मन वढाय वढाय भाग 2

मन वढाय वढाय भाग 2

दुसऱ्या दिवशी त्याने मित्राकडून त्या मुलीचा पत्ता घेतला. प्राजक्ता सावंत, खत्री चाळ, सातपाटी रोड, चौकशी करण्यासाठी म्हणून तो त्या पत्त्यावर गेला. ती सात आठ खोल्यांची चाळ होती. तिथूनच त्याला शिकवल्याचा आवाज येत होता. जसा जसा तो जवळ पोचला त्याला स्पष्ट ऐकू आले. ती जे काही शिकवत होती त्यावर मुल प्रतिक्रिया देत होती. बहुधा मुले समाधानी असावी. त्यांच्या Bk चे Financial Accounting चाप्टर सुरू होते.

वर्ग सुरू होता त्यामुळे तो क्लासच्या दारात जाऊन उभा राहिला. दरवाजावरती पडदा होता पण पंख्याने पडदा हलला आणि त्याला आतील दृश्य दिसले. शिकवणारी  मुलगी पंजाबी ड्रेसमध्ये होती. विद्यार्थ्यांकडे पाठमोरी राहून विद्यार्थ्यांना फोल्डिंग बोर्डवर शिकवत होती. तिचे फळ्यावर लिहून झाल्यानंतर ती एक्सप्लेन करण्यासाठी मुलांच्या दिशेने वळली आणि तिने Non profit concern याचे एक्सप्लेनेशन समाजावून दिले. तिची नजर अचानक दरवाजाकडे गेली.

“Who is there? What do you want?” तो करारी आवाज ऐकून याची फाटली, तरीही पडदा दूर करत तो म्हणाला “मँडम मला क्लास विषयी विचारायचे होते. मी FY Bcom ला आहे. मला प्रवेश मिळेल का?” “कोणत्या कॉलेजला आहेस तू? कोणते सब्जेक्ट हवेत?” मी दांडेकर महाविद्यालयात आहे, मला BK आणि Eco हवा आहे. तेच जरा जड जातात.” विलास म्हणाला. “हे पहा, मी तीन सबजेक्ट एकत्र शिकवते, तुम्हाला SP सुद्धा घ्यावा लागेल, 

आता फक्त शेवटची जागा आहे, class doesn’t have benches, Fees, Rs. hundred per month. महत्वाचे म्हणजे Only study, No gossip, No timepass. Is that clear? तुमचा behavior चांगला नाही अस मला वाटलं तर मी क्लास सोडावा लागेल.” “No problem.”  विलास म्हणाला. ते ऐकून सगळे विद्यार्थी हसले. “तू काय म्हणतोस तुला कळतय का? तू मजा करायला आला आहेस का ” तीने रागाने विचारले  “Sorry Ma’am, मला म्हणायचे होते,मी लक्षात ठेवीन.” “मग तसे स्पष्ट सांगता आले असते ना? संभ्रमात टाकेल असे बोलणे टाळावे. तू आता बसणार का क्लासला?” “हो चालेल.”

“बस तिथे, यापूर्वी जा टॉपिक झाला तो मागाहून कधीतरी कव्हर करू, त्यासाठी तुला अधूनमधून थोडं थांबावं लागेल.” विलास मोकळ्या कोपऱ्यात स्वतः ला सावरून बसला, तो seriously लिहून घेत होता, मधूनच सुरवात केल्याने त्याला त्यातले नीट कळत नव्हते, तिच्या ते लक्षात आले पण ती काही बोलली नाही. 

अर्ध्या तासानंतर क्लास सुटला,तो जाण्यासाठी बाहेर पडणार तोच तिने हाक मारली, “पेडणेकर, इथे या, हे पहा आज तुम्ही पहिल्यांदा क्लास अटेंड करत आहात, तुमची मागची पाटी कोरी आहे, एखाद्या विद्यार्थ्यांकडून तुम्ही मागची चाप्टर उतरवून काढा, वाचून पहा,जो भाग समजत नसेल तो मी तुम्हाला वेळ मिळेल तसा एक्सप्लेन करेन.”

“चालेल मॅम, मी चार दिवसांत नोट्स लिहून काढतो, मग मला जो भाग डिफिकल्ट वाटेल तो  मी तुम्हाला विचारेन.” “हो चालेल,  I will try to help you to understand the previous topics ,no problem. पण व्र्यात्यपणा मी खपवून घेणार नाही. सकाळी जसे वागलास तसे childish वागू नका. “ दुसऱ्या दिवशी तो क्लासला वेळेवर आला, त्यानी नोट्स लिहून घेतांना शंका विचारल्या, संध्याकाळी तो एका विद्यार्थ्यांची नोटबूक घेऊन गेला. तो घरी पोचल्यावर मेहनत घेऊन नोट्स लिहीत होता,वाचून पाहत होता.  बऱ्याच टर्म त्याला समजत नव्हत्या त्या underline करत होता. असे सलग तीन चार दिवस सुरू होते. मध्यंतरी मँडमनी त्याला विचारले,” पेडणेकर तुम्ही नोट्स लिहून घेताय ना?” 

त्यांनी मँडमसमोर वही धरली, अतिशय सुंदर ,सुबक अक्षरात नोट्स लिहिल्या होत्या काही ठिकाणी पेन्सिलने अंडरलाईन करून ठेवले होते.”Good I like your writing attitude. You are a hard worker.”  त्यांच्या बोलण्यावर त्याचा खोडकरपणा जागा झाला. तो,  Madam I am student not a worker’ कोटी करणार होता, पण एवढ्या लवकर अशी गंमत केली असती तर कदाचित क्लास बंद झाला असता. त्याला आता सिरियसली  अभ्यास करायचा होता, टाईमपास करून भागणार नव्हते.

दोन तीन दिवसांनी मँडमनी क्लास सुटल्यावर त्याला थांबायला सांगितले, “पेडणेकर आज मी तुमचे डाऊट क्लिअर करते तुम्हाला वेळ आहे ना?  म्हणजे तुम्हाला नंतरची शटल पकडून गेले तर चालेल ना ?” “हो मँडम, थांबतो मी, मी माझ्या शंका अंडरलाईन करून ठेवल्यात, तुम्ही तेवढेच मला एक एक करून सांगा, what is  asset? How it can be defined? “Any item or resource or financial value that a person , business or organization owns is treated as an asset. 

A simple example, your education is asset for your family. Once you complete your education you will start earning. That’s why ,you are asset for a famly. समजलं का? दुसरे उदाहरण सांगते, तुझ्या आईचे दागिने, कुटुंबाच्या नावे असलेली जमीन , बँकेतील FD, ही सुध्दा asset ची उदाहरण आहेत. लता दिदी, आशाताई यांचा घसा हा सुध्दा असेटच होता, म्हणून त्याचा विमा काढण्यासाठी विमा कंपनी उत्सुक होत्या. आता तू एखादे एसेट चे उदाहरण सांगू शकशील का?” “होय मॅडम, आपल्या देशासाठी शास्त्रज्ञ, संशोधक हे असेट आहेत, कारण ते शोध लावतील तेव्हा ते भारताच्या विकासासाठी उपयुक्त असतील.”

“Exactly, तूझे उदाहरण अचूक आहे.आता asset संबंधी तुझी शंका फिटली का?” “होय मॅडम, तुम्ही छान एक्सप्लेन करता.अजूनही काही टॉपिक आज घेतला तरी चालेल.”

“नक्कीच, सांग तुला कोणती शंका आहे?” Expenditure आणि Expenses यात काय फरक आहे? Expenditure is the cost paid to purchase various items or parts. Whereas  expenses are cost till the assembly of items and converting the same into sellable goods. For example, purchasing the parts to assemble the clock is the cost,  but for assembly you appointed labour,you need some machinery. So you have to spend money to convert spare parts in to clocks. मराठीत सांगायचे झाले तर घर उभारणीसाठी  सामान खरेदी करणे ही मटेरियल कॉस्ट झाली, पण घर उभारण्यासाठी येणारा सुतार किंवा अन्य  खर्च म्हणजे expenses.  समजलं न तुला.”

“मॅडम’ पण घर बांधतांना होणारा खर्च असा वर्गवारी करून का काढतात? उगाचच त्याला expenditure and expenses अस का म्हणायच?” “तुझा प्रश्न एकदम अचूक आहे, अस वर्गीकरण करण्याचे कारण कधीकधी मटेरियल कॉस्ट कमी असते पण त्याच्यापासून प्रोडक्ट बनवतांना होणारे खर्च जास्त असतात,मग त्यावर अभ्यास करून हे खर्च कमी कसे होतील?  यावर लक्ष केंद्रित करता येते. थोडक्यात तुलनात्मक अभ्यास केला तर आपण खर्चावर नियंत्रण ठेऊ शकतो.समजल ना तुला.”

