यशाचा मार्ग
स्वतःचेच चांगले मित्र बना, मित्र बनण्याचा नको आभास
मैत्री कशी असावी? याचा खरंच असावा का अभ्यास?
आधी करावी दुर्गुणांवर मात, झटकून आळस लागावे कामास
तुमची सोबत, करे तुमचेच काम, कधीही दोष देऊ नये दैवास
समान आवड वा विचार असतील तर मैत्र जुळते हमखास
कधीकधी वैचारिक समानता नसली तरी मैत्रीचा घडे ध्यास
कुबेर म्हणून जन्म घेणे हाती नसले तरी धरावी कष्टाची कास
सुखी आणि ऐदी जीवनानेच होतो ,स्वतःच्या कर्तृत्वाचा विनाश
आळस अन सुखासीन जीवन करते तुमच्यातील मर्दुमकी नाश
अहंकाराला कुणी खतपाणी घालता हुरळू नये विचार करावा खास
कोण काय देईल? अपेक्षेपेक्षा संकल्प सिध्दीचा हवा विश्वास
अंर्तमनाचा शोध घेत संपवावे मनीचे दास्य, धुंडाळावे नवे आकाश
इच्छाशक्तीची बूज त्याला दिसती मार्ग, त्याला लाभे योग्य सहवास
नव गरजेतूनच जन्म घेई उद्योग, एक सफलता जागवे अंतरी विश्वास
कोण काय देईल? याची नको हाव, मैत्रीमध्ये नको स्वार्थ, मोह, आस
स्वःकर्तृत्त्वावर हवा भरवसा, कोण मदतीस येईल? बांधू नका कयास
स्वतः घडवावे स्वतःचे भविष्य, फुकटाच्या संपत्तीचा नको हव्यास
मिळवावे मार्गदर्शन, वाढवावा संपर्क, होऊ नये कदापि कुणाचा दास
तुमच्या कष्टाची फळे गोडच असतील तोवर टीकवा श्रध्देने दमसास
आपल्या कामावर निष्ठा, पुर्ततेचा संकल्प, त्यास सापडे रस्ता हमखास