झेंडा
किती पक्ष? किती झेंडे? सामान्य माणसाचे मात्र वांदे
प्रत्येक पक्षाचे वेगळे धोरण, तरीही कोणी आघाडीत नांदे
कोणाच्या हाती कोणाचा बाण? कोणी हरवला बापाचा मान
कोणाचे घड्याळ टिक टिक बोले, ते तर म्हणती अभी भी जवान
दिल्लीमधून सुटता आदेश महाराष्ट्र अध्यक्ष बरळे काहीही गुमान
सत्तेसाठी लाचार इतके पित्याच्या वचनाचे उरले न त्याला भान
राजपुत्र बसे जवळी सदा, मिंधे करती त्यालाही वाकून सलाम
किती कोटींचे हप्ते घ्यावे, परी भोगावा लागेल त्याचाही परिणाम
कुठे? किती? त्या खरीदल्या जमिनी नावे करूनी ढेंग करती लांब
बुरूज रचणे खरेच अवघड, होता कमान त्याची राहिल का शान?
कोटींचे हप्ते, लाखोंची घड्याळे, अर्थखात्याचे चालती जुनेच चाळे
कुणास अनुदान कोटींचे, राजा मेहरबान परी, कोणाचे हात मोकळे
देवेंद्र वेदनेत विव्हळतो, चारी दिशा नियमित फिरतो, सदैव जागे कान
कोणी खाल्ले, कोणी जिरवले, पेन ड्राईव्ह खिशात त्याच्या, करी नित्य संग्राम
affiliate link
कोण झुलवतो? कोण फुलवतो? कोणी टाकले आपले ब्रीद गहाण
औट घटकेचे राज्य कोणाचे? स्वार्थासाठी पक्षाचे उगाच की बलिदान
गर्वाने कधी फुलू नये, सुटू न द्यावी मांड स्वतःची न सुटू द्यावे कधी भान
वाचाळपणा न कामी येई, मोह वाईट, अपमान ठाई ठाई, हरवतो अवचित सन्मान
कमळ असो की अन्य काही निशाणी, जोखून घ्यावे स्वतःचे पाणी
सत्तेची आस, करा मैत्रीची पेरणी, वाटा नोटा वा बाटली, मैत्रीची ते गाती गाणी
तत्व निवडणूकीचे घ्यावे ध्यानी, फोडून पक्ष, व्हावे पदाचे धनी
निष्ठा ठेवा गुंडाळूनी, असता सत्ता मिळती भाट फेका नोटा, ते पडतील चरणी
कोणते चिन्ह? पक्ष कोणता? कोण विचारे? खिसा भरून देता
टोपी, पगडी वा असूदे फेटा, दोन वर्षात गब्बर आज तिकीट मिळता
कधी या पक्षाचे कधी युतीचे,कधी आघाडी तर कधी कमळाचे
घरी ठेवले, ध्वज बहू रंगाचे, जगण्यास सामर्थ्य या ध्वज रंगाचे
छानच…
Thanks