आणि वादळ माणसाळले भाग ६

आणि वादळ माणसाळले भाग ६

समीर आपली खरेदी आटपून घरी परतला तेव्हा दिड वाजत होता. त्याला परतायला उशीर झाल्याने आई वाट पहात होती. “रे! किती उशीर! अख्खो बाजार खरेदी करून आणलस काय?” “नाय गे,बऱ्याच दिवसांनी कॉलेजात गेलेलंय,आमचे टिचर भेटले,ते विचारीत होते,गप्पा मारता मारता कधी उशीर झालो तोच कळलो नाय काय गडबड नाय मा जावक?” “गडबड तशी काय नाय.पण तुझे फुकट हवालदार येवन जेवन गेले, जाताना म्हणाले,समीराक सांगा मी येवन गेलंय.” समीर हसलो, “इतक्याच ना? जावं दे, न फळणारी नक्षत्रा येतलीच. त्याका उपाय नाय. आत्ये इली मा ता कुर्ल्याचा तिकाच बघूक सांग. सातशे रुपयांका कुर्ल्या हाडलेत. गडबड जाता नये. मी बघून येतय आप्पांका जेवक वाढ,त्यांका भूक लागली असतली.”

“होय तर, ते नुकतेच जेवन उठले, तु मासे आणशीत आणि मग मी करतलय ह्या भरवश्यावर त्यांका नाय ठेवणय, त्येंची औषधा आसत. वेळेवर जेवले प्रश्न संपलो.” तो किचनमध्ये गेला तेव्हा निलेश कुर्ल्या साफ करत होता. आते गरम मसाला भाजत होती. “निलेश मामा, कुरले बरे आसत मा, त्यांका खावक भितूर काय आसा मा?” “होय तर, काळोखीचे कुरल्ये भरलेले हत, किती तरी कवटा हत, फांगडे चांगले तालाचे हत. कस्टमर खुश होतोले, बघीत रव” “शरयू ऐकत होती. रे ! किती उशीर केलं? आता जेवतल किती वाजता? हयला मी बघतय. जा तुम्ही जेवन घेवा.” “पूनम कित्याक पाठी रवला, आप्पांबरोबर जेव नये. गो पूनम, हय ये, जेवक जा,अप्पा येतत तवसर मी आसय.” पूनम किचनमध्ये येत होती तितक्यात अप्पा आले. “रे झिला, काय आवशीक उपाशी ठेवण्याचो बेत हा? जा जेवक त्या पून्याक ने. ता पण जेवणाचा थांबला.” “होय ओ आप्पा, हो निघालय, येतव आमी तासाभरात. तुमका पडूक मिळाचा नाय.” तो आणि पूनम जेवायला गेले. आई वाट बघत होती, “समीर, मेल्या बिन आंघोळीच जेवतल काय? जा चार घागरी अंगावर घे, तवसर आमी तू आणलस ती भाजी सुटी करून ठेवतव. ही इतकी मटार कित्याक आणल काय पुजेचा जेवण हां!”

“गे स्वस्त गावली मटार ,सोलून दाणे फ्रीजरमध्ये ठेवले तर महिनोभर रवात म्हणान घेतलय. आणखी आठ दिवसान पन्नास रूपये किलोन मिळाचे नाय.” आवशीन कटकट केली म्हणून न्हावक गेलो. तवसर दोघींनी, आणलेली भाजी जाग्यावर लावली. तिघा हसत खेळत जेवत होती. पूनम घेतलेलो भात किती तरी वेळ जेवत होता,ता बघून समीर म्हणालो, “गे आई, हयाका आप्पांबरोबर वाढूक व्हया होता, आता ह्या जेवीसर सांज जातली. तवसर रात्रीचा जवाण करुची वेळ होतली.” पूनम म्हणाली,”मी घासावर घास मारणय नाय, शांतपणे जेवतय म्हणून वेळ लागता.” “मी घासावर घास मारतय काय? तुझ्या दुप्पट मी जेवतय, व्हया तर तुझ्या मामीक विचार?”



affiliate link

“रवांदे, कुणी स्पर्धा लावक नाय, रे समीर तुझा जेवाण झाला तर तू आपलो उठ,त्येका सावकाश जेवं दे. आप्पांका निजाक धाडून दी. जरा पडां दे त्यांका.” समीर निघून गेला. “पून्या, तु आपला सावचीत जेव हा,वाघ नाय पाठी लागलो हां. त्येची जेवणाची तऱ्हाच तसली, आवडला तर चार घास जास्त जेवता, नाय तर ये ये आणि पळ पळ.”

“गे मामी, राणीताई फोन करता की नाय? किती दिवसात तिची बातमी ऐकूक नाय,बरा हा मा?” “पून्या तुजा जेवन झाला काय फोन कर हां, मी पण बोलान. गेल्या आठवड्यात केललो फोन, तीत पासून करूक नाय, त्येंका पण आवशीची आठवण जाणा नाय, कमाल आसा बाये हया चडवाची. आठवड्यात एकदा तर करुचो.”

पूनमने तिला फोन केला. राणी ताई, मी पूनम बोलतय, कशी आहेस तू? काय ? —-बर नाही का ग? काय झालं?—— काय म्हणते? ताप आला होता, तापच ना! मग आता कशी आहेस? कशी आहेस? हॅलो, हॅलो शी नेटवर्क नाही.” “हॅलो, हा ताई बोल कशी आहेस? बरी आहेस ना? हॅलो—-हॅलो—” “गो पून्या काय म्हणता राणी? फोन दी बघू माझ्या कडे. काय झाला ह्या मोबाईलाक गरज आसात तेव्हा संपावर जातलो, गो काय म्हणत होता?बरा हा मा?” “गे त्येका दोन दिवस ताप इललो,आता बरा हा, पण तोंडाक चव नाय काय खाईन सा वाटणा नाय? अशक्तपणा इलोहा.” पून्या, तु परत फोन लाव बघू. माका नीट काय कळाक नाय,ह्या नेटवर्क असाच, नेमकी फटकी पडता गरज आसात तेवा. हेरवी, तास तास बोलला तरी काय जाणा नाय.”

मोबाईल रिंग वाजता(हिंदी पिक्चर ट्यून ऐकू येता), हॅलो हा ! होय! मी आई बोलतंय, गो काय झाला तुका? ताप सो इलो,काय एक्सरशन काय ता माका नाय कळाक, खय गेलेलं? फिराक, गो आतासा निंबार ताट असता,तिथला निंबार वेगळा. काय म्हणत, पर्वती—गो पार्वती कोण? तू काय बोलत कळणा नाय. “फोन परत बंद होतो. “गे मामी, पार्वती न्हय पर्वती, टेकडी आसा, लोक फिराक जातत. Morning Walk करूक जातत. उंच आसा का मोटकी कोणाक ठावक. गेलहा कोण?” तेवढ्यात राणीचा कॉल येतो, “पूनम, मोबाईल आईक दी, हॅलो आई हॅलो, गे काळजी करण्यासारख्या काय नाय. जरा ताप इलेलो,
माका, बाकी ठीक, तूच सांग, तू बरी मा? समीरचो धंदो कसो हां? काय म्हणत?— मदतीक पूनम येता, बरा झाला, तितकीच त्याका मदत. आता सीजन हा, कस्टमर भरपूर असतीत मा? काय म्हणत? आमचो धंदो? —- मी एकदाच गेलेलंय, त्याची नोकर माणसा आसत आणि आमी घराकडे नाय रवणव, स्वार गेटकडे रवतव आणि त्यांचो तबेलो सिंहगड रोडवर. काय म्हणत, तो? तो घराकडे कसो आसात? आज शुक्रवार हा. काय म्हणत—–घराकडे कित्याक नाय थांबूक? गे परवा रजा घेतली होती, डॉक्टरकडे न्हेऊक. आता त्याचा Financial year सुरू झाला,रजा घेऊन नाय चलणा. आई, त्याचो फोन येता, मी ठेवतंय चल, काय म्हणत? काय सांगू मे महिन्याचा, हा सांगतय. चल फोन ठेवतय. रागावतलो. कोणाबरोबर इतका वेळ गप्पा मारते म्हणात.”





राणीचा फोन कट झाला. तशी पूनम जायला निघाली, “मामी, मी जातंय नायतर समीर म्हणात किती वेळ जेवता? संध्याकाळी दोन जोडपी येवची हत, मगाशी समीराक सांगूचा रवला. त्यांचे खोलये साफ सूफ करून घेवक व्हये. पार्वती मावशी गेली तर पंचायती होयत.” “हो,जा बाय, उगाच कटकट ऐकून घेवक नको. आणि थोडी लवकर घराकडे जायत चल. आवशीक काळजी नको.” ती आली तेव्हा समीर कुणाशी तरी बोलत होता, बहुदा बाहेरचे कस्टमर असावे, तिने हाताने थांब अशी खूण केली. त्यांने मोबाईल दूर नेत विचारल, “काय सांगत? पटकन बोल कस्टमरचो फोन हां.” ती म्हणाली संध्याकाळी दोन रूम खाली होतले त्याचा बुकिंग मी केलेला आसा. तु पुन्हा कोणाक शब्द देव नको.”

