सत्तर वर्षांची चिरतरुणी

सत्तर वर्षांची चिरतरुणी

केल्याने देशाटन, पंडित मैत्री सभेत संचार, असं सुभाषित आहे आणि त्याचा अनुभव मी अनेकदा घेतला होता. तोच अनुभव दोन दिवसापूर्वी प्रवासात आला. मी मांडवी एक्सप्रेसने जात होतो. दिवसा प्रवास असला तरी स्लीपरचं रिझर्वेशन होतं. आम्ही दोघं ऐसपैस बसून पेपर वाचत होतो. प्रवासात पेपर किंवा एखादी छान कादंबरी हाती असण आणि कोणाचाही हस्तक्षेप न होता ती शांतपणे वाचता येण या सारखा अन्य विरंगुळा नाही. गाडीने ठाणे सोडलं आणि हळूहळू डब्यातला कलकलाट कमी होत गेला. दिव्यानंतर वातावरण एकदम शांत झालं. मुंबईतील गजबजाटाची सवय झाली की शांतताही टोचू लागते. आता पनवेल येईपर्यंत निवांतपणे पेपर वाचता येईल म्हणून पेपर काढून वाचू लागलो. समोरच्या सीटवर, माझ्या समोर मावशी बसली होती, स्वामीचरित्र वाचत होती. म्हटलं मावशींचं वाचन चाललंय, बरं झालं. इतक्यात त्यांना फोन आला. त्यांनी पुस्तक बाजूला ठेऊन फोन घेतला. “हॅलो, विनायक अरे! मला दवेनी स्टेशनला आणून सोडलं, तू काळजी करू नको बरं, काय म्हणतो ? सीट ना! हो, हो, मी एकटी सीटवर बसली आहे. मी रत्नागिरीला पोचले की फोन करेन.” त्यानी फोन ठेवला.

आमच्याकडे पहात म्हणाली, “माझ्या लहान मुलाचा फोन होता. खूप काळजी करतो, सारखं आईआई करतो.” ती बोलत असतांना पुन्हा फोन आला. “अरे पक्या! मी दिवा पार केलं, काळजी नको करू, मी पोचली की फोन करते. काय म्हणतोस? डबा घेतला का? अरे, डबा कशाला काही तरी मिळेल गाडीत, बरं तु नको काळजी करू मी खाईन काही तरी, फोन ठेऊ का? ऑ, फोन ठेवते बरं का!” आमच्या शेजारचा मुलगा, त्याचा फोन होता. त्यांनेच गाडीवरून आणून सोडलं, फार गुणी पोरगा, सत्संगला जायचं असलं तरी नेऊन सोडतो.” तिने न विचारता माहिती पुरवली.

मधून मधून पेपरच हेडींग आणि मधून त्यांची कॉमेंट्री ऐकणं सुरू होतं.आम्ही काहीच बोलत नाही पाहून त्यांनीच विचारले, “कुठे निघालात? “सिंधुदुर्गला.” ही म्हणाली
“म्हणजे कणकवलीच्या पुढे का?” त्यांचा प्रश्न
“हो, कणकवलीच्या पुढचं स्टेशन.” “मुलं नाही का आली तुमच्या बरोबर?” “नाही, मुलं मोठी आहेत आणि त्यांचं ऑफिस सुरू आहे.” मी म्हणालो. त्यांना संवाद सुरू ठेवायला विषय मिळाला. “मला चार मुलं आहेत दोन मुलगे आणि दोन मुली, एका मुलीचं लग्न झालंय, तीन मुलांची व्हायची आहेत.” त्यांच्या चेहऱ्यावर पाहता,अजूनही यांच्या मुलांची लग्न व्हायची असतील असं वाटतं नव्हतं, तरीही कुणाला त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल का विचारा? म्हणून नाही विचारलं, पण त्यांना मात्र खूप काही सांगायचं असावं असं त्यांचा चेहरा सांगत होता. आम्ही पुन्हा पेपर वाचू लागलो, माझी नजर थोडी वर होताच त्या म्हणाल्या, “मी स्वामींची भक्त आहे. माझी मुलंसुद्धा स्वामींची भक्त आहेत. कोणतीही गोष्ट करायची असेल तर ती अगोदर स्वामींना विचारतात.” त्यांनी एक छोटं पुस्तक काढून मला दिलं. “हे वाचा, वेळ मिळेल तेव्हा वाचा,मला सवय आहे,मी ही पुस्तके जवळ ठेवते, अनेकांना फुकट देते. मला स्वामी देतात. तुम्हाला काही अडचण असेल तर स्वामींना मनोभावे सांगा ते तुमचं ऐकतील”

