उठ गया जनाजा
भणंग जगण्याची दोस्ता, कर मनी तू पक्की तयारी
सावली तव सोबतिची, तुज सोडून दूरदेशी गेली
कशास डोकावायचे उगा, श्रीमंतांच्या जुन्या महाली
पेरले ते न उगवले, जमीन बेवफा कशी झाली?
सिंचले माझेच रूधीर, तरी कोरटी का उपजली?
विश्वास ठेऊ कशाला? माझी मैत्रीच बदनाम झाली
धूर राहिला भरून स्वप्नांचा, दुर्दशेस दोष कुणा देऊ?
सुर आळवून आता, का दुर्दैवाच्या वाहू पखाली?
भेसूर मजही कंठ लागे, मर्तीकांच्या झाल्या मशाली
तिच्या बाहुत विसवण्याची, धुंदी आता मनी न उरली
कळले न मलाच माझे, कधी शरीराची टरफले झाली?
मांडली मैफिल अर्ध्यावरती, मज बेहोषित सोडून गेली
जखमा हळव्या मनाच्या, चाटून पाहिल्या मी कितींदा
त्या चिघळून पार आता, न उरल्या खुणा काहीच मागे
पाहिला आठवूनी, भुतकाळ, दुनियेत झाले हसेच हसे
मित्र गेले कुठे कळेना, एका रात्रीत सरला खजिना
रित्या बाटलीस कोण पुसते, मुश्कील है अब पिना
पक्षी सोडून गेले पेड, यादो मे उनके क्यू रोना
प्रेम गंधर्वाची इहलोक यात्रा, त्याच्या खांद्यावरून निघाली
वैभवाचा अस्त झाला, उठला जनाजा, मग जाग आली
झाले हसू मज जन्माचे, चित्ता पेटून शांत शांत झाली
ना सखी कुणी, न उरले आता मैतर अब जेब है खाली
आशेची किरणे पेरीत फिरलो,परी ती वांझोटी निघाली
रात को मै ड्रामा मे राजा पर मुहँ मे बिडी है विझलेली