Dare to do it

Dare to do it

नीला रेप्युटेड कंपनीत outsourcing एजन्सी मार्फत गेले चार वर्षे कामाला होती. या चार वर्षात तिने स्वतःच्या कामाचे रेप्युटशन निर्माण केले होते. कोणी सोडून गेले की बॉस ती अधिकची जबाबदारी तिच्यावर सोपवत असे, बॉस पुढील काळात आपल्याला कंपनी स्टाफमध्ये घेतील या आशेवर ती चणे खावे लोखंडाचे म्हणत जबाबदारी पार पाडत होती. “Neela is doing well, I am going to give her opportunity in our international team.” असं तो अनेकदा आपल्या सहकाऱ्यांसमोर म्हणाला. तोंडदेखलं कौतुक करून तो विसरून जात असे. ती मात्र, कधीतरी आपला बॉस आपल्याला स्टाफमध्ये घेईल याच आशेवर झोकून देऊन काम करत होती.

स्वतःचे काम करून, अधिकच्या कामाची जबाबदारी पेलूनही तिच्या वेतनात वार्षिक 7 टक्के ही भर पडत नव्हती,कंपनीत तेच काम करणाऱ्या इतर स्टाफच पॅकेज तिच्यापेक्षा खूप जास्त होत. ती तेच काम त्यांच्या सोबत करत असूनही तिला म्हणावा तसा लाभ दिला जात नव्हता. मुख्य म्हणजे तिला कंपनीच्या नियमित स्टाफमध्ये घेतल्या शिवाय कंपनी नियमित स्टाफला देत असलेले पीएफ, इन्शुरन्स, बोनस इत्यादी बेनिफिट मिळणार नव्हते. म्हणूनच चार, साडेचार वर्ष वाट पहिल्यानंतर ती निराश झाली याच काळात काही ठिकाणी ती फायनल इंटरव्ह्यू पर्यंत पोचली पण या कंपनीत ती काँट्रॅक्ट पे रोलवर आहे ऐकून ड्रॉप झाली. त्यामुळे दीर्घकाळ काँट्रॅक्ट मध्ये काम करत राहिली तर तिचा ग्रोथ होणार नाही हे लक्षात आल्याने ती जास्त कॉशस झाली होती. तिच्या बरोबर काम करणाऱ्या दोन मुलींपैकी एक यूएस ला गेली होती तर दुसऱ्या मुलीलाही जॉब मिळाल्यामुळे सोडून गेली होती. ते बर्डन तीच सांभाळत होती. अखेर लवकरात लवकर दुसरीकडे प्रयत्न करून तिने कंपनी सोडायची ठरवली.

या कंपनीत जॉईन होण्यापूर्वी ज्या दोन कंपनिमध्ये तिने जॉब केला होता तिथेही तिने काम करतांना कधीच Compromise केल नव्हते. एकदा Job स्विकारला की dedication द्यायचं हा तिचा स्वभाव होता. प्रमोशनच्या बाबतीत या पूर्वीच्या कंपनीत तिला तसाच अनुभव आला होता. आपण इतरांच्यापेक्षा जास्त आऊटपूट देऊनही बॉस ignore करतो म्हणून तीने मौन धारण करूनही पाहिले होते. बॉसनेच सांगितलेल्या कामात त्यानेच क्रम बदलल्यामुळे झालेल्या गोंधळाबाबत तीला ब्लेम करण्याचा प्रयत्न करताच ती बॉसशी स्पष्ट बोलली होती. अर्थात कोणत्याही मोठ्या माणसाची चूक दाखवलेली त्याला आवडेलच असे नाही, पण मनाला नाही पटल तर खपवून घ्यायचं नाही असा तिचा स्वभाव होता. आपली चूक नसेल तर ती ठामपणे विरोध करत होती.

तिच्या लक्षात आले होते