त्या वळणावर भाग 2

त्या वळणावर भाग 2

कथेचा भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा

एक दिवस मी डॅडला सांगितले, “तुमच्याकडे अभ्यास करणं मला बोअर होतं. आधी तुम्ही example सोडवून पाहता, मग मला सांगता. आमच्या टीचर वेगळी मेथड सांगतात. माझा वेळ फुकट जातो. माझा अभ्यास सुरू आहे पण मी फार better काही करू शकेन अस मला वाटत नाही. माझ्याकडून अपेक्षा न ठेवाल तर बरं. तेव्हा प्लिज मला टॉर्चर करू नका.” Dad ला माझ्या बोलण्याचं आश्चर्य वाटलं, आपण ही हिंमत अण्णांकडे म्हणजे माझ्या आजोबांकडे केली असती तर काय झालं असतं? आठवून तो स्वतःशी खेदाने हसला.

शेवटी व्हायच तेच झालं माझ्यावर डॅडने घ्यायची तेवढी मेहनत घेऊनही, SSC परीक्षेत गणितामध्ये मी जेमतेम पास झालो. घरी सुतकी वातावरण होतं. कमी मार्क मिळाल्याचं सोसायटीत अगोदरच समजलं असावं. शेजारी भिंतीला कान लावून असतात की काय न कळे? पण पास झाल्याचा आनंद तर कणभरही नव्हता. डॅडची सारखी धावपळ सुरू होती. कोणी म्हणेल तिथे फॉर्मसाठी पळत होता. गरजवंताला अक्कल नसते. मी कुठूनही घरी आलो की डॅड सूड उगावल्या प्रमाणे शाब्दिक घण मारत होता. “एवढी मदत करून काय दिवे लावलेत, आता प्रवेश नाही मिळाला तर करा हमाली, म्हणजे अक्कल येईल.” धक्के खाऊन मी सिझन झालो होतो. कोडगा म्हणतात ना तसा, क्षणभर वाईट वाटायचं, पण एक दोन दिवसात मी विसरून जायचा प्रयत्न करायचो. खरं तर तेव्हाच मी आत्महत्या करायला हवी होती पण नाही सुचलं.

खूप खटपट लटपट करून डॅडने मित्राच्या मदतीने मला डिप्लोमाला प्रवेश मिळवला तेव्हा कुठे त्याच मन शांत झालं. या धावपळीत त्याची तब्येत बिघडली.अशक्तपणा आला. कित्येक दिवस त्याने माझ्याशी संभाषण बंद केलं होतं. खरं खोट ईश्वराला माहिती पण मम्मा म्हणते तो अनेकदा नशीबाला दोष देत एकटाच रडत असतो.

त्यानंतर पहिल्या सहा महिन्यात घरात थोडी शांतता होती, मी घरी आलो की डॅड, आज काय झालं? विचारत असे, मी थोडक्यात त्या दिवसभर काय झाले ते सांगत असे. बऱ्याचदा खोटं रचून सांगावं लागे. कारण लेक्चर चालू असतांना माझं लक्षच नसायचं. दोन महिन्यांनी पहिली परीक्षा सुरू झाली तेव्हा रोज संध्याकाळी डॅड पेपर कसा गेला विचारायचा? त्याला ठीक होता सांगताना पोटात गोळा यायचा. First Exam झाली तेव्हाच लक्षात आले की माझा बाजार आटोपला होता. मला फारस काही जमले नाही. कॉमुनिकेशन स्किल सोडल तर कोणत्याच विषयाची खात्री वाटत नव्हती. तेव्हापासूनच माझं काही खरं नाही वाटू लागलं. घर सोडून पळून जावं असही अनेकदा वाटलं, पण कुठे जाणार? भिकारी होऊन जगणं शक्य नव्हतं. चोरीमारी करून जगतांना पकडले गेलो तर डॅड च्या नावाची बदनामी झाली असती. मनावर दगड ठेऊन जगत होतो.

