एक ‘पण’ आजचा
काढू नये उणेदुणे, मागू नये हिशेब कालचा, इतकाच एक ‘पण’ आजचा
विसरून जायला शिकू, माफ मनापासून करु, करू हळूहळू अंत क्रोधाचा
प्रेम मागुन मिळत नाही हेका धरू नये तुमच्या मनाप्रमाणे सतत वागण्याचा
जीवनात संकटे आणि आव्हाने असणारच म्हणून हवा साधेपणा जगण्याचा
नवनवीन शिकत जावे, उपयोगी पडणारे ज्ञान घ्यावे ध्यास हवा शिकण्याचा
जो चांगली जिवनशैली जगतो त्याचे आरोग्य चांगले कंटाळा नको उठण्याचा
मनाला आनंद देणारा छंद जपा, वाचा, गुणगुणा संगीत, करा सराव पोहण्याचा
कुठलीच कला वाया जात नाही, फक्त संकल्प हवा ती गोष्ट सिध्दिस नेण्याचा
तुम्हाला जमणार नाही असे काहीच नाही भरोसा ठेवा स्वतःच्या ताकदीचा
नेहमीच बुध्दी किंवा ताकद सफल होत नाही, वापर करा नेमक्या युक्तीचा
शाश्वत असे जगात काहीच नाही, आज जे नाही ते उद्याचे नवे वैभव होई
वाळूतून पडे बाहेर काळे सोने, प्रयोगांती आविष्कार घडे नित्य कल्पनेचा
ठरवून चुका कुणी न करे, होते अवधानाने चूक, सराव करू अपशब्द टाळायचा
अपमान केला जाणूनबुजून तरी आवरु मोह लगेचच कडाडून भांडाण्याचा
माझेच खरे नका म्हणू, अशिक्षितही दाखविल रस्ता आदर राखा सूचनेचा
पद, सत्तेने नको उन्माद, नको उपमर्द, साहसाने भोपळा फुटेल भ्रमाचा
अंतरिक्ष भरारीतही हवे भान, विसर पडू देऊ नये माणुसकीच्या नात्याचा
अफाट वेगाने घडे अपघात वा घातपात प्रगतीला हवा लगाम विवेकाचा