आघात भाग ४
भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६
त्याचे लग्न ठरले. दसऱ्याच्या मुहूर्तावर पार्ल्याला थाटात साखरपुडा झाला. दोघेही अधून मधून भेटत होते. भावी आयुष्याची स्वप्ने रंगवत कधी शिवाजी पार्कला तर कधी गिरगाव चौपाटीला भेटी गाठी होत होत्या. एकमेकासाठी खरेदी होत होती. दोघेही आपल्या कॉलेज जीवनातील गमती जमती सांगून आणि अथांग सागराला साक्षी ठेऊन मावळत्या सूर्याचा निरोप घेतांना जीवनभर सोबत करण्याची हमी देत होते. तो ही झाले गेले विसरण्याचा प्रयत्न करत मनाची जखम भरून येण्याची प्रतीक्षा करत होता. या दोन तीन महिन्यात एकमेकांच्या आवडी निवडी जपण्याचा दोघानी प्रयत्न केला. तिला lite colour जास्त पसंद म्हणून त्याने चक्क तिच्या आवडीचे ड्रेस मटेरिअल खरेदी केले होते. तर त्याला जीन्स,टॉप हा सानिकाचा look आवडे म्हणून तिला त्याने तसे ड्रेस gift दिले होते आणि ती त्याला impress करण्यासाठी त्याच्या आवडीच्या ड्रेस मध्ये भेटत होती. वरवर सारं कसं छान छान वाटत होतं. मे महिन्यात मुलांची सुट्टी गृहीत धरून लग्न मुहूर्त काढला होता.
तिची “Craft World ” ऍड अँड इव्हेंट कंपनी भरभराटीला होती. अर्थात लग्नासाठी बरीच चांगली मंडळी येणार अस गृहीत धरून हॉलची शोधा शोध सुरू होती. संजीवची आई आनंदात होती,बऱ्याच वर्षांनी कुटुंबात लग्नसोहळा होणार होता. संजीव तिला घेऊन घरी आला होता. एव्हाना सोसायटीत सगळ्यांना त्याचे लग्न ठरल्याचे कळले होते.अर्थात सानिका पर्यंत ती बातमी पोचली होती. ती दर पंधरा दिवसांनी पुण्यातून मुबंईला येत होती पण तिने कधीही त्याला भेटण्याचा प्रयत्न केला नाही ना त्याने फोन करून तिची विचारपूस केली. जणू ते दोघे एकमेकांना ओळखत नसावेत. बंगलोर येथून खास तिच्यासाठी आणलेली पर्ल रिंग जेव्हा तो पाही तेव्हा त्याचे मन आकांत करी पण सोनपरी त्याला भ्रमात टाकून दूर निघून गेली होती.
जानेवारी अखेरीस चीनच्या वुहान शहरात हाहाकार उडाला आणि पाहता पाहता सगळं जग करोनाच्या विळख्यात सापडलं. संजीवची कंपनी तरीही सुरू होती. त्यांची बस विशेष सेवा म्हणून सुरू होती आणि कर्मचारी कामावर येत होते पण मुंबईत अलर्ट लागू झाला आणि बाहेरील ट्रान्सपोर्ट बंद झाला. पूर्ण राज्यात lockdown सुरू झाले. कंपनीने एप्रिल महिन्यापासून वर्क फ्रॉम होम सुरू केले. खरे तर logistic चे काम मुळातच कधी बंद नव्हते आता ते घरून करण्याची सक्ती करण्यात आली.
सहा महिने कंपनी व्यवहार सुरळीत चालू होते आणि एक दिवस त्याला मेल आला, कंपनीने लॉस भरून काढण्यासाठी नवीन employees कमी केले. काही विचारण्याची संधी न देता पुढच्या तीन महिन्यांच्या नोटीस पे देऊन त्यांना Termination लेटर पाठवून दिली. संजीवसाठी तो सेटबॅक होता. एकच जमेची बाब म्हणजे त्याला SAP येत असल्याने कुठेही Job मिळण्याची शक्यता होती. पण चाफेकर कुटुंबाला हे सांगणे गरजेचे होते म्हणून संजीवने मृण्मयीला फोन करून ही बाब सांगितली.
स्वतः ती जॉब करत असूनही, तिने परिस्थीती पूर्ण न ऐकता “माझ्या डॅडशी तुम्ही बोलता का?” अस म्हणत मोबाईल वडिलांकडे दिला. त्यांनी किमान ऐकून तरी घेतले पण ते गंभीर होत म्हणाले, “पटवर्धन, तुम्हाला सध्या जॉब नसतांना आपण लग्नाविषयी न बोललेलं बरं, पटतंय ना तुम्हाला. हे Lock down कधी उठेल, परिस्थीती कधी पूर्व पदावर येईल कोणास ठाऊक.तेव्हा मी काय म्हणतो आम्ही उगाचच मृण्मयीला आपल्या बरोबर अडकवू शकत नाही. तुम्ही पटवर्धन साहेबाना सांगाल ना ? ” त्याने त्याच्या Sap Training विषयी सांगितले, आणि लवकरच मी दुसरा जॉब मिळवेन याची खात्री दिली पण ते शांत शब्दात म्हणाले “संजीव,बेटा आम्ही आमच्या मुलीच्या संसारा विषयी risk घेऊ शकत नाही. I am extremely Sorry.” त्यांनी फोन कट केला.
जेव्हा त्याने हा प्रसंग घरी सांगितला तसे शेखर संतापला. संजीवने त्यांची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांना आता न बोलू देणे चुकीचे होते, कदाचित त्याचा त्यांना जास्त त्रास झाला असता. संजीवने दार लावून घेतले उगाच जगाला शोभा घडू नये अशी त्याची इच्छा होती. शेखरने त्यांना फोन लावला,बराच वेळ फोन वाजला आणि न घेतल्याने रिंग बंद झाली. त्यांने तीन वेळा फोन केल्यावर चाफेकर यांनी फोन घेतला.
शेखरने त्यांना विचारले,”चाफेकर साहेब , तुम्ही माझ्याशी काहीही न बोलता परस्पर तुमचा निर्णय मुलाला कळवला हे सभ्य गृहस्थाच लक्षण नव्हे. तुमच्या मुलीचा जॉब या संकटकाळात गेला असता आणि आम्ही हे लग्न मोडले असते तर तुम्हाला चालले असते , की तुम्ही कोर्टाची पायरी चढला असता आणि आम्हाला धडा शिकवला असता?” “पटवर्धन साहेब ,भावनेवर संसार चालत नाहीत त्याला व्यवहाराची जोड लागते,तुमच्या मुलाचा जॉब गेला तर तो मुलीच्या पगाराने घर चालवणार का?” आम्ही लग्न मोडल्यामुळे तुमचे जे काही आर्थिक नुकसान झाले ते भरून देऊ.”, मोबाइल स्पीकरवर असल्याने चाफेकरांचे बोलणे सगळे ऐकत होते. शेखर तरीही शांत स्वरात म्हणाला, “चाफेकर साहेब ,समजा मुलाचा जॉब त्यांचे लग्न झाल्यावर गेला असता तर तुम्ही काय निर्णय घेतला असता? तेव्हाही तुम्ही मुलीला माहेरी घेऊन-जाणार होतात का? हे पहा माझा मुलगा सुशिक्षित आहे. त्याला उद्या कुठेही नोकरी मिळू शकेल पण संसार मोडल्यामुळे त्याच्या भावना तुम्ही दुखावता आहात त्याची भरपाई तुम्ही करू शकाल का?” संजीव वडिलांना म्हणाला, “पप्पा कशासाठी त्यांची मनधरणी करायची, जिच्याशी लग्नाची गाठ बांधणार होतात तिलाच कदाचित मी नको असेन, तुम्ही त्यांची समजूत काढून काय उपयोग ? तिला माझा भरोसा वाटत नसेल तर तिला थांब म्हणण्यात काय अर्थ.”
शेखरला ते म्हणणे पटले,तो चाफेकरांना उद्देशून म्हणाला, “चाफेकर साहेब तुम्ही माझ्या मुलाचे म्हणणे ऐकले असेलच. तुमच्या मुलीलाही तुमचा निर्णय योग्य वाटत असेल तर ठीक आहे पण मी अभिमानाने सांगेन की माझ्या मुलाच्या कर्तृत्वावर माझा विश्वास आहे आणि तुम्हाला हे लग्न मोडल्याचा पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही.” चाफेकर यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही तसा शेखरने फोन कट केला.
हे लग्न मोडल्याचे कोमलला प्रचंड दुःख झाले. पण ती तसे दाखवत नव्हती. सगळे व्यवहार नेहमी सारखे सुरू झाले. लॉक डाउन मुळे सानिका पुण्याहून घरी आली होती. तिचेही Work From Home सुरू होते. झाल्या प्रकाराने शामला शांत झाली होती. तिच्या दादूटल्याचा संसार उभा राहण्यापूर्वी वाहून गेला होता. सर्व घरी असूनही Carfew लागल्या प्रमाणे शांत होते. कोविडच्या भीतीने गरजे शिवाय कोणी बाहेर पडत नव्हते. ना कुणी कुणाला भेटत होते जणू आणीबाणी सुरू होती. शमाचे VJTI बंद होते तिचे Online Class सुरू होते. संजीव अधून मधून देशमुख यांच्याशी Video chat करत होता. त्याने दोन तीन ठिकाणी online application केले होते. सध्या सगळीकडे तीच परिस्थिती असल्याने त्याला खात्री नव्हती. IT कंपन्यानी सॅलरी 30% less केल्याची न्युज येत होती. अधून मधून कोमल त्याच्या बाजूला बसून त्याला उभारी देण्याचं काम करत होती त्यामुळे तो जास्तच अवघडत होता.
[…] १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग […]
[…] १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग […]
[…] १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग […]
A very good watch, and it will be shipped quickly