तो रागावला, गो, ह्या माका मगाशी सांगाक काय झाल्लला, आता ह्या कस्टमराक काय सांगू,पूनम तुझी कमाल हां, आता ते काय म्हणतीत?” “रे मी रजिस्टरमध्ये नोंद केलीहा. तु नाय बघूक ती चूक माझी काय? बघूचा होता तू.नाय पेक्षा विचारुचा होता माका.” त्याने होल्डवर ठेवलेला फोन घेतला आणि म्हणाला, साहेब सॉरी माझ्या रूम ऑल रेडी गेल्यात, मी इथे थोडा वेळ नव्हतो त्यामुळे मला update माहीत नव्हते, extremely sorry.”

त्याने फोन ठेवला आणि तिच्याकडे पाहिले, तिचे डोळे भरून आले होते. तो तिला समजावत म्हणाला,”गो, पूनम रडत कित्याक? आधी डोळे पूस. मी काय तुका वायट बोललय. माका अगोदर कळला असता तर मी माझ्याकडे रूम नाही म्हणान मोकळो झालं असतंय इतक्याच.”
ती त्याच्याकडे रागाने पहात म्हणाली, “तुका रजीस्टर बघूक काय झालला? त्याच्यावर नाव, पत्तो, मोबाईल नंबर लिवलय ना मी!” “बरा, माझी चूक झाली. झाला समाधान, आधी डोळे पूस, आरशात बघून ये. आपण कस्टमर बरोबर relation नीट ठेवले नाय तर गोंधळ होयत. अशी रडत रवलस तर कस्टमर कशी बगशीत. ये हय बस. तुझे बुकिंग चे कस्टमर येण्याअगोदर रूम तयार करूक व्हये. घराकडे जाऊन हयला सांगशीत तर काका धाडूचे नाय, ह्या बोलणा आपल्या दोघात, समाजला काय आणि आधी हस बघू, रडणारे मुली बरे नाय दिसणत. आरशात बघ. जा, पावडरीवर नक्षी उठली ती सारखी कर, नाय तर आवस भलतो अर्थ काढीत.” ती हसली. तिला बुकिंग बद्दल दोघांत चर्चा न झाल्यामुळे काय घडले ते उशिरा लक्षात आले.

शरयू तिचे काम आटपून कधीच गेली होती. ती वॉशरूमला जाऊन आली. उद्या यायचं नाही असं ठरवून ती पुन्हा काउंटरला येऊन उभी राहिली. ज्या मुली दुसऱ्या कुणाकडे काम करत असतील त्यांच्या हातून अशी चूक घडली तर त्यांना आपल्या मालकाकडून किती ओरडून घ्यावे लागत असेल असा विचार तिच्या मनात आला आणि ती स्वतःशी हसली. थोड्या वेळाने जाणारे कस्टमर आपले सामान आणि चावी घेऊन आले. “समीर नाही का? बिल पेड करायचे आहे.” “आपण ताम्हणे ना? आपलं बिल तयार आहे, आपण पैसे कॅश ने भरणार की कार्ड आहे. “तिने विचारले. “नाही आम्ही कॅश देणार पण समीर तुला काही बोलला का? म्हणजे कॅश डिस्काउंट बद्दल.” कस्टमर म्हणाले. “प्लीज दोन मिनिटे, मी त्यांना विचारून घेते, ओके. हॅलो, हॅलो, हॅलो अरे मी बोलतंय, आज जी कस्टमर रूम खाली करून जातत त्यांका कॅश डिस्काउंट देवाचा आसा. काय? हा बोल, तु येत? हा ये. साहेब थोडं थांबता का? प्लीज बसून घ्या. ते स्वतः येतील.” समीर आला, तिने बिल बुक त्याच्या समोर धरलं. “अगोदरचा अँडव्हान्स वजा करून तेवीस हजार होतात. हा रेंट आणि हे बोटींगचे, हे टी, स्नॅक्स, लंच अँड डिनर. हे extra requirement, cold drinks, ice cream, dry snacks pouch. bisleri etc.. समीरने बील पाहिले आणि त्यांने फ्लॅट रेटने पाच टक्के सूट दिली. ते बील कस्टमरने तपासले आणि पेमेंट केले.”Thanks Sameer. we like your service.” “No mention sir, you are welcome again, This is my card. If any customer brings it, we will give him the same benefit.”



affiliate link


समीरने शरद मामाला फोन लावला.शरद मामा लगबगीने आला. “मामा आपल्या माणसाक बोलवन यांचा सामान त्यांच्या गाडीत भरूक मदत करा.” ताम्हणे फॅमिली आणि शरद मामा गेले.पूनम समीरकडे पहात म्हणाली “किती बिल झाला तर किती सूट दिली तर चलात ह्या माका सांगून ठेव म्हणजे दर वेळेक तुका बोलवक नको. तु उद्या मालवणाक गेलस तर कस्टमर काय वाट बघीत रवात?” तीच म्हणणं योग्यच होत, तो हसला, “मी सांगण्याची गरजच नाय. हळू हळू तुका सगळा कळतला. तु विचारलस म्हणून सांगतय. साधारण पंधरा हजार रुपयांचा बिल झाला तर 5%. पंचवीस हजार रुपयांच्या वर झाला तर 8% आणि मोठो ग्रुप इलो पण बिला वेगळी वेगळी घेतली तर 10% सूट देवक हरकत नाय. ह्या पुढे सूट किती देव माका विचारण्याची गरज नाय, बरोबर.”

“तु त्या ताम्हणे बरोबर इंग्रजी कित्याक फाडल, ते तर मराठी बोलत होते. इम्प्रेशन मारण्याची काय गरज, ते शहरातले मुली बोलतत म्हणान आपण पण बोलूक व्हया काय?” “गो ! तू आसस मुर्ख, आमी हय गावात रवलव तरी अडाणी नाय ह्या त्यांका कळाकच व्हया.” ती त्याच्याकडे पहात राहिली, आपण ह्याला साधा समजतो तसा हा नक्की नाही, म्हणूनच कदाचित कस्टमरशी कस बोलाव ही अडचण त्याला नाही. तिने गल्ल्यातील पैसे तपासले आणि वहीत नोंद केली. थोड्या वेळाने ती आवरून जायला निघाली, “समीर मी निघतय, ही चावी.” “जाशीत तू ,का सोडूक व्हया?” त्याने विचारलं “तुका येवचा असला त ये नाय तर मी जातलय. उगाच जाशीत का? करत रवा नको.” ती रागातच बोलली. समीरने बाईकला किक मारली,” गो चल, नीट बस पाठल्या पाठी सांडशीत”, त्याची बाईक वाटेवरून धावू लागली.पाच मिनिटांत तो तिच्या घराजवळ पोचला.

ती उतरता उतरता म्हणाली, “येत मा,का आजव नाय येण?” तो निमूट उतरला तिच्या बरोबर वाटेला लागला. त्यांच्या घराकडून समुद्र दोन फर्लांग, उधाणाची भरती होती. लाटा धावून धावून किनाऱ्याकडे येत होत्या. तो तिच्या घराच्या पायऱ्या चढता चढता म्हणाला,”तुमका बरा हा, हयसरसून भरती, ओहटी दिसता. हवाव बरी लागता.” त्याचा आवाज ऐकून शरयू बाहेर आली, “समीर,वाट गावली काय? रे, परवा भायल्या भायर गेलस,तुका हाक मारूक इली नाय? कालवा केलेलंय,देणार होतय. बरा, च्या करू का सरबत?” “गे आते, काय नको, मी निघतय. आप्पांका सांगूक नाय, शरद मामा आसत पण आप्पा म्हणतीत गेलो खंय. तेवा मी निघतय, सांज झाली, कोणी कष्टमर इला तर मामांका त्यांच्या बरोबर बोलाक जमणा नाय.”

“रे जाशीत, बस निवांत. कस्टमर पळून नाय जाणा, वायच कोकम सरबत करतंय, पिऊन बघ मेल्या, कसा लागता ता. पून्या जा गे बाय, सरबत कर, खूब गोड करू नको हां, बरा पुन्याक काय जमता की नाय, हिशोबात गोंधळ घालणा नाय मा.” “समीर, ह्या सरबत घे, बघ जमला काय? खरा खरा सांग.” “गो, छान हा, काय घातलं भितूर, जिऱ्याचो वास येता, बरोबर मा.” “रे जीरा आणि मिरीची पावडर हा, चिमूटभर घालूक व्हयी, सुंदर लागता.आमच्या आईचो प्रयोग हां, अँसिडिटी झाली, अपचन झाला की आमचे बाबा, स्वतः करून पितत.” पूनम म्हणाली. “आते,सुंदर लागता ह्या सरबत. आमच्या कस्टमर मंडळीक कॉम्प्लिमेंटरी देवंक हरकत नाय, फार खर्चव नाय आणि आरोग्याक उत्तम.” “रे, पेप्सी, मिरांडा, मँगोला, स्पाइस पिणारी माणसा, ह्या सरबत आवडात की नाय देवाक ठाऊक.” शरयू म्हणाली “प्रयोग करूक काय हरक? सोलकढी मागून घेतत ना? मग सरबत पितली, प्रयोग करून बघूक काय हरकत? चलला तर ठीक नाय तर आपलो आसाच.आते बघ, तास कसोसोच गेलो. मी चलतय, पूनम थँक्स, सरबत बरा हां.तु पिलस ना?” “तुका लवकर आठवण झाली, नशीब घराकडे गेल्यावर विचारलस नाय!”

“हॅलो, हॅलो, हा आप्पा, आतेकडे आसय, हो हो—निघतय, हो सोमतो निघतय, काय? कस्टमर इलीहत, बसवा त्यांका, हो इलय. बघलस ना आते? म्हणान मी खय जावक नाय बघणय. घराकडे मी नसलंय की बरोबर कस्टमर हजर. श्रेयसचो पत्तो खय, तास होऊन गेलो. कधी इलय तर त्येचो पत्तो नसता. त्याका सांग मी बोलावलंय.” “अरे,तो हॉली बॉल खेळाक जाता. शाळेच्या मैदानात,रोज जाता. येताना गजाली मारत येतत.आता हे पण येतीत. जा बाबा, बापूस पुन्हा फोन करीत.” शरयू म्हणाली. त्यांने निघता निघता पूनमला बाय केले. ती त्याला सोडायला बाहेर आली. दोघांची नजरा नजर झाली. ती त्याला पहात गोड हसली. तिने त्याला दूर गेल्यावर बाय केल. त्याने बाईकच्या आरशात पाहिलं. ती अजूनही रेंगाळत तिथेच उभी होती.



affiliate link

समीर वाटेला लागला,अंधार पडत होता,थोड्या अंतरावर श्रेयस दिसला,”दादा,घराकडे जावन इलस काय? बाबा इले?” “अजून तरी नाय, पण तु इतक्या उशीर पर्यंत काय करी होत? आते वाट बघीत होती.” “नाय,आम्ही सगळे मित्र गप्पा मारीत येय होतो, वाटेत घणस दिसलो, तो बापडो रस्तो ओलांडून जाय होतो. आमच्या ग्रुप मधल्या मुलांनी मारलो. थयच टाकून दिलो.” तो वाटेला लागला. गेले सात आठ दिवस तो पूनमच निरक्षण करीत होता. तो एकटा असला की काहीतरी कारण काढून पूनम त्याच्या बरोबर बोलायचा प्रयत्न करत होती. तिचा फटकळ स्वभाव त्याला मुळीच आवडत नव्हता.

जस जसे पुनमचे तेथील येणे जाणे वाढले त्याच्या छोट्याश्या ऑफिसमध्ये बरीच टापटीप दिसू लागली. पूनम रोज आली की सातेरी आणि विठ्ठल प्रतिमांची पूजा करी. तिचे टेबल आणि आजूबाजूची जागा स्वच्छ पुसून काढत असे. जेव्हा तिला अडचण असे तेव्हाही फोन करून ऑफिस स्वच्छ केल्याची खात्री करून घेई. तिची ही टापटीप पाहून हळू हळू तो तिच्याकडे ओढला गेला. ऑफिसमध्ये कुणी नसतांना तो तिला लाडाने पून्या म्हणू लागला, ती ही त्याच्या सरळ स्वभावामुळे त्याच्याशी जवळकीने वागू लागली. कधी कधी काही काम नसताना तो उगाचच ऑफिसमध्ये येऊन तिला पहात बसे. मालवणला गेला की काही गिफ्ट आणून देणे, तिच्या मनी पर्स मध्ये पै से ठेवणे असे प्रकार सुरू होते.

पुनमच नटणं, वेगवेगळे कपडे ट्राय करणे, उशीरा पर्यंत थांबणे अशा प्रकारात वाढ होऊ लागली. कधी कधी स्वतःशी बोलत बसे. पूनम मधला हा बदल शरयूच्या लक्षात आला. आपणच मुलीला विचारणे योग्य नाही म्हणून ती गप्प बसली. समीर अधूनमधून तिला सोडायला येत होता. त्यात आक्षेप घेण्यासारखे काही नव्हते. ती भावंडे होती.आठ पंधरा दिवसांनी ती किचनमध्ये काम करत असतांना एक दिवस समीरने पूनमचे हात धरून तिच्याशी लाडी गोडीने बोलतांना तिने पाहिले आणि ती जागी झाली. न जाणो गमतीनही असेल पण उद्या दोघांपैकी एकाच चुकीचे पाऊल पडले तर! या आशंकेन तिची झोप उडाली. उद्या मुलीच चुकीच पाऊल पडल तर नवरा उच्छाद केल्याशिवाय रहाणार नाही हे ही तिला ठाऊक होत. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे पूनम सकाळी तयार झाली. तस शरयूने तिला थांबवले आणि म्हणाली, “गो आता पयल्या इतके कस्टमर नाय येणत,तेवा तु नाय गेलस तरी चलात. पावसाळो जवळ इलोहा घराकडला बघूक व्हया. मी आप्पांका कळवतय तू नाय येणस म्हणान.”

ती आईकडे पहात म्हणाली,”आधी तूच म्हणी होतस लवकर जा म्हणान आणि आता तूच म्हणतस कस्टमर कमी आसत, नाय गेल तरी चलात. एक काय ता सांग. आता मी तयार झालय,जावन बगतय आणि काय काम नसला तर दुपारी परत येतय,चलात मा !” शरयूचा नाईलाज झाला, नको जाऊ म्हटले तरी प्रश्न, म्हणून तिने होकार दिला, पण जाता जाता इशारा दिला, “पून्या, आता तु मोठा झालस. चांगली एकवीस वर्षांची घोडी. तेवा कोणा बरोबर उगाच अघळपघळ वागता नये, लोक चुकीचो अर्थ काढतात. आपणाक कळाक व्हया, समीर आता मोठो हा, त्याच्या बरोबर उगाच खेळता नये. जा, पण काय सांगतय ता नीट ध्यानात घे.” “माका सगळा कळता, उगाच लेक्चर देईत बसा नको. तुका सांगलय ना, काम नसला तर दुपार पर्यंत घराक येतय, मग तर झाला.”





वाटेने चालता चालता पूनम विचार करु लागली. आई सांगते म्हणजे नक्की तिने आपल्याला पाहिले असावे पण आपण तर काहीच केल नाही. हातावर हात ठेवला किंवा समीरशी बोललो तर गहजब करण्याच काहीच कारण नाही. उद्या खरच समीर बरोबर फिरायला गेले किंवा तो मला आवडतो म्हणाले तर काय! विचारांच्या तंद्रीत ती सागर रिसॉर्ट मध्ये कधी पोचली तेच कळलं नाही. आज ती फुल गोळा करून आणायला विसरली होती.

तिने बागेत फेरफटका मारला मिळतील ती चाफ्याची, कण्हेरी, जास्वंदीची फुले गोळा केली आणि हार केले. काउन्टर जवळ आप्पा मामा बसले होते, ते हसले. “इलस बरा झाला, माझी औषधा घेवची वेळ झाली होती,कोणी येता काय बघीत होतंय.” “मामा कोणाचो फोन बिन होतो काय?” “कोणाचो येवचो होतो काय?मी इल्यापासून आजून तरी कोणाचोच नाय.” “मी कस्टमरचो म्हणी होतंय, काल पासून दोन तीन रूम खाली आसत.”

“गो, आता पावस जवळ इलो. शाळेची रजा संपत इली. वातावरण तापला. म्हणान पर्यटक कमी झाले. आता पूर्ण पावसाळो धंदो निमताचो. नाय म्हणूक काही हौशी, समुद्रात पाऊस कसो पडता बघूक येतत चार सा दिस रवतत. पण, सिजन आता संपलो. आता दिवाळी सरल्याशिवाय येणारे येरे मेरे.” “मामा मगे, उद्यापासून मी कित्याक येव? आई म्हणा होती कस्टमर नसतीत तर जाऊन काय करशीत?”

“आता मी काय सांगू, तुका नसात येवचा त नको येव. समीर म्हणा होतो या ऑफ सिजन वेळेत Youtube वरून Discount offer टाकूक व्हयी. 50% ऑफ mansoon offer जाहिरात मुंबई वर्तमान पत्रात टाकून कस्टमर ओढूक व्हये.” “पण 50%सूट दिल्यावर आपणाक काय फायदो? आपलो खर्च निघाक नको” पूनम बोलली. समीर तितक्यात इलो आणि पूनमकडे बघीत म्हणालो,”मामा भाचीत काय गप्पा चालू आसत?” “ह्याच, मामा म्हणत होते तु Youtube वर जाहिरात देऊन 50%मान्सून ऑफरवर सूट जाहीर केलीहा.” पूनम बोलला “गो ! आमी देतलव ती सूट बुकिंग वर आसा, जेवण खाण्यावर न्हय,नाय तरी खोली रिकामी रवली, तर त्याचो उपयोग काय? प्रयत्न करून बघू. customer गावला तर तोटो कमी होईत.” समीर बोलला. त्याची जाहिरात मुबंई, पुणे इथे द्यावी असे ठरले. राणी म्हणाली पावसात इथे अनेक वॉटर फॉल असताना तुझ्याकडे कोण येणार? पण तु म्हणतोस तर जाहीरात देवया. त्या प्रमाणे समीर आणि राणी दोघानी मिळून एका कंपनी जवळून सागर रिसॉर्ट ची जाहिरात लॉन्च करण्याचे नक्की केले. या बाबत समीरचे राणीशी बोलणे झाले तसा पूनमने स्वतःचा विषय काढला, “समीर, सध्या कस्टमर नाय आसत, तर मी कित्याक येव,माझी गरज नाय हा, गरज असात तेव्हा मी येतय, चलात मा!”

समीर आधीच वैतागला होता. तो तिला रागाने म्हणाला, “तुका नसात येवचा त नको येव, माझी खय जबरदस्ती हा. मी कोण तुका सांगणारो, ये का येव नको? तुझ्या मामांका सांगून जा, म्हणजे झाला.” “रे! चिडत कित्याक,आई म्हणाली, सध्या कस्टमर कमी आसत आणि आता घराकडे पावसापूर्वीची कामा आसत तू नाय गेलस तरी चलात,तरी मी आईक सांगलय जावन बगतय आणि नसला काम तर परत येतय समजला. मी माझ्या मनान नाय ठरवक. माझ्यावर चिडान काय उपयोग?” “तो तिच्या जवळ येत म्हणाला, तुझ्यावर खय चिडलय. मी माझ्यावरच चिडलय. पूनम खरा सांगू , तु हय असलस की माझा अर्धा टेंशन कमी होता. तुझी टापटीप माका आवडता. तु चिडलस की छान दिसतस. आईच्यान सांगतय.मस्को नाय मारणय, तु माका—तु—“





कोणाची तरी चाहूल लागली म्हणून तो गडबडला. गो, मी जरा कोळमकराक भेटून येतय,कोण कस्टमर इला तर बघ.” तो बाहेर जायला निघणार तर तिनेच हात धरुन थांबवल. “समीर, तु काय तरी सांगा होतस,काय ता पूरा कर आणि जा, मी घरी जाव का रवा ता सांग.” समीरने बाहेरची चाहूल घेत तिचा हात हळूच सोडवला,”गो,तु घराक गेलस तरी चलात,आप्पांका सांगून जा म्हणजे बरा. मी जातलय,तुका सोडू काय,चल येतस तर” तिला त्याच मध्येच संपवलेल वाक्य त्याच्या तोंडून ऐकायच होतच. ती म्हणाली, “मी आप्पांका सांगून येतय तवसर थांब.”

आप्पा येतच होते, त्यांना पाहून ती म्हणाली, “मामा, आता हय काय काम नाय तर मी घराकडे जाव काय? आई पावासासाठी लाकडा,पिडे घरात भरतली, जरा तिका मदत होयत.” “मी सांगलय, ती कस्टमरची बिला बनवन ठेवलस काय ? आज दोपरण्याक ते जावचे हत, त्यांची खोटी नको. तुका घराकडे काम आसा त खुशाल जा,समीराक सोडूक सांगतय,जरा थांब. तो खय आसा तो बघतय. समीर,रे समीर, हय ये रे झिला.” “काय ओ आप्पा. हयच होतय। कस्टमराक बघून इलय. शरद मामाक सांगून खोलये तपासूक सांगा. कस्टमर जातांना चूकून आमचे चादरी नेतीत.” “रे, ता मी बगतय. तु पून्याक घराक सोडून ये, तिच्या आवशीचा काम हा.” गो पूनम,चल तुका सोडतय आणि पर्स हाडली असशीत तर सोमती घे. वाटेत सांगा नको ह्या विसारलय म्हणान.”

पूनम आणि तो निघाले तेव्हा साडे अकरा वाजत होते,उन मी म्हणत होत. ती त्याच्या पाठीमागे बसली, मोटरसायकल रस्त्याला लागली तशी ती त्याच्या जवळ सरकली.तु काय सांगीत होतस ता सांग,त्याच्या कानाकडे तोंड करत ती कुजबुजली.” तो साईड मिरर मधून तिच्याकडे पहात म्हणाला, त “ताक” कळणा नाय? मॅड आसस काय? I love you, त्यांने आरश्यात पहात किस घेतल्याची खूण केली, तसा तिने त्याला चिमटा काढला. तो हळू ओरडला, “गो, गो, काय करत, ही काय पद्धत आसा?” तिने त्याच्या मानेवर चुंबन घेतलं, तसा तो शहराला. त्याने बाईक थांबवली. आजूबाजूला कुणी नाही पाहत, त्याने तिच चुंबन घेतलं. तिला मिठी मारली, “पून्या, तू माका आवाडतं.”
त्याच्या घट्ट मिठीत ती सुखावली. क्षणात ती सावध झाली. “अरे रस्त्यातच काय करतस कोणी बघल्यानी तर काय होयत? आधीच आईक संवशय इलोहा. तिका कळला तर वाट लागात.” “मग, तु धमकी कसली देत, उद्यापासून येवचय नाय म्हणान, म्हणून माका राग इलो.” “मी काय चुकीचा बोललय? कस्टमर नाय तर येवन काय करू?आई म्हणता उगाच जाऊ नको. घराकडे कामा कर.” “गो, पर्यटन हो धंदो असोच हा,आता पाऊस जवळ इलो म्हणान, पण एकदा दिवाळी सरली की कस्टमर सारख्या येयत रवता. आज आपल्या रिसॉर्ट सारख्या एक तरी रिसॉर्ट हा काय? तु रागवलस,तर माझा कसा होयत?”



affiliate link

“अरे,बहुतेक आमच्या आईक संवंशय इलो सो वाटता. तु ऑफिसमध्ये सारखो सारखो फिरा नको आणि इलस तरी अंगचटीक येव नको. कोण नसला तर गोष्ट निराळी, तु खुळ्यावरी वागतस म्हणान असा झाला.” “पूनम, तुझ्या आवशीन बावीस चोवीस वर्षांपूर्वी प्रेम केला, तेवा चलला मा? मग मी तुझ्यावर प्रेम केलय तर खय बिघडला?”
“ता माका काय कळणा नाय आणि हय रस्त्यात बोलत रवशीत तर संवंशय नक्कीच येयत. त्या पेक्षा तुका मी खराच आवडतय तर माका मागणी घालून लग्न कित्याक नाय करणं? चोरून भेटण्यात काय मजा?” त्याने तीची हनवटी उचलत तिला जवळ ओढले. “गो चोरून भेटण्यात जी मजा असता, ती वेगळी असता. इतक्या लवकर लगीन कित्याक करूक व्हया, आपण सावंतवाडीक जावन फिरान येवया.पिक्चर बघूया. तुका कसली ती परीक्षा देवची आसा ती दी. एकदा लगीन केलस मगे पस्तावशीत. घर आणि हॉटेल याच्यातसून सुटका नाय कळला.”

“ता माका काय सांगा नको, अशी लगट करीत रवलस आणि आमच्या बाबांका कळला तर माझी चामडी सोलतीत. त्यापेक्षा तु आप्पाकां सांगून बघ काय म्हणतत ते, ह्या असा वागणा बरोबर नाय.” “गो, इतक्या लवकर लग्न करून अडकाक जातला.लग्न, मुला, संसार. थोडा फिराया, मजा करूया, मग लग्न आसाच.” “कसली मजा ? मी नाय हा वाटात तसा वागूक देवचय, आधी लग्न मग मजा. उद्या काय गडबड झाली तर लोक शाण घालतीत तोंडात. रिसॉर्ट बंद पाडतीत. आवस बापूस हाकलून लावक कमी करुचे नाय. शाणो असशीत तर तू मामांका सांग, अश्याक असा हा, बग काय म्हणतत. नायच म्हटल्यानी तर बघूक येयत.” “काय बघूक येयत? तुका आमच्या रस्त्याकव धाडूचे नाय, बाकी खयला?” समीर म्हणाला. तिच घडाळ्याकडे लक्ष गेलं, “रे वाटेत किती वेळ उभी रवाया , सोडतस तर सोड, नाय तर मी चलत जातंय, किती वेळ रस्त्यात उभे आसव कळता तुका?” ती चालू लागली. समीर तिच्यासाठी वेडा झाला होता. तिला भेटण्याची एकही संधी सोडत नव्हता. याचा परिणाम काय होईल याची जणू तमाच त्याला नव्हती. आप्पाना किंवा आईला ही गोष्ट कळली तर त्याचे काय परिणाम होतील हेच तो लक्षात घेत नव्हता.

दर चार दोन दिवसांनी तो तिला सोडायला जाई,कधी आडोसा पाहून तर कधी रस्त्यावरच कुणी नाही पाहून तिला जवळ घेई. क्षणभर कुणी बघेल याची तमा न बागळता एकमेकांना लगटून रहात. ते वेगळ्याच धुंदीत जगत. ती त्याला म्हणे, “एवढो जीव उतावीळ झालोहा तर माझ्या बाबांका येवन भेटीनास, खराच नाय म्हटल्यानी तर तू वासू आणि मी सपना. काय होवचा ता होईत पण ह्या चोरून भेटणा माका नकोसा वाटता.” त्याने समजूत काडली, “पून्या नक्की ह्या आठवड्यात मी आप्पांकडे विषय काडतय. माकाव कळता ह्या असा रस्त्यात जवळ घेणा बरा न्हय पण जीव रवणा नाय. सारख्या सारख्या तुका जवळ घेवक मन करता. माझो नाईलाज होता. आता आपण भेटायाच नको मगे जिवाक तळमळ नको आणि हो प्रसंग नको.” ती हसली, “आता कसो शाण्यासारखो बोललस. तु झिल माणूस. तुका कोण बोलाचा नाय पण माका तुझ्या बरोबर बगल्यानी तर गावभर होतला. आमचे बाबा आवशीचा आणि माझा जा काय करतीत ता कळाचाव नाय, समजला.. हयाच्यापूढे सोडूक येव नको म्हणजे तुका हो खुळचट विचार सूचाचो नाय. आदी मामाक सांगून आमच्या बाबांका भेटून काय ता ठरव मगेच पूढले चाळे, कळला. मी जातय आणि उगाच फोनव करू नको.” पूनम आपल्या घरी आली.