स्वामींवर श्रध्दा असणं मान्य पण या युगात प्रत्येक गोष्ट स्वामींना विचारून करणारी तरुण पिढी आहे हे ऐकून विचित्र वाटलं. पण तसं सांगण्याची हिम्मत प्रथम परिचयात करावी अस वाटेना. म्हणून मी फक्त हो, हू, असं का? इतकाच त्यांच्या बोलण्याला प्रतिसाद देत होतो. त्यांना मात्र खूप काही सांगायचं असल्याचे जाणवत होते. त्यांनी आपली मुलं चांगल्या पोस्टवर असून अतिशय साधी असल्याबद्दल सांगितलं. त्या म्हणाल्या, “माझी मुलगी पोलिस खात्यात कॉन्स्टेबल असून अतिशय स्ट्रिक्ट आणि डेरिंगबाज आहे. मोठा मुलगा मल्टिनॅशनल कंपनीत स्टोअर मॅनेजर आणि लहान मुलगा कॅपिटल इंडिया कंपनीत Executive post वर काम करतो.” हे सांगताना त्यांचा चेहरा खुलला होता. खूप आनंदी दिसत होत्या.जणू त्यांचं जीवन कृतकृत्य झाल्याच त्यांना सुचवावे वाटत असावे.

त्यांना अचानक आपल्या लग्नाची गोष्ट आठवली. त्या म्हणाल्या, “मी सातवीत असतांना माझं लग्न झाले. तेव्हा मी पंधरा वर्षांची होते. माझे मिस्टर माझ्या सासऱ्यांच्या दुसऱ्या पत्नीचे अपत्य त्यामुळे त्यांना वडिलांकडून म्हणावे तसे प्रेम मिळाले नाही. पण हे खूप प्रेमळ होते. कामावरून घरी आले की मला कामात मदत करायचे. एकदम सुखी संसार होता आमचा, पण कुणाची तरी दृष्ट लागली. दिवाळी सण जवळ आला होता, एक दिवस दिवाळी सणापूर्वी हे तोरण दुरुस्ती करत असतांना, लाईट अचानक गेली, ह्यांच्या ते लक्षात आलेच नाही आणि लाईट अचानक सुरू झाली आणि त्यांना शॉक लागला, मुलगी शेजारी खेळत होती, बाबा असे काय करतात म्हणून पहायला पुढे गेली होती. नशिबाने वाचली. हे मात्र, डॉक्टर येण्यापूर्वी जागीच गेले. सासऱ्यांनी आम्हाला अशा प्रसंगात मदत करण्याऐवजी एकट पाडलं, घरातील सर्व वस्तू ते घेऊन गेले. पण मी हार मानली नाही, जिद्दीने मूलं वाढवली. मला उत्तम स्वयंपाक येतो, मी बऱ्याच घरी स्वयंपाक बनवून देत होते, अगदी मनोहर जोशी साहेब यांच्या घरी देखील स्वयंपाक बनवला आहे. स्वतः कष्ट करून मी मुलं वाढवली, त्यांचं शिक्षण केलं. मी जोशी साहेबांना मुलाच्या नोकरीसाठी चिट्ठी देण्याची विनंती केली होती पण… असो, माझ्या मुलांनी हिंमतीने नोकऱ्या मिळवल्या, मला मुलांचा सार्थ अभिमान वाटतो.

