गुन्हा

गुन्हा

मदत करणं असेल गुन्हा तर तो मी नेहमी करतो
चुकलोच म्हणत जूने विसरून पून्हा तीच वाट धरतो

चुकांचं परिमार्जन, म्हणजे नवीन चुकांचं जणू लायसन्स
चुका करून त्या निस्तरण्याचं तसं हे माझं जुनंच व्यसन

चुक केली तरी ठरत नाही तो गुन्हा, फार तर मागावी क्षमा
पण चुक न करता येईल अनुभव? होईल का कुणी शहाणा?

मी चुकतो म्हणजे नक्की काय? हेच तर मला समजत नाही
माझ्या मते दखलपात्र, अयोग्य, खरच की मी काही करत नाही

माझी माहिती, कृती, अयोग्य अस समजण्याची का करावी घाई?
टाळण्यासारखं बरंच असतं पण हे समजून मुळी कोणी घेत नाही

त्यांच्या मते माझ्या प्रत्येक कृतीत चुकीचे बीज लपलेले असते
फरक इतकाच मी त्याकडे पाहात नाही दुसरे ते नेमकं हेरतात

चुकीची व्याख्या करण्यात मी उगा वेळ कधी घालवत नाही
मात्र काही डोमकावळे मागावर असतात त्यांनाच असते घाई

कोणाला काही सांगावं, मदतीला जावं असं आता वाटत नाही
मी करतो ते चुकीच, हा शोधच असतो मुळी कडवी थाप, एक आवई

आता मी अपघात पाहूनही डोळ्याआड करतो, अन स्वतःशी हसतो
मनाला असलं वागणं पटत नाही पण या जगाची रीत न्यारी म्हणत गहिवरतो

असलं निगरगट्ट, स्वार्थी जगणं, खरं तर माझा मुळी पिंडच नाही
पण या स्वार्थी जगात खरंखोटं याची जाणच बहूदा कुणाला नाही

म्हणूनच मी आता सुजाण नागरीकाप्रमाणे नाका समोर चालतो
काहीही डो्ळयांना दिसलं तरी न गहिवरता डोळ्याआड घालतो

माझ्या जुन्या मदत करण्याच्या व्यसनाची मी घेतली पक्की फारकत
माझ्या बोलण्यावागण्याची उगाचच कुणी घेऊ नये कधी हरकत

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

One thought on “गुन्हा

  1. Bhosle R. B.

    छान कविता.

Comments are closed.