सुखांत भाग 2

सुखांत भाग 2

भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मनोरमा चपापली, “ये निनाद, अरे बाळा ! मुद्दाम मी बऱ्याच दिवसांनी थालीपीठ टाकली आणि तू निघून जातोस. आधी ये आणि बस, हे बघ तुझे पप्पा करतील ते मला मान्य, या घरा बद्दल मी भावनिक झाले कारण इथे येईपर्यंत तुझ्या पप्पांनी आणि मी कितीतरी तडजोडी केल्या आहेत. पण तुझ्या शिक्षणाचा प्रश्न याने सुटत असेल तर जरुर पप्पांच्या सोबत मी ही आहे. गेल्या तिस वर्षांत काही मागीतलं असेल तर फक्त तुमच्यासाठीच. आता वेगळ काय मागणार? ये शांत बस आणि पोटभर थालीपीठ खा. तुला अमेरिकेत जायचं आहे ना जरूर जा, आईची, बाबांची आठवण ठेव म्हणजे झालं.” “आई, पप्पांचा निर्णय मला मान्य नाही, मला जायला नाही मिळालं तरी चालेल पण हे घर विकून इतक्या लांब रहायला जायचं म्हणजे अतिच झालं. पप्पा आईची गैरसोय करून आणि हे घर विकून कुठही नाही जायचं.”

त्यांच बोलण सुरू असतांना नंदिनी आली, “आई,दादा काय म्हणतोय? कोण जातय? दादाच नक्की झालं का जायचं? पण त्याची परीक्षा तर अद्याप झाली नाही मग!” “हे बघ, तुला विषय माहिती नाही, उगाच तोंड मध्ये खुपसू नको. माझी MBA परीक्षा झाली तरी जोपर्यंत स्कॉलरशिप मिळत नाही तो पर्यंत मी जाणार नाही हे नक्की.” “ते तर मला माहिती आहे, it’s not joke to pay forty lakhs
For Visa and admission. At the same time you should get a part time job for your monthly living. am I right?” “तुझ खरं आहे पण,युनिव्हर्सिटी पार्ट टाईम जॉबची व्यवस्था करणार आहे फक्त ऍडमिशन मिळालं पाहिजे.” “Last two years you have been preparing for an exam, is that not sufficient to get through?” “अग,अभ्यास करायला वेळ कुठे मिळतो, कधी तरी अभ्यास करून थोडच पास होता येत, तुला माहिती आहे ना चांगला स्कोअर असेल तरच युनिव्हर्सिटी स्कॉलरशिप मिळते.” “मुलांनो तो विषय बास करा.आता आधी खाऊन घ्या,मी रात्री डाळ-खिचडी बनवायच ठरवलयं, कोणाच काही ऑब्जेक्शन?” “माझं काही म्हणणं नाही, खरतर मला अर्धा ग्लास दूध पुरे,मुलांच त्यांना विचार.” माधवराव म्हणाले. “हो आई , आमचही काही म्हणणं नाही, पण खिचडी बरोबर पाफड तळ म्हणजे झालं” नंदिनी म्हणाली. “पाहीलस जिभेला किती चोचले आहेत ते, सतत काहीतरी वेगळं हव असतं.” “दादा,माझ्या जिभेला चोचले पण तू नाही वाटतं खात. मी मागते म्हणून तुला सांगावं लागत नाही इतकच.” “बोलायला कुणाला ऐकायची नाही, अशीच प्रगती अभ्यासात दाखवा म्हणजे झालं.” माधवराव तिच्या पाठीवर थोपटत म्हणाले आणि निघून गेले.

नंदिनी थालीपीठ खाता खाता, निनादला कॉलेज मधल्या गंमती जमती सांगत होती. तो ऐकलं दाखवण्यासाठी हू हू करत होता. पण मनात पप्पानी आमचं संभाषण ऐकलं तरी काही बोलले नाहीत याच आश्चर्य वाटत होत. म्हणजे बहुदा शेफाली बोलली ते पप्पांनी नीट ऐकल नसाव असही त्याला वाटलं.

