संभ्रम
राजकरणावर काही लिहायचं, बोलायचं नाही घेतली होती शपथ
आपण शिस्तप्रिय संघटनेचे एक नम्र सेवक हेच होत माझ मत
तो ही एक एकनिष्ठ, निती, तत्व पाळणारा प्रामाणिक देशभक्त
अंगात होता वेगळा जोश, नमस्ते सदा म्हणता तापत होतं रक्त
रोज संध्याकाळी एकत्रितपणे करत होता देशाचे मंगल गुणगान
लाठी फिरवतांना, दोन हात करतांना गर्वाने ताठ होत असे मान
त्याच्या पोषाखाचा, टोपीचा, लयबद्ध संचलनाचा मनी अभिमान
गुरुजी ते सावरकर, धींग्रा ते भगतसिंग यांच्या त्यागात पंचप्राण
राष्ट्रासाठीच अर्पण हे जीवन हाच विचार, मनी संसाराचे तर्पण
सत्तेची लाचारी शिवली अन गंगा कलंकित झाली, सरले जीवन
काय घडलं? कोण बिघडलं? नकळत त्यांनी असंगाशी नात जोडलं
आता, आयाराम गयाराम, त्यांनाही पक्ष प्रवेश म्हणून सार बिघडलं
नेते विटले, कमळही भरकटले, खोटीच समाजसेवा ,आला विट
घड्याळाचे काटे गरगर फिरले, तरी ते स्थितप्रज्ञ मला आली झिट
कधी खांद्यावर, कधी डोक्यावर निष्ठावंतांनी वाहिला पक्ष ध्वज
उर फुटेस्तोवर ते पक्षासाठी राबले, नेते मदमस्त जणू चाले गज
कोणावर ठेवायचा विश्वास? सारेच तर गनीम, नेताच बने पाश
तो येडा, साहेबांसाठी भोगली जेल, त्यांच्यावरच फाजील विश्वास
घडतंय काय? कोणत्याच पक्षाला नाही स्वच्छ प्रतिमा, का द्यावे मत?
झुंडशाहीचे पुरस्कर्ते हे, यांची इतर पक्षाप्रमाणे अवनती हीच गत
तेव्हा भारत ‘माझा’ आहे म्हणतांना असलीच तर बाळगा लाज
सत्तेसाठी काहीही, युती,आघाडी, तिघाडी, इतका बरा नव्हे माज
मित्रांनो सावध व्हा मनी संभ्रम असला तरी तुम्ही उगाच उचलू नका तळी
येथे कुणावर ठेवाल भरवसर्व, कितीही पक्षनिष्ठ असलात तरी देतील बळी