अटळ असलं तरीही
का करावी कुणाची फिकीर जर घडणारं आहे अटळ?
बिनधास्त मस्त जगावं फक्त नसावं जीवन कुठेही उथळ
अढळ स्थान एखाद्याला लाभतं, तुमची आमची फुकाची वळवळ
कितीही कष्ट केले, वा बनवाबनवी तरीही जीवाची होते तळमळ
नशिबाने सारंच काही मिळत नाही सोबत हवे कष्टाचे बळ
कधीकधी कष्ट तोकडे पडतात तेव्हा उपयोगी पडते कळ
सगळ्या गोष्टी वेळवर करा, नका ठेऊ काही हातचे राखून
नंतर उगाच हुरहूर नको अरे! करायचे होते ते गेलेच राहून
मनाचं दार मोकळं असेल तर आपुलकीने मित्र येतील धावून
कधी कुणाची मदत लागेल, वेळ काळ नाही कधी येत सांगून
पैसा कमावला तुम्हीच, खर्च करतांना करताय खळखळ
योग्य वेळी, कारणास्तव वापरा, तसाही तो स्वभावाने चंचल
कुठवर तुमची तो सोबत करेल? कुणाची तरीच होईल चंगळ
धन खर्चुन जोडली माणसं, तरच प्रसंगी कोणी असेल जवळ
कितीही केला संचय तरी धन नेहमीच देणार नाही हमी
चार सच्चे मित्र आणि तुमची अर्धांगिनी हीच येतील कामी
धन संचयाने मन संशयी, सततच लागते तिचीच मनी चिंता
मैत्रीच कामी येते, हप्त्याचे काळे धन वाढवते तुमचा गुंता
तेव्हा आवश्यक तेवढेच राखून बिनधास्त स्वतः घ्या उपभोग
म्हणू नका, कुठे जाणे येणे एवढे का सोपं आहे हवा योगायोग
अर्थात वार्धक्य आणि मृत्यू अटळ असला तरी, तोवर एन्जॉय करू
उद्याची चिंता का करावी? नाविन्यपूर्ण जगणंही आता स्वीकारू
खूप छान ! जीवनातील सत्य !!