रात्री तो अभ्यासाला बसला,कितीतरी नोट्स त्याने कलेक्ट केल्या होत्या. पाठचे पेपर्स सोडवण्याचा प्रयत्न करत होता पण एखादा प्रॉब्लेम सुटला नाही की मन खट्टू व्हायचं. डिस्कशनसाठी चारपाच मित्रांचा ग्रुप केला होता. ते बरेचदा व्हिडिओ चॅट करून प्रॉब्लेम डिस्कस करत असत. एकमेकांना हेल्प करत. त्यांच्याच ग्रुपमध्ये मैथिली होती, शेफाली इतकीच डॅशिंग पण तितकीच सुस्वभावी आणि निर्मळ मनाची. तिच्या तोंडी असभ्य भाषा नव्हती की बडेजाव, ती त्याला अनेकदा प्रॉब्लेम सोडवायला मदत करायची. आज शेफालीशी झालेल्या वादावादीमुळे त्याला अचानक तिची आठवण झाली. दोन तीन वेळा तिला कॉल करण्यासाठी त्याचा हात मोबाईलकडे गेला. त्याने स्वतः ला आवरलं, दुसऱ्याच्या दुःखात मदत करण्याऐवजी तो मैथिलीची मदत घेण्यासाठी उत्सुक होता. त्याने निग्रहाने स्वतः ला आवरलं. “नाही, कुणाच्या कुबड्या घेऊन मी दुःख हलकं करणार नाही. मी लढेन, मी जिंकेन.” तो स्वतःशी म्हणाला.

त्यांने शेफालीला विसरून खंबीर मनाने अभ्यास सुरू केला. पाहता पाहता आठ दिवस गेले,त्याचा आत्मविश्वास वाढत होता. होय मी जिंकेन माझ्या कर्तृत्वावर मी यशस्वी होईन. अधुनमधून त्याला शेफालीची आठवण यायची पण दुसरं मन म्हणायच, सुरी सोन्याची असली तरी ती जवळ बाळगू नये कधीही घात करू शकते. जेव्हा जेव्हा शेफालीचा फोन आला त्याने तो निग्रहाने टाळला. महिना होऊन गेला पण त्याने तिला भेटण्याचा प्रयत्न केला नाही, आधी दर आठवड्यात दोनदा फोन यायचा आता दर दिवशी फोन येऊ लागला. फोन वाजला तरी तो तिचा कॉल पाहून इग्नोर करत होता. आज दर दोन तासाने फोन येत होता, त्याने निग्रही मनाने फोन उचलला. शेफाली, रागाने बोलत होती, “तू माझा फोन का उचलत नाहीस? माझ्याशी संबंध तोडायचे असतीत तर tell me you are not interested because I do not deserve this. Don’t be a cunning fox, be brave like a lion.” त्याने शांतपणे ऐकून घेतल. “Shefali,thanks for your advice, I can’t tolerate your language for my family. Sorry I can’t walk with you, thanks for your company. Forget the dream which we have seen together. Forgive me and leave me alone.”

त्यांने मोबाईल बंद केला, त्या मोबाईलकडे बराच वेळ तो पाहत बसला न जाणो पुन्हा ती फोन करायची. आज खूप टेंशन कमी झाल्याचे त्याला जाणवत होते. शेफाली जीवनातून कायमस्वरूपी वजा झाली होती. नाहीतरी तिच्या सोबत वाटचाल करण अवघड होतं. आता फक्त अभ्यास आणि अभ्यास,स्कॉलरशिप मिळावयाचीच या निग्रहाने तो अभ्यास करत होता. पहाता पहाता सहा महिने निघून गेले. आता चांगला कॉन्फिडन्स आला. मैथिली आणि त्याची ग्रुप डिस्कशन वेळी भेट होई. आता ते दोघे कधी कधी ब्रिटिश लायब्ररीत तर कधी एन.एम आय कॅम्पसमध्ये भेटत होते. . ती अतिशय मृदु स्वभावाची पण चाणाक्ष तितकीच हजरजबाबी होती. कधीकधी त्यांचा एकत्र चहापाणी होई. त्याला अभ्यासात मदत होत होती.

पहाता पहात परीक्षा आली.त्याने फर्म मधून पंधरा दिवसांची सुट्टी घेतली. NMIM च्या माजी विद्यार्थ्यांचे पत्ते मिळवून त्यांच्याकडून ‘की’ पॉईंट समजून घेतले. पार्ट टाईम विद्यार्थ्यांना रेग्युलर विद्यार्थ्यांपेक्षा अशीच जास्त मेहनत करावी लागते पण त्यातही चांगली गोष्ट म्हणजे या मुलांना स्टाफ चांगलीच मदत करतो.निनादला प्रोफेसर राजेश सराफ आणि वीणा अवसरे यांनी वेळोवेळी भरपूर मदत केली होती. त्याने शेवटच्या दिवशी त्यांना भेटून आभार मानले.

दिवस भरभर जात होते. रिझल्ट कधी लागेल याची खात्री नव्हती. पेपर्स चांगले गेल्याने त्याला पास होण्याची खात्री होती पण स्कोअर चांगला झाला तरच स्कॉलरशिप मिळणार होती अन्यथा स्वप्न, स्वप्नच राहणार होतं. मैथिलीशी ओळख झाल्यापासून तो खूश होता. ते मुद्दाम कधी कुठे भेटत नव्हते पण दर विकेंडला तीचा फोन येत होता. कधीतरी मेसेज येत होता. शेफालीच्या अनुभवातून उगाचच कोणात इनव्हाल्व व्हायच नाही, निनादने ठरवले होते.

