गणपती माका पावलो
रे आठ दिसार इले गणपती, झोपून काय रवतस आये आरडता
मेल्या उठ चाय खा आणि वाडवण घेऊन लख्ख अंगण झाडता
खरा तर ‘ह्या’ बायकोक असता, ती ऐकणा नाय म्हणान माका नडता
गावाक पोरग्या मिळत नव्हता ह्या मुंबयचा सारख्या इंग्रजी झाडता
आता माका सवय झाली हा, पण कामावरसून येऊन थकाकव होता
ता दिसभर मोबाईलवर असता, म्हणान आवशीचो इलाज नसता
आऊस आमची खतरूड पण तिची सगळी थेरा गुमान खपवून घेता
इलाजच हरलो गावाक पोरग्या मिळत नव्हता,आता भोगूचा लागता
सुन लाडकी, तिची भाची, कामधाम सांगल्यावर तिचो बापूसच काडता
ती श्रीमंता घरची, कमरेवरसुन कळशी नाय येवची, मग आऊसच हाडता
तिच्या बापाशीन हुंडो दिलीहा, वाशींग मशीन, लाईट असली त चलता
मायक्रोव्हेव ओव्हन, गिझर, फ्रीज, लाईट बिल भरतांना बापूस कुथता
तिका चुलीवर जमणा नाय, आमका मोदींचो गॅस पंधरा दिसच येता
तिका चपातीची सवय आमका व्हयी भाकरी, तिका खय ह्या जमता
घराकडे आमच्या चार म्हशी, हिका एकव घेणा नाय जवळ, लात मारता
बाईल बिलंदर, म्हणता, आई तुम्हाला बरं जमत, तुम्ही दूध छान काढता
आमच्या बापाशीक चलणा नाय कुकरचो भात त्यांचा म्हणे पोट फुगता
सुनेसमोर बोलणत नाय, उगीच कलागत नको, पाठसून गाळी घालता
माझ्या पगाराचो मेसेज इलो की माझ्या बायकोक ता बरोबर कळता
कायऐक दडान रवण्यातला न्हय, धूर नसलो तरी आग जोरात जळता
म्हणान शक्कल लढवलय, रोज मध्यरात्री माझ्या मुखी गणपती बोलता
मध्यरात्री तो अंगातव येता, संस्कृत मधून बोलताना तिच्या लात घालता
हो उपाय इलो कामी, काल सकाळ पासून ती आवशीशी नीट बोलता
सकाळी उठून चुल पेटवता, जेवण, भांडी, केर वारो करूकव लागता
मी कामावरून दमान इलय ह्या आता तिका कळता चाय पाणी देता
मामा तुमच्यासाठी चुलीवरचा भात, तुमचे पाय चेपून देऊ का? इपरीत घडता
आई तुमच वय झालय, तुम्ही नका आणू पाणी, म्हणत दूडीन आणता
कोणी तरी तिका बोललो जपून रव अधुनमधून घोवाच्या अंगात येता
उशिराच का होयना, पण तिका समजवण्याचो एकनंबरी उपाय गावलो
चतुर्थी येवची होती, त्याआधी अंगात येऊन गणपती माका पावलो
छान कविता,समर्पक शिर्षक