स्मृती

स्मृती

बोर्डाची १२वी ची परीक्षा पंधरा दिवसावर आली तसा विनय भानावर आला. अजूनही Maths आणि Chemistry ची दोन दोन Chapter करणे बाकी होते. इंग्रजीला तर हातही लावला नव्हता. त्यातल्या त्यात Physics आणि Bio ची भिती वाटत नव्हती. प्रिलीमला पेपर सोप्पे गेले होते. गंमत म्हणजे प्रिलीमचा रिझल्ट अजूनही डिस्प्ले केला नव्हता.
कुठून सुरवात करावी तेच कळत नव्हतं. गेला महिनाभर ममा सकाळी पाचला अभ्यासाला उठवत होती पण अभ्यास होत नव्हता. सारखी सुषमा डोळ्यासमोर यायची. जर पिकनिकला गेलो नसतो तर, जर सुषमाशी भेट झाली नसती तर, आता ह्या तर ला अर्थच नव्हता. घडायला नको ते घडलं होतं.

आम्ही क्लासच्या पिकनिकला गेलो तेव्हा तिची पहिल्यांदा ओळख झाली. तिची माझी क्लास बॅच वेगळी होती. क्लासची एकत्र पिकनिक नालासोपारा येथे आनंद रिसॉर्टला गेली आणि आम्ही बसमधुन प्रवास करतांना पहिल्यांदा ऐकमेकांना भेटलो. कोणीतरी गाण्याच्या भेंड्या खेळण्याची टुम काढली आणि सर्व मुलांनी दुजोरा दिला. भेंड्याची चढाओढ लागली, मुली व्हरसेस मुलं. दोन्ही बाजूला नव्या आणि जुन्या गाण्यांचा भरपूर स्टॉक होता. आम्हाला “र” अक्षर आलं होतं.आमच्या बाजूने र वरून एखादे गाणे सुरु केले की मुली ओरडत रिपीट, रिपीट, र वरची बरीच गाणी गाऊन झाली होती. कोणालाच र वरून गाण आठवेना, जो तो दुसऱ्या जवळ आशेने पहात होता, आणि मुलींच्या बाजुने तिने गिनती सुरू केली. टिकटिक एक, टिकटिक दोन, टिकटिक टिकटिक तीन.. ,आता आमच्यावर भेंडी चढणार हे निश्चित होतं इतक्यात मला र वरून गाणं आठवलं,
रूला के गया सपना तेरा,बैठी हु कब हो सवेरा
रूला के गया सपना तेरा, मी ते कडव तिथेच सोडलं

टाळ्यांचा कडकडाट झाला.भेंडी टळली,तीने माझ्याकडे पाहिल, “ए प्लीज गाण पूर्ण म्हण ना रे” , मला काय वाटलं कुणास ठाऊक पण मी ते गाणं पूर्ण म्हटलं. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या.

गाडी रिसॉर्टला पोचली. आरडाओरडा करून सगळ्यांना भूक लागली होती. entry formality पूर्ण होताच सगळे ब्रेकफास्टसाठी लाईनमध्ये उभे राहिले. मी वॉशरूमला जाऊन आलो त्यामुळे मी लाईनमध्ये मागे उभा होतो. ती जिला मी पहिल्यांदा भेटत होतो.मुलींच्या लाईनमध्ये पुढे उभी होती. थोड्या वेळाने तिचे लक्ष माझ्याकडे गेले,ती हसली, म्हणून मी ही हसलो, तिने खुणेनेच, कुठे होतास विचारले? मी चेहरा धुण्याचा अभिनय करत उत्तर दिले.
लाईन हळूहळू सरकत होती. स्नॅक्स च्या टेबल पासून ती सातवी ,आठवी असतांना तिने कोणाचे लक्ष नाही पाहून अचानक लाईन सोडली, तरीही तिच्या विचित्र वागण्याने इतर मुली तिच्याकडे पहात होत्या. तीने खुणेनेच तिच्या मैत्रिणीला काहीतरी सांगितले.आता स्नॅक्स स्टॉलवर कमी गर्दी होती. ती स्नॅक्स घेऊन जिथे मी बसलो होतो तिथे आली. “Can I sit here? ” “Oh! no problem,have a seat. थोड बारीक आवाजात ती Thanks म्हणाली.
“Oh! But for what?” “For accepting my request .I am Sushama Bhanavat and you?”
“Vinay kale,Thanks for your comment.”
“काही म्हण तू चांगल गातोस,क्लास जॉईन केलाय का?”
“नाही नाही आपलं असंच, म्हणजे आवड आहे म्हणून, माझी ममा गाते क्लासिकल सुध्दा.” “काय म्हणालास ? ममा क्लासिकल गाते. मग तर तुझ्याकडे एकदा आलच पाहिजे. मला क्लासिकल खूप आवडतं, काय?, आल तर चालेल ना?” “हो ये की, पण आता आपल्या परीक्षा सुरु होतील, त्यामुळे परीक्षे नंतर आलीस तर बरं होईल म्हणजे तुला सवडीने ऐकता येईल.” “त्या माझ्यासाठी वेळ देतील?”
“हो! म्हणजे ती वेळ नक्की देईल, पण आत्ता नाही. आता तिच्यासाठी महत्त्वाचा फक्त माझा अभ्यास. Nothing else. “बरं तर,Nice to meet you.Bye bye , मी इथे बसून राहिले तर आपल्या संबंधी गैरसमज होईल तेव्हा मी निघते, पण तू तुझा सेल नंबर दे, मी तुला मिसकॉल देते,चालेल ना ?” “Sure,घे माझा नंबर.ओके,मला मिसकॉल दे. बरं, तुझं एक्झाम प्रिपरेशन झाल का?”
“Yes, Most of I finished before our class prelim. Now I am solving previous board papers, what about you? Have you?”
“I have to prepare for Math and Chemistry. I have difficulties in integration and sums in chemistry. Let’s see I have to work hard now.”
“Vinay, if you are interested, I can help you in integration to clear your doubts. By the way, what about your CET preparation? ” “I have prepared for Bio and physics but here also, the problem is the same.” “Ok, then do one thing, you can help me in Bio and I will help you with math.”

आम्ही ब्रेकफास्ट संपवत निरोप घेतला. वॉटर स्पोर्टस, लॅडर, स्काय व्हील असे अनेक खेळ खेळतांना आम्ही एकमेकांना विसरून गेलो. त्या दिवशी आम्ही अनेकदा ओझरते भेटलो पण आजूबाजूला मित्र असल्याने काही बोलण झालं नाही. आम्हाला एकमेकांच्या विषयी नक्की काय वाटत होत ते माहिती नव्हत पण तिने स्माईल दिलं तर बरं वाटत होत, तिच्यासाठी मी स्पेशल आहे असं नक्की वाटत होत. तिला सारखं पहावस वाटत होत. परततांना सर्वांनी पुन्हा एकदा हंगामा केला. मी मात्र स्वतःबद्दल, आणि डिसेंबर आला तरी न झालेल्या अभ्यासाबद्द्ल विचार करत होतो अभ्यासाच्या तणावातच मी घरी पोचलो. बेल वाजवतात डॅड नी दार उघडलं, विनय ये, आलास,बराच उशीर झाला. तुझी ममा फोन करत होती तरी उचलला नाहीस!” श्रीरंग जरा मोठ्या आवाजात बोलले. “अरे ! पोरगा थकला असेल, जरा आत तर येऊ दे. फ्रेश होऊ दे, नंतर विचार काय विचारायचं ते. विनय, बेटा तुला चहा ठेऊ का,की मग थोड्या वेळाने जेवायला बसुया ?” “ममा, मी फ्रेश होऊन येतो, डॅड माझ्या मोबाईलची बॅटरी डाऊन असेल म्हणून नाही समजलं” मी म्हणालो. थोड्या वेळाने आम्ही जेवायला बसलो. माझी बहिण रश्मीका, मी काय काय मजा केली विचारत होती. मी सुषमा सोबत नव्याने मैत्री झाल्याच सोडून आनंद रिसॉर्ट मधील सगळ्या गंमती जमती सांगितल्या. डॅड ऐकत होते. थोड्या वेळाने डॅड म्हणाले, विनय पिकनिक संपली आता सिरिअसली अभ्यास कर. फक्त तीन आठवडे उरलेत. तू मेडिकलला जाव अशी आमची अपेक्षा आहे.त्या दृष्टीने फोकस कर. सीईटीला चांगला स्कोअर केलास तर मुंबईत चांगल कॉलेज मिळेल. आपल्याला डोनेशन द्यायला जमणार नाही.

ममा त्यांच्यावर पुन्हा रागावली, “अरे तो घरी येऊन दोन तास झाले नाहीत तू सारखा त्याला टॉर्चर का करतोस, विनय बेटा, डोन्ट वरी मला माहित आहे तू मेडिकलला नक्की जाशील, तू दमला असशील आज मस्त अराम कर.”
मी माझ्या बेडरूममध्ये गेलो, शांत पडून राहिलो.माझ्या मागोमाग रश्मीका आली,”ए दादा तू रिसॉर्टमध्ये फोटो काढलेस का? मी तुझा मोबाईल बघू का? “
मी तिला रागावलो, “हे बघ मी काही फोटोबीटो काढलेले नाहीत, उद्या परवा मित्र मला फॉरवर्ड करतील तेव्हा तुला दाखवेन. आता मी जरा पडतोय मला त्रास देऊ नको.”
“ठिक आहे, नसू देत फोटो पण मी तुझा मोबाईल घेऊ का? प्लीज फक्त थोडा वेळ.” मी तिच्या प्लीज शब्दामुळे नाही म्हणू शकलो नाही, ती माझा मोबाईल घेऊन हाँलमध्ये गेली. मी सकाळी बसमध्ये घडलेल्या घटनेचा विचार करू लागलो, सुषमाने मला पूर्ण गाण म्हणायचा आग्रह करताच मी ते म्हटलं, ती माझ्या टेबलावर येऊन मी बसू का? म्हणताच होकार दिला, मुख्य म्हणजे फारशी ओळख नसतांना आपल्याला math, chemistry थोड कठीण जात हे तिने न विचारताच आपण सांगून टाकलं.कहर म्हणजे तीने मोबाईल नंबर मागताच आपण देऊनही टाकला. शा! आपण इतके कसे हुरळून गेलो. ती सुंदर आहे यात प्रश्नच नाही पण ती मला मोहात पाडतेय हे खर, की उगाचच तस मला वाटतय? काहीच कळायला मार्ग नाही. मी तिच्या प्रेमात तर पडलो नाही ना? घंटा! आपल्याला कुठं कळतय, प्रेम म्हणजे नक्की काय असत?डॅडला
चुकनही कळलं तर ढुंगणावर लात घालतील.विचाराच्या तंद्रीत असतांना रश्मीका धावत आली, “दादा कुणाचा तरी फोन आलाय, घे बघ कोणाचा आहे तो.”
फोन व्हायब्रेटरवर होता. मी पाहिलं सुषमाचाच फोन होता, मी रश्मीकाला म्हणालो,”तू जा माझ्या मित्राचा फोन आहे, बोलून झाल की मी तुला देतो.” “दादा,नक्की ना?नाहीतर म्हणशील आता उशीर झाला, झोप तू.” ” रश्मा नक्की देतो, जा तू, डॅड काय करतात?” “ते न्युज बघत आहेत आणि ममा किचन आवरतेय. पण तू नक्की मोबाईल दे हा,दहा मिनिटात मी परत देईन.” ती जाई पर्यंत रिंग बंद झाली, मी कॉल बॅक केला. पलीकडून आवाज आला, “ये, हॅलो, फोन का घेतला नाही, दमलास का?” “नाही ग, पण तू एवढ्या रात्री फोन का केलास? म्हणजे माझे डॅड, ममा घरी आहेत,ते काय म्हणतील? आता ठिक आहे पण यापुढे डायरेक्ट फोन नको करू त्यापेक्षा आपण chatting करू.”
“अरे मी सहज कॉल केला, म्हटलं पाहूया आपला फ्रेंड काय करतोय? मला वाटलं तुला माझा फोन पाहून आनंद होईल.” “तसं नाही गं,म्हणजे फोन केलास ते ठिक पण डॅड घरी आहेत म्हणून म्हणतो.” “ये तू आता नक्की काय करतोस? , म्हणजे इंटीग्रेशन सोडवत असशील ना?”
“Hell with integration, सुषमा तुला तो विषय आताच काढायचा होता का? का जखमेवर मिठ चोळतेस?”
“ए विनय, sorry yaar, जस्ट जोक यार. Forget it. फोन केला कारण तस काही नाही, वाटलं पाहू तुला आठवण आहे का?” तिच्याशी काय बोलाव त्याला सुचत नव्हतं. तो काय उत्तर द्यावं विचारात असतांना तीच बोलली.
” अरे बोल की, मीच एकटी बदबडतेय. Are you angry with me? “No, no, not like that,but really I have to study seriously. Dad reminded me just now, he wishes I should go for medical. I must fulfill his dream.” “Ok, then you must study hard by planning the subject and time schedule. Bye then if you need any help I am here to help you.” “A please listen, सुषमा,खर सांगू, मी तुझाच विचार करत होतो,तू किती बोल्ड आहेस सरळ म्हटलीस पूर्ण गाण म्हणं, पहिल्यांदा आपण बसमध्ये भेटलो. फारशी ओळख नाही आणि तरीही मोबाईल नंबर शेअर केलास,This is not good, someone may take undue advantage. मलाच कळत नाही तू एवढी झटपट मैत्री कशी करतेस?” “I can recognize people, I like your innocence, I like your simple living. Now don’t forget you have to prepare for exams. Good night, good bye.”
बोलण संपता संपता रश्मीका आली, “दादा, किती वेळ मित्राशी बोलतोस मोबाईल देतोस ना?” मी मोबाईल तिला दिला. तिची आठवण होताच अंगातून गोड झिणझिण्या येऊन गेल्या, आजुबाजुला पाहीलं सगळीकडे शांत होत. कोणाला तरी मी आवडतो, तिला माझ्याशी बोलावंसं वाटत हेच मोठ डील होत. आता मला परफॉर्मन्स दाखवून तिला इंप्रेस करायच होत. मी मनाशी ठरवल,बस आता No wastage of time, only heard work.