पहिल्या सेमिस्टरचा रिझल्ट काय लागणार ते मला माहीत होतं. डॅडनेच कॉलेजमध्ये जाऊन सेम. रिझल्ट आणला. कॉलेजमध्ये ज्यांच्या मुलांना केटी लागली होती असे इतर पालक भेटले असावे म्हणून घरी येई पर्यंत त्याचा राग शांत झाला. त्यांनी त्या रात्री मला जवळ बोलावून सांगितले. “हे बघ बेटा, पहिल्या सेम ला थोडं कठीण वाटेल पण तू वर्गात नीट अटेंड करून लक्ष दिलस तर तुला सहज जमेल. तेव्हा आता काय झालं त्याच टेन्शन घेऊ नको. मात्र पुढल्या सेमला No excuse. पूढच्या वेळेस एकही केटी लागता उपयोगी नाही.” मी होय अशा अर्थाने मान डोलवली.

च्यायला, जिथं ढुंगण हमखास फुटण्याची खात्री होती तिथे console केल जात होतं. मी सुटकेचा निश्वास सोडला. चार दिवसांनी त्याच गुपित समजलं, डॅड मम्मा ला सांगत होता,”त्याला आताच रागावलो आणि कॉलेजला नाही जात म्हणाला तर भरलेलं डोनेशन फुकट जाईल, करेल हळू हळू अभ्यास.” खर सांगायचं तर आम्ही कॉलेज नीट अटेंड केल नव्हतं. जे कोणी लेक्चर घ्यायला यायचे तेच चाचपडत शिकवत होते, आम्हाला काय घंटा शिकवणार? थोडक्यात आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास. ते कोणत वाक्य किती वेळा रीपीट करतात त्याची नोंद मी वहीवर करत असे. आम्ही उंगल्या केल्यामुळे नापास झालो.” दोन दिवसांनी मम्मा म्हणाली “विजय, डॅड नर्व्हस झाला आहे. लोन काढून तुला शिकवत आहे तर तू चक्क नापास. बघ बेटा, शिकला नाहीस तर भविष्यात कोणी नोकरी देणार नाही, तुझा डॅड नवकोट नारायण नाही. पुढील वर्षी हे अजिबात खपवून घेणार नाही.”

दुसऱ्या सेमला मी seriously अभ्यास करू लागलो. प्रत्येक लेक्चर अटेंड करत होतो आणि मला टीचर appreciate करत होत्या. कधीतरी डॅड टिचरला भेटून जायचा. माझा परफॉर्मन्स सुधारतो अस टीचर म्हणाल्या तेव्हा डॅड खुश झाला होता. पण एकदा मित्रांनी पिक्चर पाहण्याची गळ घातली आणि मी मित्रांच्या चौकडीत शिरलो, इथेच चुकलं. चित्रपट इंटर्व्हल ला आम्ही दम मारला.नाकाने सिगारेट ओढून तोंडातून धूर काढायला शिकलो. मग चार दोन दिवसांनी आम्ही संध्याकाळी एकत्र जमायचो,कधीतरी लेक्चर बंक मारून बाहेर जायचो. उगाचच दादर चौपाटीवर जाऊन सीफेसला जाऊन बस तर कधी विवियानात फिरून ये असा टाईमपास सुरू होता. आयला कधी पुन्हा मित्रांच्या नादी लागलो कळलं नाही. डॅडने एवढी समजूत घालूनही वाट लागलीच. या वेळेला सुटका नव्हती. दुसऱ्या सेमचा रिझल्ट आणायला डॅड गेला तेव्हा माझा प्रताप त्याला त्याच्या मित्रांजवळून समजला. मला काही विचारण्याची त्याला गरज वाटलीच नाही. माझी शोकांतिका त्याला कळली.

डॅड ने घरी आल्यावर मला चांगला चोप दिला.मला ड्रॉप लागल्याने माझं एक वर्ष आणि डॅडचे पैसे आणि मेहनत वाया गेली होती.मुख्य म्हणजे ज्यांनी डिप्लोमाला ऍडमिशन घेऊन दिलं त्या मित्रांच प्रेस्टीज वाया गेल त्यामुळे त्यानी कान उघडणी केली होती. त्याचा अपमान झाला होता. डॅड, मम्मावर वैतागला. तिच्यावर त्यांनी हवे नको ते आरोप केले.विजयला कळत होते की त्याच्या वागण्यामुळे मम्मा अडचणीत आली होती. शेजारच्या काकू ,वरच्या माळ्यावरील सोनटक्के आजी मम्माला, तुमचा विजय काय करतो? असा खोचक प्रश्न विचारत होत्या. त्यांना कचकचीत शिवी द्यावी अस वाटत होतं. मम्मा कोणाकोणाला टाळेल?आणि डॅड तरी कोणाला उत्तर देईल?

या फ्रस्ट्रेशनमुळे मला वेळोवेळी आत्महत्या करावी असं वाटत होत. पण त्याच्या वेदना काय असतात त्या मी जेव्हा सेकंड सेम नापास झाल्यानंतर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तेव्हाच भोगल्या, बस तेव्हाच कळलं तो मार्ग योग्य नव्हता. मी ठरवलं काही झालं तरी आता माघार नाही. कॉलेजमध्ये पहिला येऊन दाखवीन तेव्हाच माझा पण पूर्ण होईल तो पर्यंत घरच जेवण पॉकेटमनी वर्ज्य.

मी विनंती करूनही रात्री मम्माने डॅडला घडलेली घटना सांगितली, ती त्याच्या पासून काही लपवून ठेऊ शकणार नव्हती . डॅड दोन्ही हातांनी डोकं धरत म्हणाला,” साधना मी पार खचून गेलोय, त्याच डोनेशन भरले, सगळ्या गोष्टी घेऊन दिल्या. आता त्याने अर्धवट माघार घेतली तर मित्र काय म्हणेल? त्यांनी विचारलं तर मी difficulty सोडवायला मदत केली असती. मी तरी काय सांगू, मी त्याला स्वतः शिकवायला तयार आहे पण त्यांनी स्वतः हार मानली असेल तर कठीण आहे.” दोघांचं संभाषण मला ऐकू येत होत.

मम्मा डॅड ला म्हणाली, “अरे प्लिज त्याला समजून घे, तो फार निराश झाला आहे, त्याने स्वतःच काही करून घेतलं तर आपण उघड्यावर पडू, कळतय ना? तूच काही तरी मार्ग काढ.” “मी काय मार्ग काढू? माझाच अभिमन्यू झालाय, साधना, घरी गेलो की नाना आणि दादा विचारतात की विजयचं कॉलेज काय म्हणतं? काय सांगणार? त्यांना कळल्याशिवाय राहील का? ठीक आहे डिप्लोमा नाही जमणार तर त्याला जो काही कोर्स करायचा असेल करू दे, मी काही कोणाकडे हाजीहाजी करायला जाणार नाही.”

“विलास तु असं कसं बोलू शकतोस? तो स्वतः निर्णय घेण्याएवढा मोठा आहे का? त्याला काय करायचं आहे ते तूच समजू शकतोस. मला त्याची माहिती नाही आणि ज्ञान ही.” दुसऱ्या दिवशी डॅड ने मला बोलवले, रागाच्या भरात मारल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. डॅड मला काही सांगण्या पूर्वीच मी म्हणालो,”Dad I am Coward, I know though mother promised me she will keep it secret, she can’t, she can not lie to you. She loves you so much. But henceforth I will not give single chance to complain. Yes I made many mistakes. I make you feel ashamed. But I will promise you, I will complete my diploma with flying colors paying my own fees.You must feel proud after three years. डॅडने माझं म्हणणं ऐकून घेतले. त्याला ती माझी पोपटपंची वाटली पण दुसऱ्या दिवशी मी सकाळीच उठून घराबाहेर पडलो. संध्याकाळी उशिरा घरी परतलो. बराच थकलो होतो. मम्मा काही विचारण्यापुर्वीच मी म्हणालो, “मम्मा मी थकलोय, मी झोपतो.” मम्माने माझा हात पकडून विनवणी केली, “विजय, बेटा चल दोन घास खाऊन घे. असं उपाशी झोपू नये, तुला झोप लागणार नाही.” मी हळुच हात सोडवून घेतला. “Sorry Mama, मला भूक नाही तू जेवून घे”

दुसऱ्या दिवशी मी सकाळी लवकर उठून माझ सर्व आटोपून निघून गेलो. दोन दिवस मी फक्त झोपण्यासाठी घरी येत होतो. फुकटच अन्न किती दिवस गिळायच? मीच मला शिक्षा घेत होतो. दुसऱ्या रात्री मी उशिरा परतलो तेव्हा मम्मा माझी वाट पहात होती. माझी चाहूल लागताच डॅड ही बेडरूम मधून आला.त्यांनी मी घरात आल्या आल्या विचारले. “विजय तू नक्की कुठे जातोस? काय करतोस? मला कळेल का? ” “Dad I am not doing anything wrong, but I can not disclose right now, after a few days you will know it.” माझ्या बोलण्यावर तो रागावला,” का सांगता येत नाही की तु जे काही करतोस ते सांगता येण्यासारख नाही?” “Dad believe me, I am not on any dirty path, just give me some time to prove myself.” “Ok, I trust you,come let’s have dinner. “Sorry Dad, I will not eat in the house, let me learn to earn my meal.” “Dear, do you know the last two days your Mamma has been fasting? She says I will not eat alone.”

Dad च्या प्रश्नाने मला निरुत्तर केलं. मी निमुटपणे डायनिंग टेबलपाशी गेलो. मम्माने स्वतः च्या हातानी मला भरवल, तेव्हा समजलं डॅड सुद्धा गेले दोन दिवस उपाशी होता.

डॅड ने माझ्यावर पाळत ठेऊन मी जेथे जॉब करत होतो तिथे चौकशी केली तेव्हा मी ठाण्यात ‘Pramanik showroom’ मध्ये sales representative म्हणून काम करत असल्याचे त्याला कळले. कदाचित माझ्या स्वाभिमानाला ठेच पोचवायची त्याची इच्छा नसावी. तो माझ्या showroom मालकला भेटू शकला असता पण त्याने जाणीवपूर्वक ते टाळले. कदाचित मी तो माझ्या मालकांना भेटायला आल्याबद्दल घरी हंगामा केला असता अस त्याला वाटलं असावं.

घरी मम्मा ला माझ्या job बद्दल माहिती सांगितली तेव्हा ती डॅड वर रागावली असावी. कारण दुसऱ्या दिवशी डॅड मला म्हणाला,” बेटा दुकानात salesman म्हणून तु काम करण्या एवढी माझी आर्थिक परिस्थिती नक्की बिकट नाही. तु फक्त मन लावून अभ्यास कर.”

रात्री मम्माने मला जवळ बसवून विचारलच, “तु नक्की काय करतोस सांगशील, म्हणजे सेकंड सेमची तयारी करण्याऐ्वजी तू job करतोस तर मग अभ्यासच काय? विजय तुला राहिलेल्या सर्व विषयांची परीक्षा देऊन पुढे शिकायचं आहे की सामान्य सेल्स मन म्हणून आयुष्य काढायचं आहे, तूच ठरवं?” मी कसेबसे तिने भरवले ते चार घास खाल्ले, माझ्या मुर्खपणामुळे मी डॅड ला आणि मम्माला वेठीस धरतोय हे न समजण्याइतका नक्किच लहान नव्हतो. ती बिचारी मी मार्गावर यावा म्हणून देवाकडे नवस बोलत होती आणि मी दगड बनून तिच्या वाटेत अडचणी वाढवत होतो.

I said, “Mama I know my responsibility better, now no time to regret, I will overcome all difficulties and secure a good mark. Believe in me. I am tired, let me sleep. मम्मा आज मी तुझ्या आग्रहाखातर जेवलो पण प्लिज उद्या पासून माझी वाट पाहू नको. मी उपाशी राहणार नाही पण माझे मला पाहू दे.
Let me accept the challenge.”

मी मिळेल त्या वेळेचा योग्य उपयोग करत होतो. मला वेळ ऍडजस्ट करून मिळाली होती. पीक अव्हर्स मध्ये मी maximum कस्टमर्स टार्गेट पूर्ण करत होतो. मालक माझ्यावर खुश होते. पाहता पाहता सहा महिने गेले. मी स्वतः कॉलेजची फी भरली जे पैसे मी मालकाकडून ऍडव्हान्स घेतले होते.

