आर्त
तू निघून गेल्यानंतर कळली तुझ्या असण्याची गंमत
डोळ्यांना बजावलं बन निडर, बांधून स्वतःची हिंमत
ते बिचारे अगतिक त्यांना सहन होणे नव्हते शक्य
त्यांना कुठे मोकळे स्वातंत्र्य ते मुकभावनेचे भक्त
घडले ते घडले चुक शोधत बसून कशास आटवू रक्त?
मनात खोलवर रूजले ते कसे विसरून जाऊ तुझे नातं?
स्वतःला खंबीर समजत होतो पण वेदनेने दिली मात
ह्रदयाला आसवांचा महापूर ,खरेच, वाटते तसं नसतं
प्रेम हा काही चिंतनाचा विषय नाही ते सहजच बसतं
कळत नकळत जडतो जीव, मनात अचानक कुणी भरतं
हळूहळू गुंफले जातात प्रेमाचे बंध, मन जागेपणी हरवते
सांगायचे असते बरेच पण डोळ्याच्या डोहातच तर विरते
निशब्द डोळ्यांची भाषा त्या भावनेत ती भिजून जाते
त्याच्या मिठीत हळूवार शिरतांना त्याला अलींगन देते
तो ना तिच्या स्पर्शाने पेटून उठतो ना रोमांच मनावर उठतो
जाणीवेच्या कल्पनेचा उत्साह, क्षणात मनी कोंब गुदमरतो
होते मिठी सैल तिची, भाव अनोळखी,वेदना डोळ्यात
ती मूक परतली तेथून आवरून, मागे उरले वेदनेचे आर्त