एक दिवस संध्याकाळी तो ऑफिसवरुन येत असतांना मैथिलीचा कॉल आला,त्याला आश्चर्य वाटले, कधीतरी संध्याकाळी ती त्याला फोन करत होती पण या वेळेस? म्हणून त्यांनी कॉल घेतला, ती आनंदाने ओरडली,”Ninad congrats, I am very happy , you stood second in our college.” “Thanks, Maithili,that means you must be First, isn’t it. Congrats to you for your grand success. Maithili I want a party from you.” “Sure tell me when you are coming to college? Our Professor might be looking for us?” “I can come on Saturday,not before that.” “Ok. Then see you on Saturday at 11am.” कधी नव्हे तो त्यावर्षी तिसऱ्या महिन्यात निकाल लागला. त्याने एका ठिकाणी उभं राहून आपल्या निकालाची खात्री करून घेतली.665 स्कोअर आला होता. खरं तर त्याच expectations 700+ होत पण झाला तो स्कोअर वाईट नव्हता.त्यानी जातांना पेढे नेले. घरी आईच होती, तिलाही surprise द्यायच म्हणून त्यानी पेढे स्वतःच्या सॅक
च्या तळाशी ठेवले. घरी गेल्यावर काही न बोलता त्यांनी चहा घेतला. बाबा आणि नंदिनी आली की तो अचानक ती न्युज सांगणार होता एवढ्यात कुरिअर वाला आला, त्यांनी दारावरची बेल दाबताच मनोरमा दार उघडायला गेली,” निनाद साहेबांचं घर ना? हे कुरिअर आहे.” असं म्हणत बॉक्स देऊन निघून गेला.तीने कुरिअर उघडून पाहिले तर त्यावर कॉंग्रेट्स फ्रॉम मैथिली प्रधान असे लिहिले होते. “निनाद,हे तुझ कुरिअर, मैथिली प्रधान यांनी पाठवलय. कोण ही मैथिली? बघ तरी काय पाठवलय ते?”
तो हसला, तस ती समजून गेली,” हं म्हणजे तुझा MBA रिझल्ट लागला आणि आम्हाला तू बोलला देखील नाहीस!”
“आई खरच तस काही नाही आहे? ही मैथिली चक्रम डोक्याची आहे.” “बर! खरं काय ते कळू दे तरी,पप्पा म्हणत होते की निनाद आणि त्याची मैत्रीण पुढच्या शिक्षणासाठी बाहेर जायच म्हणतं होते खरं का रे?” “अग मला पूढील शिक्षणासाठी बाहेर जाव लागणार ते तर मी कधीचच म्हणालो नव्हतो का? पण तू समजते तसं मैत्रीणी बरोबर नाही.” “पण तुझे पप्पा तर म्हणत होते,म्हणून तर ते घर विकायची घाई करत होते, म्हणाले त्याच्या शिक्षणात पैशांचा अडथळा नको.” “आई,खरच तस काही नाही, हे खर आहे की मी MBA परीक्षा त्यासाठीच देत होतो,आई मी परीक्षेत दुसऱ्या रँक ने पास झालो. मी पप्पा आल्यावर तुम्हाला हे सिक्रेट सांगणार होतो.पण मैथिली ने कुरिअर पाठवून सगळं पाणी फिरवलं.” हे बघ पेढे. त्यांनी आपल्या सॅक मधून पेढे काढले. “बरं बरं,आता ही मैथिली कोण ते ही सांग. का आईला सांगायच नाही आहे?” “अग ती माझी क्लासमेट, तिच्या मदतीमुळे मला चांगले मार्क मिळाले.” एकदम साधी आहे.” “बरं बरं,आधी ते पेढे देवाकडे ठेव आणि तुझ्या मैत्रीणीला कुरिअर मिळाल्याच सांग हो,ती बिचारी वाट पहात असेल.” मनोरमा गोड हसली. संध्याकाळी माधवराव यांना बातमी समजली तेव्हा त्यांनी मुलाला जवळ बोलवून मिठी मारली, “अभिनंदन! अशीच प्रगती कर, पण बेटा तुझी मैत्रीण थोडी विचीत्र आहे,जपून रहा.” “पप्पा व्हेरी सॉरी,पण शेफाली माझी क्लासमेट होती आणि तीच माझं त्याच दिवशी वाजलं, माझा तिचा काही संबंध नाही. पप्पा हा पेढा,मला आता Scholarship मिळेल,तुम्हाला हे घर हे शहर सोडून जायची गरज नाही.” “तुझी आई म्हणत होती, तुझ्या क्लासमेटनी तुझ अभिनंदन केलय आणि स्विट पाठवली. कोण आहे ही मैथिली प्रधान?” “पप्पा ती माझी क्लासमेटच आहे पण तुम्ही जिचं संभाषण ऐकल ती नाही, मैथिली सुस्वभावी आणि शांत मुलगी आहे. आमच्या कॉलेजमध्ये First आली,तिच्या मदतीमुळे मला फायदा झाला. पण आमची मैत्री वगेरे काही नाही हां ,उगाच गैरसमज नकौ.” “मनोरमे! आज काही तरी गोडधोड कर आणि त्याला उतारा म्हणून काहीतरी चमचमीत हवं, आपला मुलगा MBA झालाय आणि आता परदेशात जाणार यापेक्षा आनंदाची गोष्ट कोणती. बरं त्या मैत्रीणीला एकदा बोलव घर पहायला.” निनाद लाजला, तस नंदिनी हसत म्हणाली, “पप्पा तीला माझी वैनी करून घेताय का? म्हणजे मला घरातच फ्रेंड मिळेल.” निनाद तिला मारायला धावला तस ती आईच्या मागे लपली. गोष्ट घडायची असली की मुहूर्त लागत नाही, पुढच्या दोन महिन्यात निनाद कुलकर्णी आणि मैथिली लग्न करूनच परदेशी उच्च शिक्षणासाठी निघाले तेव्हा दोन्ही फॅमिली त्यांना निरोप द्यायला जातीने हजर होत्या.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar