १९९६ ला सूरू झाली पूढे १९९८ विस्तार होत ती मंगलोर पर्यंत पोचली. यापूर्वी कोकणात जायचे दोन मार्ग होते, पहिला जलमार्ग जो रत्नागिरी, विजयदुर्ग, मालवण, वेंगुर्ले ही बंदरे घेत शिंदीया शिपींग करत होती. १९४८ साली रामदास बोटीला रेवस बंदराकडे जलसमाधी मिळाली, ८००पेक्षा अधिक लोक बुडून मेले त्यामुळे काही काळ बोटीतून प्रवास बंद झाला. अशीच दुसरी घटना मालवण बंदरातही घडली. १९७२ साली राजकोटच्या खडकावर आदळून रोहीणी बोटीला अपघात झाला आणि १९७६ बोटवाहतूक कायमची बंद झाली. तद्पूर्वी दिपावती, लिलावती, चंद्रावती, रोहिदास, रामदास, कोकणशक्ती इत्यादी बोटींनी जल प्रवास सूरू होता या बोटी मफतलाल, चौगुले शिपींग, मोंगल लाईन इत्यादी कंपनीच्या होत्या.

चौघुले कंपनी त्या काळातही तोटा सहन करून कोकणात बोट चालवत होते याचे कारण ते एकमेव मराठी माणूस या व्यवसायात होते. गोवा स्वतंत्र होई पर्यंत या बोटी भाऊचा धक्का, रेवस, विजयदुर्ग, हर्णे बंदर, देवगड, रत्नागिरी, मालवण, वेंगुर्ला याच मार्गाने ये जा करत. एका वेळेस १००० ते १२०० प्रवासी सफर करत. जोपर्यंत बोटी सुरू होत्या, मालवणला बंदर म्हणून महत्त्व होते. कितीतरी वस्तूंची ने आण बोटीतून होत होती. बाजारपेठ गजबजलेली होती. १९७२ ची दुर्घटना घडली आणि सरकारने १९७६ पासून मालवण बंदर सुरक्षित नाही असे म्हणत शासनाने वाहतूक बंद केली.

दुसरा मार्ग, अर्थात एस.टी प्रवास. सर्व सामान्य माणसाला परवडणारी आणि घरापर्यंत पोचवणारी एसटी ही सामान्य माणसाची गरज भागवते म्हणूनच तीचं आणि खेड्यातील लोकांच नात आहे. फार पूर्वी म्हणजे एसटी सूरू होण्यापूर्वी पूणे ते सांगली, पूणे ते कोल्हापूर, पूणे ते अहमदनगर अशा ठराविक मार्गावर खाजगी प्रवासी गाड्या होत्या. परंतु त्यांच व्यवस्थापन खाजगी मालकाकडे किंवा कंपनीकडे असल्याने ठराविक थांबे, अचानक भाडेवाढ अशा समस्या होत्या. १९४८ साली मोरारजी देसाई यांच्या काळात, मुंबई स्टेट ट्रान्सपोर्ट कंपनी नावाने सरकारी वाहतूक सुरु केली आणि त्याची पहिली एसटी पूणे ते अहमदनगर मार्गावर सुरू झाली. त्याचे कार्यालय मध्यप्रदेश, गुजरात, आंध्र, कर्नाटक येथे होते. त्यानंतर भाषावार प्रांत व राज्य रचना झाल्यावर महाराष्ट्र राज्य ट्रान्सपोर्ट कंपनी म्हणजे आजची एसटी सुरू झाली. आरंभी बेडफोर्ड कंपनीच्या गाड्या होत्या. तिला सिल्व्हर कलर आणि निळे टप होते आणि ह्या गाड्या लाकडी बांधणीत होत्या. कालंतराने त्या अल्युमिनियम पत्रा वापरून तयार होऊ लागल्या. त्यांचा सध्या असलेल्या रंगामुळे त्यांना उच्च वर्गीय लाल डब्बा म्हणू लागले मात्र सर्व सामान्य लोकांसाठी आजही ती लाल परी आहे.

आज एसटीची सोळा हजार किंवा त्याहून आधीक वाहने असून. त्यात शिवनेरी, शिवशाही, अश्वमेध, एशीयाड, हिरकणी, रातराणी, निमआराम इत्यादी प्रकार आहेत. शिवनेरी, शिवशाही या गाड्या भाडेतत्त्वावर चालवल्या जातात.गोर गरीबाला मात्र लाल परीच परवडू शकते. रातराणी गटातील गाड्यांच्या सिटची रचना हे दूरचा आणि रात्रीचा प्रवास लक्षात घेऊन केलेली असते म्हणून तीला पाठच कुशन डोक्यापेक्षा वर पर्यंत असते. तिचे तिकीट थोड जास्त असत तरीही तीच सर्व प्रवाशांना प्रीय असते कारण दिवसापेक्षा रात्रीचा प्रवास हा थंडाव्यामुळे सुखद असतो. मुख्य म्हणजे ही लालपरी घराच्या रस्त्यापर्यंत प्रवाशाला सोबत करते.शिवशाही किंवा शिवनेरी ह्या गाड्या दादर पूणे, दादर कोल्हापूर किंवा, पूणे कोल्हापूर या मार्गावर जास्त चालवल्या जातात.

ही लाल परी गावांना शहरांशीच जोडत नाही तर माणसाला माणुसकी शिकवते. दूरच्या प्रवासात जस तू, तू, मी ,मी होत तस माणुसकीच दर्शनही घडत. एखादी व्यक्ती घरून तातडीचा निरोप आल्याने गावी जायला निघते. एसटी आधीच फुल असते आणि आता उभ्याने प्रवास करावा लागणार हे गृहीत धरून आणि गावी आई किंवा कुणी अन्य सिरीयस आहे तिला आराम वाटुदेत असा मनात देवचा धावा करत तो उभा असतो. थोड्या वेळाने थकून पायरीवर जाऊन बसतो. इतक्यात कुणा ताईला गहिवर येतो, “अहो! ऐकताय का, बिचारा कधी पासून पायरीवर बसून आहे, थोडा वेळ बबड्याला तुमच्या मांडीवर घ्या, कोणावर वेळ काही सांगून येत नाही.” , बबड्याचा बाप नाईलाज म्हणून त्याला जागा देतो. अशी माणुसकी जागवणारी एसटी.

तर कधी एखाद्या आजीला झोप अनावर झाल्याने ती सारखी शेजारच्या मुलावर मान टाकत असते. तो बिचारा तिला रागावू शकत नाही. तिच्या सोबत असणारा मुलगा आणि सून दुसऱ्या सिटवर मस्त झोपी गेलेले असतात किंवा स्वप्न रंगवत असतात, हा उठून तिला जागा देत म्हणतो, थोडा वेळ झोपा मी उभा राहतो.

जशी माणुसकी पाहायला मिळते तसे कधी न पाहिलेले भांडण ही इथेच अनुभवता येते, ते सामान ठेवायच्या जागेवरून असेल, एखाद्या मोठ्या माणसाने जास्त जागा अडवल्यामुळे असेल किंवा कोणीतरी एखाद्या तरुणीकडे टक लावून पाहिलं म्हणूनही असेल. अशा वेळी आपण सार्वजनिक ठिकाणी आहोत याच तारतम्य न बाळगता लोक कचाकचा भांडतात, एकमेकांवर हात ही उगारतात. व्यक्ती तेवढ्या प्रकृती.

पण ह्या एसटीत बरेच काही शिकायला मिळते. भला मोठा बोजा एक हातात धरून एक हात शिडीला धरून चढणारा हमाल, बोजा हातात धरून काट्याला न लावता सहज वजन सांगणारा हमाल, आणि ओ काकू किटकीट करू नका एक डाग दहा रुपये, तीन डागाचे तीस, द्यायचे तर द्या, नाहीतर डाग परत खाली टाकतो. असं दमात तोच घेतो. त्या एसटी डेपोत त्याच स्वतःच साम्राज्य असतं. हे सगळे अनुभव लाल परीने प्रवास केल्या शिवाय कसे येणार!

