अपेक्षांचे ओझे

अपेक्षांचे ओझे

हाती काही नव्हते तेव्हा, माझ्याकडे कोणाची नव्हती अपेक्षा
जो जो संचय वाढत गेला, बदलत गेली निती, वाढे अभिलाषा

मनी होते समाधान, वैभवात भर पडत होती, नाती सुखावत होती
हळूहळू समजले, या लक्ष्मीकारणे माझी मनःशांती दुरावत होती
मन हळवे झाले पाहून स्वार्थ, काहीच उपाय उरला नव्हता हाती

सांगुन दुःख हलके होईल, या समजुतीने उगाच बोलत गेलो
तेच तेच प्रसंग मनी उगाच आठवून, मनाचे बंध उसवत गेलो
रडून दुःख हलके होईल, या समजुतीने डोळे गाळत गेलो
कुणाच्या मनी कणव निर्माण होईल, असे उगाचच वागत गेलो
सतत तेच तेच रडगाणे गाऊन लोकांच्या नजरेतुन उतरत गेलो

अपेक्षांचे मोहोळ दिसामासाने वाढते, माहीत होते मला सत्य
किती असावी गरज? हव्यास म्हणून मी साधने जमवत गेलो
दुसऱ्यांना तुच्छ लेखत माझ्याच गुर्मीत, मी ताठ्यात जगत गेलो
आयुष्यात काय जमावायचे ते नकळून, उगाच संसार फुलवत गेलो
बंगला, गाड्या, रोकड, शेअर असे समृद्धीचे, हत्ती दारी झुलवत गेलो

मध तिथं माश्या, हा किस्सा मला कुणी सांगण्याची नव्हती गरज
आयुष्यात पाहिले होते दुःखही, बरेवाईटाची होती मना समज
पण अहंकार जोजावत मी रुतत होतो गाळात, याचे सुटले भान
गरजा पूर्ण करणारे मी यंत्र, म्हणून कोणीच धरत नव्हते माझा कान
माझ्याच अपेक्षांच्या थडग्याखाली मी निवांत, मलाच मी शोधत होतो

मला काहीच नको म्हणतांना, मी संसारात पूर्ण गुंतत गेलो
जो जो ईश्वर देत होता, मी नवीन काही त्याला मागत गेलो
हव्यासच मनी इतका होता, की मनशांती मी हरवत गेलो
भाकरी करपू नये म्हणून, हात पोळले तरी पून्हा परतत गेलो
भोग भोगायचेच आहेत माहित असून, व्यथा नव्याने मांडत गेलो

काहीच नको, काहीच नको म्हणतांना मोठेपणा, मान मिळवत गेलो
साहेब कसे आहात आपण? ऐकून उगाचच सुखावत गेलो
प्रसिद्धी अन हव्यासापोटी निर्बंधपणे उगाचच वाहवत गेलो
जेव्हा जाग आली आणि कळले हा तर आहे सुखाचा फक्त भास
आता सारे काही आसे पण समाधान त्याचा आणता येत नाही आभास

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

5 thoughts on “अपेक्षांचे ओझे

 1. real email generator

  I have no idea how I got here, but I thought this post used to be fantastic.

 2. alpilean amazon

  Ive read several just right stuff here Certainly price bookmarking for revisiting I wonder how a lot effort you place to create this kind of great informative website

 3. Puravive weight loss reviews

  Hello i think that i saw you visited my weblog so i came to Return the favore Im trying to find things to improve my web siteI suppose its ok to use some of your ideas

 4. Puravive official

  Wonderful beat I wish to apprentice while you amend your web site how could i subscribe for a blog web site The account aided me a acceptable deal I had been a little bit acquainted of this your broadcast provided bright clear idea

 5. tempmal

  What i dont understood is in reality how youre now not really a lot more smartlyfavored than you might be now Youre very intelligent You understand therefore significantly in terms of this topic produced me personally believe it from a lot of numerous angles Its like women and men are not interested except it is one thing to accomplish with Woman gaga Your own stuffs outstanding Always care for it up

Comments are closed.