आम्ही बापुडे

आम्ही बापुडे

गाणे आपण रोजच ऐकतो, एखाद्यास लहर, मुक्त गाण्याची
त्यांनाच मिळे खरा आनंद, ज्यांना सवयच असे रोज पिण्याची
विनोदाला दाद द्यावी, आनंदाची चादर घ्यावी, रीत उपभोग घेण्याची
नशा म्हणजे? बावळट पश्न, लहर हवी मनसोक्त रमण्याची
काही खेळती तिन पत्ते, कोणी रमी, काही ना सवय फिरण्याची

घरात निमूट रोज गिळतो चव कशी कळावी त्याला टपरीची?
चवीनं खाणार, पेशगी देणार, त्याला वाट गवसणार, तिच्या माडीची
घरात ज्याच्या अठरा विश्व दारिद्र्य त्याला नेहमीच गरज पैशांची
ज्याच्या वाट्यास नेहमीच उपेक्षा, सोबत हवी एका मित्राची
सडीफटींगला कसल भय अन भिती? चिंताच नसे जगण्याची

अनभिज्ञ, तो कुठे जन्मला? त्याला कसले कौतुक, जात धर्माची
जीवनात भरकटला आहे, त्याला कशी व्हावी जाणीव कर्माची?
रोजच पोटासाठी ज्याची वणवण, त्यास भिती का वाटावी प्राणाची?
कर्माच्या पश्चतापात हजारदा जळतो, त्याला न चिंता वाटे सरणाची
अक्षर ओळखच मुळीच नाही, त्यास कशी गोडी लावावी वाचनाची?

थोडेच शहाणे वापरती ट्रिक, स्वतः कलंदर बनून छान जगण्याचं या बोटावरची थुंकी त्या बोटावर, सराईतपणे, खोटे रेटून बोलण्याची
खिशात नसेना दमडी तरी, मिजासीत, मोठ्या हॉटेलात शिरण्याची
तिथेच सावज नेमक गाठून, लढवून शक्कल, बिल परस्पर भरण्याची

आपण असतो असे बापुडे,घरंदाज सवय आपल्याला भिण्याची
तिकीट रेल्वेत चाचपून पाहतो, तारीख पाहतो, भिती वाटे लज्जेची
सवय आम्हाला जुनीच आहे,न चुकले तरी विनवणी करण्याची
छोट्याशा दुःखाने पिचून जातो, खचून जातो, आदत सदैव रडण्याची

आनंदानेही थकून जातो, ताकद न इतके सूख अचानक पेलण्याची
खिशात असल्या हिरव्या नोट्या तरी भिती वाटे ते खर्च होण्याची
कोणी म्हणाले घे थंडा, तरी डोकावे संशय, आदत फक्त पाण्याची
शंकेनेच आम्ही कडमडतो, पाल सरसरली तरी, मनी आशंका सापाची

आम्ही बापुडे, काळीज धडधडे, पाहता इशारत कुणा सुंदर ललनेची
सुख घ्यायचे अशा अवेळी हे न कळे, आम्हा चिंता कुणी पाहण्याची
येऊन लाडात, घेतला हाती हात, कंप ह्दयात, वाट पाहतो जाण्याची
मनात मांडे, सुखाचे वांदे, करून कल्पना वेळ दवडतो आयुष्याची

आज मस्त जगून घ्यावे न रुचते, सदाच चिंता वाटे उद्याची
दुःख उगाळून रडत बसणे, जुनीच खोड ओझे वागवत फिरण्याची
कुढत कुढत का जगावे? का भ्यावे, पत्रास नसावी कधी मरणाची
नशिबी तितकेच उरणार आहे फिकीर करू नये आहे ते सरण्याची

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *