आघात भाग २

आघात भाग २

भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६

तिला रुपारेल येथे Science ला admission मिळाले. बहुदा गोखले काकांच्या सूचनेनुसार प्रवेश मिळाल्यानंतर तिने पेढे वाटले. तिचे सकाळचे कॉलेज असल्याने त्या दोघांची भेट अधून मधून रस्त्यात होई. तिला IT इंजिनिअर व्हायचे होते. वडिल मंत्रालयात Class ॥ officer होते. आई Teacher होती, एकंदरीत त्यांची आर्थिक परिस्तिथी चांगलीच होती त्यामुळे तिच्या IT Engineering मार्गात कोणताच अडथळा नव्हता.

पाहता पाहता Senior ची तीन वर्षे कशी गेली कळलेही नाहीत. कॉलेजमध्ये तो cultural Activity मध्ये नेहमी पुढे असे. कधी कधी घरी यायला त्याला बराच उशीर होई. कामाच्या गडबडीत तो आईला फोन करायला विसरून जाई. तो येईपर्यंत कोमल जेवत नसे, पण त्याचं हे अनियमित येण वाढले तसे शेखर त्याला रागावला. “संजीव तू कॉलेज सुटल्यावर वेळेवर घरी का येत नाहीस, काय काम असते तुला? तुझ्या अनियमित येण्यामुळे तुझी आई उपाशी राहते याचा कधी विचार केला आहेस का?” “पप्पा, मी काही तिथे Time Pass करत नाही. मी student Association चा सचिव आहे. कॉलेज मधल्या सर्व Functions ची जबाबदारी माझ्यावर असते, हवं तर देशपांडे सरांना विचारा, आणि आईला मी यापूर्वी सांगितले तू माझ्यासाठी थांबू नको पण ती ऐकत नाही तिला विचारा की तुम्ही.”

मुलगा असं काही म्हणेल याचा त्यांनी विचार केला नव्हता, आता तो वीस वर्षांचा युवक होता, कॉलेजमध्ये नेतृत्व करत होता साहजिकच आपली बाजू मांडण्यात त्याची चूक नव्हती. ते त्याला समजावत म्हणाले, “तू पोळी भाजी नेत जा म्हणजे आई तुझी वाट पहात थांबणार नाही आणि तू उपाशी राहणार नाहीस.” “पप्पा मी आता एवढा लहान नाही, मी डबा नाही नेला तर उपाशी राहीन. इतर मुल शेअर करतात, तुम्ही माझी काळजी सोडा.” कोमल हसून म्हणाली,” म्हणजे तू कोणाच्याही डब्यातले खातोस की काय? कमाल आहे हा तुझी,अहो पाहिलत का तुमचा मुलगा केवढा मोठा झाला तो, जरा जास्तच अक्कल आली त्याला. नाहीतरी तुमच्या पेक्षा उंच दिसायला लागलाय.” शेखर तिच्याकडे पाहात म्हणाला,”उंची वाढली म्हणजे अक्कल येत नाही,तू उगाच त्याची बाजू घेऊ नको.” ती हसली,”काय बाजू घेतली? तो तुमच्या पेक्षा उंच दिसतो हे खोटं आहे का?” “बरं, बरं जा आपल्या कामाला,आणि संजीव तू रे ते कॉलेजमध्ये सचिव की काय पद सांभाळत अभ्यासाचं वाटोळं करू नको म्हणजे झालं,कळतेय ना! हे Last year आहे चांगले percentage मिळाले तर कुठेतरी चिकटवता येईल.”

“पप्पा,माझा जॉब मी मिळवेन, तुम्हाला कोणाची मनधरणी करावी लागणार नाही .बघाच तुम्ही.” संजीवचे बोलणे ऐकून शेखरला बरे वाटले .तसेही आत्ता पाहिले दिवस राहिले नाहीत, एकतर सरकारी, निमसरकारी नोकर भरती होतच नाही,त्यात सवर्णांना सरकारी नोकरी दुरापास्तच. तेव्हा कोणावर विसंबून न राहणे हेच उत्तम.संजीव आपल्या अभ्यासाला निघून गेला.

Year Activities आणि Functions यात संजीवचे वर्ष कसे गेले कळले नाही ,मार्च महिना पाठी पडला आणि Final year Time Table Display झाले. मे महिन्यात परीक्षा होत्या आणि संजीवच्या हाताशी फक्त जेमतेम एक दीड महिना उरला. तो झपाटून अभ्यासाला लागला. assignment आणि Project पूर्ण करण्यात त्याचा बराच वेळ जाऊ लागला. शामल आपल्या अभ्यासात व्यस्त होती,घराला Exam Fever आला. कोमल त्यांना काय हवे काय नको पाहण्यात गर्क झाली.

