आणि वादळ माणसाळले भाग २

आणि वादळ माणसाळले भाग २

हे नसताना शरयू येय. तिच्या घरची परिस्थिती चांगली होती तरी पण मी ते जा काय आणीत तेतूरला तिका ठेवी. ती या घरची मालकच होती. ती सुद्धा भाच्यांका खावक घेऊन येय, इल्यावर लाड करी, मुलांका जवळ घेय, कधी राणीची वेणी घाली. मुला चहाडखोर, आत्या येऊन गेल्याचा बापाशीक सांगत, ते ‘हूं’ म्हणान सोडून देयत. त्यांचा शरयूवर प्रेम, पण जगाक कळता नये अशा बेतान वागत..

एक दिवस हे म्हणाले, शरयूक जास्त जवळ करू नको, उद्या हिस्सो मागूक तयार होईत. माका आश्चर्य वाटला, सख्खो भावच असो म्हणूक लागलो तर लोका म्हणतलीच. तरी मी तिची बाजू घेयत म्हटलय, “तुमच्या पाठीवरची सख्खी बहीण ना ती! तुमी असा बोलताच नये. तिचो अधिकार आसाच की.” ते म्हणाले, “असल्या व्यवहारात तू लक्ष देव नको. उद्या तिचो घोव आपल्या मानेवर बसून वाटो घेईत.” त्यानंतर मी कधीच तिचो विषय काडूक नाय . शरयू दिवसाआड येय पण चुकूनही या विषयी अवाक्षर उच्चारूक नाय. ती इली तरी तास भर मुलांवांगडा रवा, गजाली मारी त्यांचो शाळेचो अभ्यास घेय आणि जाय. त्याणा कधीच वयनी माका ह्या दी अशी मागणी करुक नाय की कोणत्या वस्तूक कदी हातव लावक नाय. मी मनातच म्हणय, “आमच्या ह्यांचा डोक्या खराब हा. इतक्या गुणी बहिणीचा ह्यांका कायव पडला नाय.”

बघता बघता मुला मोठी झाली आणि त्यांका कॉलेजसाठी मालवणाक धाडूची लागली, खर्च वाढलो, एसटी चो पास, कधी जर्नल व्हया म्हणत तर कधी वर्कबूक त कधी गाईड. कधीतरी कुल्फी, पेप्सी. सर्व मुला खाईत, आमच्यांनी काय तोंडावर बघूचा! म्हणान दोन चार दिवसान मीच त्यांका, ह्यांच्या अपरोक्ष पैसे देय. मुलाच ती, त्यांकापण काय तरी खावया वाटणा स्वाभाविकच मां? दर दोन दिवसान मुलांका पैसै व्हये जाईत आणि ह्यांच्या डोक्यात तिडीक येय. पगार कसो पुरतलो असो प्रश्न पडत रवा. गावतल्या भागेल्याची दुकाना पाहून म्हणत, कायतरी करूक व्हया तर चार पैसे गावतीत. दुकान काढून चलवणा म्हणजे सोप्या काम न्हय, दिवसभर अडकूक जातला. कोणीतरी मित्रान पर्यटकांसाठी खोलये काढण्याची आयडिया ह्यांका दिली. एकदाच काय ती गुंतवणूक,मगे पैसेच पैसे.affiliate link

एक दिवस माका म्हणाले, “मुला आता मोठी होतत तसो त्यांचो शिक्षणाचो खर्च वाढतलो, ह्या पगारात भागण्यासारख्या नाय, आपण पर्यटक येतत त्यांका रवण्यासाठी भाड्याक देवक दोन चार रूम बांधले त सांगड बसात. तुका काय वाटता?” मी विचारलय, “आणि ते बांधूक पैसे खयसून आणूया? खोलये बांधले की त्येंची साफसफाय इली ती कोणी करूची? त्यांनी काय झंगाट केल्यानी तर कोण निस्तरतला?”

“लावलस नाट ? गो महिन्यात पाच सा दिवस खोलये भाड्यान गेले तरी दहा वीस हजार गावतीत, आता साफसफाय इलीच, ती आपणाक करुकच व्हयी, रिक्यामकी बसून पैसै कोण देईत? भाई ठाकूरांच्यानी आठ रूम काढलेहत, रूमाव गाबताची बायल साफसफाई करुक येता. गेस्ट इले की गावड्याक रांदाप करुक बोलवतत, गेल्या आठ महिन्यात फोर व्हीलर घेतल्यानी, काय चेष्टा हा! जम बसलो त रिटायरमेंट नंतर अजून दोन चार खोलये काढूक येतीत, बघीत रवलव तर आमी नाय तर आणखी कोणी तरी सुरू करतलो धंदो. आमच्या बागेत कितीशी मोकळी जागा आसा, तिचो काय उपयोग?

हे म्हणत होते ता खराच होता, आम्ही नाय तर अजून कुणीतरी गेस्ट रुम काढणारच होता, तरी पण त्यासाठी पाच सहा लाख रुपये खर्च होतोच आणि एवढा कर्ज कोण देतला? हो प्रश्न होतोच, आमचा घर समुद्र भरती रेषेच्या जवळ येईत असल्याने आमच्या ह्या जुन्या रहात्या घराचोच प्रश्न होतो. नवीन रूम बांधूक परवानगी मिळतली कशी? हो प्रश्न होतोच. मी काय विचारूक गेलय तर हे तापातापी करीत, तरीही ह्यांची तळमळ सुरूच होती म्हणान विचारलय, “समजा खोलये काढूचे ठरवले तर पाच सहा लाख लागतले त्याचा काय?कोण देतला पैसै? रूम बांधूक ग्रामपंचायतीची परवानगी नको!”

“तुका प्रश्न जास्त पडतत, प्राविडंट फंडातसून विनापरतावा कर्ज घेतंलय. खोलये बांधूया, ग्रामपंचायत, पंच काय करतीत? पाडून तर टाकूचे नाय मां? काय करतीत तो दंड भरलो मगे,तसा मी खवणेकराच्या कानावर घातलय, म्हणालो बिंदास करा, काय हजारभर दंड करतीत तो भरून मोकळे व्हा.”

त्यांचो विचार पक्को होतो, माझी संमती ह्या नाटकच होता, म्हणान मी सांगलय, “तुमचो निर्णय झालेलोच आसा त माका उगाच कित्याक विचारतास? येणाऱ्या भाडेकरूंनी दारू खाऊन भांडणा केली तर ती सोडवूचा घोपाण माझ्यात नाय तुमका साफ सांगतय, त्यांनी केलेली घाण साफ करुची सोय करा, मी जावचय नाय. तुमचो पैसो तुमका लखलाभ, आज पर्यंत काय मागूक नाय आणि पुढे मागूचय नाय. तुमची इच्छा, काय व्हया ता करा.”affiliate link

आठवड्याभरात काम सुरू झाला, ह्यानी पंधरा दिवसाची सुट्टी टाकल्यानी, नवीन बांधकाम काय चेष्टेचो विषय? धोंडे, रेती, सिमेंट, लोखंड, चिरे, कडप्पे, मारबल, किती मटेरियल इला? आणि किती येवचा हा? त्यांकाच म्हायत, धावपळ करुक आसा कोण? मजुरांका दोन पावटी चाय पाणी देयसर टाके ढीले होयत. दोन खोलये वर आणि दोन खाली. काँक्रीट आर.सी.सी. बांधकाम त्याका दोन पावटी शिपूचा लागा. एकदाचे खोलये तयार झाले. हे येणाऱ्या जाणाऱ्याक खोलये दाखवीत रवत, माका मेलो नुसतो चहाक काळ. खोलीत एक ठय इंग्लिश संडास आणि बाथरूम. पंधरा दिवसात मालवणच्या साळगावकरांनी काम पुरा केल्याने बाहेरून जिनो ठेवलो. कस्टमरची गरज म्हणून,सिंक, एक मोठो आरसो एक पलंग, एक लाकडी कपाट, एक ड्रेसिंग टेबल. असा रेडिमेड सामान कुडाळच्या कुलकरण्याकडून इला. चार रूम तयार झाले. वाटेवर बॅनर लागलो “सागर दर्शन” येथे भाड्याने रूम मिळतील. संपर्क — श्नी. ठाकूर. सगळा कसा झटपट झाला. सगळो पैशांचो खेळ.
खर्चाचो आकडो किती पोचलो तो एकदाव त्यांनी सांगूक नाय पण माझ्या अंदाजानं सहा लाख पाठी पडले ह्या नक्की. सोमण भटाक बोलवून गणपती पूजन करून घेतला. विठ्ठलाच्या मंदिराक रूपये पाचशे एक देणगी दिली. धंद्याक त्याचे आशीर्वाद व्हये त्याशिवाय आमी काय करतलव? घाडयाक बोलावून म्हापुरूसाक गाऱ्हाणा घालूक लावला.

बॅनर छापून हाडलो, अवाठात उद्घाटनाचो निरोप पोचतो केलो. लाडू चिवडो आणि थंडाची बाटली येणाऱ्या पाहूण्याक देवचो बेत केलो. गावाकडे रितच हा, तुमी आपल्या पैशांन कायेव केलास तरी जोपर्यंत गावाक च्या पाणी करणास नाय तवसर कुजबूज थांबाची नाय.
सरपंच व्हिक्टर इलो आणि रिबीन कापून उदघाटन करून गेलो. आजूबाजूच्या घरातल्यांका बोलवून उद्घाटनाचो पाहुणचार केलो. विठ्ठल कृपेने रूम सोमते गेले. पयले कस्टमर म्हणान त्यांका चहा पाणी दिलो. जाताना त्यांका भेटवस्तू देऊन निरोप घेतलो. त्यांका मित्रांका देवक “सागर दर्शन” चा व्हिजीटींग कार्ड दिला. महिन्याभराचा अँडव्हान्स बुकिंग रावल्यानं केल्यानं त्याका पाच टक्के कमिशन ठरला. येणारे व्हिजीटर रात्री, बेरात्री येईत पण व्यवसाय सुरू केल्यावर ह्या होतलाच. सकाळी ओरडून विचारीत, “ओ मालक गरम पाण्याची काय सोय?” शेवटी चार गिझर आणून बसवल्यानी तेव्हा सुटका झाली. कधी कधी लायटीवर फटकी पडा, म्हणान पाण्याचो गॅस वरचो बंब घेवचो इलो. खोलीत लाईट व्हयी,पंखो व्हयो म्हणान इन्व्हर्टर बसवून घेतलो. लगीनात नवरीचे सतराशे छप्पन नखरे, तसली तऱ्हा झाली. पण विठ्ठल कृपेने सगळा मार्गाक लागला.

घरात पैसो येवक लागलो तसे पै पावणे वाढले, मुलांची डिमांड वाढली म्हणूक लागली, “एसटीची वाट बघीत रवतव आणि वेळ फुकट जाता. घरी वेळेत इलव तर आप्पांका मदत होईत. स्कूटर घेतलव तर वेळ वाचात, हप्त्यावर गावता. आजकाल सगळे तसेच घेतत.” आमच्या पेक्षा पोरांकाच ज्ञान भारी, ह्यांनी कुडाळात चौकशी केली, दहा हजार रोख देऊन हयांनी स्कूटर आणल्यानी. बाकी छत्तीस हप्ते भरुचे. झिल म्हणालो, “सॅंडल घालून कॉलेजाक जावं?”, झिलान रिबॉक का कसले बूट मागल्यान, दोन दिवस रडून गोंधळ घातलो, झाला! बापूस पाघळलो, पैसे खुळखुळत होते, प्रॉव्हिडंट फंडातून कर्ज काढून ह्या उभारला, फंडाचे पैसे परत ठेवक नको? ते असे तसेच खर्च जावक लागले. कस्टमर वाढले. व्याप वाढलो,ताप वाढलो. रात्री लवकर झोपाक नको, सकाळी उशिरापर्यंत निजाक नको.

रावलो म्हणालो ठाकूर आणिक चार खोलये बांधा, बघा, लक्ष्मी आपण चलत येयत. रावल्याचा काय जाता, त्याच्या हाती कमिशन जाय होता. हे चळले, ह्यांनी रावल्याचा मनावर घेतल्यानी, मालवणाक फोन लावून विचारल्यानी, साळगावकर म्हणालो, “ठाकूर बांधूक गेलास तर खर्च वाढता, नवीन टेक्नीक इलाहा, ता वापरलास तर खोली चार दिवसात तयार होता, स्वस्त पडता आणि दिसाकव भारी हा. तुमका व्हयी असली तर मागवया, कोल्हापूर नायतर बेळगावाक दोन डिलर आसत. त्यांची माणसा येऊन फिटींग करून देतीत. आपणाक अंग मेहनत काय नाय, सिजन आसा तोवर फायदो घ्या.” चार लाख रूपये खर्च होतो, पण व्हयत्या तयार खोलीत, बाथरूम ते बेड सगळी फिटींग झयच्या थय होती. दगदग नव्हती. खयपण हलवूक सोप्पे होते.

प्रश्न होतो पैशांचो. हे माका म्हणाले, “बँकेत दोन अडीच लाख जमा आसत, तरी दीड लाख व्हये, कसा करूया?” मी काय सांगतलय. म्हणाले, “बँक लोन देणा नाय, पतपेढीचा व्याज भारी पडता, त्यापेक्षा कामावर राजनामो दिलो तर सर्विस गावात. नाही तरी नोकरी करून ह्या सांभाळणा माका जडच.” मी रागावलय, “हे धंदे सांगितले कोणी?” ह्यांका मी सांगीत व्हतय धंदो करणा आपला काम न्हय, कितीशी लवंगटा सांभाळूची लागतत,महिन्याक पंचवीस तीस हजार पगार नक्की येय होतो, तो काय वाईट होतो? उद्या नोकरी सोडली तर तो बुडतलो आणि धंद्यातून पैसे उभे रवतीत ह्याची हमी हां? पण ह्यांका सांगून काय फायदो? मी सांगलय, “डोक्या जाग्यावर ठेवन काय ता करा, कायम नोकरी सोडून ह्या करण्याची गरजच काय? मिळतत तितके पैसे पुरे झाले. “व्हया झाला अती, तोंडात इली माती” अशी गत नको.

त्यांका राग इलो, म्हणाले, “दैव देता आणि कर्म नेता अशी तुमची तऱ्हा, नोकरी फारतर अजून दोन तीन वर्षाची. ह्या धंद्यात जम बसलो त तुझ्या झिलाक नोकरीसाठी धाव घेवक नको मुंबयक. नायतरी बामणांका नोकरे रवलेत खय?” मी कायच बोलूक नाय, माका ठाऊक आसा, हो बापयो दोन तीन दिवस चूप रवान आपणाक व्हया ता करतलो, जूनी खोड जायत कशी? दोन चार दिवस बोलणा टाकल्यानी, “हो, नाय, व्हया, वाढ, नको.” यापेक्षा अधिक बोलाक नाय, शेवटी वैतागून मीच सांगलय, “तुमकां वाटात ता करा, नोकरी ठेवा नायतर सोडा, नोकरीव तुमची आणि धंदोव तुमचो.”affiliate link

पडत्या फळाची आज्ञा मानतत तशी गडबड केल्यानी, राजनामो खरडून इले, खोटा कारण देवन मेडिकल रजा घेवन इले. एका दिवसात जेसीबी आणून बेणावळ केल्यानी, दोन सफेद जाम आणि एक कवातो कुपळून दुसऱ्या जागेत उभो केलो, झाडा जगतीत याची काय हमी? धरता झाडपेड जेसीबीने कुपळताना डोळ्यात पाणी इला, मजूर माणूस हुकमाचे ताबेदार. बेळगावावरून आणलेले हे रेडीमेड रूम दोन दिवसात तयार झाले . दोन दिवसात दोन मोठे खोलये तयार केल्यानी, खोलये दिसाक भारी होते किती टिकतीत ता त्या ईश्र्वराक ठाऊक. तेतूरच काय ती सोय. त्याका एअर कंडिशन बसवूचो लागलो. कुलकरण्याकडला फर्निचर हाडल्यानी, प्लंबींग, गिझर किती खर्च झालो तो त्या म्हापुरुषाकच ठावक.

नवीन बॉक्स टाईप खोलये तयार झाले तसा त्यांचा मन शांत झाला. आपणच खोलयांची साफसफाय करीत. झिलान जाहिरात कंम्पुटरवरून youtube वर का खय टाकली, मुंबईत पावण्या रावण्यांका Whatsapp केलो. “हनीमून सुट” असा काय ता खोलयांका नाव दिल्यानी आणि तरुण जोडपी येवक लागली. कोणी नाश्ता मिळेल का? तर कोणी जेवण मिळेल का? नॉन व्हेज द्याल का? अस विचारूक लागले, हे म्हणूक लागले, संधी आसा, सोय करून व्हयी. कुठूनसो पोरगो पकडून आणलो तो हॉटेलात काम करीत होतो. त्याका शाकाहारी, मांसाहारी, चायनीज, असला जेवण करूक येईत होता, जेवन खावन आठ हजार ठरवल्यानी. कशाच्या जोरावर ह्या नवीन लफडा गळ्यात बांधून घेतल्यानी त्यांकाच ठाऊक? कस्टमर वाढले. लोक फोन करून विचारुक लागले. “या ,चुलीवरचे जेवण तयार आहे.” जाहिरात लावून मोकळे झाले. चुलीक काय घालूया,सापळ्यावर जेवण जाईत? ती भुरभुर पेटून जातत. देव दयेन हॉटेल बरा चलला होता. मुलांची शिक्षणा मार्गाक लागली होती,त्यांका बरी वाईट नोकरी गावली म्हणजे मी मोकळी होणार होतंय.

राणीचा बीए संपला,मी तिका सांगलय, “राणी!बाय गो, बिएड कर म्हणजे खयतरी शाळेत नोकरी गावात. शिक्षकी नोकरी बरी, दगदग नाय,सरकारी पगार ,व्हये तितके सुट्टे.” म्हणाली, “माका नाय मास्तरीण व्होवचा,मी Law करतलय,जीवनात चॅलेंज व्हया, एकदा LLB झालंय की एंट्रन्सशिप केलंय की मालवणात प्रॅक्टिस करीन.” बापूस म्हणालो, “आपल्या कुटुंबात कोणी वकील जावक नाय, तिची इच्छा आसा तर करीना.” मी विचारलंय, “रोज वेंगुर्ल्याक धाडतालास? थंय रवाची सोय करशात, पण व्हयत्या घोडीक एकटी ठेवची म्हणजे!” बापूस अगदीच भोळो, म्हणालो, “गो आपणाक नाय जमला, देव दयेन त्यांका शिकव ची ऐपत आसा त शिकांदेत.”

तिच्या पथ्यावर पडला, बापाचो सपोर्ट, आवशीक कोण भीक घालता? ता थंय वेंगुर्ल्याक जाता. आम्ही अडाणी, ह्या वासरात लंगडी गाय शाणी, कितीतरी मोठं मोठी पुस्तका घेऊन येय. रोज बापाशी कडून खर्चाक पैशे न्हेय,ना हिशोब ना तंत्र. समीर मालवणात कॉलेजमध्ये जाता, की नाय याची चौकशी कधी करुक नाय. विचारला तर म्हणीत, “तो काय चार वर्षाचो हां?” चुलत दिर थय भंडारी हायस्कूलात शिक्षक होते, त्यांनी समीराक सिगरेट ओढतांना बघितल्यानी आणि भावशीक येवन बोलले, “तु हय या धंद्यात बुडलेलो, झिल खय जाता? काय करता, बगशीत की नाय? मी त्याका सिगारेट ओढतांना बघितलंय, पोरगो फुकट जातलो लक्ष ठेव.

“यांनी मान डोलवल्यानी आणि भावस गेल्यावर माझ्यावर तापले, “तु त्याका लाडावन ठेवलंस, त्याका पैसे देता कोण? मी धंदो बघू का तुझ्या झिलावर नजर ठेवक जावं? “, मी काय येक बोलाक नाय,नोकरी आपणच सोडल्यानी आताशे खूप तापतत. ह्या धंद्यान जिवाची शांतता घालवली पण सांगतला कोण?

धंद्यापुढे झिल काय करता? चडू वेंगुर्ल्याच्या law college मध्ये जाता, ता उशिरा घरी का येता? या बद्दल विचारपूस करूक त्यांका वेळ नव्हतो. “धंदो केलो आणि संसार बुडालो” म्हणण्याची पाळी इली तरी डोळे बंद. या माणसाक मी बाई माणूस काय सांगतलय? जा व्होवचा ताच झाला, समीर वाईट मुलांच्या संगतीक लागलो. कधी कॉलेजाक जाय तर कधी गावातल्या टग्या पोरांबरोबर नको थंय फिरत रवा. कोणी म्हणत इंग्लिश दारू घेता, गुठखो, तंबाखूव खाता. बामण असून व्हयत्या किरीस्तावांसोबत नाय ते चाळे कशे सुचतत कळयना? बोलणाऱ्या माणसांची तोंडा कोण धरीत, आपलाच नाणा खोटा लोकांका बोलून काय उपयोग.

समीर दुपारी जेवक इलो, तसो बापूस आरडलो,”रे हय ये,आज सकाळी कॉलेजाक गेल्ल?” समीर तोंड पाडून उभो. “काय विचारलंय गेलेलं काय कॉलेजाक? एक नाय का दोन नाय तो आपलो ढिम्म, खांबावरी. बापूस वैतागलो, दिली चार कानशिलात. “रे तोंड धरला काय? खय होतस सकाळी घर सोडल्यापासून?” पुन्हा हात उगारल्यानी तसो बोललो. “विठ्ठलाच्या देवळात होतय,कॉलेजात नाय जावक,शिकवलेला कळणा नाय. प्रश्न विचारल्यानी आणि उत्तर नाय दिलंय तर मुला हसतत.” हे चिडले, “मुला हसतत तर, तुका नीट उत्तर देवक काय धाड भरली?” ह्यांनी माझ्याकडे बघीत विचारल्यानी, “हो कॉलेजातून इलो की पुस्तका वाचता की नाय? लिहीता की नाय? काय करता ता तरी सांग?” मी काय कपाळ उत्तर देतलंय, मी बोललय, “तुम्ही घराकडे असतांना तुमका जुमानणा नाय, तो माका काय धूप घालतलो !” माझ्या अंगावर इले, “गो, तू करतस काय घरात? जवाण आणि कपडे? उरललो वेळ गजालीक गेलो. ह्याची रोजची खबर घेवक तुका वेळ नाय ह्या माका सांगा नको. आजपासून जेवण खाण बंद कर,तुझ्या लाडान फुकट गेलोहा.”

माका संताप इलो,झिलाच्या दोन मुस्काटात दिलंय, तसो म्हणालो, “माका तुमचा घर नको, तुमचा फुकटचा खावक रवताच कोण ? हो जीव देतंय तुमच्या नावानं.” तो वाटेक लागलो. बापाशीन अडवूक नाय. मी त्याका बोललय,माझी शप्पथ आसा, पाठी फिर! गेलस तर पुन्हा घरात घेवचय नाय. “म्हणान “झिल झालो तोच मेलो.” तो काय न बोलता बाहेर पडलो, मी ह्यांच्याकडे बघलय, ते समीर जात होतो त्या वाटेकडे, तो दिसाचो नाय होईपर्यंत बघीत रवले.
त्या दिवशी सांज जायसर माका काय वाटला नाय पण आठ वाजूक इले तसो धीर खचलो, चार पावटी फोन केलो रिंग वाजून जाय पण उत्तर नाय, नको नको ते विचार येवक लागले मनात, हे कधीचेच बाजूच्या इस्वलकराक घेवन बघूक गेल्ले माकाच माहीत नाय. मी चडवाक फोन केलयं, तर ता म्हणाला आज मी मैत्रिणीकडे रवतलय,परीक्षेचो अभ्यास हा, न इलाज म्हणान भावाशीचो प्रताप सांगितलय तसा म्हणाला, “मी येतंय तासभरात.”,

“आता आठ वाजता रात्रीचा खय येतं, तू येव नको, काय होता ता बघूया. मी कळवतय तुका.”, मी मोबाईल ठेवलय तितक्यात हे इले, “म्हणाले गाव पालथो घातलो,ह्याची खय जाग नाय,खय गेलो ईश्वराक ठाऊक. उगाच जीवाक घोर. पोलिसात सांगूक गेलव तर लोका हसतीत.” मी रागावलंय, “ओ तो खय गेलो तो बघा, तुमचो जीव हय निवांत रवता कसो? कोण, कोण हसतीत ते हसतीत, उद्या तेच म्हणतीत पोरगो निघून गेलो तरी आवशी बापशीक काय वाटणा नाय.” तवसर स्कूटरचो आवाज इलो. राणी भावाशीक घेऊन इला, हे बघीत रवले, ता काय बोलाक नाय. मी जेवक वाढलंय, पण समीर जेवक येयना बहिणीक म्हणालो, “माका नको जेवक, त्यांकाच कायता पाँटभर जेवं दे, दुपारी मारल्यानी मग आता शोधूक कित्याक म्हणान गेले.”affiliate link

ह्यानी हाताक धरून आणल्यानी, वाढल्या ताटावर बसवल्यानी आणि म्हणाले, “आधी जेवक सुरवात कर, मगे कित्याक मारलय आणि कित्याक शोधी होतय ता सांगतंय. “राणी त्याका हळू आवाजात काय तरी म्हणाला तसो जेवक लागलो, त्याचा जेवन होईसर हे निवांत बसून रवले, मग म्हणाले, “तुझ्या आवशीन तुझो गोळो नव महिने वाढवलो, आजयेन मांडीवर घालून न्हाऊ माखू घातलो, माका लय खाज म्हणान आरामाची नोकरी सोडून तुमच्या साठी हो धंदो उभारलो. तुम्ही उद्या काय आवशी बापाशीक बघतालास ता दिसताच हा. आमचे हात पाय चलतत त ही स्थिती,जाग्यावर रवलव त काय! ‘ आमी कोणतोच नाद करुक नाय, तुका सिगरेट, गुठखो कशाक लागता? आणि काय काय व्यसना आसत त्या विठ्ठलाक माहिती.”

ह्यांचे डोळे भरून इले. लगीन होऊन घराक इलय तेवा आवस म्हणाली “त्याका पान सुपारी, आणिकव काय व्यसन असला तर ता बंद करणा तुझ्या हातात आसा, बायलेन प्रेमान जिंकूचा असता घोवाक, नवरो मुठीत ठेवचो तर प्रेम लावून वठणीवर आणूक व्हयो, रडान आणि शिवीगाळ करुन न्हय. पयल्या रात्रीच हे म्हणाले, “माका सुपारीच्या खांडाचाव व्यसन नाय. खरा वाटयना, पण कुलस्वामिनीची शपथ घेतल्यानी आणि मी पण मग अंतर देऊक नाय.”

अशा या निर्व्यसनी माणसाचो झिल जर खानदान बुडवक लागलो तर राग इल्याशिवाय रवात काय? मी ह्यांच्यावर रागावलंय, “ओ, त्याच्या नादी काय लागलास, जेवण गारेगार झाला. त्याका फरक पडलो असतो त असो वागलो असतो काय? आवशी बापाशीक लोक येवन म्हणतत मा, पोरगो फुकट गेलो म्हणान. उद्या आपल्या हातान त्याका काय व्हया नको विचारा आणि काय व्हया ता घेवन खय जाता तो जावं दे.”

इतक्या ऐकल्यावर दुसऱ्या तिस-यान माफी मागली असती, पण ह्याची मेल्याची मती भ्रष्ट झालीहा. खोलीत गेलो आणि आडवो झालो. हे माका म्हणतत,”गो, बग त्याका काय फरक पडता काय? आज शोधूक गेलय पूना कदी जावचय नाय,तो आणि तेचा नशीब.” माका अन्न गोड लागेना राणी बाजूक बसली होती. बापाशीच्या डोळ्यातून टीपा गळत होती. मी तशीच उठलय. खोलीतून त्याका घेऊन इलय,”रे मेल्या बघ,बाप रडता,काय सुख दिलास रे त्यांका? उद्या त्यांका काय झाला त मी कोणाकडे बघू ” तो बापाशीकडे बघीत रवलो, मग खाल मानेनेच बोललो, “मी उद्या मुंबईत जातय थय नोकरी करीन स्वतःच्या पायावर उभो रवल्यावरच तोंड दाखवीन.” इतको वेळ राणी चूप होता ता त्याच्या जवळ इला म्हणाला, “आप्पानी हय इतके खोलये काढले, ह्या हॉटेल काढला ता कोणासाठी? तुका शिकूचा नाय मा, उद्यापासून तू त्यांका मदत कर, गाव गुंडात जावं नको. ती सिगरेट, तंबाखू खावं नको, शोभणा नाय आमच्या जातीक.”