गाडीत कंडक्टर तिकीट तपासणी करता करता एखाद्या जोडप्याला विचारतो,”या मुलाचं वय किती?” “नवरा म्हणतो साडेचार वर्ष.” कंडक्टर संशयाने विचारतो, “नक्की का? जन्मतारीख किती? हा प्रश्न कंडक्टर विचारेल याची जोडप्याला कल्पना नसते बाई पटकन खरी जन्म तारीख सांगून टाकते. तसं कंडक्टर बोट मोडत हिशोब करतो, आणि म्हणतो,” काय राव! तुम्ही म्हणताय वय साडेचार वर्ष, साडेपाच होतात की, अर्ध तिकीट काढाव लागेल.”
तो म्हणतो, “अहो, साडेचारच झाल्यात त्याच्या आईला त्याची जन्मतारीख नीट आठवत नाही, तिच्या बहिणीच्या मुलाचा जन्म त्याच्या आदल्या वर्षी याच तारखेचा. तिचा नेहमी गोंधळ होतो.” ,बायको सावरत म्हणते, “हो हो, यांच बरोबर, माझा नेहमीच गोंधळ होतो.” मी त्याला मांडीवर घेऊन बसलेय, नाहीतर हाफ तिकीटच काढल असतं.” कंडक्टर तरीही संशयाने पहातो, पण विचार करून निघून जातो.

सर्व तिकीटं तपासली की तो एकदा हिशेब जुळवतो, त्याचा चार्ट भरतो आणि त्याचा तिकीट बॉक्स सीटवर टाकून त्यावर बसतो. सतत, जागते रहो अस स्वतःला म्हणत तो प्रवासात एसटीच्या हालचालींवर लक्ष ठेऊन असतो. प्रवास करणारे ६० प्रवासी त्याच्या भरोशावरच निश्चिंत मनाने झोपलेले असतात. पळणाऱ्या एसटीत प्रवाशांना तिकीट आणि सुटे पैसे देणं साधी गोष्ट नाही. याच बरोबर कोणत्या स्टाँपवर किती प्रवासी चढले ही नोंद पळत्या गाडीत तेच करू जाणे. भिन्न स्वभावाच्या प्रवाशांना हातळण हे ही कौशल्याचं काम आहे, दूरच्या प्रवासात एसटी एखाद्या थांब्यावर थांबली की कधी प्रवासी लवकर परतत नाही, कधीकधी प्रवाशांना शोधून आणाव लागत.

कधी एखाद्या प्रवाशाची प्रकृती गंभीर होते आणि वाटेत हॉस्पिटल शोधून त्याच्यावर उपचार करायची पाळी येते, कधी एखादी अडलेली बाई एसटीत बाळाला जन्म देते. तर कधी एखाद्या प्रवाशाची बॅग चोरीला जाते. कधी कोणी महाभाग गाडीत वांती करून नको तो प्रसंग प्रवाश्यावर आणतो आणि कंडक्टरलाच यातून मार्ग काढावा लागतो. नक्की कोणत्या प्रसंगला तोंड दयावे लागेल ते सांगता येत नाही. तरीही न कंटाळता ते आपली ड्युटी करत असतात.

ड्रायव्हरला तर सतत डोळे उघडे ठेऊन एसटी हाकावी लागते. उन, वारा पाऊस याची तमा न बाळगता.एवढ्याशा जागेत, एकाच स्थितीत बसून मन शांत ठेऊन गाडी चालवणे सोप्पे नसते. रस्त्यावर असणारे ट्रॅफिक झालेला अपघात, यांनी न डगमगता मनाचे संतुलन राखून वर्षाचे ३६५ दिवस गाडी त्याच त्याच मार्गावर किंवा नवख्या मार्गावर चालवणे नक्कीच सोप्पे नसते. राज्य सरकारच्या सेवेत असणाऱ्या ड्रायव्हरला एक न्याय आणि एसटीच्या सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेगळा हे असमान सूत्र नक्कीच मानहानीकारक आहे. तेव्हा या सर्व मुद्द्यावर विचार व्हावा आणि या कर्मचाऱ्यांच्या मागण्याचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा हीच सामान्य नागरिकांची अपेक्षा. त्यासाठी थोडा भार सरकारने सहन करावा थोडा भार जनता आपल्या भावंडांसाठी नक्की करेल.

दूरच्या प्रवासाला निघालेली गाडी तास,दोन तास धावून दमली की हम रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या एखाद्या डेपोत शिरण्यापूर्वी कंडक्टर ओरडतो, “गाडी फक्त दहा मिनिटे थांबेल,डेपोच्या मागच्या बाजूला मुतारी आहे,ज्याला लागली असेल त्यांनी पटकन जायच, उगाच तिथे टाईमपास करायचा नाही, अजून बरच आंतर कापायचं आहे.”

