हिशेब त्याचा मांडू नये
प्रेम केले कुणावर तरी, हिशेब त्याचा मांडू नये
फुटकळ कारण शोधून कुणाशी, उगाच भांडण करू नये
हरे शामा, हरे कृष्णा, चित्त हारण मोहना ——-(धृ)
प्रेम करता ह्रदयही द्यावे, मागेपुढे उगा पाहू नये
प्रेम करता उगा कुणावर अटींचा बोजा लादू नये (धृ)
प्रेम केले, भेट टाळण्यास सबब खोटी सांगू नये
प्रेमात गुन्हे हजार माफ, विनवणीची अपेक्षा करु नये (धृ)
प्रेमाचा दिवा अंतरी असुद्या, बाहेर शोधा जाऊ नये
माझेच प्रेम मोठे आहे, खोटा दावा कधी करु नये (धृ)
प्रेमाचे उत्तर प्रेमाने द्यावे,धनाची लालसा धरु नये
रूसवा धरून, संधी साधत, खिसा खाली करु नये (धृ)
प्रेमात हवा विश्वास मैत्रीवर, संशय मनी बाळगू नये
नम्र परी सावध असावे, फसव्या थापांना फसू नये (धृ)
लटके वागणे, लचकत चालणे, तिरक्या नजरे पाहू नये
शरीराची शोभा न करावी, दिखाव्याला कोणी भुलू नये (धृ)
वरवरच्या सौंदर्याला भुलून, जीव कुणावर लाऊ नये
साधेपणा अन सरळ स्वभाव, हलके त्याला समजू नये (धृ)
मनात कपट न धोरणी कावा, भाव अशाला देऊ नये
सौंदर्य असे चार दिसांचे मृगजळामागे उगा धावू नये (धृ)
स्वभाव अन गुण पहावे, खोट्याची संगत धरु नये
जुळले न मनाचे धागे तरी कुणा जीवनी विष कालवू नये (धृ)
I was very pleased to uncover this great site. I need to to thank you for ones time for this fantastic read!! I definitely appreciated every bit of it and I have you bookmarked to look at new information on your blog.