शोध
सारेच अर्तक्य, अनाकलनीय, दुर्लभ तरीही नित्य शोध सुरु
प्रत्येक श्वासागणीक जगणे, मरणे तरी “माझे” चा अट्टाहास धरु?
कल्पनेच्या जगात वावराताना बांधतो आम्ही नित्य इमले
जगण्यात सुखाचा ध्यास, त्यासाठीच मनाचे नवनवे जुमले
पैसे खुप मिळवावे म्हणून आम्ही कोणतीही करतो तडजोड
फसवणूक,दरोडा,चोरी,तर कधी पैशासाठी परीक्षा पेपर फोड
सत्ता, खुर्ची आहे तोवर राजा, घ्यावा फायदा पदरात पाडून
लक्ष्मी म्हणे चंचल असते, कळणार नाही कधी जाईल सोडून
हे सर्व मिळवायचे तर हवी चाणाक्ष बुध्दी, त्यासाठी घ्यावे गाडून
निती, नियम पाळण्यापेक्षा पेरावे धन अन माणसे घ्यावी जोडून
बंगला, गाडी,बँक बॅलन्स, जमीन, शेअर्स, सुखासाठी सारेच जवळ हवे
मित्र, मैत्रीण, पार्टी, सुख चालत येई दारी, मनसोक्त कवेत घ्यावे
कुठे थांबायचे कळले नाही तर बसतोच पाठीवर नियतीचा आसूड
दुसऱ्याचे दुःखाश्रू अन शाप भोगावे लागतात दैवच घेत नंतर सुड
सुखासाठी करावे चातुर्याने श्रम, सचोटीने मिळवावे गरजे पुरते धन
रंजल्यागांजल्या उठवावे, मदतीस जावे, दुर्बलांचे जिंकून घ्यावे मन
सोने नाणे इथेच राही, कोणीच काही नेत नाही, इतकेच घ्यावे ध्यानी
दुष्कर्म छाताडावर नाचे, सत्कर्माचा डंका वाजे, व्हावे पूण्याचे धनी
तुमचेच कर्म आता ठरवते, करी पाप पुण्याचा इथल्या इथेच हिशोब
काय हरवले काय गवसले त्याचा मरण्यापूर्वीच घ्यावा डोळस शोध
छान कविता सर.
धन्यवाद भोसले सर.
छान..! वस्तुस्थिती अचूक हाताळली आहे…!