प्रवासी बिचारे गाडी डेपोत थांबते कधी आणि आपण विधी उरकून किंवा चहाची तलफ पूर्ण करून येतो कधी या विचारात एकमेकांना रेटत असतात. गंमत म्हणजे हा पठ्ठा चांगला पंचवीस मिनीटांनी परततो. टण टण घंटी उगाचच बडवतो. मग एसटी च्या मागच्या टोकापासून डोकी मोजत येतो आणि उगाचच ओरडतो, “शेजारी आलेत का एकदा बघून घ्या,एकदा डेपो सोडला की कुणाचच ऐकणार नाय.” कोणीतरी ओरडून सांगतो, “मास्तर चला आता,एकतर तुम्ही आम्हाला पळापळ करायला लावलीत आणि स्वतः मात्र उशीरा आलात.” तो पाठी वळून पाहतो, “कोण बोललं, कोण बोललं ते? आमी लेट आलो अस बोलायच काम नाय.” तसे दोन चार पेसेंजर एकदम बोलतात, “पूरे की मास्तर, चला,गाडी काढा आता,आता नाही का उशीर होत?” कंडक्टर घुश्शात डबल बेल मारतो आणि गाडी मार्गाला लागते. थोड्या वेळान एक बेल वाजते आणि ड्रायव्हर लाईट विजवतो. काही हळूहळू आवाजात कुजबुजत असतात. त्यात केलेली खरेदी आणि त्याचे हिशेब, येतांना आमच्या खोलीवर लक्ष ठेवा असा शेजारच्या खोलीत दिलेला निरोप, गावी गेल्यावर आखलेला बेत आणि असच काहीतरी. कोणीतरी पून्हा हळू आवाजात साकड घालत, “आता राहिलेल उद्या बोला.” मग शांतता पसरते.

गाडी गिअर बदलत धावू लागते. कोणी पेंगत असत तर कोणी खिडकीतून बाहेर पडलेल्या चांदण्यात पळणारी झाडे, वाकडी वळणे, दूर दिसणारी घरे पहात आणि गार वारा अंगावर घेत गुणगुणत असत. दोन तीन तासाच्या अंतराने गाडी पून्हा गजबज असलेल्या डेपोत शिरते. डेपोत गाडी शिरताना कंडक्टर ओरडून म्हणतो गाडी जेवणासाठी अर्धा तास थांबेल. कंडक्टर गाडी डेपोत लावण्यासाठी खाली उतरतो. इथे खुप साऱ्या एसट्या एका रेषेत उभ्या असतात. डेपोत आलेल्या एसटी ला कंडक्टर शीटी फुंकून पाठी पूढे करत एकदाचे रांगेत आणतो.

एसटी थांबताच, सर्व प्रवासी बाहेर पडण्याची घाई करतात. तोपर्यंत विक्रते, ए उसाचा ताजा रस घ्या, ए आले पाक, आवळा सुपारी, लाले लाल कलिंगड, चिक्की घ्या चिक्की, लोणावळा चिक्की घ्या वीस ची एक पन्नास च्या तीन घ्या.अशी ओरड चालू असते. बरेच पेसेंजर आपला घरुन आणलेला डबा घेऊन एसटी कॅन्टीनमध्ये जातात. तर काही मात्र गाडी लागते म्हणून जेवण घेण टाळतात. ह्या वेळेस कंडक्टरलवकर हजर होतो, घंटी घणघणू लागते, प्रवासी पळापळ करत एसटीत चढतात आणि एसटी मार्गाला लागते. एसटी सुटता सुटता ही एखादा महाभाग आपली हौस पूर्ण करून येतो. इथेही त्याला त्याचा पेट्रोल पंप कसा मिळतो ते ईश्वर ठावे.

मुंबई मधून राज्यातील विविध शहरात, तालुक्याच्या ठिकाणी, आणि पर राज्यातही एसटी जाते. एसटी हा शहरे आणि खेडी यांना जोडणारा दुवा आहे. गावातील अस्सल रानमेवा शहराकडे आणण्याचं आणि शहरातील सुगंधी तंबाखू, रेडीमेड कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू गावाकडे पोचवण्याच काम गेले साठ सत्तर वर्षे एसटी करत आहे. आधुनिकीकरण झाल्याने आता गावाकडे शहरातील वस्तू सहज उपलब्ध होतात, आणि गावाकडील वस्तू शहरात ट्रान्सपोर्ट व्दारे शहरात सहज पोचतात पण एसटीने गेले पन्नास वर्षे शहर वाशीयांची अभिरूची आणि आवड जपण्याचे काम अव्याहत केल आहे. मे महिन्यात एसटी चे टप भरलेले असे ते मालवण, देवगड, वेंगुर्ले येथून मुंबई, पूणे येथे येणाऱ्या हापूस आंबे आणि फणसाच्या बोज्यांनी.