Account and Finance, घेऊन तो commerce Graduate झाला. First Class मिळाला. Convocation Function कलिना विद्यापीठात होणार होते. राज्यपाल स्वतः पदवीदान समारंभाला हजर राहाणार होते. शेखरने स्वतःहून संजीवच्या Convocation साठी सूट शिवायला पैसे दिले. त्याच्या जीवनात तोच असा क्षण होता ज्याची आठवण त्याला कायम सोबत करणार होती. July महिन्यात Convocation program झाला. शेखर, कोमल आणि शामल उबेर करून गेले. त्या दिवशी त्यांनी बाहेर लंच घेतला. मुद्दाम स्टुडिओत जाऊन फोटो काढले. कोमलला हे सगळं नवीन होत. कोमलला आपल्या नवऱ्याचा अभिमान वाटला. मुलाच्या आनंदासाठी पहिल्यांदाच त्यांनी इतका खर्च केला होता. पहिल्यांदाच मुलाच्या प्रोग्राम साठी त्यांनी ऑफिसला दांडी मारली होती.

FY ला असतानाच तो tally सॉफ्टवेअर शिकला होता. या Software चा भविष्यात त्याला फायदा होणार होता. नपंपनवीन Software व्यवहारात वापरली जात होती ती शिकण्याशीवाय पर्याय नव्हता. सोसायटीत तळमजल्यावर अभिजित देशमुख रहात ते auditor होते. कधी कधी difficulty विचारायला तो त्यांच्याकडे जात असे. Concept क्लिअर करायला त्यांनी बऱ्याच वेळा मदत केली होती. ते त्याला अकाउंट एन्ट्री, ट्रायल बॅलन्सpayment Receipt यांची माहिती देत.केवळ पुस्तकी प्रॉब्लेम सोडवून व्यवहारात पुढे जाता येत नाही हे त्यांनी अनेकदा त्याला समजावले होते. काही नवीन नियम अथवा tool आले तरी ते त्याला समजावून सांगत. त्यांनीच त्याला logistic कंपनीत Vacancy असल्याचे दाखवले.

योगायोग त्यांच्या कॉलेजमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये तो सिलेक्ट झाला आणि Twill Logistic experts या कंपनीत कामाला लागला कंपनी मल्टिनॅशनल होती त्यामुळे त्याला मिळाले ते Annual Packages चांगलेच होते,शनिवार, रविवार सुटी होती. चार लाख हे काही मामुली नव्हते त्यामुळे तो खुश होता. त्याला appointment letter मिळाले तेव्हा चार लाख आकडा ऐकून त्याचा विश्वास बसेना. तो खुश झाला घरी जाऊन कधी आईला सांगतो असे त्याला झाले.त्याने अपॉइंटमेंट लेटर आईला दाखवले तसे तिने आनंदाने त्याला जवळ घेतले,ते पत्र देव्हाऱ्यात ठेऊन तिने नमस्कार केला.

शेखर घरी आला तेव्हा त्याला घरातून गोड शिऱ्याचा वास आला.त्याने अंदाज बांधला बहुदा संजीवला जॉब लेटर मिळालेल दिसत.त्याने नेहमी प्रमाणे फ्रेश होऊन कोचावर बैठक ठोकली,”कोमल,ये कोमल,अग चहा आणते ना? आणि हो शिरा आधी घेऊन ये हो.” ती बाहेर येता येता म्हणाली, “तुम्हाला कसं lblहो कळलं,शिरा केलाय तो?” तो गंमत करत म्हणाला,”अग मला जीना बोलला, म्हणतो कसा एकटे खाऊ नका, हो नाहीं तर अपचन होईल.” ती हसली, “अरे वा! जीना तुमच्याशी बोलतो का?” तो हसला, “संजीवची मेहनत कामी आली,त्याच नशीब चांगले.नाहीतर नुसत्या ग्रज्युएशनवर कुणाला एवढा चांगला जॉब मिळतो का ?” ती म्हणाली,”ही त्या कुलदेवतेची कृपा बरं, उगाच नाही मी म्हणत तो माझ्या पाठीशी आहे म्हणून.” तो हसला,”अच्छा,म्हणजे हा जॉब तुझ्या कुलदेवतेने दिला असेच ना?” ती रागावली,”तुमचा नसू दे विश्वास, माझी खात्री आहे माझी अंबा माझ्या पाठीशी आहे.तुम्हीच म्हणाला ना नुसत्या graduation वर अशी नोकरी मिळत नाही म्हणून.”
संजीवने appointment letter त्याच्या पप्पांकडे दिल. “घ्या पप्पा, त्यांनी मला yearly four lacks ऑफर दिली. शिवाय satuday, Sunday ऑफ,चांगले आहे ना?” अरे चांगले काय छान,तुमच्या आईचा देवच पावला की,आत्ता तुझा पहिला पगार झाला की सत्त्यनारायण घालू,चालेल ना? सगळ्या नातेवाईक मंडळींना बोलावू.” पप्पांना आनंद झाला पाहूनच तो सुखावला,त्याच्या मनात आले,जर सानिकाला ही बातमी कळली तर तिला ही आनंदच वाटेल. सानिकाची भेट कधी होते आणि कधी सांगतो असे त्याला झाले.

सानिका CET Entrance पास झाली तिला 153 गूण मिळाले आणि तीला VJTI इंजिनिअरिंग कॉलेज ला प्रवेश मिळाला तेव्हा पासून तिच्या येण्या जाण्याच्या वेळा बदलल्या. VJTI प्रवेश घेतल्या पासून तिच्यात प्रचंड बदल झाला. ती मूड असेल तर त्याच्याशी बोले.

अधून मधून त्यांची भेट होई.तिच्या अभ्यास विषयी तो विचारत असे. ती कॉलेजमध्ये खूप आनंदात होती. नवे मित्र मैत्रिणी यामुळे तिचे दिवस छान जात होते. VJTI कॉलेजला गेल्यापासून ती दिवसे दिवस जास्त modern बनत होती.ती दिसायला मुळातच सुदंर होती पण High Heel, Jeens, Short top,आशा पेहरावात जास्तच modern वाटत होती. एव्हाना ती त्याला आवडू लागली होती, कंपनीतही अनेक मुली होत्या त्या त्याच्याशी बोलत. बऱ्याच वेळा कॅन्टीन, एन्ट्रन्स गेट अशा ठिकाणी भेटत Hello, Hi करत पण सानिकाच्या चेहऱ्यावर जो गोडवा होता,जे ग्लॅमर होत ते त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हतं. नुसती रंग रंगोटी. कंपनी मधल्या मुली त्याच्याशी मैत्री करायचा प्रयत्न करत पण तो त्यांच्या पासून अंतर राखून असे. पण सानिकाच्या मनाचा थांग पत्ता त्याला लागत नव्हता. कधी स्वतः Hello Hi करे तर कधी पाहिलच नसावं, अस भासवत निघून जाई. त्याच्या मनी, स्वप्नी फक्त सानिकाच भरून राहिली होती. तिने त्याला झपाटून टाकले होते.

संजीवचा पहिला पगार बँकेत जमा झाला त्याचा मेसेज आला आणि त्याच्या मेल अकाउंट वर सॅलरी स्टेटमेंट देखील आले,त्यांने तो मेल पप्पांना दाखवला. कोमल त्याला म्हणाली, “संजीव आधी पेढे घेऊन येबआणि देवापुढे ठेव.” तो हसला, “अग आई तूच पेढे घेऊन ये ,पैसे बँकेत जमा झालेत आणि मला Saturday शिवाय वेळ नाही.” ती रागावत म्हणाली, “मोबाईलवर खेळत बसायला तुमच्याकडे वेळ आहे पण आईने सांगितले ते काम करायला वेळ नाही .” कोमलने दोन महिन्यानी मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी पूजा करण्याचे ठरवले होते. त्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यात दुसऱ्या गुरुवारी सत्यनारायण महापूजा घातली. नातेवाईक मंडळी सकाळपासूनच आली,शेखरच महाप्रसादाचे निमंत्रण होते. संजीवचे काका मुलूंड वरून पूजेसाठी आले होते.वत्यांनीच पूजा सांगितली.
कोमलच्या मदतीला शिंत्रे काकू होत्या,आपल्या घरचे कार्य असावी तशी मदत त्यांनी केली.चाळीस पन्नास निमंत्रित महाप्रसादाला होते.संध्याकाळी सोसायटीमधील बरेच जण तिर्थप्रसादाला आले.सानिका आई सोबत आली. शमाने त्यांना तिर्थप्रसाद दिला.