माझं सेकंड सेमची exam आणि केटी सब्जेक्ट मी पास झालो. मुक्काम दूर होता. मी घरात जेवत नव्हतो त्यामुळे माझी तब्येत बरीच खराब झाली. सुरवातीला मम्मा माझ्यासाठी थांबत असे. मी यशस्वी झाल्याशिवाय घरी जेवणार नाही हे मम्माला कळलं तेव्हा तिनेही अन्न सोडून दिलं. दोन दिवस दोघेही उपाशीपोटी होते. मी बाहेरून जेऊन आलो आहे सांगूनही तिने हट्ट सोडला नाही.मी दोन घास खावे म्हणून आग्रह करायची पण मी निग्रहाने टाळायचो. शेवटी सतत उपाशी राहिल्याने मम्मा आजारी पडली आणि माझा हट्ट मला सोडावा लागला.

हळूहळू दिवस सरकत होते. फार काटकसरीने मला वागावं लागत होतं. मी माझ्या मालकाकडे गहाण पडलो होतो म्हटलं तरी वावगं ठरणार नव्हतं.सकाळी एका वेळेस नास्ता करण्याचा चाळीस ते पन्नास रुपये खर्चही मला परवडत नव्हता. पण स्वाभिमानाच जगणं काय असत ते मी जगत होतो. त्याचा मला अतिशय आनंद वाटत होता. एक दिवस आमच्या मालकांनी दुपारच्या वेळेत बोलावून मला लंच बॉक्स दिला, म्हणाले, “आज मला भूक नाही तु खाऊन घे.” मी पाहिला घास तोंडात घालताच मला लक्षात आले की तो माझ्या घरचा डबा होता. माझे डोळे भरून आले.

माझ्या नकळत माझा डॅड डबा ठेऊन गेला होता. माझ्या डॅडला पाहून मालकांनी त्यांना ओळखले. कधीकाळी त्यांनीही त्यांच्याकडे पार्ट टाईम नोकरी केली होती. एक दिवस मालकांनी मला बोलावून माझ्या क्षमतेबद्दल अभिनंदन केले आणि माझा पगार चार हजार वाढवून दिला. मला संशय होता यामागे माझ्या डॅडचा हात असावा. मी किती मुर्खा सारख वागत होतो, माझा डॅड स्वत:च सगळं माझ्यासाठी लुटायला तयार होता ते फार उशिरा माझ्या लक्षात आले.

मी जेव्हा सकाळी कॉलेजला जायचो आमच्या बिल्डिंग मधील आमच्याच मजल्यावर राहणारी सोनल धुरी मला रोज दिसायची. माझ्याशी हसायची. कधी कधी डोळ्याने काही सांगण्याचा प्रयत्न करायची. मी मात्र तिला भिक घालत नव्हतो. माझ्या आयुष्यात बरेच रामायण घडले होते आणि मला आता डॅडला दुखावून चालणार नव्हते. काही दिवसानी तिनेच मला मेसेज केला. मला आश्चर्य वाटले. ती स्वतः माझ्यात इंटरेस्ट दाखवत होती. तिने माझा मोबाईल नंबर कुठून मिळवला तिलाच ठाऊक? पण मी यापूर्वी जे पराक्रम केले होते त्यामुळे तिला रिप्लाय करण्याची डेरींग केली नाही. डॅड ला समजलं तर यावेळेस मला नक्की घर सोडावं लागलं असतं.पण सोनलने बहुधा माझ्यातील बदल टिपला असावा. मी एकुलता एक आहे हे ही तिला माहिती होते. तिने माझा पिच्छा पुरवला.ती मला रस्त्यात गाठू लागली. मी तेव्हाच तिला मेसेज केला .”सोनल सध्या मी तुला रिस्पॉन्स देऊ शकत नाही, माझ्यासाठी डिप्लोमा पास होणे खूप महत्त्वाचे आहे.”

तीने ओके मेसेज केला नाही, त्या नंतर तिने एकदाही मला त्रास दिला नाही की माझ्या अभ्यासाच्या वाटेत आली नाही. मी काम करून शिकतो हे तिला कळल्याने तिला माझ्याबद्दल जास्त जवळीक वाटू लागली. ती मला इंप्रेस करण्याचा नेहमी प्रयत्न करायची. जाताजाता माझ्याकडे कटाक्ष टाकून जायची तर कधी गोड हसायची, हाय हिल घालून चालतांना होणाऱ्या आवाजाने माझ लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करायची. तिच्या आकर्षक पेहरावाने आणि लुकने मी कधी तिच्याकडे ओढला गेलो मलाच कळले नाही. हळूहळू आमच्यात संवाद सुरू झाला. दोघे एकाच इमारतीत रहात होतो त्यामुळे येता जाता जाणीवपुर्वक स्पर्श नेहमीचाच होता. मी माझ्या अभ्यासात तिचा व्यत्यय येऊ दिला नाही.

ती कॉमर्स च्या सेकंड इयरला होती. तिलाही लास्ट इयर चे टेन्शन होतेच म्हणून आम्ही फार क्वचित भेटत असू. हळूहळू ती मला आवडू लागली. कधीतरी आम्ही घरापासून दूर एखाद्या बागेत बसून हातात हात घालत गप्पा मारत असू पण जोवर डिप्लोमा पास होऊन जॉब लागून स्वावलंबी होत नाही तोवर आपल्या प्रेमाची वार्ता कोणालाच कळता कामा नये ही अट तिला मी घातली होती. तिने मनापासुन मला साथ दिली. माझ्याकडून तिने कधीही भेटीची अपेक्षा केली नाही. त्यामुळे ती मला जास्त भावली.

आमचे प्रकरण सुरू असले तरी या वेळेस मी अभ्यासात बिलकुल चालढकल करत नव्हतो मी किती महत्वकांक्षी आहे हे मला दाखवून द्यायचे होते. लहानपणी सोनल अगदीच सो सो दिसायची, आम्ही तिला रडकी म्हणून खेळायलासुध्दा आमच्यात घेत नव्हतो पण गेल्या चार पाच वर्षात ती अंगाने भरली, रसरशीत दिसू लागली. तरीही मी तिला टाळत होतो पण अलीकडे तिच निर्धास्तपणे बोलणं, लयीत चालण,केसांचा बॉब आणि तिचे बोलके डोळे खुणावू लागले होते. मी तिच्या जाळ्यात अडकत चाललो होतो. स्वतः कधीतरी तिला कॅडबरी देत होतो. तर कधी I LOVE U चा मेसेज पाठवत होतो.सगळंच विपरीत.

परीक्षा काळात मला शोरूममधून सुटी घ्यावी लागत होती. तेव्हाही मी कॉलेज कॅम्पसमध्ये जाऊन अभ्यास करत होतो. माझा डॅड ऑफिसमध्ये जाण्यापूर्वी कॉलेज कॅन्टीनमध्ये माझ्यासाठी डबा ठेऊन जायचा. कॅन्टीन मालक मला बोलावून टिफिन द्यायचा. पाहता पाहता माझी लास्ट सेमिस्टर Exam झाली आणि मी रिलॅक्स झालो. या तीन वर्षात आमच्या मालकांनी मला समजून घेतले. माझा फायनल Result डॅड घेऊन थेट आमच्या शोरूममध्ये आला. मी दुकानात होतो, त्यांनी येतांना पेढे आणले आणि आमच्या मालकांना देत ते म्हणाले, शेठ तुमचा विजय पास झाला. ते आमच्या मालकांच्या पाया पडले, त्यांचे डोळे अश्रूंनी डबडबले होते. हे पाहून मलाही गलबलून आले. माझ्या वडिलांना दुसऱ्या कोणासमोर भावुक होतांना मी पाहत होतो.

आमच्या मालकांनी पहिला पेढा देवाकडे ठेऊन तोच पेढा मला भरवला आणि म्हणाले अशीच मेहनत कर. लतुला विलास सारखा बाप मिळाला ईश्वराचे आभार मान. माझ्याकडे शब्द नव्हते, मी न संकोचता डॅडला मिठी मारली त्याच्या विषयी असणारा राग तर केव्हाच संपला होता.

काही दिवसांनी कॉलेजमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू झाले, फर्स्ट रँक असल्याने आणि अपेक्षित उत्तरं दिल्याने मी सिलेक्ट झालो. मी मेडीकलही पास झालो. पंधरा दिवसांनी मी कामावर जॉईन झालो.

एका नाजूक वळणावर मी सावरलो नसतो तर माझी आणि माझ्या कुटूंबाची वाताहात झाली असती. मी Tekson Engineering मध्ये Jr. Engineer म्हणून कामाला लागलो तेव्हा सोसायटीमधील सर्वांना सुखद धक्का बसला. एक दिवस मी आईला आमच्या प्रेमा विषयी सांगितले तर ती गोड हसत म्हणाली, “बाळा तुझं गुपित मला माहिती आहे. मी वाट पहात होते तु आपल्या तोंडाने मला कधी सांगतोस. मांजर डोळे बंद करून दूध पिते, त्याला वाटते आपल्याला कोणी पाहात नाही. मी तुझी आई आहे, सोनल आणि तुझं गुफ्तगु मी पाहिले होते. ती दिसायलाच नाही तर वागायला चांगली आहे म्हणूनच मी तुला जाब विचारला नाही.तुला सांगायला हरकत नाही. तुझ्या डॅडला मी याची कल्पना दिली होती.” “तरीही डॅड मला काही बोलला नाही की रागावला नाही, असं का? आता डॅड माझ्यावर प्रेम करत नाही अस तर नाही ना?”

“अस मुळीच नाही, तुझा डॅड म्हणाला, त्यांनी या पूर्वी ठेच खाल्ली आहे तो शहाणा असेल तर चुकीचं वागणार नाही. याउपर वाहवत गेला तर त्याच्या आयुष्याला तोच जबाबदार. म्हणूनच सावध भूमिका घेत आम्ही तुझ्यावर लक्ष ठेऊन होतो. तु वावग वागत नव्हतास म्हणून आम्ही शांत होतो. तुम्हा मुलांच कधी कुणाशी जुळेल आणि कधी ब्रेकअप होईल सांगण अवघड म्हणून मी तुझ्या बाबांव्यतिरीक्त कुणाला बोलले नाही.”

मला डॅडमध्ये झालेल्या बदलाचे आश्चर्य वाटले, गेल्या चार वर्षात डॅड माझ्याशी बरंच मित्रत्वाने वागत होता. मुलं मोठी झाली की वडीलधारी माणस आपोआप शहाणी होतात. मुलांच्या गोष्टीतला त्यांचा इंटरेस्ट आपोआप कमी होत जातो अस वाचलं होतं ते पटत होत पण माझं आणि डॅडच एक वेगळं रिलेशन होत त्यामुळेच डॅड माझ्या बाबतीत एवढं लिबरल वागेल हे खरं वाटत नव्हते.

माझ्या यशाने माझ्या डॅडलाच नाही तर आमच्या शेजारच्या काकूंना माझा अभिमान आहे. गम्मत अशी की त्यांच्या सोनलच आणि माझं कधी जमलं ते मलाही कळलं नाही. काही गोष्टी घडायच्या असल्या की कोणता मुहूर्त लागत नाही. सोनल का म्हणून माझ्या प्रेमात पडली? ते मला माहिती नाही. कदाचित माझा संघर्ष तिने फार जवळून पहिला असावा. खरं तर सोसायटीतील प्रत्येकजण मला वाया गेलेला मुलगा समजत असतांना आणि तिला ते माहिती असतांना तिने माझा हात धरावा ह्याचं मला कौतुक आणि कुतूहल वाटतं.

कधी काळी तिचीच आई माझ्या विषयी उलट सुलट बातम्या वरच्या मजल्यावरील लेले काकूंना पोचवत होती आणि आज मी त्यांचा जावई होणार हे सांगतांना त्या एकदम आनंदून जातात. वेळ हेच जखमेवर औषध आहे. आनंदात असो की दुःखात वेळीच सावरण्ं फार महत्त्वाचे नाहीतर जीवनाच्या नाजूक वळणावर अपघात व्हायची शक्यताच अधिक.

समाप्त

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

One thought on “त्या वळणावर भाग 2

  1. Vanraj Yashwant Thakur
    Vanraj Yashwant Thakur says:

    छान.

Comments are closed.