तो तिच्याकडे खालच्या नजरेनं बघीत रवलो, “उपदेश देवक बरा वाटता पण लोक तुझ्या वरसून माका काय काय ऐकवतत त्येचा काय?” “लोक काय पण बोलतीत, आम्ही कॉलेजात एकत्र शिकतव, म्हणून काय पण वावडे उठवण्यात काय अर्थ? आमका कोणी धरल्यानी काय?” मी विचारलंय, “राणी,माझ्या ह्या कानावर इलाहा, खरा सांग, लोक उगाचच कित्याक बोलतीत? तुका एकटयाक कॉलेजात जावक येता ना? वांगड कित्याक व्हयो, मी ऐकलंय ता खरा ठरला त आप्पा काय म्हणूच्या आधी मीच तुका आडात लोटून देईन, मग माझा काय होवचा ता होवंदे”

ह्या ऐकून हे पार निराश झाले, “गो काय म्हणत? माका कळात असा बोला, हिचा काय आणि?” “अहो, राणी आणि तारी गाबताचो झिल दोघव एका कॉलेजात शिकतत, परवा ता करलकराचा भिम्या माका येऊन म्हणाला, गे बायो, आमच्या बाबांनी राणीक तारीच्या प्रकाश बरोबर स्कूटर वरून फिरताना कुडाळात बघितल्यानी. तु लक्ष ठेव आताशे दिवस खराब, तो मेलो तसलोच हा, काय गोंधळ केलो तर तोंड दाखवक जागा रवाची नाय.”

“नाय ओ आप्पानू,लोका काय पण बोलतत, आमी ता “.Indian penal Code and jurisdiction ” पुस्तक बघूक एकत्र गेलेलव. वेंगुर्ल्याक ता मिळत नव्हता म्हणान—” “गो तु कशाकव जा,त्याच्या बरोबर स्कुटर वरून डबलसिट गेलस मा! लोकांची काय चूक,तुझी गाडी असतांना त्याच्या गाडीवरून जावची गरज काय? ह्या बग, भावशीन आपला आयुष्य उधळून देवाचा ठरवला आसाच. तु पण काय ता ठरव म्हणजे धोंडो गळ्यात बांधून आमका जीव देवक बरो. ईश्वरा ह्या आयकण्यापेक्षा नेलस तर सुटीन मी.”

बोलता बोलता त्यांच्या तोंडातून फेस इलो, ते बेशुद्ध पडले, माका काय सूचेना, चडवान तोंडावर पाणी मारला, हाताचे तळवे चोळले. दहा साडेदहा वाजून गेले आता इतक्या रात्री कोणाक बोलवतलव? झिलान चुलत्याक बोलवून हाडलो. त्यानी पायाचे तळवे चोळले. छातीक मालीश केला तसो त्यांनी श्वास घेतलो. थोड्या वेळान शुध्दीवर इले. चुलते रागावले, माझ्याकडे बगीत म्हणाले, “गे बेशुध्द कसो पडलो? एवढ्या रात्री काय करी होतास?”

शेवटी जा काय होता ता सांगलय,तसे संतापले,”धंदो कसलो करतस? बरी नोकरी सोडून हे उपद्व्याप करण्याची गरज काय होती,पैसो येता पोरांका दिसता,त्यांका अक्कल आसा खय? रे समीर! असो समोर ये, रे बामण ना तुमी? ह्या असा उपटसुंभावरी ख्रिस्ताव पोरांबरोबर फिराक काय वाटणा नाय? थय शिगरेट फुकूक पैसे कोण देता? परत दिसलस तर भर बाजारात तुडवीन,पूना ऐकूक येता नये, उद्या बापाशीक काय झाला तर आवशीची हाडा खाशात काय? तु गो राणी, शिकाक जातस का थेरा करुक? पूना ह्या असला प्रदर्शन होता नये.” यांच्या कपळावर हात ठेऊन आणि समजूतीच्या चार गोष्टी सांगून ते वाटेक लागले.

क्रमशः

भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

7 thoughts on “आणि वादळ माणसाळले भाग २

  1. आणि वादळ माणसाळले भाग ६ - प रि व र्त न

    […] १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग […]

  2. आणि वादळ माणसाळले भाग १ - प रि व र्त न

    […] १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग […]

  3. zovrelioptor

    naturally like your website but you have to test the spelling on several of your posts. A number of them are rife with spelling issues and I in finding it very bothersome to inform the truth nevertheless I¦ll definitely come back again.

Comments are closed.