बाप्पा गजनानास अनावृत्त पत्र

बाप्पा गजनानास अनावृत्त पत्र

बाप्पा गजनानास अनावृत्त पत्र

बाप्पा, नमस्कार,
साष्टांग नमस्कारच म्हणणार होतो पण हल्ली गुरूजी साष्टांग नमस्कार घालायला सांगतात तेव्हा अष्टांग धरणीला नीट टेकत नाही, म्हणून आपलं नमस्कारावर भागवलं. बरं तिथे स्वर्गात सगळ कुशल मंगल आहे ना? हल्ली तुमची स्वारी येथे येत नसावी म्हणून म्हटले इकडची परिस्थिती एकदा कळवावी. आता चतुर्थी येत आहे तद्पूर्वी तुम्हाला परिस्थिती कळवलेली बरी.

गजानना, श्री गणेशा , गणपती, मंगलमूर्ती, विनायक किती किती नाव रे तुझी? तू म्हणे विघ्नहर्ता आहेस. तू बुध्दीदाता आहेस, तू करूणाकर आहेस मग आपल्या भक्तांसाठी एवढी कृपा करच, येथील गणेश मंडळांना चांगल्यावाईटाची जाण दे, त्यांच्या मनात असणाऱ्या श्रध्दा आणि अंधश्रद्धा याचा गोंधळ कमी कर.

तुझे थोर भक्त बाळ गंगाधर टिळक यांना तू ओळखत असशीलच त्यांनीच म्हणे सार्वजनिक गणपती उत्सव प्रारंभ केला. त्यांच्या कृपेने तुला एवढी प्रसिद्धी मिळाली. पारतंत्र्यात लोकांचे संघटन व लोकांचे प्रबोधन करता यावे या शुध्द हेतूने तुझा हा सण साजरा करावा असे त्यांना वाटले. त्यांचं काही चुकलं का? तुझ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिक्षण, संस्कार पोचवणे समाजातील अनिष्ठ प्रथा दूर करणे, आपला स्वातंत्र्य हक्क मिळवण्यासाठी एकजुटीने इंग्रजांशी लढा देणे हा टिळकांचा उद्देश असावा. पण झाले काय, तर हा गणेशोत्सव आपण का करतो तेच मंडळ विसरलीत. आज टिळक असते तर त्यांना पश्चाताप झाला असता.

बाप्पा तुला कळवायला हरकत नाही, टिळकांना अभिप्रेत असलेली कोणतीही गोष्ट आजच्या उत्सवात होत नाही हे सत्य स्विकारावेच लागेल. निदान चार दिवस धार्मिक कार्यक्रम करतांना तोंडून तुझ नाव येईल. जिभेला चांगले वळण लागेल. मुर्तीकारांना काम मिळेल, काही कलाकारांना संधी मिळेल आणि अर्थाजन करता येईल. पावसाळ्यात मंद पडलेले अर्थचक्र सुरू होईल. ग्रामीण भागातील जनतेला काही दिवस उपजीविकेचे साधन मिळेल हा हेतू नक्कीच साध्य होईल असे वाटत होते.

पण कुठले काय तु अचानक काहीतरी संकट उभे करतोस आणि परीक्षा घेतोस. त्यामुळे सगळे फिस्कटते. आता काल परवा असा अचानक इतकी वर्षा करायची गरज होती का? पण आले तुझ्या मना तिथे कोणाचे चालेना. असो आमचा तमाशा झालेला पाहून तुला बरं वाटलं का? लवकर आवरले हे बरे केलेस, तु पुन्हा अर्थचक्राला गती दिल्याबद्दल तुझे आभार मानावे तेवढे थोडेच, नाहीतरी तुच तर जगाचा पोशिंदा आहेस, मग तू काळजी नाही घ्यायची तर कोणी घ्यायची.

बाप्पा, टिळकांना कुठे माहिती होते भविष्यात जनता कस वागेल? तेव्हा जनतेला गणपती उत्सवाच्या निमित्ताने एकपात्री नाटक, भजन,कीर्तन,भारुड, अशा अंगी असलेल्या विविध कला दाखवण्यासाठी व्यासपीठ मिळत होते. राष्ट्रीय कार्यक्रमासाठी कार्यकर्ते लागत ते ही अशा विविध उत्सवातून निर्माण होत होते. पण तुच सांग राष्ट्रभक्ती, कलेवर प्रेम ,आत्ता हे राहिलाय का?

तुझ्या आगमनाला लोक जे ढोल, ताशे वाजवतात त्यांनी डोक्यात घणघण ठोके वाजल्याचा भास होतो. हृदयाचे ठोके वाढतात. वयोवृद्ध नागरिकांना, ऋग्णांना त्याचा मानसिक त्रास होतो पण हे कोणी लक्षात घेतच नाही.सध्या सेलिब्रेशनला महत्त्व आहे. त्यामुळे तुझ्या उत्सवाच्या मागचा कार्यकारणभाव कोणी लक्षात घेणार नाही. तुला हे उत्सवाचे सेलिब्रेशन पचनी पडते का?

अरे एवढा उन्माद असतो, की उत्साहापोटी कुणाच्या लक्षात येत नाही की या आवाजाने वयस्क व्यक्तींना किती त्रास होत असेल. बाप्पा खर सांग ह्या कर्णकर्कश आवाजाने तुझे तरी कानाचे पडदे शाबूत राहीले आहेत का ? जर तुझेच कान गप्प झाले असतील तर तू माझे निवेदन ऐकणार तरी कसे? नाहीतर मी आपला एकटाच बडबडत बसेन आणि तुला काही ऐकूच येणार नाही. तर नक्की तु माझे ऐकतोस ना? पहिले एक काम कर तुझ्या भक्तांना सुबुद्धी दे आणि तुझ्या आगमनात मिरवणूक डीजे ,बँजो अशा वाद्यांच्या गजरात होते ती बंद करण्याची बुद्धी भक्तांना दे.

अरे इथली लोकसंख्या इतकी वाढली आहे की सगळे एकत्र रस्त्यावर आले तर चालायला वाव नसतो, त्यात भाद्रपदात तुझी चतुर्थी आली की रस्त्यावरून प्रवेश करतांना सामान्य लोक चिंताग्रस्त असतात कारण रस्त्यावरची २/३ जागा मंडपाने व्यापलेली असते आणि कशीबशी वाट काढत नागरिकांना मुठीत जीव धरून तिथून जावे लागते. या गदारोळात चौर्यकर्म करणारे डाव साधून जातात ते वेगळेच. एकदा इथली परिस्तिथी पहा मग तु स्वर्गात किती मजेत आहे ते तुला कळेल.

बाप्पा तुला सांगावे की सांगू नये अशा द्विधा अवस्थेत मी आहे. अरे हल्ली शहरात प्रत्येक घरातून तुझ्या उत्सवाच्या नावाने हप्ता वसूल केला जातो, तुला तरी हे पटतंय का? म्हणजे मज्जा यांची आणि नाव मात्र पुढे करणार तुझे. मी हप्ता अशासाठी म्हणतोय की दिलेल्या वर्गणीवर यांचं समाधानच होत नाही आणि कुणी कमी रूपये दिले तर ही टारगट पोरं मोठ्यांने पंचनामा करतात, ” काय काकू फक्त शंभर रुपये! घरात दिड लाखाचा, एल.सी.डी. टिव्ही, बिल्डिंग खाली होंडा सिटी आणि वर्गणी फक्त शंभर!” बिचाऱ्या काकू, नाईलाजाने एकशे एकावन्नची पावती हातात पाहून तेवढे पैसे त्यांचा हातात ठेवतात आणि दार ओढून घेतात.

बाप्पा शोभत का हे असलं वागणं तुझ्या भक्तांना? पण तू त्यांचं काहीच वाकडं करत नाहीस मग सांग ही दांडगाई नाही का? ही वर्गणी म्हणावी, हप्ता म्हणावा की खंडणी म्हणावी? तेव्हा या वर्षी तरी या मंडळ प्रतिनिधींना सुबुध्दी दे. अर्थात त्यांच्याकडे जास्त वर्गणी मागायला सत्तर कारणं आहेतच, म्हणे मुर्तीच्या किमती वाढल्यात, पुरोहित जास्त बिदागी मागतात, डेकोरेशनच सामान आणि सगळेच पदार्थ महाग झालेत. शिवाय डीजे, बँजो आणायचा तर वीस हजार रूपये पुरतही नाहीत.