कस्टमर कमी झाले तसे शरद मामा त्यांच्या घरी साकेडीला जायला निघाले, घरची शेतीची कामे रखडली होती, समीरने त्यांना वीस हजार रुपयांचा चेक दिला. आईला सांगून नारळाची काप, सुके मासे, सफेद जाम असे देता येईल ते दिले. मामा खूश, तो त्याला एसटीला सोडून आला. आता आठवड्याक चार दोन कस्टमर येयत. चार दोन दिवस रवान जात, निलेश शेतीच्या कामाक गोवेरीक निघून गेलो. शरयू वन्स भावशीन फोन केलो तर वेळ काढून येय. मी आणि हे स्वतः कस्टमर इलो तर जेवण करून देव. मदतीक पार्वती होतीच. मदतीक दोन माणसा होती त्यांचो हिशोब करून टाकलो उगाच पोसूक भार काय कामाचो. पूनम इली तर किचनमध्ये येय, मदत करी. अगोदर दर रोज दुपारी राणीचो फोन येय, नंतर कधी दोन दिवसांनी, कधी शनिवारी असो येय. तिचो फोन इलो नाय तर हे फोन करीत, दूर गेली म्हणान आमका आपली काळजी. राणी आता कोणा गोडबोले वकीलाकडे असिस्टंट म्हणून जाय, नायतरी घोव ऑफिसमध्ये गेल्यावर रिक्यामी बसून काय करतला. तितकोच तिचो वेळ बरो जाय आणि नवीन गोष्टी कळत. ह्यांका ता वकीलाकडे जावक लागल्याचा समीरान सांगितला तर म्हणाले, “शिकला त्याचो उपयोग झालो ह्या काय कमी, अनुभव गावलो आणि घराकडसून लोकांची काम केल्यान तरी पंधरा वीस हजार खय जावचे नाय.” त्यांका ऐकून बरा वाटला. समीर आणि ती एकमेकांची मोबाईल वरून खुशाली घेयत. आमका ता मेसेज मेसेज नाय जमणा. दोन वर्षा झाली तरी तिच्याकडसून काय बातमी नाय ह्या बघून चिंता वाटता पण आतासा ही पोरा प्लॅनिंग करतत म्हणान मी तोंड फोडून विचारुक नाय.

शरयू एक दिवस दुपारी इला आणि माका बोलला,”वैनी माका जरा तुझ्याशी खाजगी बोलूंचा आसा.” “मी म्हटलय बोल.” बाहेरची जाग घेत बोलला, “आप्पा खय? झोपलो की ऑफिसमध्ये गेलो.” मी म्हटलंय, “तुझो भाऊस, दुपारी तासभर झोपता. तुका ठावक नाय काय? पण काय सांगतस ता सांग.” तर म्हणाली “गे वैनी, समीर आणि पून्याचा काय ठीक नाय वाटणा. मी त्येका सांगलय आता कस्टमर कमी असतत तू जावं नको, काय तरी घराकडे मदत कर तर ऐकणा नाय आणि समीर बरोबर नको तशी वागता, समीर पण तिची खूप चेष्टा मस्करी करता, दिसाक बरा दिसणा नाय. समजला ना, मी काय म्हणतंय ता.”
मी रागावलय, “अहो ताई, ह्या काय सांगतास! भावंडा ती, केल्यानी मस्ती तर करीनत.” तर म्हणता, “तसा न्हय,पण मी असा ऐकलंय, वाटेत एकमेकाक खेटतत. आणिकव काय काय करतत, माझाच चडू, सांगाक लाज वाटता. लोक बोलाक लागले तर उद्या गावात तोंड दाखवक जागा रवाची नाय.” शरु बोलला. मी रागावलय, “तुमका कोणी काय सांगला,विश्वास कसो ठेवलास? पून्याक विचारलास काय? बाय गो, लोक अशाक असा बोलतत खरा काय ता माका सांग.प्रश्न सुटलो असतो.” ता म्हणाला, “नाय मी विचारणारच होतय, पण म्हटला आधी तुमच्या कानावर घालूया. उगाच गावभर बोंब कित्याक.” मी म्हटलय, पेडगावाक कित्याक जावचा. हो सूर्य हो जयंद्रथ, मी समीराक बोलवलय, थोड्या वेळान तो इलो. “काय गे कित्याक बोलवल? थय कामा पडलीत टेन्ट काढूचे हत,घरांवर ताडपत्री घालूची हा. बोल काय ता.” समीर सांगत रवलो. “तुझी कामा सदीचीच आसत,आत्या काय सांगता ता खरा आसा काय?” “आत्या काय सांगता ता आधी सांग मगे विचार ना? आत्या काय सांगता ता माका खय ठावक.” “तु आणि पूनम बरोबर वागणास नाय.” “कायव काय सांगत? बरोबर वागणव नाय म्हणजे काय करतव ता तरी सांग?” “वाटेत चाळे करतास,एकमेकाक खेटून चलतास आणिकव काय करतास, खरा मा? रे गाव हसता हे चाळे बघून” “ह्या कोणत्या चुतमारीच्यान सांगला, आमच्या पाळतीवर असता काय मायझयो? आमी काय करतव त्याच्याशी त्येचो काय संबध.” समीर बोललो.
“समीर, लोकाक गाळी घालून प्रश्न सुटाचो नाय. ह्या खरा का खोटा? ता माका सांग. “मी विचारलय “समजा खरा असला, तरी लोकांनी तेतूर नाक खुपसूची गरज काय? आमी त्यांच्ये भानगडी बघतव काय? आमी कायव करू, आमचा आमी बघू, लोकांका पंचायती कित्याक?”

“रे काय बोलत ? तुझ्या जिभेक काय हाडबीड आसा की नाय!” “आई, तु खरा काय विचारलस, म्हणान मी खरा ताच सांगतय, माका पूनम आवडता, मी तिका आवडतय आम्ही लगीन करतलव.” “रे, समीर ती आतेभयण तुझी, आते बहिणी वांगडा कोण लगीन करतत काय ? कायतरीच काय बोलत.” शरयू बोलली. मी समीराक सांगलय, “रे मेल्या, तु लाज सोडलस पण आम्ही सोडूक नाय, तुझो बापूस गप रवात काय? ता काय नाय, उद्या पासून ता हय येवचा नाय आणि तु त्येका भेटूक जाता नये, जर ही गोष्ट काकांका कळली तर तुझे पाय मोडून ठेवतीत आणि तुझो बापूस काय बोलाचोव नाय. शाणो बन आणि हो खुळो विचार सोडून दी.” “आते, माका ती आवडता आणि आते बहिणी वांगडा लगीन करता नये असा शास्त्र खय हा? समजा तसा असला, तरी आम्ही लग्न करतलव ह्या नक्की. शास्त्र गेला चुलीत. जर लगीन करूक नाय दिलास तर जीव देतलय.” समीर बोललो.





मी कपळावर हात मारलय, “रे मेल्या जीव काय वर इलोहा. पूनम अगोदर हय येय काय? तेवा तू जगा होतस मा? दोन तीन महिन्यात प्रेम झाला. आधी ती चिडीवर येता म्हणान कंपलेंट करी होतस ना आणि ह्या मेतकूट जुळवलास कधी? अगदीच रे विटंबना. आणि तु जीव दिलस तर आमी दोघा काय करू? तुका फक्त स्वार्थ कळता. बापाशीक बरा नसता ह्या नाय कळणा? आता ह्याका कोण समजावीत , पंचवीस वर्षाचो घोडो, काय लहान हा!”

“आई, ता माका काय ठावक नाय,आप्पाकां तूच सांग, माका पूनम व्हयी, मी तिच्याशीवाय जगू शकणय नाय. माका तुमचा नाता गोता कळणा नाय.” , समीर ओरडून बोललो. ह्यांका जाग इली तसे हे इले, “वायच पडल होतय काय चललहा, हो काम धंदो सोडून हय कित्याक इलोहा. आणि आरडता कित्याक ?” मी त्यांका सांगलय,लपून रवात काय? “तुमच्या झिलाचो पराक्रम आयका, पून्यावर त्याचा प्रेम जडला आणि तिच्या वांगडा लगीन करूचा हा त्याका.”

“काय? डोक्या फिरला काय रे ? आते बहिण ती, आतेबहिणी सोबत कोण लगीन करता? पावण्या रावण्यात खूप मुली आसत, आम्ही बघूया दुसरी. मुलींचो काय दुष्काळ आसा.” हे संतापले “आप्पा, माका दुसरी नको, तिसरी नको मी लगीन करतलय तर पूनम बरोबरच, माका कोणी विरोध केलास तर मी तोंड घेऊन जातलय नायतर समुद्रात उडी घालतलय.” ” रे उंडग्या, उडी घालूसाठीच तुका इतको मोठो केलो काय रे, ह्या बघ तुझ्या डोक्यात जा खुळ आसा ना ता चार फटके बसले म्हणजे कमी होईत. मी नाना काकांका बोलवन आणतय मगे तुका बरोबर कळतला.”

हे उठून वाटेक लागणार होते, तवसर शरयून ह्यांचो हात धरलो. ती भावाशीक म्हणाली. “घरगुती भांडणात नानाक कित्याक बोलवतस? तो आमचो चुलत भाव त्याका हेतूर कित्याक? आप्पा संसार कोण करतला? ती दोघा मा, उपडी लोळून खाणत नाय त्यांचा बरा वाईट त्यांका कळता. त्यांका काय करतत ता करूं दे. जा काय करूचा ता करा, पण हय नको, आमची संमती नाय असाच समजा. जे काय भानगडी होतीत ते तुमचे तुम्ही निस्तारूचे. आमची काय एक मदत होवची नाय.जमात? आम्ही काय एक ऐकूक नाय आणि तू आमका काय सांगूक नाय. उद्या पूनमच्या बापाशीक कळला तर दोष आमका देता नये,भांडणा होतीत. आणि ती भांडणा सोडवक आमका ताकद नाय, बरोबर मा वैनी.” “शरूताई ह्या काय? तुमचा डोक्या ठिक आसा ना?ओ, ह्या कळला तर पूनमचो बापूस उच्छाद करीत. काय तरी सल्लो कसो देतास? “

“शरयू, तू बोलतस ह्याच माका खरा वाटणा नाय, गो आवशी बापाशीच्या संमती शिवाय लगीन केलस तेवा त्यांच्या मनाक किती त्रास झालो, विचार केलस काय? तुझी आवस तुझ्या लग्नाच्या वक्ताक सैरभैर झाली होती, आठव जरा. ” “आप्पा, वैनी, माका सगळा आठवता पण आता या पोरांपुढे इलाज हरलो तर काय करशीत? झाकली मुठ सव्वालाखाची. समीर चार दिवसात ह्याचो सोक्षमोक्ष लागाक व्हयो, वाडीक जा. थय तळ्याजवळ वैदिक पध्दतीत लग्न करतत, सोमता कोर्ट रजिस्टर मॅरेज कर, दाखलो घेवनच गावात ये कळला. पुढे काय ता बघू.” हे बहिणीवर रागावले, “शरू तू व्हयता काय ता करून बसलस आणि आता ह्याका तोच सल्लो देतस. माका न विचारता त्याका सांगतस लगीन करून मोकळो हो म्हणान तुझी हिंमत कशी झाली?”

“रे आप्पा, मी लगीन केलय त्याका तेवीस वर्षा झाली. जग बदलला आता आमच्या गावात बामणानी भागेल्यांची चडवा लगीन करून आणलीहत, तुका काय ठाऊक नाय? किती पोरांनी खालच्या जातीच्या पोरी पळवून हाडले. लग्ना केली. आता जात फक्त नावाक रवलीहा. उगाच पोरानी नको तो उपद्व्याप करण्यापेक्षा आमीच मोठेपणा दाखवलो तर काय होईत? “. हे तरी तिच्यावर संतापत बोलले, “इतको मोठो निर्णय घेतस घोवाक विचारलस काय? शरू, हो पोरखेळ न्हय, कदम आतासो खय तुका माहेराक धाडता, डोक्याक संताप झालो तर कायेव करीत. “आप्पा मी पून्याक विचारलय,त्याका ह्या सगळा ठाऊक हा, पण ता मनान आता समीराक आपलो मानता,काय होईत ता भोगूची त्येची तयारी हा. माका ठाऊक हा वादळ येतलाच. म्हणान ठरवलय.हे बोलतीत, मारतीत ता निमूट सहन करतलय पण पून्याक समीराक देऊन मोकळी होतलय. चार लोकांनी माझ्या चडवाची बदनामी करण्यापेक्षा लग्न लावलेला काय वाईट. “

समीरान आत्येचे पाय धरले,”आत्या, तु सांगशीत तसा मी करतय पण काका रागावर येवचे नाय मा?” “मेल्या, ह्याचो विचार आधीच करूक व्हयो होतो. आता माकाच काय तरी मार्ग काढूक व्हयो. पूनमचो बापूस आग्या वेताळ हा, कसा तरी त्यांका शांत करूक व्हया.” “शरयूताई, आमच्या ह्यांची तब्येत असली,उद्या कदमांनी हय गोंधळ घातलो तर काय होईत ता ठाऊक आसा ना,संताप करून घेतीत? तुमका सगळी गम्मत वाटता काय? वादळ होईत घरात, वादळ.”

“वैनी माका वादळाचो अनुभव आसा.तु काळजी करू नको. पोरांनी शाण खाण्या अगोदर आपणच मार्गाक लावलेली बरी,खरा मा. आप्पा, रे ह्या उभारलस ता मुलासाठीच ना, वेळ इली तर आपण पडता घेवक व्हया. संताप करुन काय फायदो?” आमचे हे बहिणीची मुक्ताफळा ऐकून बोलले, “शरू, माका असली झंगटा करुची सवय नाय,पण तुझ्यासाठी मी गप रवतय. पण उद्या पून्याचो बापूस माका काय बोललो तर मी गप रवचय नाय, ह्या बारीक ध्यानात ठेव” “शरू बोलला,”जा काय होयत त्याची जबाबदारी माझी मग तर झाला. एवड्या तेवड्या कारणा वरसून जीव देवक नको.

शरूच्या धाडसाचा आश्चर्य वाटला. पण आता मार्ग नव्हतो. ती म्हणता ता खराच होता. मुलांची चूक आवशीकच सुधारूक व्हयी. सासवेन चार काकणा दिलेली होती त्यातली दोन शरूक देण्याऐवजी तिच्या चडवाक दिली म्हणजे आपल्याच घरात रवली. हो विचार मी मनात केलय,ह्यांका सांगल्याशिवाय आज पर्यंत काय करूक नाय आता काय कपाळ करतलय?

शरू गेला तसा मी समीराक बडबडलय,”रे मेल्या प्रेम करूक तुका पूनमच गावली,आता खय आत्तेची गाडी रूळावर येय होती. उद्या तुझ्या बापाशीक नसता पटला तर घराबाहेर काढल्यांनी असता, बापाशीक बरा नाय ठाऊक हा ना, असो कसो रे तु? त्या पूनमचो बाप चक्रम हा, आता आत्तेची धडगत नाय, काय ? सांगतस पून्यावर प्रेम आसा म्हणान ! लक्षात ठेव, बापूस काय जरी बोललो तरी डोक्या थंड ठेव, उलट उत्तर करू नको समजला. उद्या त्यांका काय झाला तर मी पाठी रवाचय नाय.”

मी इतक्या बोललय पण समीरान तोंडातून एक शब्द काढूक नाय. मीच ठरवलय ह्यांचो मुड बरो असलो तर विषय काडून बघूक हरकत काय? संध्याकाळी मी तांदूळ निवडीत बसल होतय,इतक्यात हे आले, “गो स वाजत इले च्या नाय ठेवल? शरूचो उपाय ऐकून मस्तक बाद झाला. मी चहा दिलय तसे हेच म्हणाले, तुका वाटता ह्या सोप्प्या हा. तो कदम कुदतलो.आमचा रत्न(मुलगो) अर्धवट शिकलेलो आणि ता ग्रज्युएट. त्याका पसंत नको. हे माझ्याकडे विचित्र नजरेन बघीत म्हणाले, “खुळावलस काय तु, पूनम तुका सून म्हणून चलात? असा नंडेचा चडू तुका चलात. आमच्यात असा लग्न कुणी केलेला ऐकल काय? माका काय ठिक वाटणा नाय, शरूचा मस्तक फिरला तुझा जाग्यावर आसा ना ? “



affiliate link

“ओ! आता ह्या महाभारत थांबवा, समीरान उद्या एखादी गाबताची पोरगी आणली तर चलात काय तुमका? पूनम तुमच्या बहिणीचा चडू हा, शिस्त आसा, कामाची सवय हा.नाकी डोळी हा, आता मावस भाऊ-बहीण लगीन करतत, ही तर आतेभावंडा त्याका काय होता.”

“गो अचानक ह्या खुळ कुठून काढल? आमचे पावणे रावणे काय म्हणतीत? शरयूचो घोव काय म्हणात? लोक हसतीत ह्या लग्नाक. माका तोंड दाखवूक नको कोणाक. माका ही गोष्ट पटण्यासारखी नाय.उगाच माका भरीक घालू नको.माझी व्हयत्या लग्नाक संमती मुळीच मिळाची नाय.लोक पाठसून नावा ठेवल्याशिवाय रवाचे नाय.” “अहो काय तरीच काय? आमी त्येका पळवून नाय आणणव, मानान घेवन येतव आणि लोकांच्या तोंडाक आमी कित्याक लागाया. मी काय ता बरोबर करतय. तुमका त्येची काळजी नको. तुम्ही मगाशी शरु समोर काय बोलाक नाय आणि आता पूना तिच टेप कित्याक, त्या विठ्ठलाच्या मनात जा काय आसा तसा होईत.”