“हो ! समजलं.” अस विलास म्हणाला तरी त्याच्या मनातली शंका पूर्ण फिटली नव्हती. पण त्या टर्म तो लिहू शकला असता.  वयाच्या मनाने ती खूप चांगले शिकवत होती,त्याला समजावे यासाठी उदाहरणे देत होती. एक दोन आठवडे हा त्याचा विशेष शिकवणी वर्ग सुरू होता.तिच्या मते जेवढे यापूर्वी शिकवून झाले होते,तिने ते कव्हर करण्याचा प्रयत्न केला  होता. 

एक दिवस ती म्हणाली, ” विलास माझ्या मते, तुमचा बुडालेला सर्व अभ्यास आपण पूर्ण केला आहे. उद्या पासून तुम्ही थांबण्याची गरज नाही.” तो तिच्याकडे पहात म्हणाला, “पण मला काही अडले तर मी तुम्हाला विचारले तर चालेल ना?” “Of course, तुम्ही जरूर विचारा,पण त्यासाठी वेगळे येण्याची गरज नाही, क्लास सुरू असतांना विचारले तरी चालेल. फार तर थोडं थांबून विचारू शकता. 

“ठिक आहे. मी तसेच करीन.”  म्हणत विलास निघाला, पण का कुणास ठाऊक, तो घरी जात असताना उद्या पासून ती आपल्या एकट्याला शिकवणार नाही याची चुटपुट त्याला लागून राहिली. 

ती आपल्याला एकट्याला शिकवते तेव्हा कितीतरी वेळा आपल्याकडे पाहते. तिचे ते तसे पाहणे आनंददायी असते. तो ही तिच्याकडे पाहत बसायचा तिच्या ते लक्षात आले  की तिची  तिलाच लाज वाटायची.पण कदाचित त्याचे ते पाहणे तिला आवडतही असावे अन्यथा ती नक्कीच रागावली असती. हळूहळू तो तिच्यात गुंतत होता, ती आपली शिक्षिका आहे याचाही त्याला विसर पडत होता.

तो नियमित क्लासला जायचा, विषय समजून घ्यायचा. प्रश्न विचारून तिचे लक्ष वेधून घ्यायचा. ती कॉलेजमध्ये दिसली तर तो डोळ्यातुन तिच्याशी हसायचा, पण तिने कॉलेज कॅम्पसमध्ये त्याला फारसा प्रतिसाद दिला नव्हता . महिन्याभरात टर्म एक्साम झाली. दिवाळी सुट्टी लागली. तिचे क्लास सुरूच होते, तिने प्रत्येकाला पेपर कसे लिहिले? कोणत्या  प्रश्नांची उत्तरे लिहिता आली नाही? असे काहीबाही विचारले. प्रत्येकाच्या मनातील शंका निराकरण केले. तेव्हाच मुलांना आपण केलेल्या चूक समजली आणि आपल्याला किती गूण मिळतील त्याची चिंता वाटू लागली. तिने नवीन टॉपिक शिकवायला सुरवात केली. सुट्टीत तिने आठ दिवस जास्त वेळ क्लास घेतला. दिवाळी सुरू होण्यापूर्वी सर्वांना घरून बनवून आणलेले  लाडू आणि करंजी वाटली. मुले एकदम खुश.

“उद्या या सत्रातील शेवटचा टॉपिक शिकवणार आहे, उद्या आठवणीने माझी फी घेऊन या. कोणाला काही प्रॉब्लेम नाही ना?” “नो मॅडम,happy Diwali, ” सर्व एकत्र ओरडले.  “अरे अरे! उद्या क्लास आहे. आजच happy Diwali  करण्याची गरज नाही.”

दुसऱ्या दिवशी क्लास सुरू होण्यापूर्वीच तो  आला, तिच्या हाती चाफ्याच्या फुलांची पुडी देत म्हणाला, मॅडम आमच्या घरच्या चाफ्याची आहेत. खास तुमच्यासाठी,आणि  हे पैसे.” त्याच्या  हाताला   तिच्या हाताला स्पर्श झाला  तस  त्याच्या मनात रोमांच उठलं. तो नादावला. “फुल आणलीत, किस खुशी मे ?” ती त्याच्या डोळ्यात पहात म्हणाली. “का अस विचारता, मी फुलं आणलेली आवडली नाहीत का? द्या परत नेतो.”