म्हटले तर त्यांची कारण कधी कधी पटतात बरं का? पण साधेपणाने गणपती उत्सव साजरा केला तर नाही चालणार का? कार्यक्रम जोमात झालाच पाहिजे असा तर तुझा आग्रह नाही ना? मग हे त्यांना सांगणार कोण? कधीतरी त्यांच्या स्वप्नात जाऊन सांग की, की मला तुमची भपकेबाजी नको म्हणून. दाखव त्यांच्या समोर तुझी डेरिंग.

की मग तुलाच बडेजाव आवडायला लागलाय? तुलाही सेलिब्रेशन ची हवा लागली की काय? काल गणपती मंडळाचे कार्यकर्ते आपसात चर्चा करतांना मी ऐकलयं बरं का? काय बरं म्हणत होते? हं, आठवले, “सबसे उचा गणपती अपानाईच होना मंगता, डान्स रखेगा तो गौतमी पाटीलका, इसका उसका नही चाहिये। लायटींग भी लेजर मंगता ओ एलईडी लायटींग मजा नही लाता, रात को कुच इंतजाम होना मंगता आख्खी रात जागना क्या मजाक है क्या?” बरं ह्या प्रश्नांवर मंडळातील सर्वांच एकमत, त्यामुळे जबरदस्तीने वर्गणी जमा करणं आलच.

तुला ठाऊक आहे का? तुझ्या उत्सवाची वर्गणी गोळा कोण करते? अरे कमाल आहे, तुला ठाऊक नाही, हल्ली हे काम टपोरी पोर करतात, शिक्षण अर्धवट सोडलेलं, नोकरीचा पत्ता नाही मग या पोरांशिवाय आहेच कोण? अर्थात एखादा मवाळ दादा, भाऊ त्यांच्या टीममध्ये असतोच, त्याच काम या उद्दाम टपोरी गँंगला शांत ठेवणं आलंच. मग ही पोर इमारती मधून फिरून वर्गणी गोळा करतातच पण रस्त्यावर जे विक्रेते बसतात त्यांच्याकडून हे पैसे दुपटीने वसूल केले जातात. टपरीच्या मालकाला ते निमूट द्यावे लागतात, उद्या टपरीचे मोडतोड केली तर ते केवड्याला पडेल या विचाराने ते हात ढीला सोडतात.

बाप्पा, हाताची पाच बोटे सारखी नाहीत रे, सर्व नागरिकांची आर्थिक परिस्थिती सारखी नाही रे तुला तर ते माहिती आहेच, आजही अनेक जणांना दिवसाची दोन टोक सांधतांना किती कष्ट पडत असावेत. व्यवसायिकांचे ठीक आहे, त्यांनी दिलेली वर्गणी ते आपल्या कस्टमरकडून सहजच वसूल करू शकतात पण गरीबाचं काय?

अरे पाऊस सुरू झाला की छत्री, सँडल यालाच पैसे पुरत नाहीत. अरे आम्ही पाटीवर अभ्यास केला पण आताच्या पालकांचे खर्च वाढले आहेत. शाळा सुरू झाल्यावर गणवेश, पूस्तके, वह्या, लिखाण साहित्य, रेनकोट, शुज आणि शाळेची वाढलेली फी, याच बरोबर शिकवणी वर्गाला तर घालावे लागतेच मग त्यासाठी घरच्या खर्चात कपात आलीच. एवढं सगळ करतांना तुझे गरीब भक्त मेटाकुटीला आले नसते तरच नवल. तूच सांग त्यांनी काय करावे? मुलांना शिक्षण देणे बंद करावे का? पण काही म्हणा तुझ्यावरती प्रत्येक भक्ताची अमाप श्रद्धा आहे म्हणून केवळ गणपती उत्सव दणक्यात साजरा करता यावा यासाठी लोक मागील तीन महिने काटकसरीने घर चालवत आहेत.