मी झपाटून अभ्यासाला लागलो. मला अभ्यासात बिझी पाहून डॅड खुश होते. ममा माझी सरबराई करायला उत्सुक असायची. कधी कधी ती माझ्या रूममध्ये बसून पेपर किंवा एखादे पुस्तक चाळत बसायची. कधी माझ्यासाठी कॉफी घेऊन यायची. रश्मीका पाय न वाजवता माझ्यासाठी आईने दिलेला खाऊ ठेऊन जायची.

आता सुषमा कधीतरीच chatting करून अभ्यास कसा चालू आहे विचारायची. आधी ठरवून एक दोन वेळा क्लासच्या बाहेर आमची भेट झाली, एकत्र पिझ्झा घेतला, तिने मला तिच्या नोटबुक शेअर केल्या. पण आम्ही भेटलो तरी विषय फक्त अभ्यास असायचा. कधीतरी मी सुषमाशी अभ्यासाविषयी डिस्कस करायचो तेव्हा ममा कुठेतरी आजुबाजुला असायची. तिने एकदा विचारलं देखील, “विनय कोणाशी एवढं बोलतोस रे? मित्र आहे की मैत्रीण.”
मी तिला अर्ध सत्य सांगून टाकलं, “अग माझी क्लासमेट आहे, तिच maths चांगलं आहे, तिला माझ्या डिफिकल्टी विचारत होतो.” “बरं बरं, काय नाव तिच? कशी दिसते?”
“ममा, ती कशी दिसते याचा अभ्यासाशी काही संबंध आहे का? सुषमा भानोत तिच नाव, गोरेगावला रहाते, पार्ले-साठे कॉलेजमध्ये आहे. या पलिकडे तिची माहिती नाही.” “अरे रे! मी ज्या गोष्टी विचारल्या नाहीत त्या ही तू सांगून मोकळा झालास,म्हणजे तुमची चांगली मैत्री आहे तर.” “ममा,तुझी सवय मला माहिती आहे,तू एक एक प्रश्न विचारत रहाणार म्हणूनच सांगीतले. झाल तुझ समाधान.” “विनय,हे बघ काय तिच नाव ते सुषमा भानोत की कोण ती, मैत्री अभ्यासापुरतीच ठेव, या मुलींच काही सांगता येत नाही, मुलगा चांगल्या घरचा आहे समजल की चिकटायला बघतात. तेव्हा..” “ममा, I know my priority, she is not that kind of girl, She is brilliant and well focused. Did you know actually she helped me to come out from my math phobia.so don’t blame her.” “Oh! You are more confident of the unknown, rather than your mother’s experience. Fine keep it up.” ममा आश्वस्त झाली. आता तिला आमच्या मधील संबंधाची भिती वाटत नव्हती.
घरातलं वातावरण एकदम बदललं होत. मी अभ्यासाला लागलो पाहून ममा खुश झाली. डॅडसाठी नाही पण सुषमासाठी मला टार्गेट गाठायचंच होतं. तिच्या solved examples ची मला बरीच मदत झाली. तिने सोल्युशन एवढी व्यवस्थित लिहिली होती की तिला काही न विचारता मला स्टेप्स कळत होत्या. सुषमाच्या मॅच्युरिटीवर मी खुश होतो. तिच्यामुळेच माझ्या मनात जिगर निर्माण झाली होती. कधी कधी रात्री दोन अडीच वाजेपर्यंत मी अभ्यास करायचो, लाईट तशीच ठेऊन झोपी जायचो पण कोणीही माझ्यावर रागावत नव्हतं.

पहाता पहाता परीक्षेचा दिवस उजाडला, practical exam अगोदरच झाली होती. मला तिन्ही विषयात double digit marks मिळाले अस एक शिपाई काका म्हणाले होते. तेच आम्हाला प्रॅक्टिकल ला मदत करत होते. आमच्या send off प्रोग्रॅमला सर्व स्टाफला आम्ही प्रेझेंट दिले होते. मला प्रॅक्टिकल एक्सामला त्यांनी सोल्युशन ओळखायला मदत केली होती. परीक्षेच्या दिवशी सकाळी तिचा फोन आला. “Hello, sushma here, my best wishes for your exam, hope you are confident now.” “Thanks Su, best wishes to you also. God bless you.”

रोज तिचा गुड मॉर्निंग मेसेज यायचा आणि एक वेगळाच उत्साह वाटायचा, पाहता पाहता दोन तीन पेपर झाले, Math असताना दोन दिवस गॅप होता.मी व्हिडिओ कॉल करून माझ्या डिफिकल्टी तिला विचारून घेतल्या.आता इंटीग्रेशनची भीती वाटत नव्हती. ती ममाशी बोलली, दुसऱ्या दिवशी ती घरी आली.आम्ही दोघानी मागचे दोन तीन पेपर सोडवले. ममाने तिच्यासाठी न्युडल्स आणि कॉफी केली. तीने बरेच प्रॉब्लेम मला सोडवून दाखवले. डॅड येण्याअगोदर ती गेली. संध्याकाळी ममानेच सुषमा विषयी डॅडना सांगितले. ती हुशार आहे ऐकून डॅड माझ्याकडे येत म्हणाले, “बघ तुला तिच्याकडून शिकायची पाळी आली कारण वर्षभर तु टाईमपास केलास,आता तिच्याइतका तरी स्कोअर कर.”

खर तर डॅडचा मला प्रचंड राग आला होता सारखं comparison करत असतात. तिच्यापेक्षा मला Bio किंवा Chemistry मध्ये नक्की जास्त मार्क्स मिळतील याची खात्री होती. पण मी ते सांगत बसलो नाही. मी म्हणालो “Math मला डिफिकल्ट जातं हे मी तुम्हाला म्हणालो होतो पण Now I will surely secure good marks in Math. तुम्ही म्हणता तस नसत She faces difficulty in Bio and I am going to help her, a single person may not be master in all subject, We share each other and solve our difficulties.”
डॅड काही बोलले नाहीत. माझा मुद्दा त्यांना पटला असावा, अजूनही काही पेपर बाकी होते.आम्हाला अभ्यास करायला पुरेसा वेळ होता. आता सुषमा पेपर नसेल त्या दिवशी आमच्या घरी येऊ लागली. वेळ असेल तेव्हा ममा तिच्याशी गप्पा मारत असे. आठ,दहा दिवसांनी आमची परीक्षा संपली.

मी सीईटी साठी confidently तयारी करत होतो.बोर्ड परीक्षा झाल्याने तसा रिलॅक्स होतो. बरेच दिवस सुषमाचा फोन नव्हता, मी ही फोन केला नव्हता. Exam संपली की तू ममाकडे ये अस तिला म्हणालो होतो. बहुदा ती CET साठी तयारी करत असावी म्हणून मी फोन करून तिला disturb केलं नाही. दोन तीन दिवसांनी दुपारी माझ्या मोबाईलवर फोन आला, मी फोन नंबर पाहून दचकलो तो सुषमाचा फोन नंबर होता. मी hello म्हणत संवाद सुरू केला तेव्हा समोरची व्यक्ती म्हणाली, “मी सुषमाचा वडील बोलतोय हा फोन विनय काळे याचा फोन आहे का?”
मी हो म्हणालो. मला कळेना सुषमाच्या वडिलांनी मला का फोन केला असावा. ते म्हणाले,तुमचा मोबाईल नंबर तिच्या मोबाईलवर सापडला. ती तुझ्या बाबत आमच्याशी बोलायची म्हणून तुलाच फोन केला सुषमा आजारी आहे, तिला भेटायला तु येशील का?

“कोण? सुषमा! ती आजारी आहे,काय झालय तिला सांगाल का? अहो ती तर एकदम उत्साही होती.आम्ही एकत्र अभ्यास करायचो.अस अचानक तिला काय झालं?”
“तस म्हणजे तिला चार पाच दिवसांपूर्वी अचानक ताप आला आम्ही लगेचच औषधे आणली पण दुसऱ्या दिवशी ती जास्तच सिरिअस झाली. आम्ही तिला लगेचच एका खाजगी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केली. तिच्या शरीरात प्रचंड कणकण होती. ती जोराने रडत होती. हातपाय आपटत होती. डॉक्टरांनी तिला आराम मिळावा म्हणून झोपेच इंजेक्शन दिल.पाच सहा तासांनी ती उठली तेव्हा थोडी बरी वाटली. उठून बसण्याचा प्रयत्न करत होती. तिला उठता येईना पाहून आम्ही तिला आधार देऊन उठवण्याचा प्रयत्न केलग पण व्यर्थ. आता ती कमरेतुन लुळी पडली आहे. फक्त डोळे उघडून पहाते म्हणून एक विनंती होती. तुम्ही आलात तर कदाचित…”

“ओ माय गॉड! काका मी नक्की येतो मला पत्ता सांगा.”मी तिच्या वडिलांना म्हणालो. मी ममाला घडला प्रसंग सांगितला तिचा तर विश्वास बसत नव्हता. ममा आणि मी पार्ले येथे हॉस्पिटलमध्ये गेलो तिचा अवतार पाहून मला रडू कोसळले, “सुषमा उठ बघ मी आलोय,मी तिच्याकडे पहात ओरडलो, तिचे डोळे लकाकले तिने हात हलवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आणि दुसऱ्याच क्षणी तिने मान टाकली. माझ शरीर बधीर झालं ,क्षणभर मला कळेना हे अस काय झाल. माझ्या समोर ती या देहातून निघून गेली. मी ओक्साबोक्शी रडू लागलो. ममा माझ दुःख पाहून हादरली. सुषमाच्या आई ,वडिलांची स्थिती काय झाली असावी ते सांगणच अवघड होत पण मी ठरवलं तिच स्वप्न मी पूर्ण करेन.

मला तिथ उभ राहणही अशक्य झालं. मी भानोत अंकलचा निरोप घेऊन निघालो.आम्ही कसेबसे घरी पोचलो. डॅड ला ही गोष्ट कळाली तेव्हा त्यांनाही धक्का बसला. जिने माझ्या अभ्यासात मदत करून मला उभारी दिली तीच आज अचानक या जगातून निघून गेली होती. मी झपाटून अभ्यास करु लागलो, तिचा चेहरा सारखा माझ्या समोर यायचा
तिची ती विनंती ए प्लिज गाण पूर्ण म्हण ना!
रूला के गया सपना तेरा, बैठी हू कब हो सवेरा
रूला के गया सपना तेरा ।

आज त्या प्रसंगाला बारा वर्षे झाली मी इंटर्नशिप पूर्ण करून चार वर्षे सर्विस केली आणि आज स्वतःच हॉस्पिटल उघडलं होतं, आणि त्याचं उदघाटन तिच्या वडिलांच्या हस्ते करत होतो,त्यांना कदाचित कल्पना नसावी की मी काय करत होतो पण ते आले आणि हॉस्पिटलच्या नावाचा कव्हर केलेला फलक त्यांनी फित कापून दूर केला त्यावर मोठ्या अक्षरात लिहिले होते, “Sushama Speciality hospital dedicated to my beloved friend.’
ज्या मैत्रीणींनी माझ्या मनातील भिती दूर व्हावी म्हणून माझ्या घरी येऊन मला अभ्यासात मदत केली.उभारी दिली, तिला दिलेली ती श्रध्दांजली होती. हॉस्पिटलच्या नावाचा तो बोर्ड पाहून सुषमाच्या वडिलांनी मला मिठी मारली आमच्या मैत्रीसाठी त्यांच्याकडे शब्द नव्हते. यापुढे मी आजन्म अविवाहित राहून रुग्णसेवा करण्याचे व्रत स्वीकारले होते हे त्यांनी ऐकले आणि ते गहिवरले. ते म्हणाले “शहाजहानने आपल्या पत्नीसाठी ताज बांधला ही कथा असेल पण आपल्या मैत्रिणीच्या स्मृती जतन करण्यासाठी अशी वेडी प्रतिज्ञा घेणारा फक्त तूच.”

माझे आई ,बाबा यांना पूर्व कल्पना असल्याने ते स्थितप्रज्ञ होते पण लग्न झालेली माझी धाकटी बहीण मात्र माझ्या वेगळ्या विचारामुळे हॉस्पिटल उद्घाटनाला आली नव्हती. केवळ पंधरा दिवसांपूर्वी मैत्री झालेल्या एका मुलीसाठी मी आजन्म लग्न करणार नाही हा विचार तिला पटत नव्हता. पण मी काय करत होतो ते फक्त मलाच माहिती होते, होय मी माझ्या सुषमाला विसरू शकत नव्हतो.सुषमाच्या स्मृती हॉस्पिटलच्या रूपाने मी जतन करणार होतो. माझ्या जीवनात कोणी अन्य स्थान घेऊ नये म्हणूनच मी हॉस्पिटलला तिचे नाव दिले होते ज्यामुळे मला सतत जाणीव होणार होती, माझ्या वेड्या मैत्रिणीने माझ्यासाठी आपले जीवन दिले होते.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

One thought on “स्मृती

  1. נערות ליווי

    I was very pleased to uncover this great site. I need to to thank you for ones time for this fantastic read!! I definitely appreciated every bit of it and I have you bookmarked to look at new information on your blog.

Comments are closed.