हे म्हणाले, “ही गोष्ट गावभर जाता नये, आता तुझो झील कळीवरच इलोहा तर कदमाक विचारून बघू, पण मी काय त्याच्या पाया पडूक जावचय नाय ह्या नीट लक्षात ठेव.” “शरयूच्या घोवाक तुमीच पटवन सांगा,बघा काय म्हणतत ते.”मी बोललय दोन दिवस शरयूचो पत्तो नाय, शेवटी मी फोन केलय तर रडाक लागला, मी विचारलय, “ओ ताई काय झाला? दोन दिवस ह्या वाटेक नाय.” तर म्हणाला, पून्याक मारल्यानी, माका गाळी घातल्यानी, म्हणाले, “अजीबात थय जाता नये. माझी पोरगी काय वाटेवर सांडली हा काय? तिका ग्राज्युएट केलय, समीराचा शिक्षण काय? समीराक अजीबात देवचय नाय.” दोन दिवस कारखान्यात जावक नाय.आमच्या पाळतीवर होते.”

मी तिची समजूत घातलय, हय काय घडला ता तिका सांगलय आणि म्हणालय, “तुझ्या भावाशीची समजूत मी कशीबशी काडलीहा, मनात इला तर तो मार्ग काढीत अजीबात घाबरा नको. रात्री ह्यांच्या कानावर घातलय तर म्हणाले, “कदम स्वतःक कोण समजता, जर पून्याची तयारी असात तर बापूस तिका आडकाठी करुक शकणा नाय.”

समीर तसो धास्तावलो होतो. कस्टमर इले तरी त्यांच्यावर लक्ष देईनसो त्याका वाटयना. आमचे हे हार्ट पेशन्ट असून खंबीर. त्याका म्हणाले, “जा तु आराम कर, मी आसय ना, मी हयला बघतय.” माका आश्चर्य वाटला,आमचे हे शरयूक मराठ्यांचा, म्हणून हिणवीत आणि आता आपणच झिलाक प्रोत्साहन देतत. तो रडकुंडीक इलो, “आप्पा माझ्यामुळे तुमका उगीचच त्रास, पून्याक काकांनी मारला असा आई म्हणा होती. मी कदम काकांक सांगतय लागल्यास पून्याक माका नाय दिला तरी चलात पण त्येका मारू नको.” हे समीरवर चिडले. म्हणाले, “रे, चूप रव बायल माणसावानी रडत कित्याक, आमी इतक्या सांगूनव तुझ्या टाळक्यात जाणा नाय मा, मग ठिक. जा होयत ता होयत. मी एकदा कदमाक सांगून बघतय. नाय आयकलो, तर तु पून्याक फोन करून सांग, आमी पळून जावन लगीन करूया म्हणान. बघूया तरी तिची तयारी आसा की नाय! तु भिया नको मी सगळी तयारी करतय.”

दुपारी त्यांनी शरयूक फोन केलो, आणि घोवाकडे देवक सांगितलो, ते फोन घेईनात, कदम म्हणाले, माका त्या बामणाबरोबर बोलण्याची इच्छा नाय. शेवटी ह्यानी त्यांच्या मोबाईलवर फोन केलो, आदी त्यानी उडवा उडवीची उत्तरा दिली. कदमाक ह्यानी गोडीगुलाबीने सांगून बघाल्यानी, त्यांचा स्वतःचा उदाहरण दिल्यानी तरी कदम बधेना, हे म्हणाले माझी विनंती तूमका मान्य नाय तर विषय संपलो. त्यांका काय माहित ठाकूरांचा पाणी काय आसा ता?

कदमाक वाटला,बरा झाला, आता विषय संपलो तर पुढचे भानगडी टळले. दोन दिवस हे शांत रवले आणि कोर्ट मॅरेजसाठी फॉर्म घेऊन इले. कदम बेसावध झालो, फॅक्टरीत जावक लागलो,घरी किती दिवस बसान रवात. ह्यानी शरूक पूर्ण कल्पना दिली. नाईलाज झालो,जी गोष्ट, जा कार्य गोडी गुलाबीत होवचा होता त्यात वाकडेपणा इलो. एक दिवस पूनमाक घेऊन हे सावंतवाडीक गेले आणि रजिस्टर लग्न करून पूनम घरी इली.

दुपारी ह्यांनीच कदमाक फोन करून सांगल्यानी, समीर आणि पूनमचा लग्न रितसर लावून मी घरी इलय, माझी तुमका विनंती आसा, मुला एकमेकांवर प्रेम करतत, तुमी सुद्धा शरयूवर प्रेम केलास, लग्न केलास. आपलो हिशेब पुरो झालो.राग मानू नये लहान मुलांका आशिर्वाद देवा.”

कदम संध्याकाळी व्हिक्टर सरपंचाक घेऊन घरी इले, ह्यांच्या नावान शिमगो केल्यानी, ” म्हणाले, चडवाक न्हेवक इलय, बऱ्या बोलान पाठवलास तर ठीक, नाय तर काय करीन ता बघा.” हे शांतपणे म्हणाले,”भावोजी हो लग्नाचो दाखलो, मी तुमका विनंती केलंय, तुम्ही नंतर विचार करूया म्हटला असतास तर थांबाक माझी हरकत नव्हती, त्या पोरग्याक तुम्ही मारलास, ह्या माका आवडला नाय. तुम्ही माझ्या बहिणीशी लगीन केलास ता योग्य आणि हया मुलांनी केला तर अयोग्य, ता कसा? माका समजावून सांगशात. माका मुलाचा लग्न थाटात करुची इच्छा होती, तुम्ही मोडतो घातलास. झाकली मुठ सव्वा लाखाची, झाल्या प्रकाराबद्दल “मी “माफी मागतंय. पोरांवर राग धरू नको.”

कदमांनी ह्यांका आवशीवरसून गाळी घातल्यानी आणिले म्हणाले, “तु घराच्या भायर कसो पडतस तो बघतय? पोरग्याक घेवन गेलय नाय तर बापाचा नाव लावचय नाय. कदम म्हणतत माका”! हे म्हणाले, “माका धमकी देऊ नको,कोर्टात रीतसर लग्न झाला हा. वकील बरोबर होतो, त्याका परिस्थिती ठाऊक हा, अजूनव मी विनंती करतय , वाईटपणा नको. पोरगी एकमेकावर प्रेम करतत. पळान जाण्या पेक्षा, जीवाचा बरा वाईट करण्यापेक्षा ह्या काय वाईट? झाला गेला विसरान जा,मुलांका आशीर्वाद दी.”

व्हिक्टर, कदमाक म्हणाले, “कदम भाऊ,आता तापातापीन उपयोग नाय समजूतीन घेवा, ठाकूर म्हणतत ता बरोबर वाटता. जर ह्या कोर्ट मॅरेज झाला तर त्याच्या विरोधात आपण काही करणे गुन्हो ठरता. दोघाव वयान मोठी आसत, त्यांनी समजून उमजून लगीन केलहा. माझी विनंती आसा, ह्या कपातला वादळ कपात रवात तर बरा. उद्या लोकांच्या कानापर्यंत पोचला तर लोक नसते बातमे पेरतीत.दोघांची बदनामी होण्यापेक्षा हयच वाद संपवा, ता दोघांकव पूढे बरा.”

कदम तरी धुसफूसत होते. ह्यांका म्हणाले, ” गोड बोलान फसवलस. आधी सांगलास मदतीक धाडा आणि आता त्येका फूस लावून आपल्या सारख्खा केलास हीच काय तुमची बामण निती? माजा पोरग्या काय वाटेवर सांडलहा काय? ” शेवटी ह्यानी हात जोडले आणि म्हणाले, “कदम भावजी तुमचो गैरसमज झालोहा. मुलांच्या या प्रकरणात आमचो अजीबात हात नाय, उलट मी आमच्या झिलाक सांगलय, तु पूनमचो नाद सोड पण म्हणालो आमका लगीन करूक आडकाठी केलास तर जीव देतलय. आता सांगा हेतूर आमची काय चुकी आसा काय? तुम्ही वयान ल्हान असलास तरी मी मुलांसाठी हात जोडून माफी मागतंय, असा काय होईत ह्याची माका विठ्ठला शप्पत कल्पना नाय. तुमी आपल्या बायकोक विचारा, त्येणाच ही गोष्ट आमच्या हयाच्या कानावर घातली. मुला तरुण आसत त्यांच्या हातून काय तरी चूक होव नये, म्हणान आमी सावध झालव इतक्याच.



affiliate link

आता हेतूर आमचा खय चूकला ता सांगा. त्यांच्यासाठी आमचो वाद संपवया आणि हया मुलांका आशिर्वाद देवन आपले संबंध जसे होते तसे ठेवया. भावोजी, संतापाक डोळे नसतत. माणूस अविचारान काही करून बसता त्याचो पश्चाताप झालो तरी, झालेला नुकसान भरून येणा नाय. अविचाराचा वादळ वेळीच थोपवक व्हया, नायतर भरलो संसार नष्ट करूनव वादळ शांत जाणा नाय. तुमका पटता तर बघा नाय तर तुमची इच्छा.”

कदम तरीही ताठ्यात म्हणाले, “तुमी विठ्ठलाची शपथ घेतास म्हणान मी सोडतय, नायतर आज एकाचो तरी खूनच पाडल असतय, मग जेलात गेल असतय तरी फिकीर नव्हती.” व्हिक्टर हसून म्हणाले, “कदम, हीच ती वाईट वृत्ती, ठाकूरांनी इतक्या समजावून हरी दासाची कथा मूळ पदावर. बिचारो माफी मागता, तरी तुमचो ताठो कमी जाणा नाय. मी तुमच्या बरोबर झक मारूक इलय काय? तोंड आसा म्हणान कायव बोला नये. तुमी केलास ता शाणपणा बाकीच्यांनी केलो तर गून्हो, ह्या म्हणण्याक काय अर्थ? शरयूक पळवन नेलास तेवा हो विचार कित्याक नाय केललास? केलेला हयच भोगूचा लागता, ता ह्या असा. झाला तितक्या शाणपण पुरे. आता एकमेकांका माफ करा आणि सोडून द्या.”

आमच्या ह्यांनी हात जोडले. तसे ह्यांचे दोन्ही हात हातात धरून कदम म्हणाले,”ठाकूर, तुम्ही वयान मोठे, पाया पडून माका लाज आणू नको, अहो! माका चडवाक पुढे शिकवची इच्छा होती. तुम्ही आग्रह धरलास म्हणान मदतीक धाडली. ता अभ्यासात हुशार होता. पून्या असा खुळचट विचार करीत असा वाटला नव्हता. म्हणान माझो संताप झालो. रागाच्या भरात तूमका गाळीव घातलय. लहान भाऊ समजून माफ करा”

दोघांनी गळा भेट घेतली. आणि म्हणाले, “पुनमवर तुम्ही रागवलास. त्याका मारलास. आमच्या शरयूक मारलास. रागाच्या भावनेत गोष्ट घडून गेली. माका झिलाचो राग इलेलो,पण विचार केलय,शेवटी आम्ही मोठी माणसा धडपडतव ती मुलांच्या भविष्यासाठीच ना! आता तो जाणतो झालो, त्याका हक्काचा माणूस व्हया तर खळखळ करून काय उपयोग? जर त्याच्या मनासारखी जोडीदार त्याका मिळाली, तर ठरवीना. शरयू तुमच्यासाठी, बापाशीचा घर सोडून गेला होता की. पूनम समीरसाठी आमच्या घराक इला, ही सगळी त्या विठ्ठलाची करणी, त्येची इच्छा. तुम्ही शरूक प्रेम देवचा सोडून तिच्यावर हात उचललास तरी ती बापडी शांत रवली.आता एकच करा रजिस्टर लग्न झाला हो विषय तुमच्या माझ्यात ठेवया. तुमच्या घराकडे मांडव घालून चडवाचा धुमधडाक्यात लगीन लावून देवा.आमका काय येक नको तुमचा.”

पूनम तुमचा चडू. शरू आणि तुमी कन्यादान करा. गावात आमंत्रण द्या तुमका लागात ती मदत मी करतय. राणीक बोलवन घेवया. मानपान काय नको पण पोरांका थोरा मोठ्यांचो आशिर्वाद व्हयोच.” कदमांनी ह्यांचा ऐकून मिठी मारली म्हणाले, “ठाकूर, तुमचा मन लय मोठा. तुमी म्हणतास तसा करुय, माका पंधरा दिवस द्या,मी कोणाक तरी मदतीक घेतय आणि जमात तसो लवकरचो मुहूर्त धरून ह्यांका मोकळे करु.” व्हिक्टर म्हणालो, “ठाकूर वैनी, पयलो चहा ठेवा आणि सुनेच्या हातून पाठवा.”

पूनम चहा घेऊन इला. हिरव्या शालूत पूनम सुंदर दिसत होता.ती बापाशीच्या आणि व्हिक्टर अंकलच्या पाया पडली. समीर सुध्दा दोघांच्या पाया पडलो.हे समीराक म्हणाले, “मेल्या, लाजत काय? जोडीन पाया पडा, व्हिक्टर अंकलचे आशिर्वाद घेवा. घरावर इलेला वादळ घोंघावत रवला पण आमच्या पूर्वजांची पूण्याई थोर म्हणान या विचारांच्या वादळाक हयांनी शांतपणे तोंड दिला. कदमांनी ‘गाळी ‘घालून सुध्दा हे शांत रवले. पोरांचो संसार विस्कटूक नको म्हणून आमच्या ह्यांनी शर्थीचे प्रयत्न केले आणि वादळ माणसाळला आणि शांत झाला.

पंधरा दिवसांनी, शरयूच्या दारात मांडव सजलो,माझे दोन्ही भावस आणि वैनी मुलांसह भाच्याच्या लग्नाक इली. राणी आणि तिचो घोव चार दिवस अगोदरच इला राणीन समीराक चांगलोच फैलावर घेतलो. माका शाणपण शिकवीत होतस ना,मग आता शाण कित्याक खाल्लस. आप्पाकां तुझ्यापाई किती त्रास झालो. मी आप्पांका कदीच मान खाली घालूक लावूक नाय. तो वरमलो आणि म्हणालो, “चुकला म्हणतय मी, पण, तु लग्नाक इलस का माझी हजेरी घेवक ता ठरव आदी”. शेवटी बहिण भाव भांडले आणि एकव झाले. कामत चार पाच दिवस अगोदर इले. त्यांका मनासारो पाहुणचार केलो. आमच्याकडे कामाक असणाऱ्या सगळ्या माणसांका लग्नाचा आमंत्रण दिला. शेवटी त्यांच्या जीवावर हो धंदो आसा. त्यांनी पावणे इले तरी आमी मदतीक आसव असा आश्वासन दिल्यानी, त्यामुळे घरातलो स्वैपाक करण्याचो बोवाळ आटोक्यात इलो.

ह्यांनी पत्रीका वाटण्यासाठी गाव वाटून घेतल्यानी. अर्धे पत्रीका कदमांनी वाटले, अर्धे हयांनी वाटले. समीरचे मित्र आमच्या दारातलो मांडव घालूक इले. आमचो शरद त्यांच्या मदतीक होतोच. त्यामुळे भेडल्याची सोपा आणि माडांच्या विणलेल्या चुडतांनीमांडवाक शोभा इली. घरातला शेवटचा लगीन म्हणान जून म्हयनो होतो तरी मुंबयकरा इली. घर भरान गेला. आमची शरयू येवन भावाशीक कडकडून भेटली आणि म्हणाली, “तु म्हणान ह्या निभावलस.”

ह्यानी स्वतःच्या पसंतीन सुनेक, माका, शरयूक आणि राणीक शालू आणल्यांनी. कुडाळातसून मेकअप करूक एक पोरग्या आदल्या दिवशी मुक्काःमाक इला. माझ्या आईक आणि माझ्या दोन्ही भावांका आणि भावजयींका साडी आणि कपडे दिल्यांनी. चडवाक आणि जावयाक कपडे घेतले. मी ह्यांका सांगलय, राणीच्या लग्नाक काय कमी खर्च केलास पुना इतको खर्च करण्याची गरज आसा काय? पण आयकतीत तर शप्पथ. म्हणाक लागले, “गो, माझ्या समोरचा ह्या शेवटचा लगीन. मी धडधाकट रवलय तर पूढचा म्हणान जमात ता करतलय.”

समीरची वरात न्हेवक मालवणातून गाडी आणली. समीरच्या मित्र मंडळींनी बँजो आणलो. वाजत गाजत वरात पूनमच्या घराकडे नेली. देव ब्राह्मणाच्या साक्षीन लगीन झाला. सात आठशे माणसा लग्नाक होती.कुडाळचो कॅटरर जेवणाक होतो. संध्याकाळी वरात घराकडे इली. पूनम माप ओलांडून घरात इला. ह्यांच्या आवशीचो मोठो फोटो लोट्यावर आसा, त्याका हार घालून दोघा पाया पडली.त्या माऊलींच्या आशिर्वादान पोरांचा भला होउं दे, मी मनात गाराणा घातलय.

संसारावर येणारा वादळ शांत झाला. लग्न झाल्यावर पयलो मान त्या सागराक दिलो, तोच आमचो ब्राह्मण, तोच विठ्ठल आणि तोच आमच्या गावाचो राखणदार. आता आमचो समीर आणि पूनम दोघाव “सागर रिसॉर्ट” सांभाळतत आणि आमचे हे नातवाक घेवन निवांत आराम करतत. समीराक जाणीव आसा, ह्या वैभव आमच्या ह्यांनी हिकमतीन कष्टावर उभ्या केलेला आसा. आमच्या वाडवडीलांची कृपा म्हणानच हो धंदो उत्तम चललोहा. ही कर्ली, तारकर्ली आणि समोरचो अथांग सागर ह्याच आमचा वैभव. वादळ इला आणि गेला पण आमच्या विठ्ठलाच्या कृपेने आम्ही पूना उभे रवलव, ह्या वादळाची आमका आणि आमची वादळाक सवय झाली हा.

भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६

                           समाप्त
Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

3 thoughts on “आणि वादळ माणसाळले भाग ६

  1. आणि वादळ माणसाळले भाग ४ - प रि व र्त न

    […] भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ […]

  2. आणि वादळ माणसाळले भाग ३ - प रि व र्त न

    […] भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ […]

  3. zovrelioptor

    I just couldn’t depart your website prior to suggesting that I really loved the usual information an individual supply in your guests? Is gonna be again steadily in order to investigate cross-check new posts.

Comments are closed.