तेव्हा या वर्षी थोडी कृपा कर, तुझे नाव वापरुन वर्गणी जमा करण्याची र्दुबुध्दी समाजातील दलालांना देऊ नको. यात गरीबाची परीक्षा होते. कमी पैसे दिले तर टवाळखोर टिंगल करतात. तू विद्येची देवता त्यामुळे तुला या परीक्षेचे बाऊ वाटत नसावा पण तू तुझ्या कामात यशस्वी झालास तर गरीबांची या जाचातून सुटका होइल, खरे ना ? एवढीच तुला प्रार्थना.

काय आहे, सध्या टेबलाखालून दिल्याशिवाय कोणी ऐकतही नाही. अरे तुझ्या उत्सवाच्या मान्यतेचे पत्र घेण्यासाठी टेबलाखालून द्यावे लागतात तेव्हा कुठे मान्यता पत्र हाती पडतं, आता हे सवयीच झालं आहे. त्यांनीही अंडर टेबल दर वाढवलेत. सगळाच अगदी नाईलाज झालाय.

दर वर्षी मुर्तीकार रंग महाग झालेत, माती मळणारे कामगार मिळत नाहीत अशी कारणे सांगत, तुझ्या मुर्तीची किंमत १०-२०% वाढवतातच, पण तुझ्या सजावटीचे सामान तरी स्वस्त आहे का? रस्त्यावरचे सामान विक्रेते म्हणतात, आम्हाला महानगरपालिका पावती फाडावी लागते शिवाय वेगवेगळ्या पंटर लोकांना चिरीमिरी द्यावी लागते ती वेगळीच, मग वस्तू महाग विकली नाही तर आम्ही काय कमवणार? पण यात गरीब भरडला जातोय त्याचा विचार तु करणार आहेस की नाहीस!

अरे तुझ्या नैवेद्याला पेढे ठेवतांना भिती वाटते, ते दर वर्षी महाग होतात यात काही नवल नाही पण ते पेढे खव्याचे आहेत की कुठल्या माव्याचे की कोणत्या केमिकलचे हे सांगणे अवघड. तु काहीही पचवू शकशील पण लहान मुलांचे काय? त्यांनी प्रसाद खाल्ला आणि त्यातून एखादी वाईट गोष्ट घडली तर केवढा अनर्थ होईल. तेव्हा एकीकडे तुझ्या आगमनाचा उत्साह आणि दुसरीकडे थोडी धाकधूक.

तुझ्या उत्सवाची सुरवातच मुळी पुरोहित मिळवण्यापासून होते. पुर्वी पुरोहित न बोलवता घरी यायचे आणि मिळेल त्या दक्षिणेने त्यांच समाधान व्हायचं, आता ते दिवसच राहिले नाहीत. भरपूर बिदागी मिळेल तेथेच पुरोहित वेळेवर पोचतात. याशिवाय तुझी सांग्रसंगीत, यथासांग, षोडशोपचारे पुजा करायला त्यांना वेळ तरी असतो का?

अरे एका दिवसात दहा, बारा गणपती पूजा करायच्या म्हणजे केवढे कष्ट घ्यावे लागतात. बाप्पा खरं सांग, त्यांचे उच्चार तुला तरी कळतात का? पूजा करणाऱ्या भक्ताला पळीभर पाणी घालू देण्याची संधीही ते देत नाहीत इतक्या वेगात मंत्रोच्चार सुरु असतो. त्यामुळे ते जी काही पूजा करतील ती पावन करून घ्यावी लागते.

अरे गरीब भक्तांकडे जायला यांना संध्याकाळ होते, बिचारे गुरूजी येऊन श्रीं ची पूजा करणार म्हणून ताटकळत असतात, मग इतक्या उशीरा पुजाही येणे प्रमाणे म्हणजे वेळ असेल त्याप्रमाणे होते. असो तुला हे चालतय तर आमची काही तक्रार नाही.

तुला माहिती असेलच दर वर्षी डीजे आणि कर्कश आवाज त्यामुळे ध्वनी प्रदूषण, नागरिकांना होणारा त्रास या विरोधात कोणीतरी कोर्टत जाते . कोर्ट आदेशही काढते आणि राजकीय पुढाऱ्यांच्या कृपेने लोक आदेश फाट्यावर मारतात. तेव्हा भक्तांना चांगल्या सवयी लावणे गरजेचे आहे. ते तुझ्याच हाती आहे. आता ते तुलाही मोजतात की नाही ही शंकाच आहे.पण तू बुध्दीदाता आहेस त्यांना चांगली बुध्दी दे.

तुझ्या उत्सवात, तरुणांना काहीतरी करण्याच ध्येय मिळते. मुर्तीकार आपली कला जोपासत पुढील पिढीला उद्युक्त करतात. कार्यक्रमाचे उदिष्ट ठरले की रूपरेषा आखली जाते, मग एकजुटीने ही तरूणाई कामाला लागते. मंडप बांधणे, सजावट करणे, रोषणाई करणे, पुजेसाठी पुरोहित ठरवणे, साहित्य खरेदी करणे. अशी कामे स्वतः जबाबदारी घेऊन करतांना त्यांच्यात नेतृत्व तयार होते. या आणि अशा काही गोष्टी नक्कीच चांगल्या आहेत. चांगल्या गोष्टींचे कौतुक करायला हवेच. तु सर्वज्ञ आहेस, तेव्हा तुला हे ठाऊक आहेच.

मात्र तुझ्या मंडपाच्या मागे तुझ्या डोळ्यावर पट्टी बांधून तीन पत्ते, रमी किंवा अन्य काही उद्योग चालतात त्याचे काय? यावर अंकुश कोणी ठेवत नाही. चांगले संस्कार होण्याऐवजी चुकीचे पायंडे पडले तर तरुण फुकट जाण्याची शक्यता मोठी. काही तरूण मुले या काळात फक्त आन्हिक उरकण्यापुरतीच घरी जातात. इतके ते या मंडळात रमतात पण या वेळात त्यांचे नको ते उद्योग सुरू असतात. खर तर तू अंतचक्षूनी हे पाहू शकतोस तरीही विनंती एकदा जरा मान फिरवून तुझ्या पाठीमागे काय चालते ते पहाच, म्हणजे हे भामटे तुलाही कसे नागवतात ते कळेल.

तुझ्या विसर्जन मिरवणुकीत तुझे हाल होतात ते पाहवत नाहीत. पण सामान्य नागरीक जे आपल्या कामासाठी प्रवास करत असतात त्यांची किती कोंडी आणि रखडपट्टी होते ते एकदा नीट डोळे उघडून पहा. त्याक्षणी तरी तुला ते शिव्याच देत असतील. तुला त्यांच्या मनातलं समजतं, वाचता येत तर त्यांची अडचण वेदना समजून घे की. मग अशा भव्य दिव्य सोहळ्याचा तुलाही कंटाळाच येईल. पार्वती माता तुझी वाट पहात असेल की माझा प्रथमेश गेला कुठे?

तुझ्या भक्तांनी तुझा बाजार मांडलाय, वीस आणि पंचवीस फुट उंचीची मुर्ती कशासाठी हवी? म्हणजे ही जीवघेणी स्पर्धाच झाली ना? यातून घडणारे अपघात, रस्त्यावरची कोंडी, वेळेचा अपव्यय किती तरी समस्या जन्म घेतात. तुला हे कळत नाही का? मग या चुकीच्या गोष्टी तू कशा खपवून घेतोस? बस की यांच्या मानगुटीवर, एकदा शिक्षा दे त्याशिवाय हे सरळ वागणार नाहीत.

तुझ्या सारख्या आराध्याची एवढी मोठी प्रतिमा बनवून विसर्जन करतांना क्रेन वापरून तुला टांगून तुझे जे हाल करतात ते पाहिले की अंगावर काटा येतो. खूप वाईट वाटते रे. सध्या तुझी स्तुती करणारी गाणी रचली जातात त्याला शेंडा ना बुडखा फक्त संगिताचा दणदणाट. तेव्हा हे सिध्दीदात्या तुझ्या अडाणी भक्तांना भक्तीचा योग्य मार्ग दाखव आणि तुझ्या उत्सवा आडून जे भक्तांची लूट करत आहेत त्यांना धडा शिकव.

तेव्हा तू निर्णय घेतलास व तशी बुध्दी मंडळाच्या अतिउत्साही कार्यकर्ते , राज्यकर्ते, यांना दिलीस तर फार बर होईल. केवढ प्रदुषण कमी होईल म्हणून सांगू. दरवर्षी अशा तुझ्या हजारो प्रतिमा पाण्यात विसर्जन करून पाण्याचे किती प्रदूषण होत असेल याचा आता तूच विचार कर. पाण्यातील जलचरांना याचा किती त्रास होत असेल? बघ तू बुद्धिदाता आहेस या गोष्टीचा विचार करण्याची पात्रता आणि बुध्दी कार्यकर्त्यांना दे म्हणजे चुकीचे पायंडे बंद होतील.समाज कार्यासाठी या नवशक्तीचा वापर होऊदे . तुझ्या उत्सवाला थोडे दिवस आहेत, तू मनात आणले तर काहीही करू शकतोस. तू योग्य तो निर्णय घेशीलच म्हणा, तुझे नेत्र छोटे असले तर दृष्टी विशाल आहे, तु जाणता आहेस . तेव्हा सर्व जनतेवर कृपादृष्टी ठेव.

या काळात सजावटीचे सामान वापरून इतका कचरा केला जातो की तो उचलताना स्वच्छता कर्मचारी मेटाकुटीला येतात. त्यांनी तरी पावसाने कुजलेल्या दुर्गंधीत कसे काम करावे? त्यांचे श्रम कमी होतील असे काही कर. जनतेची सेवा करण्यासाठी त्यांना उदंड आयुष्य दे.शक्ती दे, युक्ती दे. तेव्हा भक्तांना उत्साहात सण साजरा करता येऊ दे यासाठी वरूणाला थोडा विसावा दे. सर्व भक्तांच मंगल कर आणि तुझी सेवा चाकरी करून घे रे म्हाराजा.

अरे हो एक सांगायला विसरलो सध्या हे पत्र मी मेल ने पाठवतो. काय? मेल काय असतो? अरे सध्या पोस्टमन वेळेवर पोचत नाहीत त्यामुळे ग्राहकांना टपाल सेवा नीट मिळत नाही पण माझे मेल वरील पत्र तुला त्वरित मिळेल. तुझा माउस थोडा हलव, हं, आता मेल ओपन कर, आणि आठवणीने रिप्लाय कर बरं का!

असो निरोप घेतो, तुझा लाडका भक्त 🙏🏻

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

10 thoughts on “बाप्पा गजनानास अनावृत्त पत्र

  1. tzfwypsohd

    xxmpvkyfvuefhustpluyislvpkrvzp

  2. profis-vor-ort.de

    Great article, thanks for sharing such valuable insights! 🙌 I really appreciate the way you explained the topic so clearly and made it easy to understand. It’s rare to find content that is both informative and practical like this. By the way, I recently came across a helpful platform called profis-vor-ort.de — it connects people quickly with local experts and services in Germany. I think it could be a great resource for anyone interested in finding trustworthy professionals nearby. Keep up the great work, I’ll definitely be following your future posts!

  3. profis-vor-ort.de

  4. profis-vor-ort.de

  5. profis-vor-ort.de

  6. explodingbrands.de

    Fantastic read! 👏 I really appreciate how clearly you explained the topic—your writing not only shows expertise but also makes the subject approachable for a wide audience. It’s rare to come across content that feels both insightful and practical at the same time. At explodingbrands.de we run a growing directory site in Germany that features businesses from many different categories. That’s why I truly value articles like yours, because they highlight how knowledge and visibility can create stronger connections between people, services, and opportunities.Keep up the great work—I’ll definitely be checking back for more of your insights! 🚀

  7. explodingbrands.de

  8. explodingbrands.de

  9. explodingbrands.de

  10. jvlmxvpdxy

    mpkfuripmusutuqltoqqrgdpslqzeo

Comments are closed.