“अरे, तुम्ही चक्क रागावलात? Very sorry, मला नव्हते माहीत की तुम्हाला राग ही येतो. बरं पण मग यापुढे तुम्हाला नेहमीच फुले आणावी लागतील, आणाल ना?” “तुम्ही काही  कमेंट न पास करता घ्याल तर नक्की आणेन.” तो फुलला.  तिने त्या फुलांचा  हळवारपणे गंध श्वासात भरून घेतला,त्याच्याकडे पहात ती हसली आणि फुले टेबलच्या ड्रावरमध्ये ठेवली. खोलीत चाफ्याचा दरवळ भरून राहिला.  त्याने डोळे मिटून  दीर्घ श्वास घेतला. 

“ती त्याच्याकडे पाहत हसली, पेडणेकर, तुम्ही चांगला अभ्यास करून प्रगती कराल तर माझ्या शिकवण्याचे सार्थक होईल,त्याचाही गंध समाजात पसरेल आणि माझ्या  क्लासची भरभराट होईल.”

“पण मॅडम तुमच्या क्लास चे नाव काय? ते तर कोणालाच माहिती नाही, आम्ही क्लासला येतो,पण कोणी नाव विचारले  तर सावंत मॅडम यांचा क्लास असेच म्हणतो.” “अच्छा, म्हणजे तुम्हाला माझं नाव हवंय, की क्लासच नाव हवंय? “क्लासच आणि  तुमचंही,त्या शिवाय, आम्ही कुणी विचारले तर सांगणार काय?” “बरं बरं, नंतर  सांगते,आता विद्यार्थी येतील, तुम्ही बसा जाग्यावर.” पाच मिनिटात सर्व विद्यार्थी आले, आज त्यानी Receipt and payment account हे प्रकरण नव्याने सुरू केले.

“It’s a summary of all cash and bank money received and paid out by a non profit group over a specific time. It works  like a cash book to show the final cash left at the end of year.” त्यांनी फळ्यावर लिहिलेली डेफिनेशन विद्यार्थ्यांनी लिहून काढली. मग त्यांनी काँलेजचेच उदाहरण घेतले. काँलेजमध्ये विद्यार्थ्यांकडून येणारी फी ही cash received  साईडला मांडू तर विद्यार्थ्यांवर होणारा खर्च जसे की स्पोर्ट्सवर झालेला खर्च,एक्साम कंडक्ट करण्यासाठी क्वेश्चन पेपर,आन्सरशीट, टाय अप थ्रेड वगेरे हे cash paid साईडला लिहू. जर तुम्ही योग्य मांडणी केली तर जमेची आणि खर्चाची बाजू बरोबरच येईल. यामध्ये आपण profit चा विचार केलेला नाही.

आपण दुसरे उदाहरण घेऊ, तुमच्या बाबांनी आईला महिन्याच्या खर्चासाठी पैसे दिले तर ती वस्तू खरेदी, बिले, कामवालीचा पगार हे सर्व खर्च मांडून महिना अखेरीस किती खर्च झाला आणि किती शिल्लक राहिली ते पाहिल. याचा उपयोग खर्च योग्य कारणासाठी झाला आहे ना? हे पाहण्यासाठी किंवा पडताळणी करण्यासाठी होतो. तुम्हाला कळलंय ना? “

शक्यतो मॅडम आधी इंग्रजीतुन एक्सप्लेन करत, अगदीच कोणी आग्रह केला तरच त्या पुन्हा मराठीत सांगत. मॅडम आणि विद्यार्थी यांच्या वयात समानता असल्याने, त्या विद्यार्थ्यांच्या पातळीत येऊन शिकवत. असाच काही भाग संपवून मॅडमनी आजचा क्लास संपल्याचे जाहीर केले.मुलामुलींनी फी मॅडमकडे दिली. दुसऱ्या दिवसापासून क्लासला रजा असल्याने मुले आनंदात होती.

गप्पा मारत मुले बाहेर पडली, विलासही बाहेर निघत होता, तो बाहेर जात असल्याचे पाहून मॅडमनी हाक मारली, ” पेडणेकर ! या, तुम्हाला उत्सुकता होती ना, क्लास चे नाव काय ? मला माहिती आहे, तुम्हांला ते आधीच माहिती आहे, तुम्हाला ते केवळ माझ्या तोंडून ऐकायचे आहे.खरं ना? माझे नाव, ‘प्राजक्ता सावंत’ आहे. आता तुमचे समाधान झाले ना.” ” प्राजक्ता! फार सुंदर नाव आहे.”

