आघात भाग ३
भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६
त्याच्या बंगलोरला जाण्याची तयारी किती दिवस शेखर आणि कोमल करत होते. कोमलने त्याच्यासाठी काही पदार्थ करून दिले. एखादा शाळेचा मुलगा पिकनिक ला निघावा आणि आईने त्याची बॅग निगुतीने भरावी तशी तयारी घरून केली जात होती. शमा त्याला रोज कशाची नी कशाची आठवण करून देत होती जणू तो कायम तिथे राहायला जात होता. दोन मोठ्या सूट केस भरल्या तरी सामान शिल्लक होत. तो आईला रागावत म्हणाला ” “विमान म्हणजे तुझी पुण्याची एशियाड नाही हवे तेव्हढे सामान लादायला, अधिकच्या सामानाचे पैसे भरावे लागतील, नाहक भुर्दंड पडेल.” ती रागावत म्हणाली,”तिकडे गेलास आणि काही मिळाले नाही ना मग आईची किंमत कळेल हो! रोज इडली आणि सांबार खायला लागले की कळेल आई कशाला मरते ते.” अखेरीस जाण्याचा दिवस उगवला, मुलगा सहा महिन्यासाठी एकटा जाणार म्हणून कोमल कष्टी झाली होती तर शमाला त्याला एअरपोर्ट वर पोचवायला जाण्याची घाई झाली होती.
दुसऱ्या आठवड्यात रात्रीच्या Flight ने तो Bangalore ला गेला.निघतांना “ती” भेट घेईल असे त्याला राहून राहून वाटत होते पण तसे काही घडले नाही. तो थोडा खट्टू झाला पण नोकरी असेल तरच सर्व काही, शेवटी “धनानी भुमे पशवश्र्च गोष्टे,भार्या-गृहद्वारी जन: स्मशाने—-” हे संस्कृत सुभाषित तो ऐकून होता.
तो तिला अधून मधून फोन करण्याचा प्रयत्न करत होता पण ती बीझी असल्याचे भासवत होती. खर खोट फक्त तिलाच माहित, का ती असा लपंडाव खेळत होती? त्याने आता फोन करायचाच नाही असे मनाशी ठरवले पण त्याच मन ट्रेनिंगमध्ये लागत नव्हते. तिच्या शिवाय त्याला करमत नसे इतका तो तिच्या एकतर्फी प्रेमात गुंतला होता. या पूर्वी तिची भेट झाली की तो तिला चांगल्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन जात होता,ती ही जात होती पण तिच्या मनाचा थांगपत्ता लागत नव्हता. तिच्या तोंडून जे शब्द ऐकायला तो अधिर होता तेच ती टाळत होती. तिला त्याच्या बद्दल काहीच वाटत नव्हते तर ती का त्याच्या सोबत हॉटेलमध्ये येत होती हेच त्याला कळत नव्हते. कधी कधी तो स्वतःला समजवत होता. तशी ती त्याच्यापेक्षा तीन चार वर्षे लहान होती आणि IT फस्टक्लास मिळवत पूर्ण करणं हा तिचा Goal होता. पण तो पहात होता, गेले दोन महिने ती त्याला टाळत होती.सहा महिने त्याने कसे काढले ते त्यालाच कळत नव्हते, “हर पल एक लम्हा लम्हा सा लगता था” अशीच जणू त्याची अवस्था झाली होती.
सहा महिन्यांनी तो आला,तेव्हा Bangalore वरुन त्यानी वडिलांसाठी ड्रेस मटेरीयल, आईसाठी साडी आणि शमासाठी गिफ्ट आणले,सानिकासाठी त्याने आठ हजार खर्च करून पर्ल रिंग आणले. तिची भेट होईल या आशेने तो येता जाता तिसऱ्या माळ्याच्या दिशेने पहात असे. एक दिवस चक्क गोखले काका जीना उतरताना दिसले, तस तो म्हणाला, “नमस्कार काका, सानिकाच college कस चाललयं.” ,तस ते हसून म्हणाले,”अगदी उत्तम बर का!आता ती आय.व्ही साठी चैनईला गेली आहे. तू कूठे गेला होतास ? दिसला नाहिस तो ?” “काका,मला कंपनीने बंगलोरला ट्रेनिंग साठी पाठवल होत. कालच आलो.” त्यांनी shake Hand केलं, “Keep it up. I like your attitude.” ते हात हलवत म्हणाले. “थँक्स .” त्याने जीना उतरता उतरउतरत त्यांना आपली कथा ऐकवली.ते हसले,” बर केल कंपनीने स्वतःच ट्रेनिंगला पाठवल. भविष्यात जे नवीन शिकण्यास सक्षम असतील त्यांनाच कंपनी ठेवणार, आमचं आपल बरं होत एकदा नोकरीवर लागल की रीटायर होऊनच बाहेर.” तो ही त्यांच्या विनोदावर हसला.