या बाईंनी एकटीने चार मुलं वाढवली,त्यांचं शिक्षण पूर्ण केलं, ते ऐकून त्यांच्या विषयी आदर वाढला. अचानक त्यांना लहानपणी शाळेत शिकवलेली मराठी कविता, “फुलपाखरू छान किती दिसते” कविता आठवली, त्यांनी ती म्हणून दाखवली. Jack and Jill कविताही त्यांनी पूर्ण म्हटली. अनेक भावगीतं त्यांना येत होती. त्यांनी ती म्हणून दाखवली. त्या मावशी एक हौशी फुलपाखरू होत्या,त्यांच्या मनात विचारांचे वावटळ जसे येत होते त्या आठवणीत रमून एक एक आठवणींचा पदर उलगडून दाखवत होत्या. त्यांना प्रवासाची हौस आहे असं त्या म्हणाल्या. महिला किंवा सत्संगपरिवारासोबत मी कुठेही बिनधास्त जाते असं त्या म्हणाल्या. त्या स्वतः बाबत भरभरून बोलत होत्या. त्यांना सायकल चालवता येत आहे हे ऐकून आश्चर्य वाटले तर त्यांनी दुसरा धक्का दिला, त्या म्हणाल्या मला पोहायला आवडते. शहरात राहणाऱ्या गरीब कुटुंबातील मुलांना पोहायला शिकू देणं हा श्रीमंती लाड पण तरीही त्या जिद्दीने शिकल्या. त्यांच्या आठवणींच्या कोषात खूप आठवणी आणि अनुभव असल्याचे लक्षात आले.

त्यांना सोशीक श्रोता मिळाला होता त्यामुळे त्या मनात जाग्या होतील त्या आठवणी सांगत होत्या. त्या म्हणाल्या, “लहानपणी मी विस पैसे तास दराने भाड्याची सायकल घेऊन चालवली आहे. आईजवळ मी हट्ट करायचे आणि आई द्यायची. आम्ही गरीब असलो तरी आई माझे लाड पुरवायची. आज माझ्यात जे काही चांगले आहे ते सर्व आईचे आहे आणि जे वाईट आहे ते माझ्यातील दुर्गुणांना वेळीच कोणी आवरलं नाही म्हणून आहे.

या ७२ वर्षांच्या मावशीकडे आठवणींचा साठा ठासून भरला होता. कितीतरी आपत्ती येऊनही त्यावर मात करत त्या सुंदर आणि आनंददायी जीवन जगल्या होत्या. अनेक थोरा मोठ्यांच्या घरी वावरत असल्याने त्यांना अनेक क्षेत्राचा ऐकीव अनुभव आहे त्यामुळे त्यांचे विचार अनुभव संपन्न आहेत यात वादच नाही. त्यांनी गरजूंना वेळोवेळी मदत केल्याच त्या सांगतात. त्यांचे कथानक म्हणजे एक जीवंत बोलपट ठरावा असा कडू गोड आठवणींचा ठेवाच असल्याच मला जाणवललं. मी तस व्यक्त करताच त्या गोड हसल्या.

मी पुन्हा पेपर वाचू लागलो तस अचानक त्याना काही आठवलं आणि त्या म्हणाल्या, “मी रत्नागिरीला उरूस आहे तिथे जात आहे. तिथे दर्ग्यातील बाबाच दर्शन घेतलं आणि नवस बोललो की तो पावतो. म्हणून मी त्याचं दर्शन घेऊन माझ्या मुलांचं लग्न लवकर व्हावे म्हणून साकडे घालणार आहे.” आता मात्र माझी उत्सुकता जागृत झाली.”मावशी तुमची मुलं किती मोठी आहेत?” त्या म्हणाल्या,”लहान मुलगा अडतीस वर्षांचा आणि मोठा त्रेचाळीस वर्षांचा.”
“मावशी,तुम्ही बऱ्याच ठिकाणी वावरता सत्संगला जाता तर मग तुमच्या मुलांची लग्न का रखडली? शिवाय तुमचे स्वामी सदैव तुमच्या बरोबर असतात अस तुम्ही म्हणता मग स्वामींना तुमची दया का येत नाही? ते तुम्हाला मार्ग का दाखवत नाही?” त्या निरुत्तर झाल्या, थोडा वेळ शांततेत गेला. त्या म्हणाल्या “मलाच कळत नाही स्वामी माझी कुठपर्यंत परीक्षा घेणार आहेत? ,मी घर चालवण्यासाठी दिवसभर बाहेर काम करत होते त्यामुळे मी मुलांना न्याय देऊ शकले नाही, मी स्वामींची भक्त असल्याने त्यांनाही स्वामींच्या भक्तीत रस वाटू लागला. बऱ्याचदा मी स्वतःला हरवून गाणं म्हणत बसते आणि स्वयंपाक करायला विसरून जाते. पण आता मला वाटतं जेवढा वेळ माझा सत्संगमध्ये गेला तो मी कारणी लावला असता तर मुलांची लग्न झाली असती. पण आता फार उशीर झाला, मुलांचं लग्न व्हायचं वय निघून गेलं आहे आणि कधीही काही न बोलणारा माझा विनायक मला वेळोवेळी माझ्या चुकीबद्दल सतत बोलू लागला आहे.”

त्या खरं तेच सांगत होत्या आठवणींचे पदर उलगडता उलगडता त्या मधूनच वेगळ्या दुनियेत हरवत होत्या. रस्ता दिसेल तिथे पांथस्ताने जावं तसे त्यांचे विचार मधूनच भटकत होते.आम्हाला श्रोत्याची भूमिका वठवावी लागणार होती हे दिसत होतं. त्यांनी पुन्हा हिंदी मराठी गाणी म्हणायला सुरवात केली. विशेष म्हणजे त्यांना गाण्याचे दोन पेक्षा जास्त अंतरे येत होते,आवाज सुरेल होता, अचानक काही आठवल्या प्रमाणे त्या म्हणाल्या,”आता काल परवाचा प्रसंग पहा, लता मंगेशकर गेली आणि मी सुन्न झाले, तिचे अंतविधी टीव्हीवर पाहताना मला शोक अनावर झाला, कितीतरी वेळ मी रडत बसले होते. मुलगी माझ सांत्वन करत होती. मी स्वयंपाक बनवला नाही हे तिच्या लक्षात आलं तो पर्यंत दोन वाजले होते. तिन्ही मुलं घरी होती पण कोणी नाराजी व्यक्त केली नाही. मुलीने ब्रेड आणला आणि आम्ही ब्रेडवर भागवलं. असं बऱ्याचदा होतं, मी विचारात कुठंतरी हरवून जाते. त्यामुळे माझं मुलांकडे दुर्लक्ष झाले हे खरं पण मला आता खूप वाईट वाटतं. माझी मुलं माझ्या आज्ञेत असल्याने त्यांनी स्वतः कधीच कुणाशी मैत्री केली नाही. कदाचित आई आमची मैत्री स्वीकारणार नाही असं त्यांना वाटू लागलं आता मी मुलांना त्यांनी आपला जोडीदार पहावा अस सुचवते पण त्यांना वाटत मीच त्यांच्यासाठी योग्य स्थळ पहावं. त्यांना चांगली स्थळ येतात पण प्रत्येक मुलीला स्वतंत्र रहायचं असतं, मी मुलांना सांगते की त्यांनी माझा विचार न करता त्यांनी आपला जोडीदार पहावा पण त्यांच वय वाढल्याने ज्या मुली आता येतात त्यांच्या अपेक्षाही प्रचंड आहेत. कोणाला स्वतंत्र फ्लॅट हवा कोणाला गाडी तर कोणाला मोठं पँकेज असणारी नोकरी, पण मी मुलांना सांगीतल आहे तुम्ही माझा विचार करुन अडकू नका.”,

आतापर्यंत मला त्या मावशींच कौतूक वाटत होतं पण आता त्यांचा राग येऊ लागला होता. मुलांना वाढवताना नको तेवढ जपत राहील्याने मुलांनी स्वतः स्वतंत्र विचारच केला नव्हता. आई हेच सर्वस्व समजून ती आजही आईच्या आज्ञेत वागत होती. केवळ एकाच मार्गावर जात राहिल्याने आणि अंधश्रद्धेत बुडाल्याने त्यांनी आपल्या मुलांना व्यवहारी ज्ञान दिलेच नव्हते. त्यामुळे भक्तीचा अतिरेक होऊन लं मोठा मुलगा नको त्या मार्गावर गेला. व्यसनी बनला. तरीही आईच आंधळ प्रेम. त्याला त्याची चूक दाखवण्याऐवजी पाठीशी घालत होती. मुलगी, थोडी जगावेगळी, आईवर जो प्रसंग ओढवला तो ऐकून व्यथित झालेली त्यामुळे, आईला काय आवडेल या एकाच विचाराने तिच्या भोवती पिंगा घालत होती, आपल्यालाही आयुष्य आहे आणि ते जगण्याची आपल्याला मुभा आहे हेच विसरली होती. नोकरी आणि घर या पलीकडे तिने पाहिलचं नव्हते. पोलीस खात्यातील नोकरी त्यामुळे आणि बारा बारा तास ड्युटी करत असल्याने थोडा रूक्षपणा आला होता. लहान मुलगा थोडा विचारी होता पण त्याच्या बरोबरीच्या मित्रमैत्रिणी यांची लग्न झाल्याने एकटा पडलेला. वाढत्या वयामुळे थोडा अस्वस्थ, बेजार. म्हणूनच त्याचं आईशी उघड भांडण ठरलेलं. तरीही ती शांत. स्वामींच्या मनात येईल तेव्हा नक्कीच मदत करतील या विचारांनी.

गाडीत अचानक भेटलेल्या या बाईंनी आम्हाला भारून टाकलं आहे. या जगावेगळ्या बाईंचा उत्साह मात्र वाखाणण्या जोगा असणार यात वादच नाही, कितीतरी हिंदी गीते त्यांची तोंडपाठ आहेत आणि त्या लयीत म्हणून शकतात म्हणून त्यांचं करावं तेवढं कौतुक थोडं. त्यांचा हजर जबाबी स्वभाव, गाण्यांची समज, विविध पदार्थ बनवण्याची आवड ,पोहणे, सायकल चालवणे यातील कुशलहता हे सगळं ऐकलं की वाटते, ‘म्हातारी इतुकी अवघे सत्तर हे वयमान’
तारुण्य सोळाचे ती अजून असे जवान
उत्साही मन तिचे हा भक्तीचा परिणाम
मैत्री दुनियेशी तिचे हास्य खेळकर छान
अशी ही मावशी प्रवासात अचानक भेटते आणि मनाचा ताबा घेते. न विचारता जीवनपट उलगडत जाते आणि जीवनाचा आनंद कसा घ्यावा हे सांगता सांगता जे अद्यापी हाती गवसले नाही त्यासाठी कंबर कसून त्याचा शोध घेत एकटीच बाहेर पडते. मुलांना संसार उभारून दिल्या शिवाय मी थांबणार नाही, अद्यापही लढण्याची जिद्द आहे हो फक्त मुलांनी शस्त्र खाली ठेवल्या प्रमाणे वागू नये अस म्हणते. तेव्हा खरंच तिच्या तारुण्याचा हेवा वाटतो. होय आजही त्यांचा उत्साह सोळा वर्षांच्या तरुणीला लाजवेल असाच आहे. मनाचं तारूण्य टिकवण्याची कला ज्याला प्राप्त झाली तो चिरतरुण नक्कीच होतो. अगदी खर, तिच्या झुंजार व्यक्तीमत्वासाठी सलाम. तिच्या मुलानी तिच्यावरून मीठ मोहऱ्या ओवाळून टाकाव्या असंच तिचं वागणं, बोलण होत. न जाणो आमच्या सारख्या शांत जीवन जगणाऱ्या माणसाची त्यांना आणि त्यांच्या कर्तृत्वाला नजर न लागो. त्या चिरतरुण राहोत हीच इच्छा.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

18 thoughts on “सत्तर वर्षांची चिरतरुणी

 1. Sarika Masurkar
  Sarika Masurkar says:

  Sundar lekh

  1. Mangesh kocharekar
   Mangesh kocharekar says:

   Thanks for complement.

 2. worldcosplay.net

  Hi there, I discovered your website by way of Google
  at the same time as looking for a similar matter, your site came up, it seems to
  be great. I have bookmarked it in my google bookmarks.

  Hello there, simply was aware of your blog thru Google, and located that it is truly informative.
  I am going to be careful for brussels. I will appreciate in case you proceed this
  in future. Many other folks can be benefited out of your writing.
  Cheers!

 3. شركة تنظيف بالرياض عمالة فلبينية

  Because the admin of this web page is working, no hesitation very rapidly
  it will be renowned, due to its feature contents.

 4. ลิงค์ เข้า sbo

  Asking questions are actually fastidious thing if you are not understanding
  anything totally, however this piece of writing presents pleasant understanding even.

 5. https://startupmatcher.com/p/judionlineterpercaya

  First of all I want to say superb blog! I had a quick question which I’d like
  to ask if you don’t mind. I was interested to
  know how you center yourself and clear your head before writing.
  I have had a hard time clearing my mind in getting my ideas out.
  I do enjoy writing but it just seems like the first 10 to 15
  minutes are usually wasted just trying to figure out
  how to begin. Any ideas or hints? Appreciate it!

 6. www.fin88.com

  Hi to all, for the reason that I am really
  eager of reading this weblog’s post to be updated on a regular basis.
  It contains pleasant information.

 7. Bhosle R. B.

  कथा खुप आवडली.

  1. Mangesh kocharekar
   Mangesh kocharekar says:

   धन्यवाद सर,तुम्ही प्रतिसाद देता म्हणूनच लिखाण होत रहात.

 8. best iptv service

  What’s up colleagues, how is everything, and what you desire to say about this article, in my view its genuinely remarkable for me.

 9. سرور اختصاصی حرفه ای

  Hi! I just wanted to ask if you ever have any trouble with hackers?
  My last blog (wordpress) was hacked and I ended
  up losing months of hard work due to no back up. Do you have
  any methods to prevent hackers?

 10. شركة تنظيف بالخرج

  Interesting blog! Is your theme custom made or did you download it from somewhere?
  A design like yours with a few simple adjustements would
  really make my blog stand out. Please let me know where you got your theme.

  Bless you

 11. شركة نظافة عامة بالرياض

  I’m no longer certain the place you’re getting your information, but great topic.

  I needs to spend a while studying much more or understanding more.
  Thank you for great information I was looking for this info for my mission.

 12. login 396club slot

  Thank you for the good writeup. It in reality was a enjoyment account it.

  Glance complex to more introduced agreeable from you!
  However, how can we be in contact?

 13. سایت شرطبندی

  Wonderful blog! I found it while browsing on Yahoo News.
  Do you have any tips on how to get listed in Yahoo News?
  I’ve been trying for a while but I never seem to get there!
  Cheers

 14. a-ufa888

  It’s truly very complicated in this busy life to listen news on TV, so I simply use world wide web for that purpose, and get the most up-to-date information.

 15. apple

  China Heat Pump Manufacturer | Swimming Pool Heat Pump | Air Source Heat Pump |PHNIX

  PHNIX is a professional heat pump manufacturer We committed to research
  development, and manufacture of air to water heat
  pump, Full Inverter Swimming Pool Heat Pump in China

 16. https://linktr.ee/agenpkvgames365

  When I initially commented I clicked the “Notify me when new comments are added” checkbox and now each time a
  comment is added I get several emails with the same comment.
  Is there any way you can remove people from that service?
  Thank you!

Comments are closed.