कसली मैत्री? कसले प्रेम?

कसली मैत्री? कसले प्रेम?

प्रेमाखातर मजनू अहोरात्र झुरत होते, जीव देऊन प्रेम अमर करत होते
आता घेऊ लागलेत निष्षापाचा जीव, त्यासाठी वेळ काळ पाहत नव्हते
मुलांनी केलेली दुष्कर्म, त्यात न कोणाचेच हित, प्रायश्चित्त उगा भोगत होते

एकाशी प्रेम, दुसऱ्याशी बहाणा, का स्विकारावा मोल्यवान नजराणा?
एकाशी मैत्री, दुसऱ्याला ठेवण्या गाफील, रोजच नवनवा बहाणा
दुष्कृत्य करतांना आठवली नाही आई, कसले प्रेम? हा तर कसाई बाणा

कळे ना तरूणाईला हा कोणता आजार? जीवघेणा, आचरट मनोव्यापार
आपले घराणे गर्भश्रीमंत, नामांकित, काहीही करू, हा बरा नव्हे अहंकार
कुटुंबाशी खोटेपणा, प्रेम केले जीवापाड, त्याच्याच छळ,हिंस्र व्यभिचार

शिक्षणाने येते का संस्कृती? सांस्कृतिक माहेराला हा कोणता विकार?
पाश्चिमात्य संस्कृतीचा संकर, अर्धनग्न वावर, इथे साराच हिडीस प्रकार
पालकांचा काही दोष नसताना सारे जगच करू लागे कुटुंबाचा उध्दार

मुलांना शिक्षणासह द्या संस्कार, अवखळ मनाला हवा प्रेमळ आधार
चहुकडे फोफावली विषवेली, टाका वेळीच उपटून, टाळा नैराश्य अंधार
मुले ही फुले भ्रमात नका राहू, अयोग्य मैत्रीचा टाळा संसंर्ग, करा उपचार

इंस्टा मैत्री, चॅटिंग दोस्ती काय कामाची? योग्य पारखून मगच द्यावा होकार
पालकांनो, श्रीमंती, ऐश्वर्य यावर ठरवू नका लग्न, याने टिकत नाही संसार
संस्कार आणि आचरण यांचा योग्य मिलाफ, तेच देतील जीवनाला आकार

कुणाचा का जीव घ्यावा उगाच? कोणी दिला तुम्हाला हा अभद्र अधिकार
मित्रांनो टाकू नका बुध्दी गहाण, वैचारिक मतभेद असल्यास द्या स्पष्ट नकार
आवरा कौंटुबिक प्रतिष्ठेचा, परंपरेचा मोह, ओढून ताणून प्रेमाचा नको करार

लग्न दोन कुटुबांचे मनोमिलन, दागिने, हुंडा नको कोणताही छूपा व्यवहार
प्रेमाचे सुत्र म्हणजे विचारांचे मंगल धागे, अविचाराला नको थारा, अन तक्रार
योग्य वयातच लग्न, समजू दे, प्रेमातही पार पाडावी कर्तव्य, तोच खरा संसार

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *