सर आली पहिल्या प्रेमाची

सर आली पहिल्या प्रेमाची

सर आली पहिल्या प्रेमाची वाटते मनाशी गावे
जे अंतरी फुलते आहे ते सांगून मोकळे व्हावे
प्रेमात तुझ्या भिजावे अन तुला चिंब भिजवावे
संपवावे द्वेत मनाचे तुज आनंदे सख्या रिझवावे 

मी रुपात गुंतले होते तो होता फक्त आभास
देऊन सर्वस्व तुजला ऐकला मनाचा श्र्वास
पाहिले प्रथम क्षणी तुजला लागला मनी ध्यास
तू दिलीस छान सोबत मज आवडला सहवास

विरह न साहवे मजला वाटे कटू वनवास
तू नकोच जाऊ कोठे कर घर मम ह्दयात
दे आधार दुबळ्या मनाला साहवणार नाही आघात
तुझे अस्तित्व माझ्यासाठी चांदण्याची लयलूट

चल ओढ्यापाशी बसूया प्रतिबिंब तुझे पहाते
तू पहा डोळ्यात माझ्या, चैतन्य अंतरी जपते
तुझी भावमुद्रा, मी नित्य, प्रेमे, आनंदे पूजते
तू माझा भोळा मोहन, मी राधा होऊनी फुलते

परी दे विश्र्वास मजला नाही सोडणार कधी हात
आली संकटे कितीही तरी करणार नाही  तू खंत
माझ्या हळव्या मनाचा पाहणार नाही कधी अंत
मी तुझीच होऊन मीरा जपेन भक्तीची वहीवाट

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar