एकांत
कधीकधी आपण असतो संभ्रमित तेव्हा हवा एकांत
निराशेने मन घेरले की वाटते, बसावे एकटेच शांत
तर कधी कधी वेळच जात नाही, एकांत पाहतो अंत
कोणी एखाद्या कातळावर निश्चिल, वाटे बसला कुणी संत
मनी विफलतेचं दुःख, वाटतं जीवन तिच्याविना रितं
ताटातूट का व्हावी? तिचं वागणच मनाला पटत नसतं
खळबळ मनाची संपत नाही, माणूस आतून तुटत जातं
लागत नाही कुठेच मन, विचारच मनाचा करती घात
शोध स्वतःचा घेण्यासाठी हवी निरव शांतता, एकांत
करावी तिच्या मांडीची उशी पडून रहावे तिथे निवांत
ऐकावी तिच्या ह्रदयाची धडधड कळेल मनाची खंत
द्यावी स्वतःच कबुली सांगावे तिला कुठे काय चुकतं
बसून नदीच्या काठी विसरून स्वतःला व्हावे विरक्त
खळाळणारे पाणी, पक्ष्यांची तान यांनाही असते शिस्त
त्यांच्या आवाजात नाद मधुरता त्यांची निसर्गावर भिस्त
जगणे व्हावी आनंदयात्रा, पण कधीतरी प्रारब्ध उलटच असतं
ऐकून तर होतोच, असतील शितं, तरच जमती भूत
कधी कोणा गरीबाच्या पोटाला एका वेळेची भ्रांत
गरीब-श्रीमंती बदलत राहते टिकवावं माणुसकीचे नातं
मुखी पडेल ते पचवायचं, कर्तव्य भावनेने दळते जातं
वैचारीक पातळीवरही जुळते मैत्री नको कुणाचा भक्त
फक्त आपलाच आग्रह खरा करण्यास्तव नका सांडू रक्त
इथे प्रत्येक जण आपल्याच कोषात, कोणासच नाही उसंत
जर खरचं हवं असेल प्रेम तर आधी स्वतः व्हावं रितं
Your blog is a true hidden gem on the internet. Your thoughtful analysis and engaging writing style set you apart from the crowd. Keep up the excellent work!