कधी एकदा सानिकला भेटतो अस त्याला झाल होत. चार पाच दिवसांनी ती आली. त्याने Whatsapp करून नाराजी व्यक्त केली पण तिने काहीच उत्तर दिले नाही. त्याने तिला फोन करुन बाहेर भेटायला बोलवले तरीही ती भेटली नाही. तो समजायचे ते समजला पण अखेरचे तिच्याजवळून ऐकावे म्हणून तो कंपनीतून सुट्टी घेऊन तिच्या कॉलेजच्या कॅम्पसमाध्ये गेला तर ती कॉलेजमध्ये गेलीच नव्हती. तो परतून जात असता ती आपल्या मित्रांच्या घोळक्यात दिसली. या पूर्वी ती बिल्डिंग बाहेरही एकटी पडत नसे.त्याला पाहूनही तिने न पहिल्या सारखे केले.तो समजून गेला, तिच्या दृष्टीने तो, “गई गुजरी बात थी” माणसं एवढी बदलतात पाहून त्याला आश्र्चर्य वाटले. तीच प्रेम कुणा दुसऱ्यावर लट्टू झाल होतं.
तो घरी लवकर आला. आई हॉलमध्ये काम करत होती, त्याला लवकर घरी आलेला पाहून तिने चिंतेने विचारले,”संजीव बरा आहेस ना?” तो काही घडलेच नसावे अश्या अविर्भावात म्हणाला, “का ग ? कसा दिसतो मी तुला ? आजारी दिसत नाही ना! कंटाळा आला होता आलो लवकर, चहा ठेवतेस ना?” तिने घड्याळ पाहिले. साडेतीन वाजले होते,काम आवरून आत्ता कुठे ती आराम करत होती.”संजीव थोड्या वेळाने ठेवला चालेल ना?” त्याने मान होकारार्थ हलवली. त्याच डोक सुन्न झाले होते. सानिका सारख्या मुलीने असे वागावे याचे त्याला राहून राहून आश्र्चर्य वाटत होते.
त्यानंतर त्याने कधीच सानिकाला भेटण्याचा प्रयत्न केला नाही. ती ही अगदी समोरून गेली तरी ती मान खाली घालून जात असे. पहाता पहाता तीची डिग्री पूर्ण झाली. ती पटनी मध्ये पूण्याला कामाला गेली. तिथेच ती पेईंग गेस्ट रहात असल्याचे त्याला कळले. त्याच दरम्यान शमाला VJTI ला प्रवेश मिळाला. ती
रोज पार्ले ते माटूंगा प्रवास करु लागली. घरून संजीवच्या लग्नाची बोलणी सूरू झाली. खर तर सानिका पासून ताटातूट झाल्यावर तो कोणा बरोबर निट बोलतच नव्हता पण ही बोच तो एकटाच वागवत होता. शेखर त्याच्याशी बोलला “संजीव आम्ही काही तुझं लग्न करण्याची घाई करत नाही पण शिक्षण झालं,चांगली नोकरी आहे मग उगाच वेळ का काढायचा हे पटत नाही,,संधी वारंवार येत नाही आणि तुझं कुठे काही असेल तर सांग,म्हणजे मी सांगून मोकळा होईन. पप्पांना काय सांगणार की “जख्म इष्क मे हमने खाई है प्यार के नाम से मै अब डरता हू” अस तो स्वगत म्हणाला.सारख सारख पप्पाना नकार कळवायला लावणं त्याला जमणार नव्हते.
एक दोन स्थळे पाहिल्यावर त्याला मुलुंड येथील मृण्मयी चाफेकर हे स्थळ आले.तिने जे जे मधून फाइन आर्ट केले होते आणि एक ऍड एजन्सी मध्ये आर्टिस्ट होती. दिसायला खूप सुदंर नसली तरी सुस्वरूप होती. तिच्याशी खूप भेटी गाठी झाल्या नाहीत, पूर्व अनुभव फारसा चांगला नव्हता म्हणून एक दोन वेळा ते भेटले आवडी निवडी जुळल्या आणि त्याने तिला होकार कळवला. त्याला ती आवडली, पण तो तिच्या प्रेमात पडला वगेरे नाही पण व्यावहारिक दृष्ट्या कुढत जगण्यापेक्षा नव्या जोडीदाराशी प्रामाणिक राहणे आवश्यक होते. पाहता पाहता तो सानिकाला विसरून गेला. पण त्याने बंगलोर येथून आणलेला तो पर्ल एअरिंग तिला किंवा शमाला द्यावा अस त्याला वाटेना ती त्याच्यासाठी नाजूक आठवण होती. “जख्म भी इतनी खूबसुरत हो जो दिल दिमाग पे हावी हो जाये |” अशी ती मनाला हूर हूर लावणारी आठवण होती,पहिल्या एकतर्फी प्रेमाची इवलीशी साठवण होती. म्हणूनच ती पर्ल एअरिंग त्याने जपून ठेवली होती.
क्रमशः
[…] भाग २, भाग ३ […]
[…] भाग १, भाग ३ […]
Chanach …
Sir.
I’m a little fake hip width, not fat at all, the quality is good
The clothes are made of pure cotton fabric, the color is the same as the picture, it is soft and comfortable to wear, but it shrinks a little, everyone buy a big size! Don’t worry if you like it