सानिकाची आई कोमलशी बोलली.संजीवच्या नोकरी बाबत चौकशी केली. संजीव तिथेच घुटमळत होता. सानिकाशी कस बोलाव याची मनात तयारी करत होता. शेवटी धीर ऐकवटून त्यानी विचारल,”गोखले काका नाही आले का ऑफिसमधून?” सानिका आईकडे पहात म्हणाली,”बाबांना यायला उशीरच होतो,कधी कधी उशिरा मिटिंग असते मग घरी यायला साडेसात वाजून जातात.” संजीव तिच्याकडे पहात म्हणाला, “तुझं कॉलेज कसं चाललंय, semister Examझाली का?” ती म्हणाली ” प्रोजेक्ट सब मिशन सुरू आहे.”
कोमलने चहा घेण्याचा आग्रह केला तस तिची आई म्हणाली, “वहिनी,पुन्हा कधी तरी नक्की येऊ , यांच्या येण्याची वेळ झाली, निघतो आम्ही.” त्या निघून गेल्या. संजीव तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पहात उभा होता.इतक्यात कोमलने हाक मारली,अरे संजीव त्यांना घरी न्यायला प्रसाद दिलास का? संजीव भानावर आला, “काय आई, काय म्हणतेस?” “अरे लक्ष कुठे आहे तुझं,त्यांना घरी न्यायला प्रसाद दिलास का?” तिने प्रसादाची पुडी त्याच्या हाती दिली. त्याने सानिकाला हाक मारली,”सानिका, सानिका,अग हा प्रसाद तुझ्या बाबांना ने .” त्यांनी तिला जिन्यात गाठून तिच्या हाती प्रसाद दिला.तिच्या ओझरत्या स्पर्शाने त्याचे मन सुखावून गेले.

तो जीना उतरून खाली येतच होता इतक्यात त्याच्या कंपनीतील सहकारी आले. संजीवने त्याना personally invitation दिले होते.त्याने त्या मित्रांची ओळख आई आणि पप्पांशी करून दिली. शेखरचे कॉलेजमधले दोन मित्र पूजेला आले होते. त्यातला एक मित्र C A करत होता तर दुसरा मित्र Mcom First Year ला होता. आदल्याच दिवशी संजीवने बहिणीला मदतीला घेऊन चौरंगा भोवती केळीच्या सोपांचे मकर बांधले होते.कोमलच्या मनाप्रमाणे सर्व यथासांग पार पाडले. शेखरचे मित्रही तीर्थ प्रसादला आले त्यामुळे. कोमलचा पूर्ण दिवस गडबडीत गेला. तिच्या मदतीला मुलुंडची भाची अपेक्षा दोन दिवस अगोदर आली होती म्हणून तिला थोडं रिलॅक्स वाटलं.

पूजेचा कार्यक्रम छान झाला पण कोमल थकून गेली. शेखरने चार दिवस रजा घेतली होती. एक दिवस संजीवने पप्पांच्या हाती बँक पासबुक आणून दिले . त्यांनी ते कोमलच्या हाती दिले तस ती म्हणाली मी बघून काय करू मला काय समजते त्यातले, तुम्ही आणि तो पाहून घ्या.” ,तस ते म्हणाले,संजीव तुझी नवीन नोकरी आहे तुला आम्ही या पूर्वी काही फारसे देऊ शकलो नाही,तू तुला हव्या त्या गोष्टी खरेदी कर, तुझ्या मौज मजेच्या आड आम्ही नाही मात्र एक लक्षात ठेव, आम्ही ह्या अडीज खोल्यात संसार केला तुमच्या पिढीने असाच संसार करावा अस मला वाटत नाही म्हणून तुझा पगार सद्या आईला देण्या ऐवजी बचत कर. उद्या नवी जागा घ्यायच ठरलं तर तुझी बचत उपयोगी पडेल.पटतय ना?” “पप्पा,तुम्ही अगदी योग्य तेच सांगताय. मला एवढंच म्हणायचंय की पैसे योग्य ठिकाणी ठेवले असते तर,म्हणजे नुसते बँक खात्यात पडून राहण्यापेक्षा गुंतवले तर फायदा होईल.”
चार सहा महिने गेले आणि कंपनीने त्याला sap Training साठी Bangalore ला पाठवण्याचे ठरवले. तिथे त्याची राहण्याची व्यवस्था केली होती.

पुढच्याच आठवड्यात तो निघणार होता.vत्याने सानिकाला मेसेज करून भेटायला बोलवले. आज तो तिला आपले मन मोकळे करणार होता. मनात हुरहूर होती. ती हो म्हणेल की नकार देईल ते त्याला कळत नव्हते पण भेटीसाठी तो आतूर होता.ती येईल की नाही हे ही त्याला माहीत नव्हते पण जिथे भेटायच ठरवल तिथे तो वाट पहात होता.बराच वेळ झाला तरी त्याची प्रतीक्षा संपत नव्हती.हळू हळू संयम संपत होता.ती आता येणार नाही अस वाटून तो परतत होता इतक्यात ती दिसली.त्याचा चेहरा फुलला.

तो तिला नजरेनेच भेटला, तिला घेऊन तो एका मोठ्या रेस्टॉरंट मध्ये गेला.मेन्यू कार्ड तिच्याकडे देत त्याने बराच वेळ काही न बोलताच घालवला. “सानिका तूला आवडेल ते मागव नुसती पहात राहू नकोस ,बघ वेटर येऱ्या झाऱ्या घालतो.”तो म्हणाला.
ती हसली,”आधी सांग, मला का बोलवलं? काय सांगणार आहेस?” जणू का बोलावलं ते तिला माहीतच नसावं. तो तिच्या हातावर हात ठेवत म्हणाला, “सानिका तू मला खूप आवडतेस,I Love You,that’s it.” त्याने तिला Prapose केले तशी ती लाजली.मात्र तिने त्याला होकार किंवा नकार काहीच कळवला नाही. त्यानेच वेटरला बोलावून पिझ्झा ऑर्डर केला,”सानिका चालेल ना पिझ्झा? की काही दुसरं मागवू. ती त्याच्याकडे न पाहताच चालेल म्हणाली, पिझ्झा येई पर्यंत तो तिच्याकडे पहात होता.”सानिका तू माझ्यावर रागावली आहेस का? तस असेल तर I am Very Sorry, but I Love you so much.” ,तिने त्याच्याकडे पाहिले.तो वरवर नव्हे मनापासून बोलत होता.


तिलाच स्वतःची खात्री नव्हती,तो तिला आवडत होता, Handsome नसला तरी दिसायला चांगला होता. Height तिच्या पेक्षा चार सहा इंच जास्तच होती आणि Simple Loving होता.ती त्याच्याकडे पहात म्हणाली,Sanjiv give me time to think over, Let me ask myself if I really like and love you? please I can’t reply you right now.” त्याने तिच्याकडे पाहिले. ती खरंच निरागस,निष्पाप वाटत होती,कदाचित संभ्रमित असावी, कदाचित Superior Complex असावा,कारण VJTI सारख्या नामांकित संस्थेतून ती IT Engineer होणार होती.आणि तो फक्त commerce graduate, “Sanika I can understand your feeling, yes, we are certainly not rich, but believe me I will keep you happy, I will strive to maintain the living standard.”

त्यांच बोलण चालू असताना पिझ्झा आला.vत्याने तिच्याकडे प्लेट सरकवली तस ती त्याच्याकडे पहात म्हणाली,”Sanjiv have I hurt you? Please apologize me,let me not feel guilty, but I have not yet thought of marriage. Let me enjoy my life. I am not a common girl who think to marry and be happy with family, I like to build my carrier.” तीने एक स्पून त्याच्याकडे दिला.

दोघांनी पिझ्झा संपवला,त्यानी कॉफी ऑर्डर केली होती. Coffee पिता पिता तो म्हणाला,मी काही महिन्यासाठी Sap training साठी Banglor ला जाणार आहे,मग आपली भेट होणार नाही,म्हणून मला वाटले की तुला सांगावे,तू straight Forward आहेस हे मला आवडले, Take your time to decide, but don’t ignore me. I am ready to wait for your reply.” दोघे उठले त्यांनी वेटरला बोलावून पैसे दिले. वेटर चेंज घेऊन आला. त्याने त्याच्याकडे पहात,”आपको रख दो.” म्हणत बाहेरचा रस्ता धरला, ती त्याच्या मागोमाग गेली. दोघे निशब्द चालत होते. त्यांनी रिक्षाला हात केला. रिक्षा अर्ध्या रस्त्यावर आली तसे दोघे उतरले. त्याने तिला shake Hand केले, तरीही ती निशब्द त्याच्याकडे पहात होती.तिच्या मनात काय वादळ चाललं होतं ते कळायला मार्ग नव्हता. थोड्या वेळाने काहीच घडलं नसावं असे ते दोघे अंतर ठेवून चालत होते. कुणीच कुणाशी बोलले नाही.
त्याचे मन त्याने मोकळे केले होते त्याचा उपयोग होईल की नाही ते काळच ठरवणार होता.

क्रमशः

भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

5 thoughts on “आघात भाग २

  1. cheap wigs

    See for yourself. It’s real hair. The hair quality is not very good. The tail is a bit hot and it feels frizzy. The roots are indented.

  2. आघात भाग ५ – प रि व र्त न

    […] १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग […]

  3. आघात भाग ४ – प रि व र्त न

    […] १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग […]

Comments are closed.