लिहिन म्हटलं

लिहिन म्हटलं

लिहिन म्हटल कविता तुमच्या माझ्या जीवनावर
विषय इतका गहन मनास घालावा कसा आवर
जीवन म्हणजे प्रश्न, कोडं, विवर, वादळ वावटळ
जीवन म्हणजे जन्म, ज्योत, जल, परिमळ, खळखळ
जीवन म्हणजे याग, त्याग, तर्पण, समिधा यांचं बळ

जीवन म्हणजे उशेचे, आशेचे, स्वप्नांचे मंजुळ संगीत
जीवन म्हणजे सोबत, दुरावा, रूसवा, हळवी प्रीत
जीवन म्हणजे श्वास, अध्यात्म, प्रेम, आंकाशा, विश्वास

जीवन म्हणजे, समज, गैरसमज, माघार, पूढाकार, ध्यास
जीवन म्हणजे झरझर वाहणारा झरा सागराची गाज
जीवन म्हणजे शितल झुळक अन मग सरींचा आवाज

करावं जीवनात स्वतःवर अन जगण्यावर मायंदाळ प्रेम
कष्ट, संकट सोबतीला हवी पण नको कुणावर ब्लेम
तुमच्याकडे जे जे आहे ते नक्कीच आहे नितांत सुंदर
नको आपपरभाव मनी, कुणासही देऊ नका अंतर
व्हरच्युल का असेना, नव्याने सजवू पून्हा जूनेच बालपण
आठवू वर्ग, शाळा, मित्रमैत्रिणींचा मेळा, सुखावेल जीवन

इतर कविता वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar