चुकीचा खिळा

चुकीचा खिळा

ज्याच्या हातुन चुक घडली नाही अशा माणसाच्या होतो शोधात
मी माझा भुतकाळ तपासत होतो काय दडलय त्याच्या पोटात?

माझ्या लक्षात आले चुक मान्य न केल्याने चुकांचे झाले खिळे
काही प्रसंग विसरून जायचे म्हटले तरी किडा पुन्हा वळवळे

कितीतरी माणसे दुखावली दुरावली, भिऊ लागली माझीच सावली
आपण तसे असतो चतुर, दोष झटकण्याची कला मदतीला
धावली

माझ्या चुकांवर दुसऱ्या कुणाला कळू नये म्हणून मी घालतो
पांघरूण
आई थोर असते यात नाहीच शंका पण पोटात घालते मुलाचे अवगुण

चुक तर पहिली माझी झाली पण दोष उगाचच आला आईवर
तुम्ही करता टोकाच्या अनंत चूका त्याचे खापर फुटते कुणा बाईवर

ती आई, ताई, प्रेयसी, पत्नी, मुलगी वा उल्लेख करू नये अशी असेल
काय दुर्दैव आहे? करून सवरुन तुम्ही निराळे दुनिया तिलाच
हसेल

कधीकधी तर तुम्ही, वडील, भाऊ किंवा जीवलग मित्रांशी खोटं बोलता
चूक करून त्याचा दोषारोप कुणा निरागस निष्पाप मुलावर लावता

कधी तुम्ही आपला अधिकारी किंवा मदतनीस यासच
खोटं ठरवता
चेहरा काही लपवत नाही, तुमच्या कृतीतून त्यांच्या नजरेतून उतरता

चुक चुकून घडते यात नवल नाही पण ती लपवता येईल कुठवर?
कधी न कधी चूक करावी लागते मान्य,अन्यथा मनी कुशंकांचा वावर

चूकलो म्हणत जर चूक सुधारण्याचा केला प्रयत्न तर
यश हमखास मिळेल
चूक लपवण्याचा जितका प्रयत्न कराल मन शंकेने तिळतिळ जळेल

कोणीच कोणाशी खोटं बोलल्याने दूरवरचा फायदा होत नाही
खोट्या पोटी खोटंच जन्म घेत मग कुणीच तुम्हाला किंमत देत नाही

चुकीचा खिळा होण्यापूर्वी स्वतःच्या मनावर, कृतीवर घाला
थोडा आवर
शुद्ध मनाने केलेत आचरण आणि व्यवहार, जगात तुम्हाला मुक्त वावर

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar