झुरळे
नीट काहीच होत नाही, चोर सोडून सन्याशाला फाशी
नीटचा अध्यक्ष त्याच नाव ,’जोशी’, झाली भलत्याची काशी
‘मोटेगावकर’ चोरांचा सरदार, हिमंत असेल तर द्या फाशी
वड्याच तेल वांग्यावर तुम्ही अज्ञानी नाही, करा की चौकशी
चुकत नाही त्याच नाव xx त्याला प्रसिद्धीची होती हाव
झुरळं औषधांना जुमानत नाही मग त्यांचा वाढतो भाव
हिंदी नाही आलं तरी हजेरी लावू, त्यासाठी सोडतो गाव
पहा राजकरण खरेच विचित्र आतंरवलीत होतो रंकाचा राव
काही मोठे होण्यासाठी खूप आतूर त्यांना धीर धरवत नाही
नवनवीन परीक्षा, सोबत ‘पेपर फुटी’, वेळेवर निकाल लागत नाही
आयुष्यात अपयशाचे साचलेपण, स्पर्धा परीक्षेनेही सरत नाही
ना नोकरी, ना उद्योग, ना व्हिजा, सरकार ढीम्म, आंदोलनाने हलत नाही
कोण सत्याग्रही? कोण पोलीस? काय चाललयं? कळतच नाही
पेरल्या बातम्या, शरदचंद्र भेटीला, पहिली जखम भरत नाही
कोणाला तरी सोबत घेतल्याशिवाय पक्ष काही टिकत नाही
शिवाजी पार्क दणाणून सोडलं तरी शिल्लक काही उरत नाही
निदर्शने, भेटीगाठी, होत राहतात राजकीय सौदे जुळत जातात
आपले कोण? अन परकी कोण? मनाचा छळ संपत नाही
कधी कोण फुटेल? उठेल, सुटेल, मोह आता आवरत नाही
तवा गरम तोवरच घ्यावे शेकून, नंतर कुत्रही शेपूट हलवत नाही
ज्यांचे प्रस्ताव केंद्र शासनाकडे पडून ते बैठक सोडून निघत नाही
काय द्या, सोडतो उपोषण, सरळपणे मागून येथे काही मिळत नाही
आम्हालाही बांधता येतात गाठी, घेता येतात भेटी, फक्त वेळ पुरत नाही
शब्दांतील मोकळ्या जागेचे महत्त्व कळणारे वायद्यांना फसत नाही
पोरं टोरं कोणीही बिनदिक्कत मारू लागल्यात आता टपल्या
एकाच जागेवर कित्येक व्रण मग भरून येणार कशा जखमा?
हटवल ३७०, नागरी विधेयक, 50-50 चा खेळ, जुना इतिहासजमा
इतके बदल आमच्या कारभारात केल्यावर कस करावं क्षमा ?
अधुनमधून तुम्ही खंगाळून काढता उद्योग, लावता आम्हाला कामा
आम्ही ऐपतीत राजेशाही जगलो, तुम्हीही वापरता सोन्याचा चष्मा
रोजच तुमच्या भेटी, रोज नागरी सत्कार, पदाचा अहंकार, शाही खाना
दुसऱ्या देशात बिज भाषण येथे मौन व्रत, कसे कुणाच्या येईल मना?
काढू सारेच बाहेर, तुमच्या कारभाराची भेसळ, तुमचा स्वभाव घुमा
कोणालाही देता अलिंगन आमचेच चालत नाही, करता ‘डोळा काना’
भोगा कर्माची फळे लाखो, करोडो झुरळे कुरतडून टाकतील ‘थाना’
सांगा चेल्यांना व्याकरण चालवण्याएवढा सोप्पा नसतो शब्द घाणा