शहरातील घरात अतिरिक्त झालेली साधने एसटीच्या टपावर बसून चार पाचशे किलोमीटरचा प्रवास करूनच गावी पोचत, त्यात लोखंडी कपाट, लोखंडी कॉट, व्यायामाची साधने, लोखंडी खुर्ची, सायकल अस काहीही असे. या वस्तूंना रंगरंगोटी करून त्या गावातील घराची शोभा वाढवत. मला सांगा एसटी नसती तर हे शक्य होत का?

पुर्वी गावाकडे आठवडा बाजार हा तालुक्याच्या ठिकाणी किंवा जेथे मध्यवर्ती ठिकाण आसेल तेथे भरत असे. या बाजारात जायला या लाल परी सारखे अन्य स्वस्त साधनच नव्हते. आता खेडोपाडी रीक्षांचा सुळसुळाट झाला आहे. कोणे ऐके काळी एसटीची सेवा ही खात्रीशीर होती. गावी केवळ एसटी रस्त्याने गेली की लोक आपले घड्याळ लावत. आता ही सेवा डबघाईला येत चालली आहे. प्रवासात मध्येच नादूरूस्त होणे. पावसाळ्यात छप्पर गळणे, हलणारी आसने आणि गाडीच्या पत्र्याचा खडखडाट यामुळे एसटी प्रवास अडचणीचा ठरत आहे. तरीही ज्यांना खाजगी वाहतूक परवडत नाही त्यांना एसटी प्रवासाला पर्याय नाही.

एसटी या नावाबरोबर प्रवासात आलेले असंख्य अनुभव आणि गमती जमती यांचा ठेवा मनात आहे, पाठीमागचा एक टायर निघून उताराला एसटी पूढे धावत असणाऱ्या आणि तीन टायरवर अर्धा किलोमीटर चालणाऱ्या एसटी मधुन मी प्रवास केला आहे. दैव बलवत्तर म्हणूनच हे लिहायला अजूनही शाबूत आहे, पण आजतरी या गमतीजमती पेक्षा या एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न लवकर सुटून एसटी पून्हा मार्गावर धावू दे हीच अपेक्षा आहे. सरकारने आम्ही कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढविण्यास तयार आहोत परंतु आधी संप मागे घ्यावा अशी अट घातली होती. परंतु एसटी युनियन वकील, ऍड. गुणरत्न सदावर्ते यांनी संप मागे घेण्यास असहमती दर्शवली. त्यामुळे मार्ग निघू शकला नाही.

पक्षीय हेवेदावे, राजकरण, हे सार दूर ठेवून हा विषय तातडीने मार्गी लावला पाहिजे. ऍड. गुणरत्न सदावर्ते, महाराष्ट्रात ३६ महामंडळे आहेत या पैकी बऱ्याच मंडळाना वेळेवर वेतन आयोग किंवा अन्य लाभ मिळाले असतांना एसटी सारख्या महत्वाच्या विभागास ताटकळत ठेवणे माणुसकीला धरून नाही. त्याच जळत त्याला कळतं, अशीच कमी वेतनावर काम करण्याची पाळी आपल्यावर सतत अली असती तरी आपण वेगळं काय केलं असत? तेव्हा शासन आणि एसटी कर्मचारी यांनी हा प्रश्न प्रतिष्ठेचा न करता मध्यम भूमिका स्वीकारून मार्ग काढावा.

वाहनांची वेळेवर न होणारी दुरूस्ती, टाईम टेबल मधील गोंधळ, काही कर्मचाऱ्यांचे प्रवाशांशी बेताल वर्तन यासारख्या काही उणीवा असल्या तरी दूरच्या प्रवासाला एसटी सारखा सुरक्षित आणि खात्रीपूर्वक पर्याय नाही हे अगदी खरे. ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आणि शिक्षक ,इतर शासकीय कर्मचारी यांना गावातून तालूक्याला किंवा मोठ्या शहराकडे कामाला जाण्यासाठी एसटी सारखा स्वस्त आणि मस्त पर्याय उपलब्ध नाही. आता शाळा,महाविद्यालय सुरू झाली आहेत आणि त्यांचं भविष्य या लालपरीवर आहे. तेव्हा शासनाने लवकर निर्णय घ्यावा आणि कर्मचाऱ्यांना न्याय देऊन संप मिटवून एसटी सुरू करावी हीच विनंती.

लाल परी सर्वांची प्यारी,गरीबाची ती लाडकी सवारी
रस्त्यावरती धावूदे विठ्ठला, डेपोतच उभी नाहीच बरी.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

13 thoughts on “लाल परी सर्वांना प्यारी

 1. komunistyczny oddział nauki w Częstochowie

  What’s up friends, nice paragraph and fastidious urging commented here,
  I am genuinely enjoying by these.

  Komunistyczny oddział nauki w Częstochowie

 2. politechnika częstochowska wydział zarządzania

  Hi there to every body, it’s my first pay a visit of this webpage; this
  webpage carries awesome and really excellent information designed for readers.

  Pcz wz
  wydzial zarzadzania pcz
  politechnika częstochowska wydział zarządzania
  politechnika częstochowska wydział zarządzania
  wydzial zarzadzania pcz

 3. https://www.google.com.af/url?q=https://cru98.com/

  Hi there this is kinda of off topic but I was wanting to
  know if blogs use WYSIWYG editors or if you have to manually code with HTML.
  I’m starting a blog soon but have no coding know-how so I wanted to get
  advice from someone with experience. Any help would be greatly appreciated!

 4. Archana Kulkarni
  Archana Kulkarni says:

  अगदी बरोबर लिहिले आहे.नाही ते लोक हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करतात आणि मेहनती, प्रामाणिक लोकांना केवळ पुरेसा मोबदला मिळावा यासाठी झगडावे लागते.उद्धवा अजब तुझे सरकार…!

 5. voltaren

  Excellent post. I was checking continuously this weblog and I’m impressed!
  Extremely useful information specifically the last part 🙂 I deal with such info much.

  I used to be looking for this certain information for a long time.
  Thanks and best of luck.

 6. https://www.google.com.uy/url?q=https://fun88n.com/

  An outstanding share! I have just forwarded this onto a
  colleague who has been doing a little research on this.

  And he actually ordered me dinner simply because I found it for him…
  lol. So allow me to reword this…. Thank YOU for the meal!!
  But yeah, thanx for spending some time to talk about this issue here on your website.

 7. https://www.google.co.th/url?q=https://www.wilcherish.com/

  Hello there I am so glad I found your site,
  I really found you by error, while I was searching on Bing for something else, Regardless I am here now
  and would just like to say many thanks for a remarkable post and a all round interesting blog (I also love the theme/design), I
  don’t have time to browse it all at the minute but I
  have bookmarked it and also included your RSS feeds,
  so when I have time I will be back to read much more, Please do keep
  up the superb jo.

 8. https://www.google.dj/url?q=https://fun88n.com/

  Generally I don’t learn post on blogs, but I would like to say that this write-up very
  pressured me to check out and do so! Your writing taste has been surprised me.

  Thank you, very nice post.

 9. Brian

  Hi to all, how is all, I think every one is getting more
  from this web site, and your views are pleasant designed for new visitors.

 10. augmentin

  I’m curious to find out what blog platform you are utilizing?
  I’m experiencing some minor security problems with my latest website and I would like to find something more safeguarded.
  Do you have any solutions?

 11. wellbutrin

  Hello there! This is my first visit to your blog! We are
  a team of volunteers and starting a new project in a community in the same niche.
  Your blog provided us valuable information to work on.
  You have done a extraordinary job!

 12. pcz wz

  Asking questions are truly nice thing if you are not understanding anything fully, but this article gives
  nice understanding yet.

  Usos web pcz
  usos
  usosweb pcz
  pcz wz
  usos pcz

 13. https://www.google.cat/url?q=https://mayalounge.net/สมัคร-fun88/

  Have you ever considered about adding a little bit more than just your articles?
  I mean, what you say is valuable and all.
  However just imagine if you added some great pictures or videos to give your posts more, “pop”!
  Your content is excellent but with pics and video
  clips, this site could certainly be one of
  the very best in its field. Awesome blog!

Comments are closed.