“म्हणजे, फक्त नावच सुंदर आहे की..” “खरं सांगू, तुम्ही पण सुंदर आहात, अगदी नावा प्रमाणे.” ” विलास, मला, तुम्ही म्हणू नकोस, तू म्हण, तू ”  अगदी हळुवार स्वरात ती म्हणाली.”

कानात नाजूक घंटी किणकिणल्याचा भास त्याला  झाला असावा . नक्की कसे व्यक्त व्हावे त्याला कळेना, तो हळूवारपणे म्हणाला,” तुझी इच्छा असेल तर मी तुम्हाला तू म्हणेन, पण तुम्ही माझी थट्टा तर करत नाही ना?  मी ऐकतो त्यावर माझा विश्वास बसत नाही. हे सगळ खरच आहे ना? मी स्वप्नात तर नाही ना?” “होय विलास ,अगदी खरं खरं, तुझा निरागस स्वभाव मला आवडला तू आत बाहेर न ठेवता बोलतोस, तुझे मन स्वच्छ आहे. म्हणूनच तू मला जास्त आवडतोस. पण त्याला आकार  देण्यासाठी आपल्याला काही वर्षे थांबावं लागेल. आपले ग्रँज्युएशन पूर्ण होऊन तुला नोकरी लागेपर्यंत. थांबशील ना तू?”

त्यांच  बोलण सुरू असतानाच कोणीतरी दार वाजवून,’ May I come in Madam?’ विचारले तसे तो भानावर येत म्हणाला, “मॅडम मला टॉपिक समजला, काही डिफिकल्टी असेल तर मी नंतर येईन. निघू मी?” “हो निघा, दिवाळीत फक्त लाडू खाऊ नका,अभ्यासही करा.” तो हसला. ती ही हसली.  विलास हवेवर तरंगतच घरी पोचला,तो स्वतःवर आज खुश होता. आतासे सतरावे संपत होतं. अजून प्रेम म्हणजे काय ते धड कळतही नव्हते पण कुच कुच होता है अशी स्थिती झाली होती खरी.  पहिल्यांदा  कुणीतरी त्याच्या प्रेमात पडलं होत. ती दिसायला खूप सुंदर होती अस काही म्हणता आलं नसतं पण ती नक्कीच मनाने सुंदर होती.’

प्रेम म्हणजे नक्की काय असते?  हे कळण्यापूर्विच तो तिच्या प्रेमात पडला होता. ती खात्रीने चांगले शिकवत होती पण ती त्याच्यापेक्षा वयाने मोठी होती आणि  तिची कोणतीही पार्श्वभूमी माहिती नसतांना तो तिच्या प्रेमळ शब्दांत फसला होता. तो सूखाच्या लाटेवर हिंदकळत होता. तिने आपल्या गोड स्वभावाने त्याची शिकार केली होती.

घरी दिवाळीचा माहोल असुनही तो अभ्यास करण्यात मग्न असे ते पाहून दोन तिन वेळा आईनेच त्याला विचारले, ” विलू, रे परीक्षा झाली ना! मग आता कोणत्या परीक्षेसाठी अभ्यास सुरू आहे? त्या मॅडमनी लहान विद्यार्थ्यांना देतात तसा तुला homework दिला आहे का?”  “नाही ग आई, आता इतक्यात परीक्षा नाही,पण पुढचे धडे वाचून ठेवले तर शिकतांना कमी मेहनत घ्यावी लागेल.कॉलेज सुरू झाले की आठवडाभरात sports  सुरू होतील मग अभ्यासाला वेळ मिळणार नाही, म्हणून आटापिटा.”

दिवाळी सुट्टी असूनही तो पालघरला उगाचच चक्कर टाकून आला.  क्लास ला कुलूप होते आणि तिची फॅमिली जिथे राहत होती तिथे जाणे प्रशस्त वाटत नव्हते. मन भेटीसाठी अस्वस्थ होते. तो शटल पकडण्यासाठी  रेल्वे स्टेशनला परतत असताना ती दिसली. तिने हलकासा मेकअप केला होता. हातवर मेहंदी काढली होती.  गुलाबी  रंगाचा पंजाबी ड्रेस आणि त्यावर सफेद ओढणीत ती सुंदर दिसत होती. तिच्या सोबत एक मध्यमवयीन बाई होत्या बहूदा आई किंवा शेजारची काकू असावी. तिच त्याच्या पर्यंत आली, “हँलो ! आज इकडे कुठे? कोणा मित्राकडे आला होतास का? , आई हा विलास पेडणेकर, आपल्या क्लासचा स्टुडंट आहे.” विलास तिच्या आईच्या पाया पडला. आई म्हणाली,  ” प्राजक्ता शिकवते ते समजते ना? आम्हाला मेल काही कळत नाही पण तिच्या मैत्रीणी म्हणतात ती चांगली शिक्षीका होऊ शकेल. तू ही लक्ष देऊन अभ्यास कर, उगाचच नको तिकडे वेळ वाया घालवू नको. तुम्हा मुलांवरच आता आमची आशा, शिकून चांगली नोकरी मिळाली की आम्ही सुटलो. आम्हाला तीनही मुलीच आहेत. एकदा तिनही मुलींची लग्न झाली की आम्ही सुटलो. ” 

“हे ग काय आई, त्याला काहीही काय सांगतेस? तो माझ्याच सारखा विद्यार्थी आहे,  तुझी उगाचच ओळख करून दिली. सॉरी विलास हीच तू मनावर घेऊ नको. ती अशीच आहे. पटकन बोलून मोकळी होते.अजून कशाचा पत्ता नाही आणि ही निघाली बोहल्यालर चढवायला.”

ती त्याच्याकडे पहात हसली. तो ही हसला. “निघतो आम्ही, तू उगाचच इथे येऊन वेळ वाया घालवण्यापेक्षा अभ्यास कर, तरच  तुला यश मिळेल. बरं आम्ही निघतो. दोघांची अनेकदा नजरानजर झाली. ती आणि आई निघून गेली. ती गेली त्या दिशेला तो कितीतरी वेळ भ्रमिष्टासारखा  पहात बसला, कोणीतरी त्याला नावानेच हाक मारली तसा तो भानावर आला. त्याच्या वर्गातील  मिनल पाटील  त्याला हाक मारत होती. “अरे विलास आज इकडे कुठे? कोणाची वाट बघतो आहेस का? क्लासला तर  दिवाळी सुट्टी असेल ना?  भेट झालीच आहे तर आमच्या घरी चल ते बघ रस्त्याच्या पलीकडे ते बैठ घर दिसते तेच आमच घर. येतोस ना?”

तिचा तो फायर राऊंड संपला. हे सगळ अनपेक्षित होते. त्याला उत्तर देण्याची संधीच तिने दिली नव्हती. अगदी नाईलाज म्हणून तो तिच्या घरी गेला, तिने आपल्या कुटुंबाशी त्याची ओळख करून दिली. तिच्या आईने आग्रहाने कांदेपोहे खाऊ घातले. अभ्यास आणि कॉलेजमधील गंमती जमती यावर बोलता बोलता बराच वेळ गेला. विलास तिच्या सौंदर्यावर भाळला होता. तिने केसांचा बाँंब केला होता, गोल हसतमुख  चेहरा, सुंदर नाक, निळसर घारे डोळे आणि कानावर केसांच्या बटा. चेहऱ्यावर आत्मविश्वास. बस जीने को क्या चाहिये अशी त्याची अवस्था झाली. तो अधूनमधून तिच्याकडे चोरट्या नजरेने पहात होता.  “मीनल,  चल मी निघतो,मला शटल नाही मिळाली तर बराच वेळ थांबावं लागेल.” त्यानी तिचा निरोप घेतला. मिनल त्यांच्या वर्गातच होती पण ती कधीही कँंटीन किंवा जिमखाना येथे टाईमपास करताना दिसत नसे. ती अभ्यासू विद्यार्थ्यीनी होती. सहजा कोणात मिसळत नसे.

तो रस्त्याला लागला. रस्त्याने जाताजाता त्याच्या डोक्यात मिनलचे विचार आले, तो  मिनलची  तुलना  प्राजक्ताशी करू लागला. मिनल दिसायला एकदम क्यूट होती,गोरीपान, मध्यम बांध्याची,भरल्या अंगाची, गोल चेहरा, बोलके डोळे, हसरा चेहरा. ‘प्राजक्ताशी मैत्री करण्यात आपण घाई तर केली नाही ना?’ तो स्वतःशीच बोलला. ‘सहज मिळे त्यात जीव तृप्तता न पावे.’ हेच खरे. माणूस, विशेषतः पुरूष असा का वागतो? समर्पित भाव त्याचा स्थाईभाव का नाही? भुंग्या प्रमाणे या फुलावरून त्या फुलावर भुणभुण करणे हा दुर्गूण त्याच्याठाई का निर्माण झाला.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *