लोकशाही
निवडणूक, लोकशाहीची थट्टा, साठ टक्के उमेदवार, ठक, गुन्हेगार
गळ्यात घालून राष्ट्रध्वज, पक्षचिन्ह सरेआम फिरती हाच ‘प्रहार’
आम्ही खरच दुर्बल आहोत का? बिनदिक्कत करतो त्यांचा स्विकार
का नाही त्यांना नाकारत, देत आव्हान घेऊन कायद्याचा आधार ?
चंद्रचूड साहेब देवतेच्या डोळ्यावरची पट्टी सोडूनही तुम्ही वेडेच ठार
यांना घटनेची कवचकुंडले आहेत, टाका काढून, होतील फार उपकार
भ्रष्टाचार, व्यभिचारी यांचे गुन्हे शिरी बाळगत हे स्थापणार सरकार
चारित्र्याचा दाखलाही चोर देणार, वाढतच जाणार यांचा अहंकार
निवडणुकीआधी आचारसंहिता, मग रितसर नेते घालतात “आचार”
कायदा गुलाम, साड्या,मिठाई, भेटवस्तू,’एका गांधीसाठी’ सर्वच लाचार
रोज रणधुमाळी, भरपेट नाश्ता, विडीकाडी, जेवणपाणी, सुरू प्रचार
हंगामातच उगवती छत्र्या, ‘लाभ घ्या, लाभ घ्या’ कोण देईल नकार
ज्याची जशी औकात, निधीची सौगात, तसा माहोल, तसाच आकार
गरजवंताला अक्कल नसते, मोर्चे, प्रभातफेऱ्या यांचा मिळे आधार
ढोल बडवती, देती घोषणा, बुलंद आवाज, सैनिकी बाणा, वाटे भार
प्रचार शिगेस पोचतो, जिंदाबाद टिपेस भिडतो, दाट चिरूनी अंधार
निवडणूक येताच भितात, द्यावा लागतो चंदा, त्यांचा जुना व्यापार
प्रत्येक पक्षाचे बडवे गोळा करून जातात, त्यांनाही आहे संसार
‘दादा बोल्या है’ म्हणत, दाखवतात थोबाड, नकोसा वाटतो शेजार
पाकीट कोंबून निर्लज्जपणे, ‘अब मेरा’म्हणतो, हा संबंधी करार
टेम्पोवरी कर्णे वाजती, चौकात सभा गाजती, शब्दांना आता धार
आरोप, शाब्दिक हल्ले, फालतू गर्जना, शिव्याचा चौफेर भडीमार
चंद्रचूडसाहेब निवृत्त होण्यापूर्वी द्या घटनेच्या शब्दांना आकार
गुन्हेगारांना ना उमेदवारी ना मतदान हक्क, हा अर्थ ठरावा साधार
you are truly a just right webmaster The site loading speed is incredible It kind of feels that youre doing any distinctive trick In addition The contents are masterwork you have done a great activity in this matter
Your blog has become an indispensable resource for me. I’m always excited to see what new insights you have to offer. Thank you for consistently delivering top-notch content!