कर्मयोगी

कर्मयोगी

 दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी   पिकनिक वजा समाज सेवा कॅम्प नेण्याचे ठरले तेव्हा एखादी कंपनी,विजकेंद्र ,एक फार्महाउस,निसर्ग शेती आणि जमलाच तर एखादा गड असा भरगच्च कार्यक्रम आम्ही ठरवला. विद्यार्थ्यांना उत्सुक्तता होतीच पण त्याहीपेक्षा माझ्यासह सहकार्यानाही होती. कितीतरी दिवस आयोजन सुरु होत. पन्नास विद्यार्थी आणि चार शिक्षक असे आम्ही मुंबईबाहेर पडलो तेव्हा अमाप उत्साह होता. आमच्या एका पालकांच्या हातून नारळ फोडून आम्ही गाडी मुंबई बाहेर काढली. मुलांनी नव्या जुन्या गाण्यांनी गाडी दणाणून सोडली. माझे सहकारी  त्यांना साथ देत होते. आमची बस महामार्गाला लागली आणि फ्लाय ब्रिज वरून जावू लागताच मुलांनी गलका केला. एक एक शहर पाठी पडत होत . महामार्गावरच्या फलकावरून बोरीवली पाठी पडल्याच कळल. दहिसर टोल नाक्यावर कर भरून बस  मार्गस्थ झाली. मुल -मुली गाण्यात रंगली होती पाठी पडणारी शहर टोलेजंग इमारती यांच्याशी त्याचं काही देण घेण नव्हत. मी मात्र त्या टोलेजंग इमारती पाहून कासावीस होत होतो. भविष्यात या साऱ्या  इमारतींना पाणी मिळेल का? कि पाण्यासाठी  हाणामाऱ्या होतील?  बस घोडबंदर रस्त्याला लागली आणि खाडी नजरेस पडताच बरे वाटले. दादर ते दहिसर ह्या संपूर्ण प्रवासात नजरेस इमारती शिवाय काही पडल नव्हत. मुलांनी ह्या प्रवासात ढुंकूनही बाहेर पाहिलं नव्हत. वर वर येणारा सूर्य, रस्त्याच्या कडेन पळणारी झाडे ह्याचं जणू त्यांना अप्रूप वाटत नव्हत. सकाळची वेळ असल्यान रस्ता मोकळा होता त्यामुळे आम्ही  डहाणुच्या  रस्त्याला कधी लागल ते कळल देखील नाही.डाहाणू गावात शिरताच  मोठा बीच नजरेस पडला  तेव्हा मात्र मुल ओरडली म्याडम बीच पहा, बीच उतरायचं  ना!  आम्हाला झाई गावात जायची घाई होती. तेथे सावे आजोबा,त्यांचा नातू आणि त्याचे काका आमची वाट पाहत होते.
उंबर गावची वेस ओलांडत आम्ही गुजरात मध्ये प्रवेश केला. सावे  कुटुंबांनी आमच स्वागत केल.  त्यांची निसर्ग शेती पाहायला  आम्ही उत्सुक होतो. आजोबांनी स्वामिनाथन अहवालांनी भारताच नुकसान झाल तितक कोणत्याही गोष्टीनी झाल नाही हे सांगताना आजोबांच्या चेहऱ्यावर क्रोध दाटून आला होता. माझ्या शेताला मी गेल्या चाळीस वर्षात कोणतही रासायनिक खत घातलं नाही हे सांगताना त्यांचा चेहरा अभिमानान फुलला होता.


 
सावे कुटुंबान आमच्या आदर तिथ्यासाठी टोपलीभर वेलची केळी  आणि थंडगार पाणी ठेवले  होते.आपल्या  शेतामधील प्रयोग सांगताना  त्यांनी निसर्गाने प्रत्येक जीवाच्या जगण्याची सोय  कशी केली आहे हे सांगताना डोंगर माथ्यावर असण्याऱ्या झाडांना पाणी कोण बरे घालतो ? ह्या गुगली प्रश्नांनी निसर्गाने जगण्याची प्रत्येक जीवमात्राची केलेली सोय सोप्या शब्दात उकलुन दाखवली. त्यांच्या बागेत एका एका माडाला चारशे नारळ पाहून मन आनंदून गेले. कोणताही खत न वापरता इतकी फळ कशी धरतात? ह्याच आम्हाला पडलेलं कोड उलगडताना ते म्हणाले ह्या नारळ ,केळी स्वतःसाठी लागणार अन्न स्वतः निर्माण करतात . नारळाची झावळ ,त्याच्या मुळाशी पडली कि त्याचं कुजून खत होत, तेच त्याचं अन्न.केळीच्या बाबतही त्यांनी हीच भूमिका मांडली . वनस्पती आपल्याला आवशक ते पाणी हवेतून घेत असतात  त्याना अतिरिक्त पाण्याची गरज नाही हे सांगताना त्यांनी एका झाडाचा शेंडा तोडून आमच्या समोर धरला. त्या फांदीतून पाणी  होत.सावे आजोबाना त्यांच्या ह्या निसर्ग शेती प्रयोगासाठी कितीतरी बक्षीस मिळाली आहेत. तेरा एकर शेतामध्ये आजही प्रयोग सुरू  आहेत.सावे आजोबा नव्वद वर्षानंतरही ह्या प्रयोगाबद्दल भरभरून सांगायला उत्सुक आहेत. खते आणि अतिरिक्त पाण्याचा वापर टाळा असा योग्य सल्ला द्यायला ते कचरत नाहीत.


       सावे कुटुंबाची तिसरी तिसरी पिढी आजोबांचा वसा पुढे चालवत आहे . एकीकडे जमिनीवर अतिरिक्त खताचा होत असलेला वापर त्यामुळे जमिनीची वाढत जाणारी क्षरता ह्याने सावे आजोबा व्यथित होतात. जास्त उत्पादन मिळवण्याच्या मोहापाई जमीनच नष्ट होण्याची भीती ते व्यक्त करतात. त्याची भेट झाली हा एक दुर्मिळ योगायोग होता. एरव्ही कोकणात माडांना अळी करून त्याच्या मुळाशी गोवर टाकूनही पाच पन्नास नारळांना महाग असणारे आम्ही त्याच्या प्रयोगाने एव्हडे प्रभावित झालो होतो कि आमच्या राणे साहेबांना हा प्रयोग पाहायला इथे आणून कोकणात त्याची सुरवात केल्यास आमच्या कोकणी माणसाला नोकरीसाठी मुंबईची वाट धरावी लागणार नाही ह्याची खात्री पटली. त्यांच्या वाडीबाहेर  पडतांना एका कर्मयोग्याला भेटल्याचा आनंद मनात होता. मुलांना त्यांच्या  ह्या आगळ्या प्रयोगाविषयी किती समजले ते नाही सांगता येणार पण मला मात्र एक नवी दिशा, नवी वाट सावे कुटुंबांनी दाखवली. त्यांनी जे निसर्ग शेतीच रोपट आमच्या हाती ठेवलं आहे त्यासाठी आभार व्यक्त करायला माझ्यापाशी शब्दच नाहीत. मनात मात्र नारळाच्या आणि केळीच्या बागा रुंजी घालत आहेत.आहे.मला हे शक्य होईल तेव्हाच सावे आजोबांना भेटून आल्याच सार्थक होईल अन्यथा माझ्या लिखाणाला काही अर्थच उरणार नाही.भारताला गरज आहे ती अशा कर्मयोग्यांची . बंदिस्त प्रयोग शाळेत काम किव्हा  प्रयोग करणाऱ्या शास्त्रज्ञ भारताला उपयोगाचा नाही. भारताला हवा भारताच्या मातीतला एक नवा कार्व्हर. सावे आजोबांमध्ये मला तो सापडला. ह्याट्स अप टू हिम फॉर हिस डीहोशन.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

14 thoughts on “कर्मयोगी

  1. Candra

    Your style is really unique compared to other folks I have read stuff from.

    I appreciate you for posting when you have
    the opportunity, Guess I will just book mark this page.

  2. Shirley

    hello there and thank you for your info – I’ve certainly picked up anything new from right here.
    I did however expertise some technical issues using this
    web site, as I experienced to reload the site many times previous to I could get it to load
    properly. I had been wondering if your hosting is OK?

    Not that I’m complaining, but sluggish loading instances
    times will often affect your placement in google and can damage your quality
    score if ads and marketing with Adwords. Anyway I’m adding this RSS to
    my email and could look out for a lot more of your respective fascinating content.
    Make sure you update this again soon.

  3. Mae

    Great article, totally what I needed.

  4. Zachary

    I think that what you said made a ton of sense. But, think
    on this, what if you added a little content?
    I mean, I don’t want to tell you how to run your website, but
    suppose you added a title to maybe get folk’s attention?
    I mean कर्मयोगी – प रि व र्त
    न is a little plain. You could glance at Yahoo’s front page and note how they create news headlines to get people interested.
    You might add a related video or a picture or two to grab people excited about
    everything’ve written. Just my opinion, it would bring your posts a little livelier.

  5. Kristy

    Hi, Neat post. There’s a problem together with your web site in web explorer, could check this?
    IE still is the market leader and a huge component to people will omit your magnificent writing due to this problem.

  6. harga spandek

    What’s Нappening i ɑmm new to this, I stumbled upon this I’ve discօvered It absolutely helpfᥙl
    and it hhas aided me out loaԁs. I am hoρing to give ɑ contribution &
    aid other customers like its aided me. Grеɑt job.

  7. sport gambler

    With havin so much content and articles do you ever run into any issues of plagorism or copyright infringement?

    My blog has a lot of unique content I’ve either created myself or outsourced but it appears a lot of it is
    popping it up all over the web without my agreement.
    Do you know any solutions to help protect against content from
    being stolen? I’d really appreciate it.

  8. vintage t shirts

    Hі there, I woulkd liҝe to subscribe for thіs webpage to gett latest updates, sօ wheгe can i do it please һrlp out.

  9. Shelton

    Great web site you’ve got here.. It’s difficult to find
    quality writing like yours nowadays. I honestly appreciate individuals like you!
    Take care!!

  10. Erica

    certainly like your web-site however you need to check the spelling on several of
    your posts. A number of them are rife with spelling problems and I
    in finding it very troublesome to tell the truth however I will certainly come back again.

  11. Kristina

    Thanks for ones marvelous posting! I really enjoyed reading
    it, you happen to be a great author.I will be sure to
    bookmark your blog and definitely will come
    back sometime soon. I want to encourage continue your great job, have a nice day!

  12. Zara

    Link exchange is nothing else but it is just placing the
    other person’s blog link on your page at appropriate
    place and other person will also do same for you.

  13. Maryellen

    Simply desire to say your article is as astounding.
    The clarity to your publish is simply cool and that i could suppose you are
    knowledgeable on this subject. Fine together with your permission let me to grab your RSS feed to
    keep up to date with imminent post. Thank you one million and
    please continue the gratifying work.

  14. mohegan sun closing

    Touche. Great arguments. Keep up the amazing spirit.

Comments are closed.